लिंगायत धर्मगुरु गुरु बसव | धर्म गुरु बसव पूजा |
बसवण्णांचे दीक्षा गुरु कोण ? |
✍ महा जगद्गुरु डा. माते महादेवि
*
अध्यात्म जीवनाच्या साधनेत गुरुतत्व फार महत्वपूर्ण.गुरुकारुण्य ही एक फारमोठी क्रिया. मतातंरच मुख्यपणे ठेवून, सामाजिक धर्मात;व “देव व्यक्त नव्हे सगुण नव्हे" अशा अव्यक्तवादी (Deistic) आस्तिक धर्मात, या गुरु कारुण्याला फारमोठे स्थान नाही. अत्यंत अध्यात्मिक जाणीव असणा-या धर्मात, विशेष करुन बसवधर्मात गुरु कारूण्य प्रमुख स्थान मिळवून आहे. अष्टावरणाचे पाहिले तत्व म्हणजेच गुरु.गुरु नसल्यास लिंग नाही लिंग नसल्यास सामाजिक व सांधिक बांधव्य नाही, पूजा नाही, गुरु कारुण्य म्हणजे अक्षर माला शिकण्यासारखे, अक्षर माला न शिकल्यास काव्य पठण कसे येणार ? तसेच गुरु कारुण्य नसल्यास अध्यात्म सिध्दी नाही.
दीक्षा संस्कार, गुरु कारुण्य सक्तिचे केलेला बसव धर्म होय, जन्मलेले मूल, मूलगा असो वा मुलगी, असो मनुष्य ब्राह्मणापासून भंग्यापर्यंत कोणत्याही पेशाचा, जातीचा असेना, ब्रह्मचारी पासून सन्याशा पर्यंत कोणत्याही आश्रमाचा असेना, तो न चुकता दीक्षा संस्काराला बध्द झालेला असला पाहिजे असे बसवधर्म घंटाघोशपणे सांगतो. तेव्हा असले एक संविधान दिलेला आध्य आचार्य बसवण्णांचा दीक्षा गुरु कोण? त्यांना व्यक्तिगुरु नसल्यास त्यांनीच घालून दिलेल्या शिवपथास ते पात्र होतात का ? असे अनेक प्रश्न आम्हास भेडसावतात.
बसवण्णांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग आम्ही लक्षात घ्यावयाचे झाल्यास निर्धष्ट करावयाचे झाल्यास प्रमुख दाखले आत्मकथेप्रमाणे असणारे किंवा प्रमाणिक साधकाच्या दिनचर्या प्रमाणे असणारे बसवण्णांची वचने. काही वेळा आपली प्रशंसा आपणच करुन घेण्यास साधक प्रवृतीत असणारे संकोच व्यक्त करणे शक्य. तेंव्हा ते आपल्या बद्दल काहीही सांगत नाहीत, अशा प्रसंगी त्यांच्या बद्दल त्यांच्या भोवती असणारे किंवा समकालीन व्यक्ती सांगणा-या गोष्टी दाखले होवू शकतात. सामान्यपणे महात्मे समकालीनांच्या मधेच जन्मून, वाढून मोठे झालेल्या महंताना शीघ्र पणे ओळखून गौरविणे कष्टाचे. त्यात बसवण्णांच्या सारखे क्रांतीकारी, खंडीतवादी, तत्वनिष्ट, लोकविरोधी कोणालाही न घाबरणान्यांना मानणे, गौरविणे, पुजा करणे फारच कष्टप्राय. अत्यंत विशेष व गणनीय म्हणजे बसवण्णा अगदी जवळच्या कुटुंबांच्या बंधूना पण गुरु झाले. अनुभव मंटपाच्या सर्वाचे पुज्य झाले. जनसामान्याच्या हृदयाचे अधिदैवत बनले. त्यांना त्यांच्या हयातीतच मिळालेली मान्यता, गौरव पाहिल्यास शरीर रोमांचित होवून उठते.
