लिंगायत शब्दाचा अर्थ

जगविस्तार, नभोविस्तार
विस्तारातीत असे तत्व विस्तार
पाताळातीत तव श्री चरण असे!
ब्रम्हांडातीत तव श्री मुकूट असे!
अगम्य-अगोचर-अप्रतिम हे इष्टलिंग,
इवलासा झाला देऊनि माझ्या हाता,
हे कुंडल संगमनथा! (बसव बचना)

संपूर्ण विश्रात आत बाहेर व्यापलेला परमात्मा हा विराट रूपी आहे. तो अंतर्यामी ही आहे तसेच अतीतही आहे असा असलेला परमात्मा अगदी छोटासा आकार घेऊन इष्टलिंग रूपाने भक्ताच्या करकमलांत म्हण्जे डाव्या हाताच्या तळ्व्यात येतो हे इष्टलिंग विश्वरूपी महालिंगाचे छोटे रूप, अकार होय. चेतन्यमय परवस्तुपासून सचराचर सृष्टी जेथे प्रकट झाली, जैथे लीला

दाखवून, ज्यांत विसर्जन पावतो त्या सत्- चित्- आनंद रूपी परमात्मास लिंगायत प्रक्रीयेत्त 'लिंग' म्हणून संबोधिले जाते. अशा या परवस्तूस विश्राचा आकार असलेल्या गोलाकारात लहान रूप देऊन शरीरावर धारण करतो तोच लिंगायत होय. लिंगायतास लिंगवंतही म्हटले जाते. धन असलेला धनवंत, गुणी असलेला गुणवंत, विधा असलेला बिधावंत, श्री असलेला श्रीमंत याप्रमाणे लिंग असलेला लिंगावंत, जो अंगवर लिंग धारण करीत नाही तो लिंगायत नव्हे लिंगायतास वीरशैव, लिंगांगि, लिंगसंगी, जंगम, सिरिजंगम आशाही नावे आहेत.

या धर्मातील मुख्य महत्वाचा नियम म्ह्णजे इष्टलिंग धारण केल्याने एक व्यक्ती लिंगायत होते जन्मामुळे नव्हे.

जन्मत: लिंगायत म्हणवून घेणारा पण इष्टलिंग धारणा न करणरा व्रतहीन आसून समाजापासून बाहेर असलेला होय असे शाणांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

कोणत्याही कारणमुळे लिंगाला काढून ठेवलेला आणि जन्मत: आपण लिंगायत आहोत म्हणून खोटे बोलणात्या बद्दल गुरूबसवेशांनी कठोरपणे टीका केलेली आहे.

लिंग नसता चालणार, लिंग नसता बोलणारा
लिंग नसता थुंकी गिळल्यास, केव्हाही किल्मिष्च
यास काय म्हणावे! काय म्हणावे बा!
लिंगाशिवाय चालणात्याचे अंग लौकीक स्पर्श करू नये
लिंगाशिवाय गमन केल्फ़्यास त्याचे चालणे बोलणे
व्रतहीन कूडल संगमदेव ( ब.ष.व. ६६८ )

इष्टलिंगासं आपल्या शरीरावर धारण करणे हा अति अवश्यक असा प्रथम नियम आहे. तसे धारण करणरा तोच लिंगायत होय.

Previousलिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्यलिंगायत धर्म संस्कारNext