Previous बसवधर्म पीठ (रजि.) महामने महामठा, लिंगायत धर्म सहिंता Next

लिंगायत वीरशैव वेगवेगळे (Lingayat Veershaiva are different)

[This Article is from the book: LINGAYAT HINDU NAVHET - A prose composition in Kannadda by Her Holiness Maha Jagadguru Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

काही दुरुद्देशाने व काही अज्ञानाने वीरशैव व लिंगायत हे समान अर्थाने एकाच धर्माची दोन नावे म्हणून वापरतात. हे पूर्णपणे चुकीचे, असंबध्द व असत्य, उदाहरणार्थः मोहमदी धर्म व इस्लाम असे कोणीतरी वापरल्यास दोन्ही पदे कुराण बोधन करणा-या धर्मालाच अन्वय होतात. तसेच लिंगायत व वीरशैव एकाच धर्मास अन्वय होतात. यांच्यामधील फरक पाहूया.

वीरशैव लिंगायत
१) शिवात वीरतम अशी भक्ती असणारे १) सृष्टिकर्ता लिंगदेवात भक्ती असणारे
२) सामाजिकपणे चातुवर्य व्यवस्थेत विश्वास ठेवणारे २) वर्ण व जात व्यवस्थेत विश्वास नसणारे
३) दलित, अस्पृश्य यांना दीक्षा निषिध्द ३) सर्व मानवाना दीक्षा लभ्य
४) स्थावर लिंग पुजणारे ४) फक्त इष्टलिंग पुजणारे
५) बहुदेवता उपासक ५) एक देव उपासक
६) धर्मगुरू बसवण्णांना धर्मगुरू मानीत नाहीत ६) लिंगायत धर्म संस्थापक बसवण्णा म्हणून दृढ विश्वास
७) वेदागत शिपुराण हेच आधार ग्रंथ म्हणणारे ७) वेदागम पुराण मान्य न करता वचन वाङ्मय धार्मिक संविधान मानणारे
८) संस्कृत धर्मभाषा. सहा प्रांतात सहा भाषा बोलतात. ८) कन्नडच धर्म भाषा, कुठेका असेनात घरची भाषा कन्नडच ठेवणारे
९) शिवाद्वैत सिध्दांत ९) शून्य सिध्दांत
१०) भक्त-माहेश्वर असा भेद आहे. १०) शरण समूहात असला भेद नाही.
११) वीरशैव पुजा करावयाचे लिंग स्थावर लिंगाचे लहान रूप असते. चातुर्वण्र्या नुसार शिला, सुवर्ण, चांदी, पादरस इत्यादी धातूपासून तयार होतात. त्याला कंते नसते ११) लिंगायत पूजा करावयाचे इष्टलिंग गोलाकार असते. त्यास चकाकणारे एकाच प्रकारचे कंते असते. लिंग धारणा करून पुजा करतात. इष्टलिंग पार्वती पतेशिवाचे चिन्ह नव्हे. ब्रह्मांडाचा मालक लिंगदेवाचे चिन्ह.
१२) तमिळनाडूच्या वीरशैवांना तिरूवाचकम्, तेलगु देशाच्यावीरशैवांना श्रीकरभाष्य वगैरे शास्त्र ग्रंथ १२) लिंगायत धर्मियांना वचन साहित्यच आधार ग्रंथ
१३) दीक्षानंतर पुर्वीचे वर्ण जात नाहीत (तमिळनाडू वीरशैव) १३) दीक्षा नंतर पुर्विचे वर्ण, जात वगैरे भेद नाहीसे होतात. सर्व समान
१४) दीक्षा घेतलेल्या ब्राह्मण वीरशैव, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वीरशैवात परस्पर जेवणखाण नाही, वैवाहिक संबंध नाही. १४) दीक्षा घेतलेल्यात जेवणखान विवाह संबंध होतात. सर्व समान.
१५) वीरशैवांच्या अंतरजातीमधे मांसाहार आहे. (केरण वीरशैव) केरळच्या ७ जातीपैकी ३ जाती शाकाहार व ४ जाती मांसाहार, १५) लिंगायत धर्मिय सर्व शुध्द शाकाहारी
१६) शव जाळतात १६) शव पुरतात
१७) पंचसूषक पाळतात १७) पंचसूतक पाळीत नाहीत.

लिंगायत समाजात लिंगायत असेच पद वापरात होते. गुरू बसवण्णाच याचे संस्थापक असा विश्वास दृढ झाला होता. गो. रू. चन्नबसाप्पा यांनी बसवण्णांचे स्थान खाली उतरविण्यासाठी लिंगायत समाजात लिंगीब्राह्मण लिंगी शूद्र असे विभाग करून उच्च-नीच असे निर्माण करण्याच्या धूर्तविचारामुळे शीतलीकृत शिवाचारमधे असलेले वीरशैव पद कृत्रिमपणे समाजात, साहित्यात घुसवून अखिल भारत वीरशैव महासभा स्थापक झालेले हानगल कुमारस्वामी व पंचपीठवाल्यांनी लिंगायत धर्माचा इतिहास, समाज, साहित्य विकृत केले.