नंतरच्या श्रेष्ठ कविंनी बसवण्णांच्या बद्ल जेमतेमच समजून घेतले. सुमारे दोन ते तीन शतमानानंतर त्यांच्या बद्दल बन्याच कल्पनांचा काहींनी प्रचार केला. बसवण्णांनी दिलेल्या समतावादाचे सुत्र काहींना गिळता न येणारी कडूगोळी झाली होती. सहन न होणारा वज्रघात. त्यांच्या तत्वाच्या कडूगोळीने जातीयवादाचा नाश होण्याच्या संभाव्य परिस्थिती मुळे, त्या वज्राघातामुळे अंधश्रध्दाचा भक्कम किल्ला डळमळीत होण्याच्या भितीने, त्या तत्वांचा प्रसार होणार नाही, किंवा त्यांच्या बद्दलभय - भक्ती निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास परिश्रम पूर्वक प्रयत्न अनेकांनी केले आहेत. ह्यामध्ये धार्मिकांचा, मुख्यत: मठ- पीठाधीशांचा हात जास्त प्रमाणात होता.खरेतर बसवण्णांना जिवंत ठेवून एका रीतीने सार्वत्रिकव्याप्ती पसरविण्याचे श्रेय ब-याच कन्नड साहित्यकांनी द्यावे लागेल. तसेच वचन साहित्य संपादक व मुख्यपणे विश्वविद्यालयांना पण द्यावे लागते. अनेकांनी कोणत्याही जाती मताच्या चिखलात अडकून न पडता. कन्नड मातेला किरीटाप्रमाणे शोभावे असे साहित्य वचन वाड्मय म्हणून प्रामाणिक पणे समजून,उजेडात आणले आहे ते बसवण्णांचे विराट रुप,
शुध्द साहित्यिक व धार्मिक भावना - रचनाकार यांच्यात असणारा फरक म्हणजे , आपण लोकांच्या डोक्यात काय काय भरावे हे जाणून त्या प्रमाणे साहित्य लिहित जाणे हा धार्मिकांचा रोग. नसलेल्यांना निर्माण करणे. दिवसाची रात्र करणे ही त्यांची कामे. अशा कृत्रिम कृती विद्वानांना मान्य नसल्यातरी प्रामुख्याने याला बळी पडणारे म्हणजे अंधश्रध्दा असणारे लोकच. मालिकत्व न बदलेल्या जमीनीच्या कब्जा बळजबरीने हस्तगत केलेल्या कुळा प्रमाणे आताच्या लिंगायत समाजाची स्थिती झाली आहे. तहसीलदार कचेरी, जमिन नोंदणी कचेरी सगळीकडे मालकाचे नांव जमिनीवर मात्र अनधिकृत कूळाचा कब्जा. त्याप्रमाणे साहित्यिक, साहित्य कृत्या, इतिहास सगळीकडे बसवण्णांचे नांव पण पुरोहितांच्या वर्चस्वामुळे अडकून पडलेल्या समाज क्षेत्रात कोणाकोणाची किती ,कोणाकोणाची पूजा.
आधार नसताना दुष्टपणाने अतिक्रमण करुन बळकावलेली जमीन न्यायालयाकडून सोडवून घेण्याप्रमाणे. आज साहित्य, विश्वविद्यालयांचे प्रकटन, वचनकारांचे दाखले मिळवून वस्तूस्थिती आम्हाला लोकांना पटवून द्यावे लागते आहे. कारण धार्मिक रोगाने पछाडून लिहिणा-या काही साहित्यिकांना निर्लक्षून निर्मलमतीच्या, सत्यप्रिय साहित्यिकांचा आम्ही आदर केला आहे. पण सत्यांश जाणून घेणे काही कष्टांचे नाही. असले एक उदाहरण इथे प्रस्तुत करीत आहे.
लिंगायत धर्माचे जिव्हाळे इष्टलिंगोपासनेचा दाता, जनक बसवण्णा ही उक्ती आम्ही खचित करुन सांगत असता क्षणीच (या पुस्तकाचा सुरुवातीचा भाग) एक प्रश्न सर्वजण विचारतात, “बसवण्णांना लिंगधारणा केलेले गुरु असलेच पाहिजेत हेच सिध्द करते की, या पुर्वी इष्यलिंगोपासना होती." म्हणजेच “गुरु पण असला पाहिजे' या पूर्व निर्णया प्रमाणे शोधत जावून कोणाच्या तरी माथ्यास हे गुरुपद बांधावयास निघतात. आता आम्ही वचने व काव्यांच्या आधारे हे पडताळून पाहया,
“बसवण्णा जन्मत: वीरशैव का?'' असा वाद अगदी अलिकडे माझ्या ऐकण्यात आला. कल्याण भवनाचे शरण मा. न. नंजप्पा यांनी आपले अमुल्य ग्रंथ विश्वकल्याण मिशन संस्थेला उदार हस्ते दान दिले. त्यातील एका ग्रंथात “श्री पंचाचार्याचा संक्षिप्त परिचय' या विषयी माहिती होती. लिहिणारे श्री मङ्घनलिंग चक्रवर्ती श्रीमखारी मठ, मैसूर. या ग्रथांच्या ७९ व्या पानावर उल्लेखिलेला वाद प्रकट झाला आहे.
