Previous लिंगायत, महात्मा बसवेश्वर, गुरु बसव लिंगायत कोण ? (Who is Lingayat) Next

लिंगायत हिंदू नव्हेत (Lingayat's are Not Hindu)

[This Article is from the book: LINGAYAT HINDU NAVHET - A prose composition in Kannadda by Her Holiness Maha Jagadguru Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

इ. स. १९६९च्या डिसेंबर महिन्यात उडपीत विश्वहिंदू परिषदेचे विराट हिंदू सम्मेलन भरले असता 'हिंदू कोण?' या नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले. ते अत्यंत लोकप्रिय होऊन विकले गेले. नंतर अनेक विषयांचा त्यात समावेश करून पुर्नमुद्रण करून १९८३ साली प्रकट केले. १९९७ पर्यंत त्याची दहा पुर्नमुद्रणे होवून विकली गेली. त्यानंतरसुध्दा पुस्तकास मागणी असली तरी त्याचे पुर्नमुद्रण झाले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्यात झालेले वैचारिक बदल.

पूज्य श्रीमन् निरंजन महाजगद्गुरु लिंगानंद स्वामीजी व मी "हिंदू" पदाला फारच विस्तृत असा अर्थ देत होतो.

"हिंदू हा एक विशिष्ट धर्म नव्हे. जात, मत, पंथपण नव्हे; काही स्वतंत्र धर्माचे एक संघ अशी विविधता असणा-या फळांच्या झाडांची एक "बाग'' असल्याप्रमाणे. - पूज्य श्री लिंगानंद स्वामी.

ॐकारात विश्वास ठेवून त्याचा उपयोग करणारे सर्व हिंदू. - माताजी.

आमचे प्रतिपादन पाहून हर्षित होवून सन्मान्य श्री. हो. वे. शेषाद्री यांनी दि. ६-१११९८५ रोजी मला मुक प्रशंसनीय पत्र पण लिहिले होते ते असे -

पूज्य श्री माता महादेवी यांना साष्टांग प्रणाम -

कल्याण किरणची विशेष आवृत्ती डोळ्याखालून घालण्याचा सुयोग आला'मातृहरके" या सदरात तसेच लिंगायत धर्मसारमध्ये आपण दिलेला हिंदूत्वाचा व्यापक अर्थ वाचला. फारच आनंद वाटला.

आज नानाप्रकारच्या आतबाहेरच्या स्वार्थी शक्ती आमच्या समाजात अंतःकलह निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून अशा ऐनवेळी तुम्ही दिलेले प्रतिपादन खरेच समयोचित. एवढेच नव्हे तर, अत्यंत समंजसपण होय. फक्त लिंगायत एवढेच नव्हेतर वैदिक बौध्द, जैन, शीख सर्वानाच त्याच्यापासून लाभ मिळवता येईल. समाजाच्या संघटनेसाठी आपली अल्पस्वल्प शक्ती खर्च करणा-या आमच्या सारख्या कार्यकत्र्यांना तो एक मदतीचा हात म्हणावा लागेल.

आमच्या सर्व सहकार्याच्यावतीने आपणास सौजन्यपूर्वक प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. दि. ६-११-१९८५ - हो. वे. शेषाद्री, उत्थान, बेंगळूरू

पण इ. स. १९९७च्या नंतर आमच्या विचारधारेत पूर्ण बदल झाला. हिंदू एक धर्म नव्हे. काही धर्माचा एक संघ असे मानल्यानंतर जैन, बौध्द, लिंगायत, शीख धर्म त्यामध्ये असल्यामुळे "हिंदू" एक धर्म म्हणून सांगता येत नाही. हिंदू एक धर्म मानल्यास त्यातील जैन, बौध्द, लिंगायत, शीख हे धर्म न होता जाती, पंथ म्हणून ओळखले जातील. वास्तविकपणे या सर्व धर्मांना आपलेच असे एक स्वतंत्र अस्तित्त्व, आचार-विचार, संहिता आहेत. जगाच्या सर्व ग्रंथात हिंदू हा एक धर्म असेच नमूद झाले आहे. भारताच्या जनगणणेत हिंदू एक धर्म म्हणून गणना करण्यात आली आहे. असे असता हिंदू कांही धर्माचा संघ अशी व्याख्या नुसत्या पुस्तकात व भाषणात वापरण्यापुरती मर्यादित राहणार विना वास्तविकपणे नव्हे.

सांस्कृतिकपणे म्हणजे वेष, भूषण, नावे, कौटुंबिक पध्दती वगैरेच्या दृष्टिने लिंगायत हिंदू संस्कृतीस जवळचे असतील पण धार्मिणपणे हिंदू नव्हेत. स्वतः विश्वहिंदू परिषद यांनीच दिलेले व्याख्यान पाहा.

भारतात उदयास आलेला सनातन म्हटला जाणारा, नैतिक तसेच आध्यात्मिक जीवन सिध्दांतात आदर, श्रध्दा ठेवणारे व निष्ठेने त्याचे पालन करणारे सर्व (मग ते कोणत्याही देशाचे, प्रांताचे, कुळाचे, जातीचे व संप्रदायाचे का असेनात) व स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे सर्व हिंदू.

किती कमकुवत व असंबध्द असे हे विवरण. एक दीक्षा देवून आत घेत नाहीत, वैदिक धर्माचे मुख्य चिन्ह असणारे जानवे उपनयनाद्वारे दुस-यांना देत नाहीत, कोणी का होईनात आपल्यात आपणहून श्रध्दा वाढवून हिंदू म्हणवून घेतले तर पुरे म्हणे ! अशा अव्यवस्थेला कारण म्हणजे एक संस्थापक गुरू हिंदू धर्मास नसणे. एखादे शास्त्रपण नसणे की जे समाजाचे नियंत्रण करू शकेल. जगाचा प्रथम योगी, ॐकाराचा द्रष्टा, भारतीय धार्मिक परंपरेचा मूळ पुरूष झालेला ‘योगीराज' शिवाने दिलेला धर्म आपल्या मूळ स्वरूपात व्यवस्थितपणे चालून आला असता तर भारत देशास खराच एक अद्भुत असा धर्म लाभला असता. दुर्दैवाने शिवाने दिलेला धर्म आर्यांच्या आगमनानंतर संपूर्णपणे वैदिक वर्चस्वाला बळी पडून त्याच्या वर्णाश्रम व पुरोहितशाहीच्या विळख्यात सापडला. आपले मूळ स्वरूप गमावून विकृत झाला. याचा परिणाम म्हणून वैदिक व्यवस्थेमुळे बिघडलेल्या समाजास सुधारण्यासाठी ब-याच नवीन धर्मानी जन्म घेतला. तेच जैन, बौध्द, लिंगायत व शीख धर्म होत. भारताच्या धार्मिक इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर, तसेच इथे उदयास आलेल्या धर्माचा तुलनात्मक दृष्टिने अध्ययन केले असता लिंगायत हा - जैन, बौध्द व शीख यांच्याप्रमाणेच एक स्वतंत्र धर्म असल्याचे आमच्या लक्षात आले. या अध्ययन व माहितीच्या आधारे लिंगायत हे हिंदू धर्माचे एक अंग नव्हे अशा निर्णयाप्रत आलो. ह्या जाणीवेची फलश्रृती म्हणजेच प्रस्तुत लेख.

याचे परिणाम बन्याचप्रकारे होवू शकतात.

१) हिंदूवादी संघटना झालेली विश्वहिंदूपरिषद, आर. एस्.एस्. वगैरेंना लिंगायत समाज हिंदू समाजाच्या व्याप्तितून बाहेर जाणे खेदजनक वाटते. यामुळे समाजाची शक्ती दुर्बल होत असल्याची भीती त्यांना भेडसावेल.

२) हिंदू राष्ट्राची उन्नत्ती हेच आपले ध्येय मानलेला संघ परिवार व इतर हिंदूवादींना भारताच्या समग्रतेला धक्का बसणार ही भीती भेडसावेल.

या दोन्ही अर्थहीन भ्रांती. कारण धार्मिकपणे, सैधांतीक लिंगायत हिंदू नसतील पण सांस्कृतीकपणे म्हणजे देशी नावे, वेशभूषण वगैरेबाबतीत ते हिंदू विरोधी (Anti Hindu) निश्चितच नाहीत. देशहिताच्या दृष्टिने जैन, लिंगायत, शीख भारताचे विरोधी होणार नाहीत. कारण लिंगायतांना भारत हीच धर्मभूमी. ज्या धर्माचे संस्थापक भारतात जन्मले त्या धर्माचे अनुयायी कोठे का असेनात त्यांना भारतच जन्मभूमी. कोणी का होईनात ते जन्मलेल्या व वाढलेल्या देशालाच ते आपली मातृभूमी मानणार, तर त्यांच्या धर्माचा प्रथम जन्मलेला देशच त्यांची धर्मभूमी होणार.

"लिंगायत हा स्वतंत्र धर्म अहिंदू धर्म" अशा जागृतीने होणारे चांगले परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.

१) विश्वगुरु बसवण्णांनी दिलेला प्रगतीपर विचार धारेचा वैचारिक धर्म म्हणजे लिंगायत धर्म अस्तित्त्वात असणे भारत देशालाच नव्हेतर सर्व जगाला माहित होण्याची संधी लाभणार आहे.

२) जागतिक धर्माच्या श्रेणीत लिंगायत नाव दाखल होणार आहे.

३) आज अनेक लिंगायत आपल्या धर्मगुरूंच्या इच्छा, उद्देश तसेच धर्म संविधानाच्या विरुध्दपणे होम-हवन, नवग्रहपूजा, प्राणीबळी, अन्यदेवतांची पूजा, झाडे-झुडुपांची पूजा वगैरे करण्यात गुंतले आहेत. त्यांना धर्माचे आचरण सांगून देणारे गुरुवर्ग व मठाधीश हे सर्व करीत असल्यामुळे ते लिंगायत धर्माचे जिव्हाळा असलेली एक देवोपासना डोळ्याआड करीत आहेत; त्यामुळे धर्माचे बोधन करण्याचा हक्क गमावून घेतला आहे. लोक अज्ञानाने वागत आहेत. वचन साहित्य वाचत गेल्याप्रमाणे लोकच मठाधीश करीत असलेले चुकीचे आचरण काही क्षणातच ओळखतात. लिंगायत धर्माचे खरे स्वरुप कळल्यावर भीतीचे निवारण होवून
आत्मबळ वाढेल.