वीरशैव वैदिक संप्रदायाचे अनुकरण करते. ब्राह्मण बदूंना उपनयन करण्याप्रमाणे जंगम बदूंना अय्याचार (बाल जंगमत्व) करण्यात येते. ब्राह्मणांच्यात मुलींना उपनय जसा नाही तसाच अय्याचार पण नसतो. ब्राह्मण बदूंनी शेडी सोडल्याप्रमाणे जंगमांच्या मुलांना शेडी सोडण्यात येते. लिंगायत धर्म भक्त माहेश्वर असा भेदभाव करीत नाही. सर्वांना इष्टलिंगदीक्षा देतो. हृदयातील अंतरंर्गतअशा आत्मचैतन्याचे प्रतीक असणारे इष्टलिंग छातीवर बांधण्याचा सत्संप्रदायालापण जाती आणून वीरशैवववादी जानव्यासारखे आडवे लांब शिवदोरा बांधून त्याच्या टोकास लिंग असलेले करडिगे बांधण्याचे वापरात आणले.जानवे नसल्यामुळे शूद्र म्हणवून घेण्याच्या आरोपातून मुक्त होण्यासाठी आम्ही लिंगी ब्राह्मण असे म्हणवून घेण्यास वीरशैव पद आगंतूकपणे लिंगायत समाजात घुसविण्यात आले. तमिळनाडु, आंध्र वीरशैवात चार्तुवर्ण्य वर्गिकरण असल्यामुळे हे पद कर्जाने आणून लिंगायत समाजात घुसविण्यात आले, एवढेच नव्हेतर पंचपीठाधीशांनी लिंगायत समाजात चातुर्वर्ण्य घुसवण्याचे साहस केले. आपली धर्म संहिता झालेल्या वचन साहित्याचे अध्ययन पारायण सोडून, संस्कृत पाठशाला काढून वैदिक शिकवून पूजा, दीक्षा, पौरोहित्य वगैरे शिकवून लिंगायत धर्माचे वैदिकीकरण केले. १२व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत बिघडली नसलेली लिंगायत वीवशैव वेगवेगळे शरण संस्कृती २०व्या शतकात विकृत होवू लागली. उत्तर भारतात ब्राह्मण वर्णाचे शर्मा शास्त्री अशी नावे ठेवून घेतल्याप्रमाणे कर्नाटकातपण आपल्या नावापुढे वेदमूर्ती व मागे शर्मा, शास्त्री, आराध्य अशी नावे लावून घेवू लागले लिंगायतात गोत्र, सूत्र, रास इत्यादी सांगण्याचा परिपाठच नव्हता. असे म्हणण्यापेक्षा गुरुबसवण्णांनी हे सर्व आदिच धुडकावून लावल्यामुळे लिंगायत धर्मात ते मुळातच नव्हते. लिंगायतांना पंचपीठाच्या मठांनी गोत्र, सूत्र विचारण्यास सुरुवात करून गोंधळ निर्माण केला.

गुरु बसवण्णांनी लिंगायत नावाचा नविन धर्म दिल्यानंतर अस्तित्त्वात असलेल्या ब-याच मत, पंथ, जाती व आदिवासी जनांगानी हा धर्म स्वीकारला. संगमेश्वरचा अप्पण्णा या शरणाचे हे वचन फारच उद्बोधक आहे.

कन्नड :
अय्या, वैष्णवरु तम्म विष्णूवं बिट्ट कळेदु ।
लिंगभक्तरादरू अनेकरू.
अय्या, जैनरादव, तम्म जीनन बिट्ट कळेदु
लिंगभक्तरादरू अनेकरू.
अय्या, द्विजरादवरू तम्म कर्मगळ बिट्ट कळेदु
लिंग भक्तरादरू अनेकरू.
लिंगवबिट्ट इतरव हिडिदवल्लरे हेळीरय्या ?
उळ्ळडेयु अवरू व्रतगेडिगळेनिसिकोंबरू (संगमेश्वरद अप्पण्णा सं. व. सं. ४-२८१)
मराठी :
देवा, वैष्णव झालेले आपल्या विष्णुला सोडून विसरून
लिंगभक्त झाले अनेक.
देवा, जैन झालेले आपल्या जीनाला सोडून विसरून
लिंगभक्त झाले अनेक.
देवा विप्र झालेले आपले कर्म सोडून विसरून
लिंगभक्त झाले अनेक.
लिंग सोडून इतर धरले आहे कोण सांगा हो ?
असेल तर तो धर्मभ्रष्ट म्हणावा.........

असे आलेल्या समूहापैकी वीरशैव तसला एक समूह. हिंदू समाज आपल्या पूर्वाश्रमाच्या प्रभावाप्रमाणे दीक्षा नंतरसुध्दा आपल्या चाली न विसरता लिंगायतात पण, वाणी लिंगायत, सादु लिंगायत, गौड लिंगायत, नोळंब लिंगायत, तेली (गाणिग) लिंगायत, रेड्डी मडिवाळ, कुंभार, असे सर्व संबोधीत होते. वीरशैव आपण वीरशैव लिंगायत असे म्हणवून घेत. एवढेच नव्हेतर आपण इतर लिंगायतापेक्षा श्रेष्ठ समजून ताठरपणे वागत असल्यामुळे शरणांच्याकडून टीकेस पात्र होतं "वीरशैव वंशात जन्मास आल्या कारणे श्रेष्ठत्व येत नाही." असे सिध्दरामेश्वरांनी आपल्या एका वचनात टीका केली आहे.

श्री गुरू बसवेश्वरांचे आजोबा पणजोबा आंद्र मूळचे कम्मे ब्राह्मण. ते लिंगी ब्राह्मणपण, संचार करीत येवून बागेवाडी प्रदेशात स्थायिक झाले. आंद्रमधे प्रचलित या संप्रदायाचे लोक चरलिंग पूजक होते. चरलिंगधारी गृहस्थाना माहेश्वर असे, सन्यास्यांना जंगम असे म्हणून गौरविण्यात येत असे. ते जानवे व चरलिंग (स्थावर लिंगाचे छोटे रूप) दोन्ही धारण करीत. लिंगी ब्राह्मणांना सीमित असणारा पूजेचा हक्क सर्व मानवाना, जात, मत, पंथ स्त्री पुरुष असा भेद न करता द्यावा अशी कळकळ क्रांती पुरुष झालेल्या गुरुबसवण्णांच्यात निर्माण झाली. पण त्याला वैदिक धर्मशास्त्र आडवे येत होते. शैवशास्त्रपण वैदिक शास्त्राच्या प्रभावाखाली कार्य करीत असल्यामुळे गुरू बसवण्णा वैदिक शैव दोन्ही मार्ग सोडून बाहेर येवून नविन धर्म ‘लिंगायत' या नावाने रुपात आणला. तो शरण मोळिगेमारय्या पुढील वचनात स्पष्टपणे सांगतात.