काव्यास किंवा शरणांच्या वचनात याला कोठेही दाखला मिळत नाही, हरिहराच्या प्रकारे :
कन्नड :
बंदु भुलोकदोळु किर्तीय पडेदिर्प
संदणिप विप्र संतानदिदि.....
विप्रनिर्प मादिराजनातना सतियु
अप्रतिम मादंबे पुंदेनिप्पा गुणवतियु
मराठी:
भुलोकात येवून कीर्ति मिळवलेले
विप्र समुदायाचा संतान होता
विप्र असलेल्या मादिराजाची सति
मांदबे अप्रतीम म्हणविणारी गुणवतीपण
मादीराज विप्रसंतान होता हे इथे स्पष्ट होते.
भिम कविचे सांगणे असे आहे.
कन्नड :
आ महा बहळग्रहारद
ग्रामणी मणि वितरणद कणी
भूमिदेवाग्रणी परम शैवांबुरुह तरणि
मराठी:
ब्राह्मण पुरीचा मुख्यस्थ,
ब्राह्मण मादिराज होय,
सिंगीराज कवि च्या प्रकारे :
कन्नड:
अग्र भूसुर श्रेष्ट
परम सांख्यायन सत्कुल प्रसूतरीलधिक....वर
मंडिगेय मादरस
मराठी:
ब्राह्मण शेष्ट
परम सांख्यायन गोत्रात जन्मलेला मादरस
काव्यांचा उल्लेख इथेचथांबवून आता वचन साहित्याकडे वळूया.
कन्नड:
होनू हेण्णू मण्णेब कर्मद बलेयल्ली सिलुकि
-------हॊह------हारुव नानल्ला
लिंगदेवनु विप्रकर्मव बिडिस
अशुध्दन शुध्दन माडिदनागि !
मराठी:
सोने, स्त्री, माती ह्या कर्माच्या सापळ्यात
अडकून पडणारा ब्राह्मण मी नव्हे
लिंग देवाने विप्रकर्म सोडवून
अशुध्दाला शुध्द केल्यामुळे !
कन्नड: आनु हारुवनेदरे लिंग देव नगुवनय्या
मराठी: मी ब्राह्मण म्हटल्यास लिंगदेव हसणार की हो !
कन्नड: हारुव हारुवनप्पे नानु सद्भक्तरू एन्नवरेद
मराठी: उडी मार मारुन अलिंगन देतो मी सद्भक्त सर्व माझे म्हणून
असे आपल्या वचनात बसवण्णांनी उल्लेख केला आहे. एवढेच नव्हे त त्यांनी जास्त करुन टीका केली आहे. ती आपल्या जाती कुलाचारावर ! सामान्यपणे कोणी का असेना आपल्या जातीवर जेवढ्या कठोरपणे टीका करतात तेवढे इतरावर टीका करण्याच्या किंवा गुणदोषा बद्दल सांगण्याच्या वाटेस जात नाहीत तेव्हा मेलेल्या सापालाच मारण्याचा प्रयत्न सोडून, बसवण्णा, ब्राह्मण कुलाचे असे निश्चित करुन या विषयाबद्दल पुन्हा चर्चा करण्याची गरज नाही. बसवण्ण जन्माने शैव ब्राह्मण,त्यांचे आईवडील मादलांबिका - मादरस म्हणून स्पष्टपणे मानुया.
वैदीक धर्माचा अत्यंत मुख्य असा संस्कार म्हणजे यज्ञोपवीत धारणा. नसल्यास शास्त्राध्ययन नाही .यज्ञ यागादी करण्याचा अधिकार नाही. वेदधा परिपालनाच्या मंदिरास ही क्रीया प्रवेशद्वार होय. त्याप्रमाणे आपल्या जातीधा नियमानुसार वडील मादरस मुलावर धर्म संस्कार करण्याचा प्रयत्न करतात.