४) गुरू बसवण्णा व त्यांच्या समकालीनांची वचने वाचल्यानंतर उमटणारी एका सुंदर शरण समाजाची कल्पना, मूर्तस्वरूप घेतलेल्या आजच्या लिंगायत समाजाचे अवलोकन केले असता, लोकांचा भ्रम पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे फुटून जातो. "बसव तत्त्व फारच छान आहे, हे लोक असे का वागतात ?" असे म्हणून, वचन साहित्य अभिमानी विचारतात. या विपर्यासाला कारण म्हणजे समाज वचन साहित्यापासून दूर राहिल्यामुळे. ह्यामुळे लिंगायत आपण करीत असलेल्या चुकीच्या आचरणातच समाधान-तृप्ती मानतात. आपला स्वतंत्र अवैदिक धर्म ही जाणीव झाल्यावर तात्त्विक शुध्दिकरण लवकर शक्य होते. आपल्या धर्माला सोडून, धर्मगुरुंच्या इच्छेविरुध्द आचरण सोडून देण्याचे प्रयत्न करतात. त्यांनी चुका सुधारून घेऊदे न घेवुदे कमीत कमी आपण करीत असलेले आचरण चुकीचे आहे हे केव्हातरी कळून आल्याशिवाय राहणार नाही.

या दृष्टिने प्रस्तुत लेख फारच उपयुक्त ठरावा अशी भावना व्यक्त करते.

हिंदू धर्म म्हणजे काय ?

लिंगायत धर्माचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी, लिंगायत हिंदू नव्हेत याची खात्री करून घेण्यासाठी हिंदू धर्माचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्माचे वर्णन करण्यास हजारो पाने लागतील, काही वाक्यात त्याचे विवरण देणे शक्य नाही.

"हिंदू म्हणजे पुरातन पारसी लोक सिंधू नदीस संबोधून सांगण्याचा शब्द झाला होता. संस्कृतमध्ये असणारे 'स' कार सर्व पुरातन पर्शियन भाषेत 'हकारात बदलत असल्यामुळे ‘सिंधू' हा शब्द 'हिंदू' असा म्हणण्यात येऊ लागला. - स्वामी विवेकानंद

सिंधू नदीच्या प्रदेशात राहणा-या लोकांना हिंदू या नावाने बोलावण्याचा परिपाठ पर्शिया, ग्रीस, अरेबिया वगैरे लोकांनी रुढीत आणला. सुरूवातीस हिंदू हे पद भौगोलिकपणे वापरण्यास सुरूवात झाली, विना धर्म सूचक म्हणून वापरात नव्हते. पर्शियन 'स'कार'ह'कार करून वापरत असल्यामुळे 'सिंधू' हे पद 'हिंदू' असे होऊन वापरात आले. सुरुवातीला सिंधू नदीच्या प्रदेशात राहणायांना लागू होत असे. कालांतराने भारत खंडाच्या निवासींना वापरण्यात येऊ लागले. वचन वाङ्मयच घेतले असता तेथे शैव, वैदिक, वैष्णव, शाक्त, काळामुख, कापालिक वगैरे पदे येतात, विना हिंदू पद वापरले गेले नाही. भारत खंडाच्या बाहेरून येणा-या लोकांनी भारतातील मूळ निवासींना हिंदू या पदाने ‘जनांग समूहाला' वापरात आणले. वास्तविकपणे हिंदू धर्मच नव्हे. मुस्लीम भारतातील मूळ निवासींना हिंदू म्हणत व या देशास हिंदुस्थान म्हणत असत. तेव्हा हिंदुस्थानात असणारे जैन, बौध्द सर्व त्यांना हिंदुच वाटले. त्यांच्याप्रकारे हिंदू म्हणजे मुस्लीम नसणारे.

पुढे ब्रिटीशांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर, त्यांनी भारतातील धार्मिक व्यवस्थेचे अध्ययन केल्यानंतर सांप्रदायिक हिंदू धर्मापेक्षा जैन, बौध्द व शीख यांचे आचरण वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात येवून त्यांना अहिंदू धर्म म्हणून ओळखले. सांप्रदायिक हिंदू आपणास वैदिक किंवा सनातन धर्माचे असल्याचे सांगत. भारतात असलेले मूळ निवासी झालेले आदिवासी लोक व द्रवीड जनांग, नंतर आलेले आर्य असा सर्वांचा विश्वास झाला. आचार, विचार, मिळून मिसळून बनलेल्या समाजालाच हिंदू म्हणण्यात येत असे. या कारणामुळे हिंदू म्हणजे खचितपणे अमुकच तमुकच असे काही न सांगता येणारे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंदू धर्मास एक संस्थापक नाही. त्यामुळे आर्य भारतास येण्यापूर्वी भारतात असलेल्या शिव संस्कृतीचा मूळ पुरूष योगिराज शिव एकारितीने स्थापक म्हणता येईल. कारण ॐकारचा दृष्टा शिव, जसे हिमालयात जन्मलेली गंगा आपल्याबरोबर अनेक ओढे, नद्या यांना मिसळून घेवून वाढत जावून मोठी नदी झाली, त्याप्रमाणे शिवापासून उगम पावलेला शैव धर्म कालांतराने आलेल्या आर्य धर्म संस्कृतीस आपल्यात समाविष्ट करून घेवून नंतरच्या काळात पर्शियन वगैरेंच्याकडून हिंदू धर्म म्हणवून घेतला. अनेक ऋषीमुनी, साधुसंत, तत्त्वज्ञानी, दार्शनीक, पूजारी, पुरोहित सर्वांनी लिहिलेले बोल, परस्पर विविधतेने मिसळलेले असे सर्व हिंदूधर्मात मिसळले आहे.

वेदामध्येच परस्पर विरूध्द असे विचार आहेत. देव एकच आहे असा विचार आहे. त्याचबरोबर सूर्य, अग्नी, वरूण, पोषन इत्यादी देवतांची स्तुती आहे. निरिश्वरवाद आहे. सेश्वरवादपण आहे. ज्ञानकांड आहे. कर्मकांड आहे. यज्ञयागादी आचरण आहे। व त्यांचे खंडणपण केले आहे. ब्रह्मसूत्र, उपनिषद यांच्यावर टीका टिपणी लिहिली आहे, पण त्याच श्लोकात अद्वैत, विशिष्ट अद्वैत यावर टीका लिहिण्यात आली आहे. दया, अहिंसा वगैरे नीती सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे क्षुद्र देवताना प्राणी बळी देण्याचे पण आहे. अत्यंत सुसंस्कृत अशा योग-ध्यान वगैरे क्रिया आहेत. स्वेच्छाचाराचे तांत्रिक मार्ग पण आहेत. परस्पर रागद्वेषांनी भांडणाया देवतांची चरित्रे पुण्यकथा म्हणून ऐकण्याच्या परिपाठाबरोबरच ब्रह्मचर्या, पतिव्रता, एक पत्नीव्रता वगैरेसारख्या आदर्शाचे वैभवीकरणपण आहे. असा हिंदू धर्म अत्यंत मिश्रित व्यवस्थेने बनलेला धर्म झाला आहे.

या पार्श्वभूमीशी तुलना करता सामान्यपणे एकरूपाचे सिध्दांत, विश्वास, आचार, विचार, विधी विधानांनी सामावलेले जैन, बौध्द, लिंगायत, शीख धर्म हिंदू धर्माहून वेगळेच असल्याचे दिसून येतात.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक म्हणतात, "Acceptance of the Vedas with reverence, recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and the realization of the truth that the number of gods to be worshiped is large; that indeed is the distinguishing feature of Hinduism" (वेदांना भक्ती व आदराने मान्य करणे, मोक्षासाठी बरेच साधनामार्ग असल्याचे सांगणे पूजेला योग्य अशा देवतांची संख्या अपार असल्याचे सत्य कबूल करणे; हेच हिंदूधर्माच्या वेगळेपणाचे खरे वैशिष्ट्य आहे.)

गो रक्षण हिंदूधर्माचे मुख्य कर्तव्य; महात्मागांधी असे सांगतात. "Cow protection is dearest possession of the Hindu sect. No one who does not believe in cow protection can possibly be a Hindu. It is a noble belief. Cow worship means to me worship of innocence." ''गोचे संरक्षण हे हिंदूमताचा जिव्हाळा आहे. गोमातेत विश्वास नसणारा हिंदू नव्हे. ती एक उदात्त श्रध्दा. मला तरी गायीची पूजा म्हणजे निष्पापपणाची पूजा वाटते."

शुध्द शाकाहारी असणारा लिंगायत धर्म केवळ गोच नव्हे तर घोडा, शेळी, मेंढी, कोंबडी, हत्ती इत्यादी सर्व प्राण्यांना जगण्याचा हक्क असल्याचे प्रतिपादन करतो. प्राणीपूजा लिंगायत धर्मात निषिध्द असल्यामुळे गायीची पूजा करीत नाहीत. हिंदूना गाय गंगा, गायत्री, गीता ह्या पूजनीय. पण लिंगायतात हे आहेत का ? तो हिंदू धर्माहून भिन्न की अविभाज्य अंग याविषयी आता पाहया -

हिंदू लिंगायत धर्म
१. एक संस्थापक गुरू नाही। १. १२व्या शतकातील गुरू बसवण्णा संस्थापक
२. नास्तिक, निरीश्वरवादी, सेश्वरवादी २. सेश्वरवादी धर्म-सृष्टिकर्त्यांवर विश्वास ठेवणे हे कर्तव्य.
३. वेद, आगम प्रतिज्ञापूर्वक मान्य ३. वेदागम, पुराण मान्य नाही, वचन साहित्य आधार
४. चावण्यावर विश्वास ठेवणारे ४. जात वर्ण असे विभाजन न मानणारे.
५. द्विज वर्णियांनाच उपनयन ५. सर्व मानवाना इष्टलिंगा दीक्षा
६. स्त्रियांना उपनयन नाही. ६. पुरूषाप्रमाणे स्त्रियांनापण लिंगदीक्षा.
७. अनेक देवतावर विश्वास, बहुदेवतोपासना ७. सृष्टिकर्ता लिंगदेवात मात्र विश्वास, एक देवोपासना.
८. तीर्थक्षेत्र यात्रात विश्वास ८. तीर्थक्षेत्र यात्रात विश्वास नाही.
९. ज्योतिष्य, वास्तु, मुहर्त वगैरेत विश्वास ९. या सर्वात विश्वास नाही.
१०. श्रध्दाकेंद्र : मंदिर, देऊळ १०. श्रध्दाकेंद्रः अनुभव मंटप , (बसव) मंटप
११. शाकाहारी मांसाहारी दोन्ही असणारे ११. सक्तिने शाकाहारी
१२. होम-हवन, यज्ञ-याग, प्राणी बळींचे आचरण १२. ह्या सर्वांचा निषेध
१३. विवाहात आग्नीसाक्ष, सप्तपदी, पौरोहित्य वगैरेचे आचरण १३. अग्नीसाक्ष, सप्तपदी नाही. केवळ गुरू-लिंग जंगम साक्ष एवढेच
१४. द्विज वर्णाचे लोक शव जाळतात १४. लिंगायत लोक शव पुरतात.
१५. पुरोहिताकडूनच पूजा १५. भक्ताकडून देवाची थेट पूजा
१६. अंतरजातीय विवाह नाही। १६. अंतरजातीय विवाहास वाव आहे.
१७. इतरांना दीक्षा संस्काराने सामाऊन घेता येत नाही. १७. दीक्षा संस्काराने कोणासही धर्मात घेण्यास वाव आहे.
१८. जनन, मरण, उच्छिष्ट, जात, रजो सूतक पाळतात १८. पंच सूतकांचा निषेध करण्यात आला आहे.
१९. पापाला प्रायश्चित आहे. १९. प्रायश्चित्त नाही फक्त पश्चाताप आहे.
२०. व्रत, नेम, उपवास आहेत २०. धार्मिक आचरण म्हणून नाही
२१. उद्योगात उच्चनीचता आहे पौरोहित्य वगैरेचे आचरण २१. सर्व उद्योग व उद्योगी समान.

