लिंगायत धर्म संस्कार

इष्टलिंग धारण करणे हा मुख्य नियम आहे है जाणून घेतले. पण ते इष्टलिंग प्रत्येक व्यक्तीने गुरूकडून मंत्रोपदेशासह स्वीकार करावयास हवे आपले आपण शरीरावर लिंग धारण करणारा तो सामाजिक अर्थाने लिंगायत होऊ शकतो. पण धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपात लिंगायत होण्यास गुरूकडूनच इष्टलिंग ध्यावे लागते. ’नेणत्या मानवाला जाणाता शरण’ होण्यास त्यास संस्काराची आवश्यकता आहे. धर्म जन्माने येत नाहीं तर संस्काराने येतो. म. बसवेशांचे भाचे चन्नबसव म्हण्तात

असा वीराचार दृढ केल्याशिवाय
वीरवंशात जन्म घेतला म्हणून वीरशैव होणे नाही
कूडल चन्नसंगमदेवा (च.ब.व. ११५)

वैधकीय परीक्षा देऊन पास झाल्याशिवाय केवल वैद्याचा मुलगा म्हणून त्या मुलास वैद्य म्हणणे जसे हास्यास्पद ठरते तदूवत संस्काराशिवाय नुसते जमाने लिंगायत होणे हास्यास्पद होय म्हणून चन्नबसव म्हणतात

भक्ताज्या पोटी जन्म घेणारा तो भक्त होणे नाहीं
गुरूच्या कृपेने लिंगधारण केल्याशिवाय भक्त होणे नाही
त्यांना भक्त म्हणून वाग्विल्यास, म्हणावे लागेल भक्तीहीन
कुंडल चन्नसंगम देवाचे हेच बचन (च.ब.व. ४२४)

म्हणून जन्मत: सर्व मानव या धर्मात भवी असता, नंतर गुरूंच्या कृपेने तो भक्त शरण बनतो.

लिंग संस्कारात दोन प्रकार आहेत. प्रथम लिंगधरणा, नंतर लिंगदीक्षा, स्त्री गर्भवती असताना सातव्या अगर आठव्या महिन्यातच गर्भातील बाळाकरिता मंत्रोपदेश देणे आवश्यक आहे. मातेच्या आहार विहाराचा परिणाम बाळावर होत असल्याकारणाने अध्यात्मिक संस्काराचा परिणाम त्या बाळावर होत असतो. हा संस्वार स्त्री गरोदर असताना झला नाही तर बाळंतपण झाल्याबरोबर बाळाला लिंगधारणा करावी.

जन्मलेल्या शिशुस लिंगधारणा न करता
यातेचे स्तनपान, म्ध न देणे हाच वीसावा आचारअ
असे चन्नबसवेशांचे दुसरे वचन आहे ( च. ब. व. ११२)

शिवभक्ताचे शिशु भूमीवर पडल्याबरोबर
विभूती लावून गळ्यात लिंग्धारणा करून,
पादोदकाने स्थान घालून, प्रसादाचे दूध, लोणी याने न्हाऊ घालून
पोषण करणे, हाच आचार. दूसरी भूत शांती करणे नाही (च.ब.व. ३९९)

मूल जन्मल्याबरोबर संस्कार करणे झाले नाही तर अकराव्या दिवशी तरी हा संस्कार व्हावयास हवा. दुसरा संस्कार म्हाणजे लिंगदीक्षा. मुलगी असो वा मुलगा कोणताही भेदभाव न करता त्यना गुरूकडून अनुग्रह धावा बालकास समजू लागल्यावर तो स्वत: पूजा करण्यासाठी त्याचे वय बारा तेरा वर्षाचे तरी व्हावयास हवे. या वयात त्याला लिंग्दीक्षा करवावे. दीक्षेशिवाय मोक्ष नही (च.ब.व.४६,११५)बीक्षा घेणे हे आद्यकर्तव्य होया लिंगधारणा हा ’वाङूनिश्च्य’ कार्याप्रमाणे तर 'लिंगदीक्षा' हे लग्नकार्याप्रमाणे आहे. केवळ वधु वर ठरविणे हे कार्य म्हणजे
’वाङूनिश्च्य’ होय. पण त्यांना सामाजिकरित्या जोडीने राहण्यास परवानगी नसते. याचप्रमाणे हा लिंगदीक्षेमुळे ही व्यक्ती याच धर्माचा अनुयायी म्हणून ओळखला जातो. आपण स्वत: लिंगपूजा करून त्याचा आनंद मिळविण्यास लिंगदीक्षा घेणे जरूरीचे आहे. निश्चय कार्याच्या वेळी (मुलामुलीचे) अईवडील आपल्य मुलामुलीला दिल्याधेताल्याचे ठरवितात पण लग्रात स्वत: वधूवरच समोरा समोरच येऊन वैवाहीक जीवनात एकरूप होतात. तसेच लिंगधारणेच्य वेळी आईवडील मुलाच्याव्तीने प्रतिज्ञा करतात. तर लिंगदीक्षेच्या वेळी स्वत: परिक्कता साधलेली व्यक्तीच प्रतिज्ञाबद्ध होते. आपला विश्वास आचरण व्यक्तीश: सामालिकरित्या लिंगदीक्षेच्या वेळी ती व्यक्ती घोषणा करते. आपल्या आईवडिलंनी घेतलेल्या प्रतिज्ञेल ती स्थीर बनवते.

लिंग्दीक्षेला तात्विक,योगिक, मनोशास्त्रीय सामाजीक अर्थसंपत्ती आहे. सर्व लींगायतानी वायाच्या चौदा पंधराव्या वर्षी सद्गुरूकडून या सात्यांचा लाभ ध्यावयास हवा.

लिंगदीक्षा म्हणजे गुरूकरणेचा लाभ मिळविणे आणि लिंगांग संबंधी होणे होया.

"दीयते लिंग संबंध: क्षीयतेच मलत्रया!
दीयते क्षीयते यस्मात् सा दीक्षेति निगधते!!" मग्गेय मायीदेव-(शिवानुभव परिच्छेद-१५-२८)

रुथूल, सुक्ष्म, कारण या तनुत्रयात असलेला कार्मिक, माया, अणव मलत्रयांचा नाश करून इष्ट, प्राण,भाव लिंग्त्रयांचा, क्रीया, मंत्र, वेधदीक्षात्रय घेऊन लिंगांग सामरस्याच्या मार्गावर चालण्यास लावणारा धार्मीक संस्कग्रर म्हणजेच दीक्षा होया. अशी दीक्षा धेतल्यावरच आपण परमात्म्याच्य मार्गाकडे वळलो अशी भावना त्या व्यक्तीत स्थिर होते. धर्मगुरूँची तत्वे आपाल्या आचरणात आणण्याची कबूली दिल्याप्रमाणे होते. आपण एक विशिष्ट आचार, विचार असणात्या समाजाचे एक अंग, एक घटक असल्याचे दाखविल्या सारखे होते. Turning towards God, Turning towards Basava and joining the holy fellowship.

Previousलिंगायत शब्दाचा अर्थलिंगायत, महात्मा बसवेश्वर, गुरु बसवNext