पूज्य श्री महाजगद्गुरु माते महादेवी
|
|
चिन्मूलाद्रिचे चित्कलायुक्त श्री माताजींचा जन्म सन १९४६ मध्ये चित्रदुर्ग येथे | झाला. विज्ञान, तत्त्वज्ञानाची स्नातकोत्तर पदवी प्राप्त झाल्यानंतर १९६६ साली पूज्य श्री महाजगद्गुरु लिंगानंद स्वामीचींच्या कडून जंगमदीक्षा घेऊन 'माते महादेवी' असे अभिदान मिळवून १९७० साली विश्वविनूतन स्त्री जगद्गुरु पीठारोहण होवून, भक्तिज्ञान-विरक्तीचे दिव्य संगम यांच्यात झालेला आहे.
आत्मीय भक्तगण त्याना ‘माताजी' असे संबोधतात. आपल्या लहान वयातच महान ज्ञान मिळवून, जगाच्या जागृतीसाटी आपल्यातील ज्ञान सुधा त्यांना प्रवचन आणि ग्रंथ लिखाण याद्वारे जनतेला देत आहेत. श्री माताजींची पहिली कादंबरी 'हेप्पिट्ट हालु’ यास राज्य साहित्य अकॅडमिचे पुरस्कार मिळाले आहे. अक्कमहादेवीच्या जीवनावर लिहीलेले 'तरंगिणी' हा ग्रंथ माताजींच्या सिध्दहस्तातून साकारलेली द्वितीय कादंबरी. बसव तत्त्व दर्शन, हिन्दु कोण? लिंगायत धर्म दर्पण इ. त्यांनी अनेक ग्रंथ लिहीले आहेत.
निर्भय व्यक्तिमत्त्व, तत्त्वनिष्ठता, सत्यप्रियता, समाजोध्दाराची तळमळ असे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व लाभलेल्या माताजींनी आपल्या अस्खलित वाणीने कित्येक लोकांना आकर्षित करुन चैतन्य देत आहेत. दैवीदत्त प्रतिभा, असामान्य पांडित्य, दिव्य मधुरवाणी, प्रशांत चित्त यांचे संगम माताजींच्यात झाल्यामुळे विश्वधर्माचे कार्य स्वीकारून, स्वदेश-परदेशातही संचार करुन, भारतीय आध्यात्मिक संदेश यशस्वीपणे प्रचार करीत आहेत.
विश्वगुरु बसवेश्वरांचे ऐक्यस्थळ कुडलसंगम येथे बसवधर्म महाजगद्गुरु पीठ स्थापन करण्यात पूज्य माताजींचा सिंहाचा वाटा आहे. मुसलमानांचे पावित्रक्षेत्र जसे मक्का, शिखांचे धर्मक्षेत्र जसे अमृतसर त्याप्रमाणे बसवभक्तांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे कुडलसंगम. याच ठिकाणी प्रतिवर्षी बसवक्रांती दिनानिमित्त (मकरसंक्रांत) जानेवारी ११ ते १५ रोजी भव्य शरणमेळावा पूज्य माताजींच्या नेतृत्वाखाली भरविला जातो.
*