आता वरील एकेका विषयाबद्दल सविस्तरपणे पाहू या -

१. हिंदू धर्मास स्थापक गुरू नाही.

बौध्द धर्मास बुध्द, जैन धर्मास (शेवटचा तिर्थकर झालेले) महावीर, शीख, धर्मास गुरूनानक, ख्रिश्चन धर्मास येसू ख्रिस्त, मुसलमान धर्मास (शेवटचे प्रवादी) मोहम्मद पैगंबर याप्रमाणे स्थापक गुरू म्हणून नाव लौकिक मिळविल्याप्रमाणे हिंदू धर्मास एक स्थापक गुरू नाही. लिंगायत धर्माचे स्थापक गुरू, १२व्या शतकात होवून गेलेले विश्वगुरू बसवण्णा (११३४-११९६) होत. गुरू बसवण्णांचे समकालीन शरण व नंतर होवून गेलेल्या शरणपरंपरेच्या सर्वांनी हे मान्य केले आहे. खालील वचन पहा.

कन्नड :
आदियल्लि नीने गुरुदेवात कारणा निनिंद हुट्टितु लिंग.
आदियल्लि नीने गुरुदेवात कारणा निनिंद हट्टितु जंगमा.
आदियल्लि नीने गुरुदेवात कारणा निन्निंद हुट्टितु प्रसादा.
आदियल्लि नीने प्रसादिवाद कारणा निनिंद हुट्टितु पादोदक.
इंती गुरू, लिंग, जंगम, प्रसाद, पादोदक स्वरूप नीनेयाद कारणा;
जंगम प्राणियागि सदाचारियादे.
अदु कारणा नीने सर्वाचारसंपन्ननागी पूर्वाचारियुनीनेयादे.
आद् कारणा गुहेश्वरलिंगदल्लि चंदय्यंगे,
लिंगद निजव तिळुहा संगनबसवण्णा ! (अल्लमप्रभूदेव व. सं. ८९४)

मराठी :
सर्वप्रथम तूच गुरूझाल्याकारणे तुझ्यापासून जन्मले लिंग.
सर्वप्रथम तूच लिंग झाल्याकारणे तुझ्यापासून जन्मले जंगम.
सर्वप्रथम तूच जंगम झाल्याकारणे तुझ्यापासून जन्मला प्रसाद.
सर्वप्रथम तूच प्रसादी झाल्याकारणे तुझ्यापासून जन्मले पादोदक.
असे गुरू, लिंग, जंगम, प्रसाद, पादोदक स्वरुप तूच झाल्याकारणे
जंगमप्राणी होवून सदाचारी झालास.
या कारणे तूच सर्वाचार संपन्न होवून पूर्वाचारी तूच झालास.
या कारणे गुहेश्वर लिंगात चंदय्याला,
लिंगाचे सत्य दाविणारे संगन बसवण्णा.

२) नास्तिक, निरीश्वरवादी, सेश्वरवादी

हिंदू धर्मात सांख्य (व त्याचा आचार विभाग झालेल्या योगा)चे पैशेषिक, पूर्व मिमांसक निरीश्वरवादी, म्हणजे सृष्टिकर्ता एकच असे न मानणारे चारवाक (चार्वाक,) नास्तिक लिंगायत धर्म हा सेश्वरवादी धर्म (Theistic Religion). सृष्टिकर्ता लिंगदेव हा या धर्माचा जिव्हाळा, सर्वस्व. लिंगांग सामरस्यच याचे ध्येय, लिंग म्हणजे ब्रह्मांडागत चैतन्य असा परमात्मा आणि अंग म्हणजे पिंडांडगत चैतन्य झालेला जीवात्मा. या दोघांचे सम्मिलन म्हणजेच लिंगांग सामरस्य होय. देव आहे हे परम सत्य, देव एकच यावर दृढ विश्वास. खालील वचने पाहा.

कन्नड :
अमुल्यनु अप्रमाणनु अगोचर लिंग
आदि मध्यवसानगळिल्लद स्वतंत्र लिंग;
नित्य निर्मळ लिंग.
अयोनि संभवनय्या नम्म कूडलसंगम देवरू (बसव व, दी. - १२२२)
मराठी :
अमुल्य अप्रमाण अगोचर असे लिंग
आदि मध्य अंत नसलेले स्वतंत्र लिंग।
नित्य निर्मळ असे लिंग;
अयोनि संभव हो आमचे कूडलसंगम देव.

कन्नड :
इब्बरू मूवरू देवरेंदु उब्बि मातनाडबेड
देवनोबने कोणिरो, इब्बरेबुदु हुसि नोडा !
कूडलसंगम देवरल्लदे इल्ल वेदितु वेद. (बसव. व. दी. - ५४४)
मराठी:
दोन तीन देव म्हणून फुगून बोलू नकोस
देव एकच पहा, दोन म्हणणे खोटे !
कूडलसंगमदेवा शिवाय देव नाही म्हटले वेद.

कन्नड :
निन्नरिकेय नरकवे मोक्ष नोडय्या,
निन्ननरियद मुक्तिये नरक कंडग्या,
नीनोल्लद सुखवे दुःख कंडय्या,
नीनोलिद दुःखवे परम सुख कंडय्या,
चन्नमल्लिकार्जुना
नी कट्टि केडहिद बंधनवे निर्बधवेदिप्पेनु ! (अक्कमहादेवी - शि. व. सं. - ५-२६२)
मराठी:
तुझ्या जाणीवेचा नरकच मोक्ष पहा देवा,
तुझ्या अजाणतेची मुक्तीच नरक पहा देवा.
तुला नको ते सुखच दुःख पहा देवा
तू इच्छिलेले दुःखच परमसुख पहा देवा
चन्नमल्लिकार्जुन
तू बांधून घातलेले बंधनच निबंध म्हणून असेन.

कन्नड :
गट्टिदुप्प तिळिदुप्पक्के हंगुटे अय्या ?
दीपक्के दीप्तिगे भेदबुंटे अय्या ?
अंगक्क आत्मंगे भिन्नवुटे अय्या ?
एन्नंगवनु श्री गुरू मंत्रव माडी तोरिदनागि,
सावयवक्कु निरवयक्कु भिन्नविल्लवय्या.
चन्नमल्लिकार्जुनन
बेरसि मतिगेवळ एतक्के नुडिसुविरय्या ? (अक्कमहादेवि शि, व. सं. - ५-१९५)
मराठी :
घट्ट तूपास पातळ तूपाचे ऋण आहे का देवा ?
दिव्यास व प्रकाशास भेद आहे का देवा ?
देहास व आत्म्यास भिन्नता आहे का देवा ?
माझा देह श्री गुरुने मंत्रमय केल्यामुळे ।
अवयवधारी व अवयवशून्य भिन्न नव्हेत देवा
चन्नमल्लिकार्जुनात
एक झालेल्या भ्रमिष्टेला का बोलविता हो ?

३) हिंदू धर्मास वेदागमच श्रेष्ठ प्रमाण

हिंदू धर्मास वेद, आगम, स्मृति, श्रृति, ब्रह्मसूत्र - भगवद्गीता हेच श्रेष्ठ प्रमाण (शास्त्र). या शास्त्रांचे दास्यत्व झिडकारून धर्मपिता बसवण्णांनी वेद, श्रुति, स्मृति यांनाच परिक्षेला लावले. या सर्वांपेक्षा अनुभव व अनुभाव प्रमाण (शास्त्र) श्रेष्ठ असे सांगितले. त्यास पर्याय म्हणून वचन साहित्य साध्य व सोप्या अशा कन्नड भाषेत, जे सर्वांना सहज समजेल असे रचून दिले. वचनशास्त्रच आज लिंगायत धर्माचे आधार शास्त्र झाले आहे. पुढील वचने पहा -

कन्नड :
हाल तोरेगे बेल्लद केसरू, सक्करेय मळलु
तवराजद नोरे तेरेयंते आद्यर वचनविरलु
बेरे बाविय तोडि, उप्पुनीरनुबुवन विधियंते
आयितेन्न मति, कूडलसंगमदेवा.
निम्म वचनंगळ केळदे अन्य पुरांणगळ केळि केईनय्या. (बसव व. दी. २९२)
मराठी:
दुधाच्या प्रवाहास गुळा चा चिखल, साखरे ची वाळू,
अमृता च्या फेसाळ लाटा सम प्रथमांची वचने असता,
दुसरी विहिर काढून खारट पाणी चाखल्यापरि माझे दैव,
तुमची वचने न ऐकता अन्य पुराण ऐकून वाया गेलो कूडलसंगमदेवा.

कन्नड :
वेदंगळ हिंदे हरियदि, हरियदि
शास्त्रंगळ हिंदे सुळियदि, सुळियदि.
पुराणंगळ हिंदे बललदिरू, बल्लदिरू.
सौराष्ट्र सोमेश्वरन कैपिडिदु
शब्द जालंगळिगे बळलदिरू, बळलदिरू. (आदय्या सं. व सं. १-१०८८)
मराठी :
वेदांच्या मागे पळू नकोरे पळू नको.
शास्त्रांच्या जवळ फिरकू नकोरे फिरकू नको.
पुराणांच्या भोवती घिरट्या नको रे घिरट्या नको.
सौराष्ट्रसोमेश्वराचा (देवाचा) हात धरून,
शब्दांच्या जाळ्यात फसून दमू नकोरे दमू नको.

