लिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य

प्रत्येक धर्माला अधारभूत असे साहित्य असावयास ह्वे. त्या तत्वाच्या अनुयायींच्यग्मधे फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणरे साहित्य असावे. खिष्रियन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास वचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल वचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे. बसवेश आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणरे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्पाचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.

याप्रकार शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहै.

आमच्या आचरणास आमच्या पूर्व पुरातनांचे सांगणेच इष्ट आहे.
स्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा
पुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा
आमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन
महालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा

आमच्या एका वचनाच्या पारायणास
व्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम
आमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास
शत रूद्रादि असे न सम
आमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास
गायत्रीचे एक लक्ष जप न होई समान
कपिलसिद्ध मल्लिकार्जुन (शिवयोगी सिध्दरामेश्वर व. ८५९)

सोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व बिचाराला शरणांचे वचनेच अधार शास्त्र होया लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. बहुतेक लिंगायत मठात अपले मूळ साहित्य असलेले वचन साहित्य सोडून कन्नड भाषेवरील प्रेमापेक्षा संस्कृत भाषेविषयी त्यांचा अभिमान वाढत चालला आहे. याचा परिणाम म्हणून त्यांच्यात व त्यांच्या अनुयायी लोकांत अप्रत्यक्षपणे सांप्रदायिक आचरण रूजले आहेत. ज्ञानपिपासेच्या ट्टष्टीकोनातून संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यास कांहीच हरकत नाही. पण संस्कृतमधे असलेले सर्व मान्य असे समजून कित्येक लिंगायत धर्माचे विरूध्द असलेल्या तत्वांना स्वत:ला विकून घेतलेले आहेत.

असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.

*
Previousलिंगायत धर्मगुरु गुरु बसवलिंगायत शब्दाचा अर्थNext
*