कन्नड :
शुध्दशैवव होद्ददे, पूर्व शैववनाचरिसदे
मार्गशैवव मन्नणिय माडदे, वीरशैवव नाराघिसदे
आदिशैववननुकरिसदे, भेदिस बारद लिंग करदल्लिट्ट
कंगळिनल्लि निंदु, मनदल्लि सिंहासनंगेयदु ... (मोळिगे मारय्या)
मराठी :
शुध्दशैव न पांघरता, पूर्वशैव न आचरता,
मार्गशैव न स्विकारता, वीरशैव आराधना न करता,
आदिशैव अनुकरण न करता, भेदतानयेवारे लिंग ।
करकमलात ठेवून डोळ्यात भरून, मनातील सिंहासनात ठेवले.

इष्टलिंग योग इतर सर्व मार्गाहून भिन्न असल्याचे येते सिध्द होते.

श्री हानगल कुमारस्वामीजींनी अखिल भारत वीरशैव महासभा स्थापन केल्यानंतर पहिले अधिवेशन इ. स. १९०४ साली धारवाड येथे भरविण्यात आले होते. त्यावेळी एक निर्णय घेण्यात आला. त्या वेळच्या लिंगायत समाजाच्या नेत्यांचा उद्देश हिंदू समाजाच्या व्यवस्थेत आपण पण ब्राह्मणांच्या समान आहोत असे सिध्द करण्याचा होता.

“वीरशैव मत निगमागमोपनिषद्भाष्य प्रतिपादीत तत्वांनी पूर्ण म्हणून श्री बसवेश्वर देवरूनी, हा मत कीर्तिमान केलेला विना स्थापक नव्हेत असे शिलालेखाच्या पुराव्यावरून सिध्द होत आहे, म्हणून ही महासभा खचितपणे
सांगत आहे."

काहींना आपला धर्म बराच पुरातन असा आनंद वाटणे सहज आहे. वचन साहित्य उजेडात येण्यास सुरवात झाली होती. तेव्हा पुनर्विचार सुरू झाला. इ. स. १९४०मध्ये दावणगेरील चाललेल्या महासभेच्या अधिवेशनात अजून एक निबंध स्विकारण्यात आला. तो म्हणजे -

"लिंगायत व हिंदू लिंगायतांनी आपण हिंदू म्हणून सांगू नये हे लक्षात ठेवणे अगत्य झाले आहे. लिंगायत “हिंदू' नव्हेत आसाच पुष्कळ नेत्यांचा अभिप्राय झाला आहे. हिंदू धर्म म्हणजे चातुर्वर्ण्य, चतुराश्रम असणारा धर्म, जैन, बौध्द, शिख, धर्माप्रमाणे लिंगायत धर्मपण एक स्वतंत्र धर्म असल्याचे स्पष्ट होत
आहे.''

इ. स. १९०४ ते १९४०च्या दरम्यानच्या काळात फार मोठा वैचारिक बदल झाला होता. याला कारण काय असू शकेल ?

१) वचन साहित्यासारखे श्रेष्ठ साहित्य उपलब्ध झाले नसणे.

२) उजेड नसलेल्या गाढअंधःकारात हातास लागेल ते धरून ठेवण्याप्रमाणे, प्रवाहात वाहात जाणान्यास गवताची काडी पण आश्रय म्हणून धरून ठेवल्याप्रमाणे, शूद्रत्वाच्या प्रवाहात वाहात जाण्याचे न इच्छिता निगमागमांचा आसरा घेण्याचा प्रयत्न.

१९व्या शतकात फार मोठे सामाजिक परिवर्तन संपूर्ण देशात घडून आले. हिंदू समाजाच्या बहूदेवोपासना, अंधः विश्वास यांच्या विरूध्द एकदेवोपासना प्रचार आर्यसमाज, ब्रह्मसमाज, प्रार्थना समाज यांच्याकडून करण्यात आला.

सति सहगमनाच्या विरूध्द चळवळ, विधवा विवाह संधी, अस्पृश्यता विरूध्द बंड इत्यादी सुरू झाल्यामुळे वैदिक धर्माचे दोष व दुर्बळ गुण लिंगायत नेत्यांना समजले. एवढेच नव्हेतर आपल्या धर्मात अनेक प्रगतिपर विचार, ब्रिटीश शिक्षणाचा फायदा म्हणून नव्हेतर, सहजपणे आपल्यातच असल्याचे आश्चर्य निर्माण केले. सी. बी. ब्रावून नावाच्या ब्रिटीश विद्वानाने १७५ वर्षाच्या मागेच लिंगायत समाजाच्या प्रगतीपर आचरणाबद्दल लेख लिहिला होता.

त्यानंतर तरी का होईना लिंगायत समाजाला जाग आली हे विशेष. प्रो. एम्. आर, साखरे या विषयी 'लिंगधारणा चंद्रिके' नावाच्या एका ग्रंथास प्रौढ प्रस्तावना लिहून लिंगायत धर्माच्या वैशिष्ट्याबद्दल विवरण दिले. पुरोहितशाहीचा हात किती स्वार्थपणाचा असतो म्हणजे लिंगायतासारख्या एका श्रेष्ठ व स्वतंत्र धर्मास वीरशैव असे एक लहान शैव प्रभेदाची पट्टी कपाळावर चिकटून समाजाची दिशाभूल केयाचे ज्वलंत उदाहरण म्हणावे.

कर्नाटकाच्या अत्यंत प्रतिभावंत श्रेष्ठ व्यक्तीपैकी एक असलेले डॉ. डी. सी. पावटे. शिक्षण तज्ञ, समर्थ व्यवस्थापक होवून कर्नाटक विश्वविद्यालय स्थापनेच्यावेळी त्याचे उपकुलपती झाले होते. विश्वविद्यालयास अंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिलेली बुध्दीमान व्यक्ती. ते पंजाबचे राज्यपाल असताना तेथील राजकीय अस्तिरता समर्थपणे हाताळून पंजाब राज्याची सुधारणा करण्यास नांदी गाईली. डॉ. पावटे यांनी दि. २३-१२-१९७३ रोजीच्या इंडियन एक्सप्रेस दैनिकात "History of Lingayat Religion" या मथळ्याखाली एक लेख प्रकाशीत केला. त्याचा सारांश असा -