हरिहरच्या अभिप्रायाप्रमाणे बसवण्णांना यज्ञोपवीत धारणा झाली होती सोळा वर्षे झाल्यावर शिवभक्ती व कर्म केंव्हाही एक होवू शकत नाहीत, म्हणू जानवे तोडून टाकून घर सोडतात. सिंगीराजाच्या प्रकारे उपनयन संस्कार झा होता. आपणच काढून न टाकता तेच तुटून गेल्यावर घर सोडतात. डॉ. बाडा रामय्यांच्या अभिप्राया प्रमाणे बसवण्णांना उपनयन संस्कार जानवे धारण झालेली असते. त्यांनी प्रगतीपर विचार धारेचा पुरस्कार केल्यामुळे महारवाड्यात जात असत व सर्वांशी समानतेने वागत, हे पाहून त्यांच्या जातीबांधवांना राग येवून त्यांचे जानवे तोडून काढून त्यांना पाणी देण्याचे पण नाकारुन त्यांच्यावर बहिष्कार घालतात. त्यासाठीच बसवण्णा आपल्या एका बचनात म्हणतात “नीरिंगे नेणिंगे होरगादंदु, समयाचारक्के ओळगादर्दू हणजेच पाण्याला जानव्याला बाहेर झालेला संप्रदायाला आत झाला.
भीम कवी सांगतात की, उपनयन संस्काराच्या दिवशी ते धारण करण्यापुर्वीच नाकारतात. तेव्हा वडील संतापले असता घर सोडून निघून जातात. बसवण्णा आपल्याला उपनयन संस्कार नको म्हणण्यास काही विशेष कारणे देतात. भीमकवीच्या काव्यात अशा प्रकारे दिले आहे.
१) मला या पूर्वीच शिवदिक्षा झाली आहे. अध्यात्म प्रधान असे ते झाले असता कर्म प्रधान असे असणारे कशाला ?(४४,संदी २, कांड-१)
२) सद्गुरुची कृपा झाल्यावर, शिवपूजा क्रिया करणा-याने अग्नीस देव मानून आहुती देणे चुकीचे नाही का? (४५, संदी३,कांड-१)
३) परिशुध्दभक्तीने एकाच भवनाशक मंत्राने आराधना न करता, अनेक प्रकारचे मंत्र पठण करुन अनेक देवतांची उपासना करण्यात वेळ घालवणे हे बरोबर का? (४७, संदी ३, कांड-१)
४) जाती गोत्रातीत असणारी अध्यात्म दीक्षा घेतल्याने पुन्हा जात गोत्र गंना जवळ करणे योग्य का? (५०संदी३ कांड, १)
५) “होय मुला; उपनयन झाले म्हणून शिवाची पूजा करु नकोस असे भाम्ही कोठे सांगतो. आम्हाला व शिवचाराला फरक काही नाही. रुद्र, नंदी ,प्रणव ह्या सर्व उपासना नाहीत का आमच्यात?'' असे वडीलांनी विचारताच (५४ संदी ५५, कांड ३,१) बसवण्णा उत्तर देतात “निश्चित दोन्ही आचरणात फरक आहे. चौदा लोकांच्या पित्याची पुजा न करता मदन (काम), चंद्र, सुर्य, अग्नि अशा देवतांची पूजा करणे मला न पटणारे विषय" (८१,२,१)
असे सांगून घर सोडून जातात. असे भीम कवी महत्वपूर्ण असे काही विषय प्रतिपादन करतात.
बसवण्णा सांगतात की, “मी यापूर्वीच शिवभक्त होवून गुरु कारुण्य मिळविले आहे." असे या काव्याचे बोल वचनांच्या उक्तिबरोबच एक नवीन उजेड टाकतात ‘पाण्यला जानव्याला बाहेर झालेला संप्रदायाला आत झाला” असे सांगणारे बसवण्णांचे वचन इथे भक्कम असा पुरावा मिळवून देते. बागेवाडी जवळचे इंगळेश्वर बसवण्णांचे आजोळ त्या गावच्या बाहेर एक डोंगर आहे. तेथे आक्कनागम्मागुहे नावाचा एक दगडाचा मंटप पाहण्यात येतो. एवढेच नव्हेतर त्यांना दीक्षा दिलेल्या जडेसिध्दमुनींचे आणखीन एक देवूळ (डोंगराच्या कडेवर) पहाण्यात येतो. इथे आम्हास साखळीच न सापडलेला एक कोंडा मिळतो.
बागेवाडी - इंगळेश्वर लांब असणारी गावे नव्हेत इंगळेश्वर बसवण्णांच्या आईचे माहेर. तेथे बहीण - भाऊ अधून मधून आज्जीकडे जा-ये करण्याचा परिपाठ असणारच. अशा संदर्भात अंतरमुखी व चिंतनशील असणारे हे बहीण भांऊ डोंगरावर असणा-या एका शैव मुनिच्या प्रभावास बळी गेले असणे शक्य
Reference: Swayamkrut Basavanna - A Prose composition written in Kannada by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi,
translated by Sharana Shri Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]
लिंगायत धर्मगुरु गुरु बसव | धर्म गुरु बसव पूजा |