शरण मेळावा- बसव क्रांती दिन

दिनांक १२, १३, १४, आणि १५ जनेवरि २०१९.
स्ठळ: महामने महामठ कूडलसंगम, ता॥ हुनगुंद, जि॥ बागलकोट, कर्नाटक.

शरण मेळावा- बसव क्रांती दिन

प्रत्येक धर्मातील लोक आपल्या आदिगुरुंच्या जीवनातील ३ दिवस महत्त्वाचे म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म, लिंगैक्य आणि नवधर्म घोषणा. हेच ते तीन दिवस होय. आदि प्रमथ बसवराजांनी वैषाख महिन्यातील अक्षय त्रितीया रोहिणी नक्षत्राच्या दिवशी जन्म घेतला. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी त्यांनी देह सोडला, लिंगैक्य झाले. मकर संक्रांतीच्या दिवशी नव धर्माची घोषणा केली.

जगातील सर्व धर्मातील लोक वर्षातून एकदा तरी एकत्रित येतात. जसे मुस्लीम हाज यात्रा करतात, शिखपंथीय खाल्सा करतात, याप्रमाणे बसवतत्त्वानुयायांनी एका जागी जमावे या दृष्टीकोनातून ‘शरण सम्मेलन आयोजित केले आहे. सन १९८८ पासून दरवर्षी हा समारंभ मोठ्या वैभवांत आचरण्यात येत आहे. श्री.गुरूबसवदेवांनी आपल्या हयातीतच अशी कित्येक ‘गणपर्व’ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. हा आदर्श त्यांनी दाखवून दिलेला आहे.

म्हणून लिंगायत धर्मियांनी आपल्या जीवनाच्या अवधीत, आपल्या हयातीत शक्य तितक्या वेळी कूडल संगम क्षेत्रात भरणाच्या बसव क्रांतीच्या समारंभात, प्रत्येक वर्षी जानेवारी दि.१३-१४ व १५ रोजी शरण मेळाव्यात भाग घ्यावा.

*
सूचीत परत
Previousपूज्य लिंगानंद आप्पाजी यांची थोडक्यात ओळखलिंगायत धर्मNext
Guru Basava Vachana

Akkamahadevi Vachana

[1] From the book "Vachana", pub: Basava Samiti Bangalore 2012.