लेखिका: पुज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी
१) कोण दृढ विश्वासाने समानतेचे हरिकार विश्वगुरू बसवण्णाच आदिप्रमथ म्हणून विश्वासून त्यांना नतमस्तक होवून आचरण करतो तो - लिंगायत,
२) कोण अत्यंत भक्तीभावाने धर्मपिता गुरूबसवण्णांची, आदी शरणांची, त्यांच्या अनुयायांची वचने धर्म संहिता म्हणून रोज नित्य पठण करतात, सांगतात व आचरण करतात ते - लिंगायत.
३) कोण सृष्टीकर्ता परमात्म्यात अपार विश्वास ठेवून तोच या जीव-निर्जीव वस्तुंच्या सृष्टि-स्थिती-लय यांना मूळ कारण म्हणून, त्यास लिंगदेव असे संबोधून, त्या लिंगदेवाचे प्रतीक गुरू बसवण्णांनी रूपाला आणलेले विश्वाच्या आकाराचे इष्टलिंग छातीवर धारण करून पूजा करणारे,
४) कोण षडाक्षरी मंत्र ''ॐ लिंगाय नमः" अष्टाक्षरी मंत्र "ॐ लिंगदेवाय नमः" व द्वादशाक्षरी मंत्र "ॐ श्री गुरूबसव लिंगाय नमः" म्हणून, विश्वासून पठण करतात ते लिंगायत.
५) जे लिंगांग योगी श्री सिध्दरामेश्वरांचे वचन "बसवाची मूर्तीच ध्यानास मूळ, बसवाची कीर्तीच ज्ञानास मूळ, म्हणल्याप्रमाणे गुरू बसवण्णांचे भाव चित्र, (विशेष करून अभय हस्त अथवा बसवण्णांची मूर्ती) घरात, गणसमावेशात, सार्वजनिक सभा, समारंभात प्रारंभीच पूजा करणारे आणि न चुकता वैशाख महिन्याच्या अक्षय त्रितिया दिवशी "बसव जयंती आणि श्रावण शुध्द पंचमीच्या दिवशी बसवेश्वरांचा लिंगैक्य दिवस ''बसव पंचमी' म्हणून आचरण करतात ते लिंगायतः
या वरील दोन्ही पवित्र दिवशी, दुस-या वैयक्तीक म्हणजे लग्न समारंभ किंवा गृहप्रवेश वगैरे सारख्या कार्यक्रमात गुंतवून न घेता वरील उत्सवानिमित्त चालणा-या मिरवणूका, पथसंचलन वगैरे कार्यक्रमात भागी होण्याचा परिपाठ ठेवणारे ते लिंगायत,
६) कोण सणांच्या दिवशी (शरणांच्या जयंत्या, लिंगैक्य संस्मरणा दिवस वगैरे) षटकोन बसवध्वज घरावर फडकवणारे, षटकोन चिन्ह घराच्या पुढील भागावर लावणारे व शरणांची नांवे आपल्या मुलांना ठेवणारे.
७) कोणी-एक लिंगायत आपण जन्मल्याबरोबर अथवा आईच्या गर्भात असतानाच लिंग धारणा करून घेवून, आपल्या वयाच्या १४-२० वर्षाच्या काळात लिंग दीक्षा निज जंगमाकडून (तत्व जाणलेला जंगम) स्विकारतो आपले धार्मिक अनुयायित्व सिध्द करतो तो लिंगायत,
८) तो मात्र लिंगायत - जो इष्टलिंग धारण केलेल्या इतर कोणासही आपला सहधर्मी म्हणून जाणून जातभेद, वर्गभेद न करता परस्पर दासोह (सहभोजन) व वैवाहीक संबंध संकोच न करता वाढविणारा. आणि इतर पर धर्मी झालेल्यांना बांधवाप्रमाणे पाहणारा. जो भक्तत्व, गुरूत्व, जंगमत्व जन्मापासून आलेल्या जाती नव्हेत; त्या पवित्र देव ज्ञान व अनुभावी जीवनातून आलेल्या योग्यता प्राप्त प्रमाण असे संबोधून आचरण करणारा.
९) ते लिंगायत - जे आपल्या धर्म पुरूषाला अष्टावरणच अंग, षडाचारच प्राण, षट्स्थलच आत्मा म्हणून समजून षट्सूत्र, षट्शील, षटक्रिया, अंगीकारून आचरण करतात.
अष्टावरण अंगस्वरूप :- गुरू, लिंग, जंगम-पूजनीय असणारे., विभूती, रूद्राक्ष, मंत्र-पूजा वस्तू (लिंग) करूणोदक, करूणप्रसाद - पूजेचे फळ,
पडाचार : - बसवाचार, लिंगाचार, सदाचार,
प्राणस्वरूप : - शिवाचार, गणाचार, भृत्याचार
षट्स्थल :- भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य
आत्मस्वरूप :- अशा अध्यात्मिक पायच्या.
१०) कुडलसंगम पवित्र धर्मक्षेत्र समजून आपल्या जीवनाच्या काळात एकदा तरी प्रत्येक वर्षी होणा-या शरण मेळाव्यात जानेवारी १४ रोजीच्या समुदाय प्रार्थनेत सहभागी होवून, पवित्र गणलिंग दर्शन घेवून आपल्या अनुयायित्वाचे दृढीकरण (Confirmation) करावे.