कन्नड :
वेदक्के ओरेय कट्टवे, शास्त्रक्के निगळव निळ्ळुवे.
तर्कद बेन्न बारनेत्तुवे आगमद मूग कोयिवे नोडय्या,
महादानि कूडलसंगमदेवा.
मादार चन्नय्यन मनेय मग नानय्या. (बसव व, दी. - ७१४)
मराठी :
वेदांना चिंदोरीत बांधून ठेवीन, शास्त्राच्या पायात साखळ्या बांधीन.
तर्काच्या पाठीवर बार ओढीन. आगमांचे नाकच कापीन पहा देवा.
महादानी कूडलसंगमदेवा,
मातंग चन्नय्याच्या घरचा पुत्र हो मी.

कन्नड: नाददवलदिंद वेदंगळादवल्स दे, वेद स्वयंभुवल्ल निल्लु,
मातिन बलदिंद शास्त्रगळादवल्लदे, शास्त्र स्वयंभुवल्ल निल्लु.
पाषणद बलदिंद समयंगळादवल्लदे, समय स्वयंभुवल्ल निल्लु. ।
इंती मातिन बणवेय मुंदिट्ट कोंडु आतन कंडिहेवेंदडे,
आतनत्यतिष्टद्दशांगुल.
आतनेतु सिलुवनेदात अंबिगर चौडय्या.
मराठी :
शब्दांच्या बलाने वेद झाले विना, वेद स्वयंभु नव्हेत थांब
बोलांच्या बलाने शास्त्र झाले विना, शास्त्र स्वयंभु नव्हते थांब.
पाषाणाच्या बलाने समय बनले विना, समय स्वयंभु नव्हेत थांब.

असे बोलांचा गंज पुढे ठेवून त्यास पाहिन म्हटल्यास, तो अत्यातिष्टद्दशांगुल. तो कधीही हाती लागणार म्हणाला अंबिगर चौडय्या (सर्वात मोठ्यापेक्षा दहा बोटांनी उंच असणारी वस्तू)

जगातील सर्व धर्माना आपलेच असे धर्मग्रंथ आहेत. खिश्चनांना बायबल, मुस्लिमांना कुराण, शिखांना ग्रंथसाहेब, बौध्दांना त्रिपिटक, पर्शियांना जेड्अवस्था, ह्याप्रमाणे वैदिकांना वेद आहेत. ह्या सर्व धर्मानुयायिंना त्यांच्या आचाराबद्दल हे कसे ते कसे वगैरे विचारल्यास, आमचा धर्मग्रंथ असा सांगतो म्हणून उत्तरे देतात. त्याचप्रमाणे हिंदूना त्यांच्या आचरणाबद्दल विचारले असता वेद, आगम, गीता, पुराण वगैरेकडे बोट दाखवतात. लिंगायतांनी आपल्या धर्माच्या आचरणासाठी मार्गदर्शन म्हणून ठेवावयास पाहिजे असलेले वचन साहित्य हेच लिंगायतांचे आचार, विचार, संस्कार यांचे नियंत्रण करण्याचे साधन होय. श्री मरुळु शंकरदेव म्हणतात :

“बसवण्णा नडेदुदे मार्ग, नुडिदुदे वेद"
"बसवण्णा चाललेलाच मार्ग, बोललेलेच वेद”

श्री सिध्दरामेश्वर म्हणतात :

कन्नड :
एम्म वचनोंदु पारायणक्के
व्यासदोंदु पुराण समबारदय्या.
एम्म वचनद नूरेटरध्ययनक्के ।
शतरुद्रिय याग समबारदय्या.
एम्म वचनदोंदु पारायणक्के
गायत्रि लक्ष जप समबारदय्या
कपिलसिध्दमल्लिकार्जुना. (सिध्दरामेश्वर व. सं. १६१३)
मराठी :
आमच्या वचनाच्या एका पारायणाची बरोबरी
व्यासाचे एक पुराण करू शकत नाही.
आमच्या वचनाच्या १०८ अध्ययनाची बरोबरी
शतरुद्र याग करू शकत नाही.
आमच्या वचनाच्या एका पारायणाची बरोबरी
गायत्रि लक्ष जप करू शकत नाही.
कपिलसिध्दमल्लिकार्जुन

चार्वाक, जैन, बौध्द व शीख या धर्मानी वेदांचे प्रामाण्य तिरस्करल्यामुळे ते वैदिक नव्हेत असे म्हणावे लागते.

एकदा गुजरातच्या स्वामी नारायण पंथाचे, ते अहिंदू पंथाचे अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळविण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले. त्या वेळचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झालेले श्री पी. बी. गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली निकाल दिला. त्या निकालाचा सारांश असा, "वेदांचे भक्ती व श्रध्देने पालन करणे, बहुदेवतोपासनेत विश्वास ठेवणे, मोक्ष साधनेसाठी अनेक मार्ग आहेत हे मान्य करणे, हीच हिंदू धर्माची लक्षणे." असे बाळ गंगाधर टिळकांच्या अभिप्रायाच्या आधारावर, स्वामी नारायण पंथांचे लोक वैदिक आचरण करीत असल्यामुळे ते हिंदूच असल्याचा निकाल देण्यात आला. याचप्रमाणे कलकत्त्याच्या रामकृष्ण आश्रमाच्या अनुयायांनी पण प्रयत्न करून हारले गेले. हे दोन्ही पंथ हिंदू देवतांची पूजा करतात, वेदागम मान्य करतात, होमहवन, यज्ञ-याग वगैरे कार्यात स्वारस्य दाखवतात म्हणजे ते अहिंदू कसे होतात?

लिंगायत धर्म वेद प्रामाण्य मानीत नाही. होत-हवम वगैरेंचा तिरस्कार करतो, व एकदेव इष्टलिंग उपासक धर्म झाल्यामुळे स्पष्टपणे अहिंदू धर्म म्हणवून घेतो.

४) चार्तवण्र्यात विश्वास

हिंदूधर्म शास्त्र चातुर्वण्य व चतुराश्रम व्यवस्था प्रतिपादन करतो. या प्रकारे समाजात वर्ण आधारित विभाग चार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. या चार वर्णातून बाहेर असणारा पंचम म्हणजे अस्पृश्य.

ऋग्वेदात येणा-या पुरूष सुक्तात देवाच्या डोक्यातून ब्राह्मण उत्पन्न झाला, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांडितून व शूद्र पायातून असे सांगण्यात आले आहे. वेदांचे अध्ययन, त्यावर आधारित धार्मिक पौरोहित्य करण्याचा अधिकार मिळविलेला ब्राह्मण सर्व श्रेष्ठ म्हणविला. देशाच्या रक्षणासाठी बाहूबळाच्या पराक्रमाने लढणारा क्षत्रिय ब्राह्मणाहून खालच्या दर्जाचा, व्यापार वृत्तीचा वैश्य त्याहून खालच्या दर्जाचा, दास वृत्तीचा शारीरिक श्रमाचे काम करणारा शूद्र सर्वापेक्षा कनिष्ट दर्जाचा, यांना वेदांचे अध्ययन करण्याचा हक्क नाही. उपनयन यज्ञोपवित धारणा नाही. चातुर्वण्य कक्षेतून बाहेर असणारा दलित सर्व प्रकारच्या धार्मिक तसेच सामाजिक हक्कापासून पूर्ण वंचित. क्षत्रिय विश्वामित्राने ब्रह्मज्ञानी अशी पदवी मिळविण्यासाठी हर साहसी प्रयत्न केले. पण ती त्याला मिळणार नाही अशी बंधने घालण्यात आली. ही गोष्ट लक्षात ठेवावी. परस्पर वैरत्वाने भरलेल्या हिंदू समाजात क्षत्रिय झालेले राम व कृष्ण यांनी दैवत्व मिळविल्याचे तेवढेच आश्चर्यकारक म्हणावे लागेल.

एकूण आश्रम चार ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास. ब्राह्मण वर्गास हे। चारही उपलब्ध. क्षत्रियांना पहिले तीन. वैश्यांना पहिले दोन, शूद्रांना फक्त गृहस्थाश्रम ब्रह्मचर्यामध्ये विद्यार्जन, गृहस्थमध्ये संतान उप्तत्ती, वानप्रस्थाश्रम मध्ये निर्लिप्तता अंगिकारून अध्ययन करणे. संन्यासामध्ये वनात जावून ज्ञानाची साधना करणे. बसववादी प्रमथांनी ह्या विभजनास विरोध केला. जन्मतः कोणीही श्रेष्ठ व कनिष्ट न म्हणता सर्वांना विद्यार्जन व ज्ञान साधनेला संधी करून दिली. मानव व शरण असे दोनच वर्गीकरण केले. अजाण, अज्ञानी मानव, सुजात सुज्ञानी शरण असे म्हणून अजाण मानवास ज्ञान देवून सुज्ञानी होण्यास संधी प्राप्त करून दिली. लिंगायत समाजात वर्ण व आश्रम पालन नाही.

"चातुर्वण्य व्यवस्था देव निर्मित, ही बदलता येत नाही; बदलण्याचा प्रयत्न केल्यास तो दैव द्रोह. हे विश्वासाने पाळणारेच हिंदू'', अशी काहींची दृढ विश्वासाची व्याख्या. याला सनातनींचे मुख्य समर्थन म्हणजे, "चातुर्वण्यं मया सृष्ट्य' असे भगवतगीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे. असे परमात्म्यानेच सांगितले असल्यामुळे, ते आपण देव शासन म्हणून मान्य करावे. या व्याख्येप्रमाणे चातुर्वण्य व्यवस्था देव निर्मित म्हणून मानलेल्या सर्व अवैदिक धर्माना हिंदू कक्षेतून बाहेर जावे लागते.

अतिवर्णाश्रम समाजशास्त्राचे प्रतिपादन करणारे लिंगायत धर्मासारखे इतर अवैदिक मत ही सर्व व्यवस्था देवनिर्मित म्हणून मान्य न करता, मानव कल्पित म्हणतात. भगवतगीतेतील या श्लोकात कसला गोंधळ भरला आहे ते आता पाहूया. "चातूरवर्ण्य माझ्यापासून (श्रीकृष्णापासून) गुण कर्माच्या आधारावर निर्माण झाले आहेत" असे श्रीकृष्णाने (प्रामाणिकपणेच) सांगितले आहे. ही अपरिवर्तनीय व्यवस्था म्हणून खचित करण्यासाठी श्रीकृष्णास जगाचा नियामक कर्ता म्हणून अतयं तर्काच्या बळाने साधण्याचे वैशिष्ट्य पहा.