मी यापूर्वी ९ वर्षे वीरशैव महासभेचा अध्यक्ष होतो. त्यावेळी लिंगायत धर्माचा इतिहास समजून घेण्यास बरेच ग्रंथ वाचण्याची संधी मला मिळाली. या ग्रंथात बसवेश्वरच लिंगायत (वीरशैव) धर्माचे स्थापक म्हणून प्रस्ताव झाला आहे. मद्रास विश्वविद्यालयाच्या इतिहास पुरातत्व विभागाचे निवृत्त प्रोफेसर श्री निलकंठ शास्त्री यांनी लिहिलेला “दक्षिण भारताचा इतिहास' नावाचा ग्रंथ माझ्या दृष्टिने विश्वासार्ह वाटतो. ते त्यामधे असे सांगतात :-

"कल्याणमध्ये राज्य करीत असलेला कलचुरी वंशाचा राजा बिज्जळ यांचे प्रधान मंत्री बसवण्णा झाले होते. ते (लिंगायत) धर्माचे स्थापक असे सामान्यपणे दिसून येते. पण लिंगायतांच्या मधील सांप्रदायवादी याला विरोध करतात. एवढेच नव्हेतर हा धर्म फार प्रचीन असून तो शिवाच्या एकामुखातून उदयास आला, एकोराम, पंडिताराध्या, रेवण, मरूळ, विश्वाराध्या अशा पंच आचार्यांनी हा धर्म स्थापन केला असे सांगतात. बसवाने हा धर्म पुनरुज्जीवन केला एवढेच. पण वर उल्लेख करण्यात आलेले सर्व आचार्य बसवण्णांचे समकालीन. त्यापैकी काही वयानी मोठे तर कांही लहान होते. ही वस्तुस्थिती असल्याचा आमचा विश्वास झाला आहे."

हा नूतन धर्म दक्षिणेच्या ब-याच भागात आपल्या अधिकारामुळे पाळेमुळे पसरवील हा तुघलकाचा प्रयत्न अयशस्वी झाल्याप्रमाणे मुस्लिम धर्मास योग्य प्रतिस्पर्धी होवून राजकीय चालना शक्ती दिलेली लहान गोष्ट नव्हे. प्रथमतः विजयनगर साम्राज्य संगम वंशाच्या राजांच्याकडून इ. स. १३३६ ते १४८५ पर्यंत राज्य करण्यात आले. अलिकडेच या राजवंशाबद्दल इतिहासाच्या एका प्राध्यापकाने पुस्तक लिहून विजयनगर राज्यावर राज्यकारभार केलेले राजे सर्व लिंगायत होते असे प्रतिपादन केले आहे.

विजयनगर साम्राज्याच्या आरंभापासून इ. स. १९२० पर्यंत पंचाचार्य बसवेश्वरांच्या अनुयायाबरोबर असणारा भेद विसरून मैत्री स्नेहानेच वागत होते. लिंगायत वेदाध्ययनाबद्दल बेफिकीर होते. इ. स. १९२० नंतर अलिकडे आमची राष्ट्रीय नीती होवून अंगिकृत झालेल्या बसवानुयायिच्या जनसूहापासून ते का वेगळे होत आहेत, त्यांना ते कोणते भूत लागले कोण जाणे, मला तरी समजत नाही. लिंगायतात आपण ब्राह्मण होवून राहू अशी समजूत झाली असल्यास त्यासारखी दुःखाची बाब दुसरी नाही.

लिंगायतानी एखादवेळी आपण हिंदू म्हणून समजल्यास आजच्या कायद्याच्या दृष्टीने त्यांची शूद्रवर्णात गणना केली जाईल. वास्तविकपणे लिंगायत, जैन, शीख व बौध्द धर्माच्या समाजाप्रमाणे आम्हासपण हिंदूच्या पासून स्वतंत्र धर्माचे असे गणणा करावी म्हणून या शतकाच्या अलिकडच्या दशकाच्या पहिल्या चरणात भारत सरकारकडे अर्ज देण्याबाबत अजून सरकार कडून कोणताच आदेश निघाला नसला तरी अलिकडच्या काही वर्षांत सरकारपण लिंगायताना हिंदू म्हणून गणना करीत नाही. अलिकडे भारतीय संसद हिंदू विवाह कायदा, हिंदू अल्पवयी संरक्षणा आधार कायदे तयार करताना लिंगायत, बौध्द, जैन, ब्रह्मोसमाज धर्मियांना वेगळे समजून त्यांच्यासाटी वेगळे कायदे केले आहेत.

डॉ. डी. सी पावटे यांचा लेख फारच महत्त्वपूर्ण असल्याची वाचकांची खात्री झाली असणार. पंचाचार्यांच्या बसवेश्वरांच्या बद्दलच्या काल्पनिक कथा १९२०च्या नंतरच्या असे खचितपणे सांगता येते. लिंगायत हिंदू नव्हेत हा अभिप्राय अंबाडा भरण्याचा नसून, लिंगायत एक स्वतंत्र धर्म म्हणून परिगणना करण्यासाठी केंद्रसरकारला विनंती अर्ज देण्यात आला आहे असे समजते. (न झगडता एकजुटिने राहणे, वीरशैव पदास चिकटून राहून लिंगायतानी स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी प्रयत्न करणे, आपापल्या अंतरीक जाती जमातीध्ये मांडणे करीत सुमारे ९० वर्षे प्रयत्न केले तरी यश न मिळणे ही खरीच लज्जास्पद गोष्ट म्हणावी.)

Hindu Law, N. R. Raghavachariars, Revised by Prof. S. Venkatraman, Publisher Madras Law Journel Office, Mylapore, Madra-4, Page-32-33.

Hindu Law now not a law of all Hindus alone : A conspectus of Hindu Law as administered by the courts over the years show that it is not coincidental with religious beliefs. Apropor this aspect, the Andhra Pradesh High Court observes." Hindu Law governed not only Hindus but also Sikhs, Jains, and Buddist. It governed Lingayats a body of dissenters who deny the validity of cast distinction."

