Previous बसवन बागेवाडी सोन्नलापूर (सोलापुर) Next

लिंगायत धर्म क्षेत्र कूडल संगम

*

जगातील इतर सर्व स्वतंत्र धर्मांना असल्याप्रमाणे लिंगायत धर्मालाही धर्मक्षत्र आहे. हेच विश्वगुरु बसवेश्वरांचे औक्य झालेले परमपवित्र क्षेत्र कूडल संगम होय, इथेच त्यांनी विध्याभ्यास केला, तपश्चर्या केली, नव्याधर्माची घोषणा केली. हीच ती धर्मभूमी होय. आजही श्री.गुरुबसवदेवांची दिव्य समाधी कृष्णा व मलप्रभा या दोन नद्यांच्या संगम स्थानी आहे. आपले पूजनीय शिवशरण, शिवयोगीगण औक्य झालेले स्थान धर्मक्षेत्र झाले आहेत. तद्वतच ‘कूडल संगम' हे क्षेत्र आहे. अशी श्रद्धा ठेऊन वर्षातून निदान एकदा तरी शरण मेळाव्यास येणे हे आपले कर्तव्य आहे. असे लिंगायत धर्मानुयायांनी समजावे.

लिंगायत धर्मानुयायांनी आपल्या हयातीत ज्या क्षेत्राचे दर्शन घेणे जरुरीचे आहेत, अशी काही महत्त्वाची क्षेत्रे

कूडल संगम: शरण मेळावा- बसव क्रांती दिन

प्रत्येक धर्मातील लोक आपल्या आदिगुरुंच्या जीवनातील ३ दिवस महत्त्वाचे म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म, लिंगैक्य आणि नवधर्म घोषणा. हेच ते तीन दिवस होय. आदि प्रमथ बसवराजांनी वैषाख महिन्यातील अक्षय त्रितीया रोहिणी नक्षत्राच्या दिवशी जन्म घेतला. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी त्यांनी देह सोडला, लिंगैक्य झाले. मकर संक्रांतीच्या दिवशी नव धर्माची घोषणा केली.

जगातील सर्व धर्मातील लोक वर्षातून एकदा तरी एकत्रित येतात. जसे मुस्लीम हाज यात्रा करतात, शिखपंथीय खाल्सा करतात, याप्रमाणे बसवतत्त्वानुयायांनी एका जागी जमावे या दृष्टीकोनातून "शरण सम्मेलन आयोजित केले आहे. सन १९८८ पासून दरवर्षी हा समारंभ मोठ्या वैभवांत आचरण्यात येत आहे. श्री.गुरूबसवदेवांनी आपल्या हयातीतच अशी कित्येक ‘गणपर्व’ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. हा आदर्श त्यांनी दाखवून दिलेला आहे.

म्हणून लिंगायत धर्मियांनी आपल्या जीवनाच्या अवधीत, आपल्या हयातीत शक्य तितक्या वेळी कूडल संगम क्षेत्रात भरणाच्या बसव क्रांतीच्या समारंभात, प्रत्येक वर्षी जानेवारी दि.१३, १४ व १५ रोजी शरण मेळाव्यात भाग घ्यावा.

कूडल संगम चित्रे (Kudalasangama Photos)

कूडल संगम: मुख्य शहरांमधील अंतर

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 (जुने नाव -13) [सोलापूर ते चित्रदुर्ग] वर संगम क्रॉसपासून केवळ 8 कि.मी. (km) आहे.

जवळचे विमानतळ (Nearest Airport): बेलगावी (बेळगाव), 188 कि.मी. (km)
जवळचे रेल्वे स्थानक (Nearest Railway Station): आलमट्टी (धरणे) Dam, 31 कि.मी. (km)

बेंगळूरु: 450 कि.मी. (km)
गोवा: 300 कि.मी. (km)
मिरज: 210 कि.मी. (km)
सोलापूर: 196 कि.मी. (km)
कोल्हापुर: 250 कि.मी. (km)
विजयपुर (बिजापुर) : 92 कि.मी. (km)
बागलकोट 46 कि.मी. (km)
हुनगुंद: 21 कि.मी. (km)
इलकल: 33 कि.मी. (km)
बसवन बागेवाडि: 30 कि.मी. (km)
*
सूचीत परत (index)
Previous बसवन बागेवाडी सोन्नलापूर (सोलापुर) Next