श्रीकृष्णाने चातुरवर्ण्य व्यवस्था केली. श्रीकृष्ण देव, म्हणजे देवानेच चातुरवयं व्यवस्था केली. हा एक विचित्र तर्क, श्री कृष्णास देव ही उक्ती लावण्यात एक मोठा तार्किक दोष संभवतो. श्री कृष्णाने हे दूढ केले असेल. आम्हाला त्याच्याशी संबंध नाही असा अवैदिक धर्माचा दृष्टिकोन. हे देवाने म्हणजे सृष्टीकत्र्याने केले असेच ना ? है। शक्य नाही. वर्ण व जाती व्यवस्था देवाने निर्माण केली नाही.

१) कोणतेही देव निर्मित असणारे सर्व जगात एकाच प्रकारचे असते. स्त्री-पुरुष देवाने निर्माण केलेल्या जाती. सर्व देशात स्त्रि स्त्रिच पुरुष पुरुषच ! पक्षी, प्राणी, मासे, जलचर, गाय, म्हैस वगैरे भूचर प्राणी सर्व देशात एकच व्यवस्था आहे. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्व देशात का नाहीत ? हे विभाजन देव निर्मित असते तर सर्व ठिकाणी असेच असावयास पाहिजे होते.

२) देव निर्मित भिन्न जातीचे प्राणी परस्पर संग करीत नाहीत. केला तरी संतान उत्पत्ती होत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या स्त्रिपुरुषांनी संसार केला असता त्यांना संतान होत नाही का ? झालेली उदाहरणे पुष्कळ आहेत.

३) देव निर्मित जाती झालेल्या पोपट, कावळा, चिमणी, सिंह, अस्वल हे प्राणी कोणत्याही संस्काराने बदलता येत नाहीत. पण मानवांना मात्र धर्म संस्काराने बदलून त्यांचा पुर्वाश्रम घालविणे शक्य आहे. धर्म संस्काराने अस्पृश्याचे अस्पृश्यत्व तसेच शूद्राचे शूद्रत्व निरसन करता येते.

अतिवर्णाश्रम समाज व्यवस्था मानणारे, प्रतिपादन करणारे धर्म सर्व मानवशरण, भवि-भक्त, बध्द-बुध्द, आज्ञानी-सुज्ञानी असे दोनच वर्ग मानतात. ते आचार, ज्ञान, अनुभाव यांच्या आधारावर विना जन्माच्या आधारे नव्हे. पुढील वचन पहा.

कन्नड :
होलेगंडल्लदे पिंडद नेलेगे आश्रयविल्ल.
जलबिंदुविन व्यवहार ओंदे;
आसेयामिष रोष हरुष विषयादिगलेल्लवंदे,
एननोदि एनकेळि एनुफल ? कुलज”बुदक्के आबुदु दृष्ट ?
सप्तधातुसमं पिडेम् समयोनिसमुभ्दवम् ।
आत्मजीव समायुक्तम् वर्णानाम किंम् प्रयोजनम् ॥
कासिकम्मारनाद, बीसि मडिवाळनाद;
हासनिल्लि सालिगनाद, वेदवनोदि हारुवनाद.
कर्णदल्लि जनसिदवर उंटे जगदोळगे ?
इकारणा कूडलसंगमदेवा ।
लिंगस्थलव नरिदवने कुलजनु. (बसव व, दी. ५८८)
मराठी:
विटाळाविना पिंडास नसे आश्रय.
जलबिंदुचा एकच व्यवहार,
आशा, आमिष, रोष, हर्ष विषय आदी सर्वांना एकच;
काय वाचून काय ऐकून काय फल ? काय तयाचे सार ?
आधार ते कोणते कुलीन म्हणण्यास ?
सप्तधातु समं पिंडम् समयोनि समुभ्दवम् ।
आत्मजीव समायुक्तम् वर्णानाम किम् प्रयोजनम् ।।
लोहार झाले लोखंड तापवून, धोबी झाले कपडे धुवून,
कोष्टी झाले कापड विणून, ब्राह्मण झाले वेद वाचून,
कानातून जन्मले या जगी कोण ? या कारणे
कूडलसंगमदेवा, लिंगस्थल मर्म जाणलेलाच कुलीन !

सर्वांची पिंडोप्तत्ती एकाच त-हेची, जन्मण्याची रीत एकाच तहेची, जन्म घेवून आल्यानंतर शारीरिक, मानसिक हालचाली एकाच प्रकारच्या, असे असता वर्ण व्यवस्थेला अर्थ आहे का ? लोखंड तापवणारा लोहार, कपडे धुणारा धोबी, धागा विणणारा कोष्टी, वेद म्हणणारा ब्राह्मण, कोणी तरी अनैसर्गिकपणे जन्म घेवून येतो का ? परमेश्वराला जाणलेलाच श्रेष्ठ कुलाचा. त्यामुळे कोणीही जन्मतः श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नव्हेत. त्यांच्या साधनेनेच श्रेष्ठत्व मिळते. व्यक्ती कोणत्याही जातीत जन्मास आली तरी स्वत:च्या आकांक्षा, इच्छा व कर्तबगारीनेच उच्च पदवी गाठू शकते.

गुरू बसवण्णांनी वर्णाश्रमाचा भेदभाव न करता सर्वांना धर्माचे महाद्वार उघडे केल्यामुळे आपले जीवन दैवीमय करून घेणे सर्व वर्णियांना शक्य झाले. अनुभव मंटपाच्या शरणामध्ये शूद्र व पंचम वर्णिय संखेने ज्यास्त असल्याचे दिसून येते. वरच्या जातीच्या लोकांनी नंतर प्रवेश केला. लिंगीब्राह्मणांनी प्रवेश केल्यानंतरच लिंगायत धर्माचे मूळ सिध्दांत व तत्व शिथील होण्यास कारणीभूत झाले.

लिंगायत हिंदू म्हणणारे एका प्रश्नाला उत्तर देण्यास जबाबदार होतात. सनातन वैदिक धर्माच्याप्रकारे "जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्छते', जन्मतः सर्व शूद्रच. संस्कारानंतरच ते द्विज होतात. द्विज करणे म्हणजे जानवे धारण व गायत्रि मंत्रोपदेश करणे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना हे करावे लागते. शूद्रांना नाही. लिंगायत हिंदू म्हटल्यास त्यांना जानवे धारणा, उपनयन, गायत्रि मंत्रोपदेश नसल्याकारणे ते शुद्रवर्णात गणले जातात. एका स्वतंत्र धर्माचे अनुयायी असलेल्या शरणांना हिंदू धर्मात घालून शूद्र वर्णियांच्या स्थानी ठेवणारे डॉ. चिदानंद मूर्ती यांच्या सारख्यांचे प्रयत्न हास्यास्पद म्हणावे लागतात. कुणबी, धनगर, कुंभार, धोबी इत्यादी श्रमिक वर्ग शूद्रवर्णात राहून धार्मिक हक्कापासून वंचित होवून राहणे अनिवार्य सत्य म्हणावे लागेल. (शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून उपनयन नाही आणि राज्यारोहन हक्क नाही असे सांगितले गेले.

५) द्विजानांच फक्त उपनयन

वैदिक (हिंदू) धर्माचा मुख्य संस्कार म्हणजे उपनयन फक्त द्विजवर्णियांनाच म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच दिला जातो. उपनयनाचा मुख्य विधी म्हणजे यज्ञोपवीत धारणा व गायत्रि मंत्रोपदेश, चतुर्थ वर्णी शूद्र व पंचमवर्णी अस्पृश्य यांना हा संस्कार नाही. सर्व वर्णाच्या महिलांची शूद्रात गणना करून त्यांनापण द्विज संस्कार दिला जात नाही.

लिंगायत धर्म केवळ भवि-भक्त किंवा मानव-शरण असे दोनच वर्ग करतो. भवि संस्काराने भक्त हेतो अज्ञानी मानव ज्ञानाने व अनुभवाने शरण (संत) होतो. जन्म घेताना सर्व मानव म्हणूनच जन्मास येतात. संस्कार, ज्ञान, अनुभाव यामुळे शरण संत होतात. पुढील वचन पाहा -

कन्नड :
उंब बट्टनु बेरे कंचल्ल; कांब दर्पण बेरे कंचल्ला;
भाड ओंदे भजन बेरे; बेळगे कन्नडि एन्निसिहुदय्या !
अरिदोडे शरण मरेदोडे मानव
मरेयदे पूजितु लिंगदेवन (बसव व, दी. ८५६)
मराठी :
जेवणाचे ताट वेगळे कासे नव्हे; पाहाण्याचा आरसा वेगळे कासे नव्हे;
धातू एकच वस्तु वेगळ्या; चकाकण्यामुळे आरसा वाटतो !
ज्ञानाने शरण (संत) बनतो, अज्ञानाने मानवच राहतो;
म्हणून न विसरता कूडलसंगमदेवाची पुजा कर.

वैदिक हिंदू धर्मात इतरांना आत घेण्यासाठी दीक्षा संस्कारच नाही. यामुळे मतांतर होवून अनेक लोक बाहेर जातात. स्वयंप्रेरणेने हिंदू धर्मात येतो म्हणणा-यांना आत येण्यास संधी नाही. बाहेर गेलेल्या हिंदूनाच पुन्हा परत यावे म्हटले तरी त्यांना संधी नाही.

लिंगायत धर्माचा संस्कार म्हणजे इष्टलिंग दीक्षा. ही दीक्षा सर्वांना मिळू शकते. गुरू इष्टलिंग देवून मंत्रोपदेश करून धर्मात प्रवेश करण्याची परवानगी देतो. जात, मत, पंथ, धर्म, लिंग भेद न करता सर्व मानवाना हा संस्कार लभ्य आहे. दीक्षाविधीनंतर सर्व एकसमान अशी भावना आहे.

६) स्त्रियांना हिंदू धर्मात संस्कार नाही

सर्व वर्गाच्या स्त्रियांना शूद्र म्हणून गणना करण्यात आली आहे. त्यामुळे शूद्राप्रमाणेच त्यांनापण संस्कार नाकारण्यात आले आहेत. श्री दयानंद सरस्वतींनी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. वेदांच्या काळात स्त्रियांना पण उपनयन संस्कार देण्यात येत होता असे सांगून महिलांना व शूद्र वर्णाच्या पुरुषांना उपनयनाची संधी करून देण्यात आली होती. पण संप्रदाय वाद्यांच्या विरोधास तोंड द्यावे लागल्यामुळे ती चळवळ फार काळ टिकली नाही.

महिला विटाळशी (ऋतुमती) होत असल्यामुळे तिला उपनयन संस्कार देता येत नाही. ती दुसया दर्जाची प्रजा असे मानले जाते. ब्रह्मसूत्रास व्याख्यान लिहिलेले आयार्च गुरू झालेले शंकर, रामानुज व माध्व यांनी शूद्रांना मोक्ष नाही असे प्रतिपादन केले आहे.

"शूद्रांना व स्त्रियांना मोक्ष नाही
कारण त्यांना उपनयन नाही
यज्ञ यागादी करण्याचा अधिकार नाही.
कारण त्यांना उपनयन नाही." (बादरायणाची ब्रह्मसूत्रे Iii सूत्र ३४-३८)

सूत्र ३८मध्ये मनुस्मृति वगैरे स्मृतित शूद्रांना वेद श्रवण-अध्ययन-अर्थ वगैरेपासून बहिष्कृत केल्यामुळे त्यांना ब्रह्मविद्या नाही.

७) हिंदू धर्म - बहुदेवतोपासना

बहुदेवतोपासनेचे आचरण करणारा जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदूधर्म, पुरातन ग्रीक, अरब वगैरे देशात मूळ देवतांची उपासना ब-याच जून्या काळात अस्तित्वात होती. पण ख्रिश्चन व इस्लाम धर्म वाढल्यानंतर विविध आकाराच्या अनेक देवतांची पूजा थांबून एक देवाची परिकल्पना आली. नंतर केवळ एकच देवाची आराधना तेवढीच राहून बहुदेवतोपासना थांबून गेली. पण हिंदू धर्मात एक देवाची परिकल्पना उपनिषदांच्या काळात मूर्तिपूजा आली असली तरी ती वृध्दिंगत होवून दृढ न होता फक्त बहुदेवतोपासनाच अस्तित्त्वात येवून, गवत ज्यास्त वाढले तर पीक ज्याप्रमाणे नाश पावते तसे अंधश्रध्देच्या बाजारात एकाच सत्य अशा देवाची परिकल्पनाच लोकांच्या मनातून नाहीसी झाली.

हिंदूच्यात असणा-या उपास्य वस्तु ९ प्रकारात विभागता येतील.

१) भूत प्रेतांची पूजा
२) पौराणिक देवतांची पूजा
३) पंचभूतांची पूजा
४) झाडा-झुडुपांची पूजा
५) प्राण्यांची पूजा
६) प्रेतात्म्यांची पूजा
७) गुरु (संत) यांची पूजा
८) विभूती पूजा
९) देव पूजा

अत्यंत खालच्या दर्जाच्या भीतीदायक अशा भूतप्रेतांची पूजा करण्यात येते. त्यांना कोंबडी, बकरी वगैरेसारखे प्राणी बली देण्याची प्रथा हिंदूधर्मात आहे.

काल्पनीक पौराणिकदेवतांची संख्या इतकी मोठी आहे की ती सांगता येत नाही. नवग्रह, लक्ष्मी, सरस्वतीसारख्या देवता शुध्द काल्पनिक, आता कांही देवता एकेकाळी ऐतिहासीकपणे होवून गेल्या असतील म्हणून विश्वास ठेवला तरी त्यांची चरित्रे अत्यंत खालच्या दर्जाची आहेत. उदाहरणार्थ - इंद्र, तुळसी पूजेच्यामागे असणारे विष्णूचे चरित्र.

हिंदू धर्मात दोन प्रकारची आचरणे आहेत. १) वेद आगम वगैरे शास्त्रीय कृतीमधून देणगीदाखल मिळालेले शास्त्रीय (Classical) आचरण. २) मूळ वंशज (Tribes) व कुलांच्या (Clans) कडून मिळालेले क्षुद्र (Petty) दर्जाचे आचरण. उदाहरणासाठी - होम-हवन शास्त्रीय आचरण झाले तर झाडा-झुडुपांची पूजा हे क्षुद्र आचरण. ह्या दोन्ही आचरणांचा लिंगायत धर्माने निषेध केला आहे. अग्नीपूजा, अग्नीसाक्ष यांनापण लिंगायत धर्मात स्थान नाही. त्याचप्रमाणे तुळशी, बिल्व, वड, पिंपळ, रुई, आपटा वगैरे झाडांच्या पूजेचा निषेध करण्यात आला आहे. हिंदू लोक गाय, नाग, उंदीर, माकड, हत्ती वगैरे प्राण्यांची पूजा फारच श्रध्देने करतात. लिंगायत धर्मात यांना स्थान नाही.

हिंदूंच्यात फार प्रचलित असणारी प्रेतात्मा पूजा अर्थात पितृपूजा. मागे होवून गेलेल्या सर्वांना स्वर्ग प्राप्त होवू दे म्हणून पुण्य तिथी पिंडदान करण्याचा परिपाठ आहे. पितृपक्ष असा विशिष्ट काळ त्याला निश्चित करण्यात आला आहे. त्यावेळी विशेष श्राध्द आदी विधी करण्यात येतात. ग्रामीण भाषेत “हिरियर हब्बा' वाढवडिलांचा सण म्हणून करण्यात येतो. हे सर्व लिंगायत धर्मात नाकारण्यात आले आहेत.

वैचारिकता असणारा लिंगायत धर्म केवळ जंगम (संत) यांच्यापूजेला मान्यता देतो. त्यांना देवाचा प्रतिनिधी म्हणून गौरवितो. गुरू बसवण्णा, अल्लमप्रभूदेव, सिध्दरामेश्वर वगैरे महानुभावांची विभूती पुरूष म्हणून गौरवून पूजा करतो. देव निराकार म्हणून सांगून सृष्टिकर्ता कूडलसंगमदेवाचे चिन्ह म्हणून गुरू बसवण्णांनी 'इष्टलिंग दिले. याला सोडून दुसरे काहीही पूजा करण्यास परवानगी नाही. हिंदू देवता म्हणजे गणपती, राम, कृष्ण, हनुमान, विष्णू, देवी, लक्ष्मी सरस्वती वगैरेची पूजा लिंगायत धर्मात नाहीत. हिंदू त्रिमूर्तीपैकी एक असलेल्या महेश्वराची पूजा करीत नाहीत. हे सर्व लिंगायत धर्माचे संविधान झालेले वचन साहित्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

८) हिंदू धर्माचा तीर्थक्षेत्रात विश्वास

हिंदू धर्म भौतिक क्षेत्रात अपार श्रध्दा बाळगून आहे. काशी, रामेश्वर, अयोध्या, तिरूपती, मथुरा वगैरे क्षेत्रांचे दर्शन अत्यंत पावन. हे पाप निवारण करून पुण्य मिळवून देते अशी विश्वासाची भावना आहे.

भारत देशात वाहणा-या गंगा, यमुना, कावेरी, तुंगभद्रा वगैरे नद्यात तसेच तीर्थक्षेत्रात असणा-या कल्याणीत (मोठ्या विहीरी) स्नान डुबकी मारून आल्याने पाप नाश होवून पुण्य प्राप्त होते असा विश्वास आहे. काही विशिष्ट दिवशी, विशेष मुहूर्तात अशा नदीत व पुष्करणीत डुबकी मारून आल्यास अपार पुण्याची प्राप्ती होते अशी विश्वासाची भावना आहे. नदी कडेच्या पाण्यात हजारो लोक स्नान करीत असल्याचे व तेच पाणी तीर्थ म्हणून पीत असल्याचे आपण पाहातो.

कोणत्याही भौतिक स्थानास भेट दिल्यामुळे पुण्यप्राप्ती होते ह्यावर लिंगायत धर्माचा विश्वास नाही. कोणतीही नदी पुष्करणी पवित्र म्हणून भावना नाही. भौतिक जलामध्ये स्नान केले या कारणास्तव पाप नाश होवून पुण्य मिळते अशी भावना नाही. व्यक्ती करीत असलेल्या वाईट कामामुळे कलंकित होतो. पश्चातापामुळेच तो शुध्द होतो. चांगल्या कामामुळेच तो पुण्यवान होतो हा दृढ विश्वास. पुढील वचने पहा -

कन्नड :
तोरेय मीव अण्णगळिरा; तोरेय मीव स्वामीगळिरा
तोरेयिंबो, तोरोर्यंबो;
परनारियर संगव तोरेयिंबो !
परधनदामिषव तोरेयिंबो ।
इव तोरेयदे होगि तोरेय मिंदडे,
बरुदोरे होहदु, कूडलसंगमदेवा. (बसव व. दी. - ६४१)
मराठी :
नदीत स्नान करणाच्या बंधूनो; नदीत स्नान करणाच्या स्वामीजीनो;
त्याग करा, त्याग करा
पर त्रिचा त्याग करा ! पर धनाचा त्याग करा !
हे त्यजिल्याविना नदीत स्नान केले तर,
नदीच आटून जाईल, कूडलसंगमदेवा.

कन्नड :
ओबर मनव नोयिसि, ओब्बर मनेय घातव माडि,
गंगेयल्लि मुळमिदडेना गुबुदय्या ?
चंद्रनु गंगेय तडियल्लिद्दडेनु ?
कलंक विडदायित्तय्या.
अद् कारण, मनवनोयिसिदवने, ओब्बट घातव माडिदवने,
परमपावन नोडा, कपिलसिध्द मल्लिकार्जुना. (सिध्दरामेश्वर व. सं. ३८२)
मराठी :
एकाचे मन दुखवून, दुस-याचे घर उध्वस्त करून,
गंगेत स्नान केले म्हणून काय होणार हो ?
चंद्र गंगेच्या तीरावर असला म्हणून काय ?
कलंक दूर होणार नाही.
या कारणे, एकाचे मन न दुखवणारा, दुसरयाचे वाईट न करणाराच
परम पावन पाहा, कपिलसिध्दमल्लिकार्जुना

कन्नड :
नित्य निरल्लिमुळगुवनु । हत्तिदडे स्वर्गवनु ।
एत्ति जन्मवनु जलदोलिप्पा कप्पे ।
हत्तदेकेद ? सर्वज्ञ (सर्वज्ञ वचन)
मराठी :
नित्य गंगेत बुडणारा स्वर्गास जातो तर,
कित्तेक जन्म पाण्यात राहणारे बेडुक,
का स्वर्गात जाऊ नये, म्हणाला सर्वज्ञ

शरणांनी ज्ञानी जनांनी पाय ठेविलेले वास्तव्य केलेले स्थान ख-या अर्थाने जंगम क्षेत्र असे शरणाचे प्रतिपादन. पण याचा अर्थ एक व्यक्ती त्या स्थलास केवल भेट दिल्या कारणे तो पुण्यवान होतो असे म्हणणे लिंगायत धर्म मानीत नाही. व्यक्तीने स्वतः साधना करून अंतरंग बहिरंग शुध्दी मिळविली पाहिजे. पुढील वचने पाहा.

