Previous लिंगायत धर्म सहिंता शरण मेळावा- बसव क्रांती दिन Next

पूज्य लिंगानंद आप्पाजी यांची थोडक्यात ओळख

लिंगैक्य पूज्य लिंगानंद आप्पाजी यांची थोडक्यात ओळख :

कर्नाटकातील विजयपुर (विजापूर) जिल्हाचे बसवन बागेवाडी तालुक्याचे मनगूळी गावात दिनांक १५/९/१९३१ रोजी मंगळवार शरणे कल्लाम्मा मल्लाप्पा यांचे चिद् गर्भात जन्म झाला. त्यांचे जन्म नांव संगमेश म्हणून ठेवण्यात आले.

गरीबीच्या अनेक कष्ट-अडचणी आल्या तरी सुद्धा धैर्य व साहस करुन पुढे चालून विद्या अभ्यास केले. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावामध्ये करुन त्यांनी बेळगांवचे लिंगराज कॉलेज मध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. नांगनूर मठाचे हॉस्टेल मध्ये राहून अभ्यास पूर्ण केले. दिनांक १९/११/१९५६ मध्ये विश्वगुरु बसवेश्वरांना साक्षी मानून भगवे वस्त्र धारण करुन ज्ञान संन्यास स्विकारले. त्या दिवसापासून संगमेश हे लिगानंद स्वामी बनले. असे संचार करता-करता प्रवचन द्वारा प्रचार चालु केले १९६१ ऑगष्ट ७ ला त्यांनी जंगम दिक्षा घेतले.

धर्माकडे लोक येत नसताना धर्मालाच त्यांच्या घराच्या दरवाज्या पर्यंत नेले. उत्तर कर्नाटकाचे बीदर जिल्हा व इतर सर्व गावाकडे पदयात्रा करुन १०-१२ वर्षापर्यंत त्यांचे अमोघ वाणीने विश्वधर्म प्रवचन द्वारा गुरु बसवेश्वरांचे सिद्धांत प्रचार केले. कर्नाटकातील सर्व जिल्हे, महाराष्ट्रातील गडहिंग्लज, सोलापूर, अक्कलकोट, उदगीर, लातूर व इचलकरंजी इत्यादी शहरे, आंध्रप्रदेशातील सदाशिवपेट, तांडूर व जैहराबाद या शहरात प्रवचन करून जनजागृती केले आहेत. त्यासाठी प्रवचन पितामह म्हणूनच त्यांना ओळखले जाते.

इ.स. १९७० मध्ये धारवाड येथे, जगन्माता अक्कामहादेवी अनुभाव पिठाची स्थापना केले. अपूर्व वाग्मी, प्रसिद्ध साहिती, अक्कमहादेवींचे प्रतिरूपच असलेल्या पूज्य माता महादेवी यांना प्र.प्रथम महिला जगद्गुरु पद दिले.

पुज्य आप्पाजी यांनी 'देवरू', 'देवपूजा विधान', 'अक्कन प्रवचन व पुज्य माताजी यांचे जीवनावरील ‘चिन्मुलाद्रिय चित्कळे' असे ग्रंथ लिहून कन्नड साहित्याला फार मोठी देण दिले आहेत. त्यांनी आपल्या घंटासारखे कंठाने मानव जीवनाचा ध्येय, जीवनाची नश्वरता, देवाचे स्वरूप व देवाचे अस्तित्व असे बरेच विषयावर प्रवचन करत होते. त्याचे ऑडिओ आणि व्हीडीओ कॅसेट आता उपलब्ध आहेत.

विश्व गुरु बसवेश्वरांचे विद्या भूमी, तपोस्थान, लिंगैक्य क्षेत्र झालेल्या कूडलसंगम सुक्षेत्राला लिंगायतांचे धर्म क्षेत्र म्हणून जाहिर केले. त्याच बरोबर इ.स. १९९२ मध्ये, बसव धर्म पिठांची ट्रस्ट स्थापन केली गेली. इ.स.१९८७ मध्ये त्यांनी बसवधर्म महाजगद्गुरु पीठाची प्रथम पिठाधिश म्हणून पद स्विकार केले. १९८८ ला शरण मेळावा चालू करून कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गोवा व देश विदेशातील लक्षांतर संख्ये मध्ये शरण बांधवांना आकर्षित केले. दिनांक ३०/६/१९९५ रोजी लिंगैक्य झाले. पुज्य गुरुजींच्या संकल्पाला द्वितीय महाजगद्गुरु माता महादेवी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करीत आहेत.

*
सूचीत परत
Previous लिंगायत धर्म सहिंता शरण मेळावा- बसव क्रांती दिन Next