हा उल्लेखपण फारच महत्वपूर्ण, सिख, जैन, बौध्द यांच्याप्रमाणे संप्रदायक हिंदू धर्मापेक्षा लिंगायत वेगळाच असणारा. जातीपध्दत मानणारे नव्हेत हे म्हणणे लक्षात ठेवण्यासारखे. कोणत्या विषयात सहमत आहे तेथे मात्र हिंदू कायदा लागू होतो. Castes and tribes of southern India. या पुस्तकाचे लेखक Edger Thurston, K. Rangachari, Vol. IMVXto M Asian Educational services, New Delhi, Madras, 1987. या पुस्तकात पान २३६ ते २९१ पर्यंत LINGAYAT असा भाग आहे. हे पुर्नमुद्रण झालेले पुस्तक.

लिंगायताना लिंगधारी असे नाव पण आहे. निलतीरी डोगर प्रदेशात असणारे बडगर लिंगायताना लिंगकट्टी असे म्हणतात, असा उल्लेख यावरील पुस्तकात आहे. (पान नं. २३६) लिंगायत, लिंगवंत (असे कन्नडमध्ये बोलावतात.) म्हणवणारे हे लोक शांतीप्रिय जमात आहे. यांचा धर्म अगदी सरळ. ते एकाच देवाला मानतात. ब्राह्मणांचे श्रेष्ठत्त्व मानीत नाहीत. (जातीयतेचे अनुकरण नाही.) सैध्दांतीकपणे जाती व्यवस्थेचा तिरस्कार करतात. उपवास यज्ञ-याग, तीर्थक्षेत्र यात्रा यांचा नकार करतात. यांची मुख्य आराध्य वस्तु म्हणजे इष्टलिंग (पान २३६) याला जंगमलिंग असे म्हणतात. ते छातीवर धारण करतात. व्यक्ती मेल्यानंतर त्याला पूरतात. त्यावेळी लिंग डाव्या हातात ठेवतात. पुरुष-स्त्री, लहान-मोठे, श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता लिंग धारणा करतात. इष्टलिंग आपले प्राणलिंग समजून, हरवून गेल्यास अध्यात्मिक मरण अशी भावना आहे. कदाचित हरवून गेल्यास पुन्हा गुरुकडून शास्त्राप्रमाणे इष्टलिंग घेवून धारण करतात. आहार व पाण्याच्या विषयात फारच काटेकोर, कोणत्याही प्रकारचा मांसाहार करीत नाहीत. मद्यपान करीत नाहीत. इतरांच्याबरोबर मिसळत नाहीत. यामुळे सुंदर अशी, सुसंस्कृत अशी शक्तीशाली अशी कन्नड भाषा राखून ठेवण्यायोग्य झाले आहेत.

लिंगायत धर्माचे संस्थापक कोण ह्याबद्दल विवाद असून, काही लोक बसवण्णांनी पुरातन शैवमतच उध्दार केला असे म्हणतात. "The story of the so called founder of the sect, Basava, may with some limitations be accepted as history." पण स्थापक म्हणवून घेणा-या बसवण्णांची कथा पाहिल्यास ऐतिहासीकपणे तेच स्थापक असे म्हणणे शक्य आहे. या ग्रंथात Lingayat Religon' असा शब्दप्रयोग केल्याचे पाहिल्यास आम्हास फारच अभिमान वाटतो आनंद होतो. डॉ. चिदानंद मूर्तिसारख्यांना न समजलेला लिंगायत धर्म, एक स्वतंत्र धर्म म्हणून एड्गर्ट थर्स्ट सारख्या ब्रिटीश विद्वानांना समलना तेवढे पुरे !

हा ग्रंथ लिहिण्यात आला तेव्हा वचन साहित्य अजून उपलब्ध नव्हते. मिळालेले साहित्य म्हणजे भीमकविचे बसवपुराण, विरूपाक्ष पडिताचे चन्नबसव पुराण एवढेच. एक महत्वपूर्ण दाखला लेखकाने तेथे दिला आहे, "Much of the good affected by the founder has thus been contracted, and the Lingayat is gradually becoming more and more like his orthodox Hindu Brother. In proof of this tendency it may be noted that, at the time of the census of 1891 there were numberous represactions from Lingayats claiming the right to be described as Veersaiva Brahmins. Further on the occasion of the census of 1901, a complete scheme was supplied to the census authorities processing to show all Lingayats sub divisions in four groups, viz. Brahman, Kshatriya, Vaishya and Sudra." It is noted in the Mysore Census Report 1891, that the Lingayats interviewed the Maharaja and begged that their registration as Virasaiva Brahmans right be directed "The census was removed by His Highness the Maharaja's Govt. passing order to the effect that the Lingayats should not be classed as shudras any more than any other non Brahmans, but should be seperately designated by their own name, and that, while they were at liberty to call them selves Virsaiva Brahmans". (पान 242, 243)

The Lingats appears to have spread very rapidly after Basava's death; Within 60 year of founders death it was embraced from Ulavi near Goa to Sholapur and from Balehalli to Sivaganga." काही लिंगायत प्रमुखांनी इ. स. १८९१मधील जनगणणेच्या वेळी लिंगायताला वीरशैव ब्राह्मण म्हणून वर्गीकरण करावे व इ. स. १९०१मधील जनगणनेच्यावेळी लिंगायताना चातुवर्ण्यमधे वर्गीकरण करावे अशी मागणी केली होती. कसला मोठा अपराध हा ! यामुळे बौध्द, जैन, शिख यांना सहजपणे मिळालेल्या स्वतंत्र धर्माची मान्यता लिंगायत समाजाला नाहीसी करून अन्याय केला आहे. (त्यांना मिळालेले धार्मिक अपसंख्याकाची सवलतपण) वीरशैववाद्यांनी आपण ब्राह्मण व्हावे या स्वार्थापोटी सर्व समाजास द्रोह केला आहे, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. हे कृतक ब्राह्मण्यत्व मिळविण्यास लिंगायतांनी (वीरशैववादी) केलेले साहस एवढे तेवढे नाही.

१) आमचा धर्म बसवेश्वरांच्यापासून आलेला नसून आदिच होता. निगमागामापासून आला असा वाद केला.

