Previous महात्मा बसवेश्वर (1134-1196) बसवण्णांचे दीक्षा गुरु कोण Next

लिंगायत धर्मगुरु गुरु बसव

एक विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरु एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिध्दंतापर्यत त्यात वाव आहे. सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत.

स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंक्ण बांधून
निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून
कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण
संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२)

महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८)

"प्राणलिंगाचा, भ्गवेवस्त्र घालण्यचा, प्र्सादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्या करताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. असे त्यांचे मत आहे. (च.ब.व. २७)

म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरु बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय. हे केवळ आमचेच अभिप्राय नसून सर्व पुरातन शरण आणि नूतन शरण संप्रदाय या मधील अभिप्राय आहे.

बसवेश्वर आदिगुरू कसे?

१) बिश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले.
२) विश्वगुरू बसवण्णांनी वचन साहित्याचे धार्मीक संविधान दिले.
३) बिश्वगुरू बसवेशांनी सांप्रदायिक योग साधनेपासून वेगळा असलेला द्दष्टीयोगाचे प्रामुख्य असलेला लिंगांगयोग (शिवयोग) दिला.
४) ’श्री गुरू बसव लिंगाय नम:' हा मंत्र बसवण्णाच्या नावापासून तयार झाला म्हणून ते लिंगायत धर्माचे आदिगुरू म्हणण्यास ज्वलंत साक्ष आहे.

विश्वगुरू बसवेशांचे महात्म्य गाणात्या कांही शरणांचे वचन पाहू या.

अ) शिवसमय प्रतिष्टापनाचार्य बसवण्णा.
आ) इष्टलिग दीक्षा देणारा प्रथम आचार्यास पाहिला
इ) लिंग, जंगमाच्य प्रसाद महात्म्यास बसवण्णाच आदिपुरूष आहे.
ई) प्रारंभी तूंच गुरू: असल्या कारणे तुझ्यामुळे जन्मला लिंग......म्हणून.....पुर्वाचार्य तूच संगन बसवष्णा. - अलुमप्रभुदेव
उ) जगदाराध्य बसवण्णा तू, प्रथम गुरू बसवण्णा तू .........
ऊ) अनिमिषय्यास लिंग दिले तो तूच बसवण्णा........ -चन्न बसवष्णा
ए) कपिलसिद्ध मल्लिनाथांनी बसवण्णास मज दाविल्या कारणे मी वचलो. -सिद्धरामेश्वर
ऐ) जगाच्या हितार्थ भूलोकी अवतरला आमुचा बसवण्णा. -अक्कमहादेवी
ओ) बसवा बसवा म्हणत अभिषेक न करणारा भक्ती शून्य देख कलिदेवर देव -मडिवाल माचिदेव

ही झाली बसवेश्वरांच्या समकालीन शरणांनी केलेले वक्तव्य या नंतर शरण परंपरेतील कांही कवीनी असे वर्णन केले आहेत.

प्रथमाचार्य - पाल्कुरिके सोमाराध्य
वीरशैव निर्णय परमावतार - मग्गेय मायीदेव
राय पूर्वाचार्य - चामरस
षटस्थल निर्णय करणारा - गुब्बी मल्लणार्य
वर वीरशेवास स्थिर केलेला - मरितोंटदार्य


वरील सर्व वक्तव्यातून बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे केन्द्र बिन्दू आणि आधारभूत शक्ती म्हणून निश्चय पूर्वक वर्णिले आहे.

बसवण्णाच माझी माता, बसवण्णाच माझे पिता,
बसवण्णाच परमबंधू मला.
वसुधीश कपिलसिद्ध मल्लिकार्जुन,
तुम्ही नाव ठेवलेले गुरूच बसवण्णा (सि. व. सं. ४-८०९)

दृष्टिची भक्ती बसवांच्या मुळे झाली;
शरणसंघाचे ज्ञान बसवांच्या मुळे झाले,
कुठले शिवज्ञान कुठले संगकार्य बसवा विना?
महाज्ञान व महाप्रकाशच बसवण्णांचा धर्म हो,
कपिलसिद्ध मल्लिनाथय्या (सि.व.सं.-७४७)


बसवभानूच्य तत्व प्रकाशात अल्लमप्रभु, अक्कमहादेवी, सिध्दरामेश्वर, मरूळ सिद्द्धेश्वर, रेवणसिध्द इ. शरण व त्यानंतरचे एकशे एक विरक्त एडेयुरु सिध्दलिंगेश्वर, षणमुखस्वामी, सर्वज्ञ इ. मध्यकालीन शरण आणि गेल्या शतकातील बाललीला महंत शिवयोगी, अथणी शिवयोगी इ. नूतन शरणानी बसव तत्वाप्रमाणे वागले तरी से सर्व लिंगायत धर्मातील गुरू अहित-तर लिंगायत धर्माचे गुरू नव्हेत म्हणुन बसवेश्वर हैच धर्मगुरू होत. बसवण्णाना प्रथमाचार्यं म्हणून अचल श्रद्धा टेवणाराच लिंगायत होय.
सूचीत परत
*
Previous महात्मा बसवेश्वर (1134-1196) बसवण्णांचे दीक्षा गुरु कोण Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys