लिंगायत 900 वर्षा नंतर जागा झाला .....तो लिंगायत महामोर्चाच्या रूपात

चलो बेलगाव....22 August

चलो गूलबरगा.....26 August

चलो लातुर.....3 September

लिंगायत स्वतंत्र धर्म व राष्ट्रीय अल्पसंख्याक धर्म या मागणीसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश इ. राज्यात भव्यदिव्य लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येत आहेत. कर्नाटक राज्यातील बिदर, कर्नाटक राज्याची उपराजधानी बेळगावी, कर्नाटक राज्यातील कलबुर्गी, महाराष्ट्र राज्यातील लातुर, आंध्रप्रदेश राज्यातील हैदराबाद इ. अनेक राज्यातून भव्यदिव्य लिंगायत महामोर्चा काढण्यात येणार आहेत.

‘एक लिंगायत – कोटी लिंगायत’ या हाकेला साद देत.बिदर लिंगायत महामोर्चा काढल्यानंतर, लातुरत 3 सप्टेंबरला लिंगायत महामोर्चा निघणार आहे.

लिंगायत वादळ एका समुदायाचे प्रतिनिधित्व करीत असलं तरी त्याच्या मागण्या या रास्त आहेत. म्हणूनच या मोर्चेकरांच्या मागण्या सहजपणे मान्य केल्या तर लिंगायत समाज डोईजड होईल. देशभरात पुन्हा यांचेच वर्चस्व राहील. या पक्क्या जाणिवेनेच अद्याप राज्य व केंद्र सरकार या समुदायाकडे दुर्लक्ष करीत आहे.

आपल्या पुढच्या पिढय़ांच्या न्याय्य हक्कांसाठी ...

लिंगायत समाजाची तरुण पिढी आपला हक्क सोडणार नाही, इतपत ती जागृत झाली आहे. फक्त तरुणच नाही तर तरुणी अन् महिलाही आता या महा मोर्चात आपला उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या आहेत. न्याय मिळेपर्यंत यापैकी कुणीच शांत बसणार नाही. हे वादळ आता चिरंतन आणि निरंतर पेटतीच राहणार आहे.

आपण बिदरच्या मोर्चाने कर्नाटक सरकारला जागे केलय आता वेळ आहे महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्याची म्हणून आपल्या शरणाची एकता दाखवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं.

Previousबेळगावि संमेलनलिंगायत धर्मNext