२) हा वेद विरोधी ब्राह्मण विरोधी नव्हे. फक्त प्राणी बळी, यज्ञ यागादी कर्मकांड विरोध करतो, ज्ञानकांड नव्हे. माध्व, रामानुजांनी केल्याप्रमाणे कांही मान्य
काही अमान्य.

३) लिंगायत समाजातपण काही जाती आहेत.

४) हे सर्व साधण्यासाठी अनेक संस्कृत ग्रंथ, श्लोक यांचा उल्लेख केला. (पान ३६०).

याबद्दल थस्टर्न सांगतात :- "It is unnecessary to weary the reader with the text's and their translations. The object in referring to these latters day accounts of the origin of the Lingayats is to show the modern tendency of tradition to bring Lingayatism into line with Brahmanistic Hinduism. The works refferred to by the learned authors appear to be sanskrit writing of not more than 500 years ago, and cannot be taken as proof that the Lingayat religion is of greater antiquity than the 12th century, or that it has always been observant of caste distinction. The persistence with which these points are advanced at the present day is, however, worthy of careful notice. If Lingayatism was an island thrown up within the "Boundless sea of Hinduism" it would appear that the waters of the ocean are doing their utmost to undermine its solid foundations". (Page 260)

ग्रंथ-कारांनी उल्लेख केलेले काही म्हणणे जातीभेद करणाच्या लिंगायतांचे डोळे उघडावयास लावतात. (पान २६७)

“लिंगायत धर्माने अगदी अलिकडेच इतर जातीमधून आलेल्या लोकांचा स्वीकार केला आहे. १९व्या शतकाच्या शेवटी धारवाड जिल्ह्याच्या तुम्मिनकट्टे गावातील बरेच विणकर जातीच्यांनी लिंगायत धर्म स्वीकार केला. उज्जिनीहून आलेल्या एका जंगमाने त्यांना दीक्षा दिली. त्यांना 'कुहिनवरु' असे म्हणतात त्यांनी आपल्या पूर्वीच्या जातीचे सर्व सामाजिक संबंध सोडून घेतलेत.

गुरू बसवण्णांच्या बोधनेप्रमाणे अत्यंत खालच्या जातीच्यांना सुध्दा हा धर्म स्वीकार करतो व इतर लिंगायताबरोबरचे समान स्थान त्यांना देतो. अब्बेड्युबायिस् लिहितात, "अत्यंत खालच्या श्रेणीचा अस्पृश्य लिंगायत धर्म स्वीकार केल्यानंतर तो कोणा ब्राह्मणापेक्षा कमी नाही अशी भावना आहे. कोठे इष्टलिंग असते ते शरीर लिंगदेवालय होण्यामुळे तेथे जात भेद, योग्यता भेद करीत नाहीत. लिंगभक्त झालेल्या अस्पृश्याची झोपडी, इष्टलींग नसलेल्या राजाच्या वाड्यापेक्षा श्रेष्ट अशी भावना आहे. हा धर्म स्थापक बसवण्णांचा आशय."

थर्स्टन सांगतात :-
"पण उज्जिनी मठाचे जंगम सांगतात की मातंग, महार वगैरे अस्पृश्य लिंगवंत होणे शक्य नाही." (पान २६७). (उज्जिनी मठपीठ स्थापन केलेले शरण मरुळसिध्द हे मातंग जातीचे होते हे सत्य हे मठवाले विसरलेले स्पष्टपणे दिसते.)

असे वीरशैव वाद्यांच्याकडूनच लिंगायत धर्म आपले अस्तित्व गमावून घेत आहे ते यामुळे सिध्द होत आहे. गुरू बसवण्णांनी ब्राह्मणापासून भंग्यापर्यंत सर्वांना धर्म संस्कार दिले हे सूर्य चंद्राएवढे स्पष्ट आहे, हे माहित होणार केव्हा ? वचन साहित्य वाचल्यानंतर,

या पाश्वभूमीवर शक्य तितक्या लौकर लिंगायतानी वीरशैवांचा संपर्क कमी केला नाहीतर आपली अधोगती आपणच ओढवून घ्यावी लागेल. सिध्दांत सिखामणी ग्रंथातील मूळ श्लोक व व्याख्यान असणारे पान नं. १०८. परिक्षेद ९चा मजकूर जसाचा तसा इथे देण्यात येत आहे. श्लोक २८, २९, ३०.

"वीरशैव ब्राह्मण, वीरशैव क्षत्रिय, वीरशैव वैश्य यांनी आपापल्या जातींच्या घरीच भोजन करावे. इतरांच्या घरी नाही. वीरशैव क्षत्रिय वीरशैव वैश्य यांनी वीरशैव ब्राह्मणाच्या घरी भोजन करावे. पण ब्राह्मणांनी क्षत्रिय किंवा वैश्य यांच्या घरी भोजन करू नये."

लिंगायतानी अगदीच मंदमतीचे न होता ह्या श्लोक व व्याख्यानाब्दल आलोचन करावे. हे पुस्तक दि. काशिनाथ शास्त्रि संपादिन 'सिध्दांत शिखामणी' म्हैसूरच्या पंचाचार्य इलेक्ट्रिकल प्रेसमधे छापले गेले आहे. इथे एक लक्षात ठेवावे की ह्या वीरशैवांचा आंद्र, तामिळनाडू, केरळच्या वीरशैवांशी संबंध आहे अशी भावना करू नये. नसलेले वीरशैव पद लादून लिंगायत धर्म समाज फोडण्याचा पंचपीठाधीशांचा बेत आहे असे समजावे. लिंगायत समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्गीकरण शक्य का ? एखादे वेळी पंचपीठाधीश वीरशैव ब्राह्मण झाले तर त्यांनी इतर लिंगायत असलेल्या वीरशैव क्षत्रिय (?) व वीरशैव वैश्य (?) च्या घरचे आमंत्रण (जेवणाचे) स्विकारून 'पतित' होणार का? एखादे वेळी हिंदू समुदायाच्या वर्णाश्रम व्यवस्थेच्या चिखलात सापडलेल्या जनांगाना त्यापासून मुक्त होण्यासाठी लिंगायत झाल्यानंतर पण जुने आचरण तेथे पुढे चालू ठेवल्यास प्रयोजन काय ? असले एक पुस्तक बाहेर पडून लिंगायतांच्या वर्गिकरणास सुरुवात केली असता आम्ही प्रतिकार केल्याचे भद्रावतीचे लिं, शरण मुरगेप्पा यांनी सांगितल्याचे आम्हास आठवते.

जणगणनेचे विवरण: इ. स. १९०१च्या जनगणतेचे Census of India. Vol. ix-B Bombay

Part II या मधेप्रादेशिक वर्गिकरणाची माहिती आहे. संपादक - R. E. Enthoven.

मुंबई प्रांतात लिंगायत कक्षेत येणा-या उपजाती. (पान २२२.)

१) अगसर १२) कुहिन शेट्टि २३) जीर ३४) पद्मसालि
२) अय्या (जंगम) १३) नाडिग | नावि २४) कुरुब । ३४) पडसालि
३) बडिगर १४), पंचमसालि २४) कुरुनालि ३६) सादरू
४) बणगार / नागलिक १५) रेड्डि २६ पट्टनाळि ३७ पत्तार
५) बणजिग १६) तिराळि २७) शिवसंपगेरि ३८) माळवार
६) देवांग १७) तुरुकार | दनगाहि २८)। बळिगार ३९) मुसुकिन मल्लव
७) गाणिगरू १८) चल्लार २९) हडपद ४०) वाणी
८) हगार | मालिगारू १९) गवकि ३०) नोळंब ४१) माळी
९) कम्भार २०) गवंडि ३१) इळिगेर | कलाल ४२) तेली
१०) कुडुवल्ललिग २१) हंडेयवरू ३२) लालगोंड ४३) गुरव
११) कुंभार २२) हंडेरजीर ३३) पंचाचारदवरू

हे सर्व मुंबई प्रांतात इ. स. १९०१ मध्ये दाखल झालेले लिंगायतांच्यामधील जाती. त्यात असणारे जिल्हे - बेळगाव, विजापूर, धारवाड, कॅनरा (कारवार), कुलाबा, रत्नागिरी. लक्षात येणारे अंश म्हणजे संपूर्ण चार्टमधे वीरशैव असे लिंगायत समान अर्थाने नाही. एक उपजात म्हणून पण कोठेही दाखल झाली नाही. याचा अर्थ हे पद मुंबई प्रांतात प्रवेश पण केलेले नाही असे स्पष्ट होते. सर्व भारताच्या जनगणणेत इ. स. १९०१मध्ये असलेली लिंगायतांची संख्या २५,३७,७४५ फक्त. (पंचवीस लाख सदोतीस हजार सातशे पंचेचाळीस) पान - ५७०. हे राहणारे प्रांत म्हणजे - अंदमान, बॉबे, कोडगु, मद्रास, हैदराबाद, म्हैसूर, वत्रावणकोर, पाहाण्यात आलेल्या आतील जाती लिंगायत, बनिया, धोबी, गवळी, गुरव, हजाम, जुलारी, कोळी, कोष्टि, कुभार, लोहार, नगर्त, नायडु, शीलवंत, सोनार, तेली, बक्कतिगरु, माळी, वाणी, झरीकारी. या जनगणणेत पान ५९१ मध्ये हैद्राबाद प्रांतात वीरशैव ४३७१ लोक होते. वीरशैव लिंगायत १५५३ लोक होते, असे दाखल झाले आहे.

ही अतीशय महत्त्वाची माहिती म्हणावी लागेल. याचा अर्थ लिंगायत नसलेले वीरशैव आंध्रात १९०१ मधे ४३७१ लोक होते तर लिंगायत धर्म स्वीकारलेले वीरशैव १५५३ लोक होते. यापासून असे समजून येते की लिंगायत धर्म स्वीकारलेल्या ४०-५० जाती पैकी वीरशैवामधून आलेला तसला एकसमूह, ‘लिंगायत" ह्या शिर्षकाखाली उरलेल्या जातींची यादी केली आहे.

इ. स. १९११च्या जनगणणेत लिंगायतांची लोकसंख्या २९,७६,२९३ (एकोणतीस लाख शाहत्तर हजार दोनशेत्र्याणव) इतकी होती. ही संख्या अगदी
वास्तव वाटते. प्रांतवार लोकसंख्या पण देण्यात आली आहे. पुढील चार्ट पाहा -

प्रांत एकूण पुरुष स्त्रिया
मुंबई लिंगायत १३,४९,२४८ ६,८३,४५२ ६,६५,७७६
केंद्र शासित लिंगायत ’७,७९३ ’४,२०४ ’३,५८९
बिहार लिंगायत ’७,५५८ ’३,६९७ ’३,८६९
कूर्ग लिंगायत १,३४,५९२ ’६६,३७६ ’६८,२१७
मद्रास जंगम १,१०,०९१ ’५४,०५९ ’५६,०३२
मैसूर लिंगायत ७,२९,४३१ ३,६५,०९१ ३,६४,३४०
हैदराबाद लिंगायत ७,५७,६११ ३,८१,२०१ ३,७६,४१०