११) लिंगायत कोण म्हणजे देवालये न बांधता आपला देहच देवालय करून देवस्वरूपी असलेले गुरू लिंग, जंगम यांची पूजा करणारा. अध्यात्मिक वे द्र बसव मंटप, आदि शरणांच्या अनुभव माटपाच्या रीतीने खेडे, शहर व नगरात वचनांच्या अभ्यासासाठी, अध्ययनासाठी, प्रार्थनांच्यासाठी स्थळ म्हणून निर्माण करून आपण पण त्यामध्ये सहभागी होणारा.
१२) तो मात्र लिंगायत - जो
(अ) यज्ञ-याग, होम-हवनासारख्या विधीपासून लांब
राहणारा.
(आ) पंचसूतक म्हणजे जननसूतक, मरणसूतक, जातसूतक, उच्छिष्ट सूतक, रजस्सुतक न पाळणारा
(इ) समाज वर्णपध्दतीच्या आधारे चार भागात विभागणी करणे हे देव निर्मित नव्हे, ती मानव निर्मित असे समजून, जातीभेद, अस्पृश्यता सारख्या अमानवी प्रवृत्तींन विरोध करून समानतेच्या पायावर सर्वांना समान संधी असल्याप्रमाणे व्यक्तींचे सर्वांग सुंदर अभिवृध्दी करणारा.
(ई) मांसाहार वर्ज करून शाकाहार पध्दतच अंगीकारून अहिंसा तत्वाचे पालन व वैचारिकता जीवनात रूढीत आणणारा
१३) लिंगायत म्हणजे - जो मानवतावादी होवून, विश्वधर्माचा अनुयायी होवून, आणि जो समाजच निराकार परमात्म्याचे मुख, 'दया हीच धर्माचे मूळ असे समजून, पापींना, वाट चुकलेल्यांना अपरिमित प्रेमाने, मानवियतेने क्षमा करून, गौरवून, त्यांच्या दुःखाच्या निवारणासाठी झटून सर्व जीवांचे हित चिंतीणारा.
लिंगायत (बसव) धर्मियांची काही आचरणीय मूल्ये.
शरण बंधूनो, प्रार्थना हाच धर्माचा आत्मा होय. तुम्ही आपल्या जीवनात खालील गोष्टींचे अनुकरण करा.
१) घरी नेहमी वैयक्तिक पूजा, जप, ध्यान करण्याची प्रथा ठेवावी.
२) सायंसमयी घरातील सर्वांनी सामूहिकपणे एका ठिकाणी बसून प्रार्थना करून वचनसाहित्याचे पठण-पारायण करावे.
३) आठवड्यातून एकदा तरी एकाठिकाणी बसून सामूहिक प्रार्थना, वचनशास्त्र पारायण करण्याची सवय लावून घ्यावी. आठवड्याच्या सामुहिक प्रार्थनेसाठी भजन आणि भक्तिगीतानी युक्त अशी सामूहिक प्रार्थना पुस्तके व कॅसेट लभ्य आहेत.
४) आपले जीवन जगाच्या हितासाठी उदात्तपणे व्यतित केलेल्या शरणसंतांचे ‘जयंती दिन' ज्यांच्या त्यांच्या नांवे आचरण करून, स्वतःचे जीवन कृतार्थ करून घ्यावे. शरण संताच्या जयंती दिनांची व उत्सवाची यादी पुढे दिलेली आहे त्या दिवशी प्रातःकाळी श्री बसवेश्वराची पूजा करून तीर्थप्रसाद घ्यावा. सायंकाळी १०१ वचने सामूहिकपणे पठण करून, मंगळारती करावी व प्रसाद विनियोग करावा.
५) बसवक्रांतिच्यादिशवी कुडलसंगम या पवित्र धर्मक्षेत्रातील शरण मेळाव्यात भाग घेऊन श्रध्दा-भक्ति वाढवावी.
६) अपरिहार्य कारणाने या ठिकाणी (कूडलसंगमक्षेत्री) येणे न झाल्यास बसव क्रांतिच्या दिवशी आपण असलेल्या ठिकाणी एका जागेत सर्वांनी मिळून सामूहिक प्रार्थना करण्याची सवय लावून घ्यावी.
लिंगायत (बसव) धर्मियांच्या काही बोलीचाली.
१) कुठल्याही व्यक्तीला बोलावून घेताना आदराने |
शरण, बन्नि |
२) कुठल्याही व्यक्तीला पाठविणेचे (निरोप) झाल्यास |
शरणु शरणार्थि, होगी बन्नि. |
३) कुठल्याही व्यक्तीला वाहनातून पाठविताना हात हलवित |
जै, जे म्हणावे. |
४) मंगल घोष |
जयगुरु बसवेश, हर हर महादेव, विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जै |
५) कांहीतरी अवघड काम करतेवेळी, अपघात प्रसंगी, ठेच लागतेवेळी, अनाहुत संभवणे साध्य असतेवेळी बचाव करून घेताना उच्चारावयाचे |
बसवा, राक्षसु तंदे |
६) कुणाची लग्न-पत्रिका अथवा जाहिरात, दैनंदिन हिशेबाचे टिप्पण लिहिताना सुरुवातीस लिहावे |
ॐ श्री गुरुबसवलिंगाय नमः |
Reference: LINGAYAT HINDU NAVHET - A prose composition in Kannadda by Her Holiness Maha Jagadguru Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.