Back to Top
Previous स्वतंत्र सिद्धलिंगेश्वर शरणांच्या वचन 2436_2468 Next

देशिकेंद्र संगनबसवय्या वचन

सूचीत परत (index)
वाचनाची निवड करा:

निवडलेल्या वचना
*

देशिकेंद्र संगनबसवय्या


चालून न जाणती थकवा माझे पाय,
करून न जाणती थकवा माझे हात,
पाहून न जाणती थकवा माझे डोळे,
गाऊन न जाणे थकवा माझी जीभ,
ऐकून न जाणती थकवा माझे कान,
मागून न जाणे थकवा, गुरू निरंजन चेन्नबसवलिंगा,
तुमच्या शरणांची कृपा, माझा भाव. / 2419
हत्तीचा वेष पांघरून कुत्र्याप्रमाणे वर्तन करणा-या
सामान्य माणसांना अविरळ भक्ती शक्य होईल का ?
चाल एका त-हेची, बोल दुस-या त-हेचे.
थोरांच्या चरणी शरण न जाता राहणा-या,
परस्त्रीस जन्मलेले क्षुद्र लोक कसे जाणतील
अनादी स्थलाचा महिमा, गुरू निरंजन चेन्नबसवलिंगा ? / 2420
पाहिले म्हणणे खोटे, न पाहिले म्हणणेच खरे.
पाहू शकणा-यांनी पाहिले हे सत्य.
पाहू न शकणा-यांनी नाही पाहिले हेही सत्य.
गुरू निरंजन चेन्नबसवलिंगामध्ये
द्वैत न म्हणे, अद्वैत न म्हणे शरण. / 2421
दगडातील अग्नी कार्याविना न दिसे,
लाकडातील अग्नी [कार्याविना] न स्पर्श शके,
बीजामधील आकार पाणी-मातीविना न दिसे.
म्हणूनच, शरणाच्या अंतरंगातील बोल,
हे आपल्या सत्यवाणीविना न प्रकट होती. कारण,
गुरू निरंजन चेन्नबसवलिंगामध्ये शब्द सुतक नव्हेत. / 2422
देह लिंगमय करून पाहिले तर सत्य म्हणेन,
मन लिंगमय करून पाहिले तर सत्य म्हणेन,
भाव लिंगमय करून पाहिले तर सत्य म्हणेन.
गुरू निरंजन चेन्नबसवलिंग होऊन,
जाणिवेच्या पलीकडे असल्यास सत्य म्हणेन
लिंगैक्य शरणास. / 2423
पायाविना चाल,
हाताविना स्पर्श,
डोळ्यांविना दर्शन,
कानांविना श्रवण,
नाकाविना वास,
जिभेविना बोल,
आपणाविना सुख,
गुरू निरंजन चेन्नबसवलिंगा,
अशी ही तुमच्या शरणाची लिंगैक्य स्थिती. / 2424
फूल हुंगूनही न हुंगल्यागत,
चव घेऊनही न घेतल्यागत,
रूप पाहूनही न पाहिल्यागत,
स्पर्श करूनही न केल्यागत,
[शब्द ऐकूनही न ऐकल्यागत]
याकारणे, गुरू निरंजन चेन्नबसवलिंगा,
तुमचा शरण तुम्हांस जाणूनही
न जाणल्यागत तुमच्यामध्ये असे पहा. / 2425
गंध अंतर्भूत असलेल्या नाकासम मम भक्ती.
रस अंतर्भूत असलेल्या जिभेसम मम भक्ती.
रूप अंतर्भूत असलेल्या नेत्रासम मम भक्ती.
स्पर्श अंतर्भूत असलेल्या त्वचेसम मम भक्ती.
शब्द अंतर्भूत असलेल्या कानासम मम भक्ती.
आणि इतर सर्व अंतर्भूत असलेला
चेन्नवृषभेद्रलिंग भक्तिभाव आपणच झाला. / 2426
चंद्रमौळी म्हणवून घेऊन,
कामदेवाला जाळून टाकले म्हटल्याने मज हसू आले.
मायाकोलाहल म्हणवून घेऊन,
जटेमध्ये स्त्रीस बसविले म्हटल्याने हसू आले मज.
निष्कलगुरू निरंजन चेन्नबसवलिंग म्हणवून घेऊन,
मज पती होऊन भोग घेतल्याचे बघून हसू आले माझ्यामध्ये. / 2427
मोरीच्या घाणीत लोळत सुख मानणा-या डुक्कराला,
सुगंधी पाण्यात सुखानुभवाचा आनंद घेणे समजेल का ?
मलत्रयाच्या चिखलात सुख अनुभवणा-या माणसास,
लिंगत्रयामुळे मिळणारा सुखानुभवाचा परमशांत
संतोष कसा मिळणार, सांगा ?
तुम्हांस जाणणा-यास जाणणे अशक्य पहा,
गुरू निरंजन चेन्नबसवलिंगा. / 2428

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

*
Previous स्वतंत्र सिद्धलिंगेश्वर शरणांच्या वचन 2436_2468 Next