या सर्व वैज्ञानिक अध्ययनापासून माहित होणारे म्हणजे सगळीकडे ‘लिंगायत हेच पद प्रामुख्याने दिसते. त्याचबरोबर उपजाती पण देण्यात आल्या आहेत. हैद्राबाद प्रांत सोडल्यास वीरशैवाचा उल्लेख दुसया राज्यात नाही. तमिळनाडु (मद्रास प्रांत) व केरळ (कोचीन व त्रावणकोर) मधे पण वीरशैवाचा प्रस्ताव नाही. तमिळनाडुमधे लिंगधारी लिंगायताना जंगम म्हणण्यात येते. त्यांची संख्या जंगम या शिर्षकाखाली देण्यात आली आहे. _ या विषयात अजून कांही माहिती देता येईल. इ. स. १८८१पासून १९०१ पर्यंत झालेल्या इंपिरियल सेन्ससय्या कक्षेत, तमिळनाडूच्या जातीवार क्र. सं. ३०२९-३०९६ (६४ जाती) लिंगायतांच्या उपजाती म्हणून आळखण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे तेलगु देशाच्या जातीत क्र. सं. ४०४०-४०६६ पर्यंत क्र. सं. - ४०५६, ४०६१ मध्ये जाती लिंगायत-जंगम असे नमूद केले आहे. एकूण २७ तेलगुलिंगायत जातीमध्ये केवळ दोन जाती लिंगायत-जंगम असे ओळखण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कन्नड देशाच्या लिंगायत जातीमध्ये ३८ जाती ओळखून त्यामध्ये ३८वी जात वैरशैव म्हणून ओळखण्यात आली आहे. म्हणजे तमीळ ६४ जाती, तेलगु २७ जाती तसेच कन्नड देश ३६ जाती व म्यल्याळी देशाच्या ५ लिंगायत जातीपैकी केवळ तीन जातींना लिंगायत-वीरशैव असे म्हणण्यात आले आहे. म्हणजे १३४ जातींना लिंगायत उपजाती असे म्हणण्यात येवून तीन जाती मात्र लिंगायत-वीरशैव असे व दोन जाती लिंगायत-जंगम असे म्हणण्यात आले आहे. म्हणजे मुख्य धर्म लिंगायत असे संबोधून त्यामध्ये वीरशैव व जंगम अशा जाती म्हणण्यात आले आहे. विना वीरशैवामध्ये लिंगायताना घालण्यात आले नाही. याचा अर्थ लिंगायत असा एक मोठा सर्वे नंबर म्हणून धरल्यास त्यामध्ये वीरशैव, जंगम असे दोन हिस्सा नंबर येतात. पण पुष्कळ लोकांनी चुकीची समजूत करून घेतल्याप्रमाणे वीरशैवात लिंगायत नव्हे. लिंगायत नावाचा (१३४ जाती) १३४ एकराचा एक सर्वे नंबरची जमीन म्हटल्यास वीरशैव केवळ ३ हिस्सा नंबर पुरतेच मर्यादीत राहातात, तर जंगम फक्त २ हिस्सा नंबर पुरते मर्यादीत राहतात. अजून व्यवस्थितपणे सांगावयाचे झाल्यास लिंगायत नावाच्या पित्यास १३४ मुले असून त्यापैकी ३ वीरशैव व २ जंगम आहेत बाकीचे १२९ मुले वेगवेगळ्या नावाची आहेत असे सांगता येईल, यांना दाखला म्हणजे Mythic society चे पुस्तक नंबर ३१५-४८७ IND १८९१-V, तसेच P-३०९, ३१५-४८७ Ind-१९०/V2 PEA तसेच ३१५-४८२ Ind १८८१-V४मधे आहेत. वीरशैव व लिंगायत समान पद म्हणून वाद करणा-यांनी कृपया याची नोंद घ्यावी. लिंगायत धर्माच्या १३४ मुलांच्या पित्यास वीरशैव व जंगम अशी दोन मुले फक्त, म्हणजे पिता झालेल्या लिंगायतास १२९. पिता मुलांना जन्म देतो विना मुले पित्यांना जन्म देत नाहीत. म्हणून शाहण्यांनी हे नीट समजून घ्यावे. एका मोठ्या समाजात घुसलेल्या एका लहान समुदायाचे नाव (वीरशैव) संपूर्ण धर्मास लावणे हे कितपत बरोबर आहे ? हा सरळ सरळ अधर्म व अपराध म्हणावा लागेल.

(मागील वर्षिच्या जनगणणेची माहिती दिलेले बल्लारीचे शरण एम्. आर् पंपन गौडा व बंगळूरू - कोडिगेहळ्ळीचे शरण चन्नबसवय्या यांना त्याबद्दल धन्यवाद)

इ. स. २००१च्या जनगणनेतील लिंगायतांची माहिती क्षेत्र नाव


संपूर्ण भारतातील लिंगायतांची संख्या ५५,१९,६२२ (पंचावन्न लाख एकोणीस हजार सहाशे बावीस) असल्याचे आकडेच जनगणनाबरोबर नसल्याचे सांगते. कर्नाटकाच्या एकूण संख्येपैकी एक तृतिआंश लिंगायत असल्याचे फजल अलि कमिशनच्या वरदीप्रमाणे माहित होते. दिल्लीत असणा-या लिंगायतांची संख्या फक्त २७ असल्याचे हास्यास्पद वाटते. अत्यंत दुःखाची बाब म्हणजे लिंगायताना जनगणणेत योग्य स्थानी घातले नाही. वीरशैव या पदाचा उपयोग केला आहे. एका जातीवादी वर्णाश्रमासारख्या वैदिक समूहाला स्वतंत्र परिपूर्ण व प्रगतीपर धर्माच्या समान स्थानात गणना करणे विषादनीय वाटतो. ह्या अपराधाला कारण अखिल भारत वीरशैव महासभा.

इ. स. १९०४मध्ये ही संस्था स्थापन झाली व तेव्हापासून हा धूर्त कट अव्याहतपणे चालू आहे. एखाद्या वेळेस वीरशैवास स्वतंत्र धर्माची मान्यता मिळविण्याची इच्छा महासभेस असेलच तर, ती गुरू बसवण्णांनी दिलेल्या लिंगायत धर्माबरोबर मिसळून न घेता स्वतंत्रपणे प्रयत्न करावेत. लिंगायत धर्मास चिकटून घेवून वंचना करू नये.

धर्मबंधूंनो, लिंगायत धर्माचे नेते असलेल्या काहींच्या धूर्त कटामुळे वीरशैव हे ब्राह्मण म्हणवून घेण्यासाठी केलेला पराकोटीचा अन्याय नाहीसा करण्याचा काळ आता आला आहे.
१) लिंगायत हिंदू नव्हेत म्हणून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळविणे. स्वतंत्र नावाने जनगणना करणे.
२) वीरशैव हे एका उपसमूहाचे नाव असल्याने ते काढून टाकणे.

Reference: LINGAYAT HINDU NAVHET - A prose composition in Kannadda by Her Holiness Maha Jagadguru Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.

*
Previous बसवधर्म पीठ (रजि.) महामने महामठा, लिंगायत धर्म सहिंता Next