कन्नड: अय्या, निम्म शरणरु मेट्टिद धरे पावनवव्या.
अय्या, निम्म शरणरिध्द पुरवे कैलास पुरवय्या.
अय्या, निम्म शरणरु निंददे निज निवासवय्या.
चन्नमल्लिकार्जुनय्या, निम्म शरण
बसवण्णनिद्द क्षेत्र अविमुक्त क्षेत्रवागि,
आनु संगन बसवण्णन श्रीपादक्के
नमो नमो एन्नुतिर्दनु. (अक्कमहादेवी श.व. सं. ५-३१)
मराठी :
देवा, तुमच्या शरणांनी तुडविलेली भूमी पावन हो.
देवा, तुमचे शरण असलेले पूरच कैलासपूर हो.
देवा, तुमचे शरण राहिलेलेच निज निवास हो.
चन्नमल्लिकार्जुन देवा, तुमचे शरण
बसवण्णा असलेले क्षेत्र अविमुक्त क्षेत्र झाल्याने,
मी संगनबसवण्णांच्या श्री चरणी ।
नमो नमो म्हणत आहे.

कन्नड: कल्याणवेबुदु इन्नारिगे होगबहुदु ?
होगबार, असाध्यवय्या.
आसे आमिष अळिदवंगल्लदे कल्याणदत्त अडिथिउबारदु.
ओळ होरगु शुध्दनादवंगल्लदे, कल्याणव होगबारदु.
नानेबुद हरिदरंगल्लदे, कल्याणव होगबारदु.
ओळणे तिळिदु होरेगे मरेदु चन्नमल्लिकार्जुनंगोलिदु,
उभय लज्जेय अळिदेनागि,
कल्याणव कंडु नमो नमो एनुतिर्दनु. (अक्कमहादेवी शि.व. सं. ५-१५२)
मराठी :
कल्याण मध्ये दुस-या कोणास जाता येईल ?
जावू नये, अशक्य हो.
आशा आमिष नाश झाल्याशिवाय कल्याण कडे पाऊल ठेवू नये.
अंतरंग बहिरंग शुध्द झालेशिवाय कल्याणास जावू नये.
अहंकार गेल्याशिवाय कल्याणास जावूनये.
आत समजून बाहेर विसरून चन्नमल्लिकार्जुनास भाळून,
उभय लज्जा नाश झाली म्हणून,
कल्याण पाहून नमो नमो म्हणत आहे.

९) ज्योतिष्य, मुहूर्त, कुंडली यात विश्वास नाही :

हिंदु धर्माचा ज्योतिष्य शास्त्रावर फारच विश्वास. मूल जन्मल्या वेळी कुंडली तयार करून घेणे, लग्न करते वेळी कुंडल्या जुळविणे, शुभ कार्य करताना मुहूर्त पाहणे, वेळेत पण श्रेष्ठ, कनिष्ठ, विपत्ती असा विचार करणे, बांधकाम करताना वास्तु पहाणे, ग्रहांच्या शांतीसाठी होम-हवन अथवा पूजा घालणे हे सर्व हिंदू धर्मात स्वाभविक. पण लिंगायत धर्म हे सर्व नाकारातो. पुढील वचने पाहा.

कन्नड :
एम्मवरू बेसगोंडरे शुभ लग्नवेन्निरय्या;
राशिकूट गण संबंधवृंटेंदु हेळिरय्या;
चंद्रबल ताराबल उंटेदु हेळिरय्या;
नाळिन दिनकिंदिन लेसेंदु हेळिरय्या;
लिंगदेवन पूजिसिद फल निम्मदय्या ! (बसव व. दी. ८४)
मराठी :
शिवशरण एकत्र येता शुभलग्न समजावे
हाच उत्तम मुहूर्त, हाच शुभमुहूर्त सांगावे.
हाच चंद्रबल, हाच ताराबल म्हणून सांगावे.
उद्यापेक्षा आजचा दिवस चांगला सांगावे
हेच कूडलसंगमदेवाच्या पूजेचे फळ समजावे..
सर्वांची मने एक झाल्यास ती उत्तम जुळवणूक (शुभमुहूर्त) असे समजावे.

कन्नड :
लग्नवेल्लियदो विघ्नवेल्लियदो संगय्या ?
दोष वेल्लियदो दुरितवेल्लियदो संगय्या ?
निम्म माणदे नेनेवंगे भवकर्मवेल्लियदो
लिंगदेवय्या ?| (बसव व, दी. ८६७)
मराठी :
शुभ कुठले, विघ्न कुठले संगमदेवा ?
दोष कुठले, दुरित कुठले संगम देवा ?
तुमचे सतत नामस्मरण करणा-यांना
भवकर्म कुठले कूडलसंगमदेवा ?

सृष्टिकर्ता, सर्वशक्तिमान झालेल्या लिंगदेवात विश्वास ठेवल्यानंतर दुसरी कसलीही भीती मनात बाळगू नये. जग सर्व देवाच्या आधीन चालते. मानव कल्पीत असे ज्योतिष्य, वास्तु इत्यादी भ्रम निर्माण करून व्यक्ती मानसिक दुर्बलतेला बळी पडतो. काळात भेदभाव करून राहूकाल, गुनितकाल, यमगंडकाल असे भेद करण्याचे गुरू बसवण्णा व समकालीन शरणांनी खंडन केले आहे. काळात हा चांगला हा वाईट असे काही नसते. व्यक्ती करणाच्या चांगल्या किंवा वाईट कामामुळे काल चांगला वाईट हे ठरते, असे शरणांचे अनुभवाचे प्रतिपादन. हिंदू धर्म विश्वास करीत असलेले ज्योतिष्य, वास्तु वगैरे लिंगायत धर्म मान्य करीत नाही.

१०) हिंदू धर्माचे मंदिर | लिंगायत धर्माचे मंटप :

हिंदू धर्माचे श्रध्दा केंद्र म्हणजे देवूळ | मंदिर, ख्रिश्चनांचे चर्च, मुसलमानांचे मशिद, शीखांचे गुरुद्वार, बौध्दांचे विहार, जैनांचे बसती त्याप्रमाणे लिंगायताना गुरू बसवण्णांनी स्थापन करून दाखविलेल्या अनुभव मंटप नावाच्या आदर्श संस्थेप्रमाणे बसव मंटप हीच श्रध्दा केंद्र झाली आहेत. बसवादी प्रमथांच्या परंपरेचे शरण सोलापूरचे सिध्दरामेश्वर, उळवि चन्नबसवेश्वर, मलेय महादेश्वर, यडेयूर सिद्धलिंगेश्वर, जेवर्गिचे शण्मूख शिवयोगी, कपिलधाराचे मन्मथ स्वामी व गुड्डापूरची दानम्मा देवी वगैरेंची समाधी स्थळे, संचार केलेली स्थळे पण लिंगायतांचे श्रध्दा केंद्र झाली आहेत. हिंदू मंदिरात पूजेचा हक्क ब्राह्मणांना असलातर लिंगायतांच्या बसव मंटपात व शरणांच्या समाधी स्थळात लिंगायत दीक्षा घेतलेल्या कोणासही पूजेचा हक्क मिळतो, आणि तेथे कोणासही प्रवेश असतो. बसव मंटप फक्त भक्तीचा केंद्र न होता ज्ञान दासोहाचा केंद्र पण झाला

११) हिंदूच्यात मांसाहार - शाकाहार दोन्ही आहे :

हिंदूतील कांही समुदाय शाकाहारी आहेत तर काही समुदाय मांसाहारी आहेत. ब्राह्मणांच्यातील कांही समूह व वैश्य समूह यांनी स्वेच्छेने शाकाहारी जीवन विधान स्विकारले आहे, त्यामुळे ते तेवढेच शाकाहारी. बाकीचे जास्त करून सर्व मांसाहारीच आहेत. लिंगायत धर्म सक्तिने शाकाहारी जीवन विधान प्रतिपादन करतो.

१२) होम-हवन यज्ञ-याग हिंदू धर्मात आहे :

हिंदू धर्माचा प्रमुख विधि म्हणजे होम-हवन, होम कुंड करून अग्नीच्या वाटे आहति अर्पण करतो अशा विश्वासाने बयाच वस्तू होम कुंडाच्या अग्नीत घालण्यात येतात. यज्ञ यागात बोकड, अश्वमेघ यागात घोडा, गज यागात हत्ती असे शास्त्रोक्तपणे पशू बळी देतात.

योगिराज शिवा यज्ञ विरोधी होता. दक्षब्रह्माचे यज्ञ वीरभद्राने उध्वस्त केले हे याला साक्ष. रामायणात राक्षस होम कुंडात पाणी ओतून विझवीत असत, म्हणून रामलक्ष्मणाला बोलावून नेण्याचा प्रसंग प्रस्ताप होतो. ते राक्षस नव्हेत शिवभक्त. ते यज्ञ विरोधी म्हणून यात अडथळा निर्माण करीत. अमूल्य अशा वस्तू यज्ञात घालून जाळणे व यज्ञाच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे असले धार्मिक विधि क्रांती पुरुष बसवण्णांनी विरोधिले आहे. पुढील वचन पाहा.

कन्नड :
किच्च दैववेदु हबियनिक्कुव हारूवन मनेयलु
किद्द सुवाग बच्चल नीरूबीदिय धूळव हो ।
बोबिल्लर करेवरय्या.
कूडलसंगमदेवा, वेदनेय भरेदु निंदिसुत्तिद्दरू (बसव व. दी. ५८३)
मराठी :
अग्निस देव म्हणून आहती देणा-या विप्राच्या घराला ।
आग लागली असता, मौरीचे पाणी, रस्त्याची धूळ टाकतात.
बोंब मारून हाका मारतात देवा ।
कूडलसंगमदेवाची प्रार्थना सोडून निंदा करतात.

अग्नी पंचमहाभूतापैकी एक. अग्नी देव म्हणून आराधना करण्यासाठी त्यात तूप ओतून मंत्र म्हणणा-या विप्राच्या घरास आग लागून ते जळत असता का मंत्र म्हणत नाही; नाश करणारी आग म्हणून शिविगाळ करून ती विझविण्यास मौरीचे पाणी, रस्त्याची माती टाकतात. अग्नी देवाने आपले घर नैवेद्य म्हणून घेतले अशी भावना का करून घेत नाहीत असा प्रश्न करतात बसवण्णा.

कन्नड :
मातिन भार्तिगे निन्न कोदिहरेंदु
एले होते अळु कडा !
वेदवनोदिदवर मुंदे अळु कडा !
शास्त्रव केळिदवर मुंदे अळु कडा !
नीत्तुदक्के तक्कद माडुव लिंगदेव. (बसव व. दी. ५७१)
मराठी :
प्रत्येक शब्दाला मारून टाकतात तुला.
अरे बोकडा रडरे बाबा !
वेद वाचणाच्या समोर रड रे बाबा !
शास्त्र ऐकणा-यासमोर रड रे बाबा !
ते तुझ्या रडण्याचा योग्य बदला घेतील लिंगदेव.
अज यज्ञात बोकड बळी देण्याच्या मूर्खपणाचे खंडन केले आहे.

कन्नड :
इट्टिय हुण्ण नरि तिंदु सृष्टि तिरुगितेबंते
मट्टेयनिट्ट द्विजर मातदेके ?
हगलुगाणद गूगे इरूळायितेंदडे
जगक्के इरूळप्पुदे मळे ?
होमद नेवदल्लि होतनु कोदु तिंब
अनामिकरोडनाडि गेलिवुदेनु ?
कूडलसंगमदेवा. (बसव ब. दी, ५७५)
मराठी :
इडिचे फळ (मादक फळ) खावून जग फिरते आहे।
असे कोल्हा म्हणतो त्याप्रमाणे
तिलकधारी द्विजवाणीला सत्य समजला ?
दिवस न पाहणारे घुबड रात्र झाली असे म्हणता,
जागाला ती रात्र होईल मूर्खा ?
होमाच्या निमित्ताने बकरा बळी देवून खाणाच्या
अनामिकाबरोबर चर्चेची काय गरज आहे ?
कूडलसंगमदेवा.

देवाची प्रार्थना, पूजा, ध्यान करून आराधना करावी विना अग्निला आहुती देवून नव्हे. असे गुरु बसवण्णानी सडेतोडपणे सांगितले आहेत. वेदांच्या ज्ञानकांडावर जास्त टीका केली नाही पण कर्मकांडावर कटूपणे टीका केली आहे.

हे यज्ञ-याग द्विजवर्णानी करावयाचे धार्मिक विधी झाले असले तर मारी, दुर्गा, काली वगैरे उग्रदेवतांना बोकड, रेडा, कोबडी बळी देण्याचा क्रूर संप्रदाय पण हिंदू धर्मात आहे. याचे पण लिंगायत धर्म खंडन करतो. असल्या मूक प्राण्यांचा बळी देवून सृष्टिकर्याच्या कोपास पात्र व्हावे लागते असे जागृत करीत
आहेत.

‘बोकड मरून रक्षण करेल का हर रागावल्यावर', असे म्हणून प्रश्न करतात, “मेढी नको बोकड नको नुसते बेल आणून पूजा कर लिंगदेवाची असे सांगतात.

१३) विवाहात अग्नी साक्ष, सप्तपदी, पौरोहित्य :

वैदिक धर्म अग्नी साक्षी मध्ये विश्वास ठेवतो. लिंगायत धर्मात अग्नीस प्रामुख्यता नाही. वैदिक धर्मात अग्नी साक्षाला फार महत्त्व देण्यात आले आहे. सर्व धार्मिक विधि-विधानात होम-हवन करतात एवढेच नव्हेतर विवाहत अग्नी साक्षच मुख्य विधी. लिंगायत धर्म अग्नीसाक्ष प्रतिपादन करीत नाही व सप्तपदी पण नाही. गुरु लिंग जंगम साक्ष ठेवून विवाह चालविला जातो.

१४) हिंदू धर्मात द्विजांचे शव जाळतात :

हिंदू धर्मियांचे शव अग्नीत जाळण्यात येतात. लिंगायतात शव पुरतात. याचा उद्देश पंचमहाभूतात पंचमहाभूतात्मक शरीर विलीन करणे. प्रकृतीपासून मिळालेले शरीर परत प्रकृतीस सोपवून शुध्दिकरण झालेले अंग (आत्मा) सच्चिदानंद नित्य परिपूर्ण लिंग (परमात्मा) देवा बरोबर समरस (विलीन) करणेच लिंगायत धर्माच्या शून्य सिध्दांताचे ध्येय.

१५) पुरोहिताकडून पूजा :

वेदोक्त हिंदू धर्मात पूजारीकडून पूजा करविली जाते. शास्त्रिय शिष्ट देवतांची पूजा करण्याचा अधिकार ब्राह्मणाला मात्र आहे. लिंगायत धर्मात गुरूलिंग-जंगम यांची भक्त सरळ पूजा करून करूणोदक व करूण प्रसाद घेवू शकतात. विधवा व सवाष्ण दोघांनाही भेद न करता पूजा करण्यास अवकाश
आहे. पुढीव वचन पहा

कन्नड :
तन्नाश्रयद सतिसुखवनु, तानुब ऊटवनु ।
बेरे भत्तोबर कैयल्लि माडिसबहुदे ?
तन्न लिंगक्के माडूव नित्य नेमव ता माडबेकल्लदे
बेरे मत्तोब्बर कैयल्लि माडिसबहुदे ?
केम्मने उपचारक्के माडवरेल्लरू
निम्मनेत बल्ल कूडलसंगमदेवा ? (बसव व. दी. १८५)
मराठी :
आपल्याला पाहिजे असलेले सतीसुख आणि भोजन
आपणच भोगले-जेवले पाहिजे ।
ते परहस्ते करवून घेता येईल का ?
आपल्या लिंगास करावयाचे नित्य नेम आपणच करावे विना
ते परहस्ते करवून घेता येईल का ?
केवळ उपचारार्थ करणारे सर्व
तुम्हाला जाणू शकतील का कूडलसंगमदेवा ?

१६) हिंदू धर्मात अंतरवर्णीय व आंतर जातीय विवाह नाहीत :

वैदिक हिंदू धर्मात वर्ण चार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. जाती शेकडो विभिन्न वर्ण व जातीमधे वैवाहिक संबंध होत नाहीत. वर्ण व जात न मानणारा लिंगायत धर्म कोणासही दीक्षा देवून विवाह संबंध करू शकतो.

१७) जन्मतः हिंदू- इतरांचा स्विकार नाही :

हिंदू धर्माचे अनुयायित्व जन्मतः येते. हिंदू सोडून इतरांना कोणतीही दीक्षा किंवा मंत्रोपदेश देवून हिंदू धर्मात घेता येत नाही. द्विजाचे चिन्ह असणारे जानवे व गायत्रि मंत्रोपदेश देता येत नाही. लिंगायत धर्मात इष्टलिंग दीक्षा संस्कार आहे. कोणासही गुरूकडून लिंगदीक्षेच्या मुखांतरे लिंगायत समाजात घेता येते. तसे आलेल्यांच्या मधे रोटी बेटी व्यवहार होवू शकतात.

१८) हिंदू धर्म पंचसूतकात विश्वास ठेवून आचरण करतो

जनन झालेल्या घरी सूतक, मरण झालेल्या घरी सूतक, परस्पर भिन्न जातीच्याने शिवल्यास सूतक, स्त्री विटाळशी झाल्यास सूतक, उच्छिष्ट सूतक - वस्तू उष्टे होतात. सोवळे नाश होते. अशा भ्रांतीवर हिंदू विश्वास ठेवतात. लिंगायत धर्मात या सूतकाना थारा नाही.

१९) पापाला प्रायश्चित आहे :

हिंदू धर्मात काही घटना घडल्यास पाप केले अशी समजूत झाल्यास त्याला परिहार म्हणून प्रायश्चित करावे लागते. काही पूजा विधि, व्रतांचे आचरण दान वगैरे करण्याची पध्दत आहे. लिंगायत धर्म केवळ पश्चातापावर विश्वास ठेवतो विना प्रायश्चित्तात नाही. पुढील वचन पहा.

कन्नड :
एलवो, एलवो, पापकर्मव माडिदवने,
एलवो, एलवो, ब्रह्महत्यव माडिदवने,
ओम्मे 'शरणे'न्नेलवो !
ओम्मे 'शरणे"दडे पापकर्म ओडुवुवु.
सर्व प्रायश्चित्तक्के होन्न पर्वतंगळेदावुः
ओब्बंगे शरणेन्नु, नम्म लिंगदेवंगे ! (बसव व, दी. ६१८)
मराठी :
अरे अरे पापकर्म केलेल्या तू,
अरे अरे ब्रह्महत्या केलेल्या तू,
एकदाच 'शरण' म्हणरे !
एकदाच 'शरण' म्हंटल्यास पापकर्म ना होते,
सर्व प्रायश्चित्ताना सोन्याची पर्वतेच आहेत.
एकदाच 'शरणु' म्हण, आमच्या कूडलसंगमदेवाला.

२०) उपवास, व्रत :

देवाच्या कृपेस पात्र होण्यासाठी व्रत, विविध देवतांच्या नावांनी विविध दिवसांचे उपवास, प्रायश्चित म्हणून उपवास वगैरे तहेची आचरणे हिंदू धर्मात भरपूर आहेत. लिंगायत धर्मात उपवास एक धार्मिक विधी म्हणून नाही, किंवा देवाची कृपा मिळविण्याचे साधन म्हणून पण नाही, आरोग्याच्या दृष्टिने पाहिजे तर उपवास करू शकता.

२१) हिंदू धर्मात उद्योगात उच्च नीचता अशी भावना आहे:

वैदिक हिंदू धर्मात उद्योगात विभजन, वर्गिकरण आहे. त्याच्या आधारावर उद्योग करणा-याच्यांत पण वर्गिकरण करण्यात आले आहे. लिंगायत धर्म जन्मतः कोणाची जात म्हणा किंवा उद्योग याचा निर्धार करीत नाही. समाजाच्या प्रगतीसाठी सर्व उद्योग आवश्यक असल्या कारणे त्यांच्या मधे भेद करू नयेत असे सांगतो. पुढील वचन पहा

कन्नड :
होलेगंडल्लदे पिंडद नेलेगे आश्रयविल्ल.
जलबिंदुविन व्यवहार ओंदे;
आसेयामिष रोष हरुष विषयादिगलेल्लवंदे,
एननोदि एनकेळि एनुफल ? कुलज”बुदक्के आबुदु दृष्ट ?
सप्तधातुसमं पिडेम् समयोनिसमुभ्दवम् ।
आत्मजीव समायुक्तम् वर्णानाम किंम् प्रयोजनम् ॥
कासिकम्मारनाद, बीसि मडिवाळनाद;
हासनिल्लि सालिगनाद, वेदवनोदि हारुवनाद.
कर्णदल्लि जनसिदवर उंटे जगदोळगे ?
इकारणा कूडलसंगमदेवा ।
लिंगस्थलव नरिदवने कुलजनु. (बसव व, दी. ५८८)
मराठी:
विटाळाविना पिंडास नसे आश्रय.
जलबिंदुचा एकच व्यवहार,
आशा, आमिष, रोष, हर्ष विषय आदी सर्वांना एकच;
काय वाचून काय ऐकून काय फल ? काय तयाचे सार ?
आधार ते कोणते कुलीन म्हणण्यास ?
सप्तधातु समं पिंडम् समयोनि समुभ्दवम् ।
आत्मजीव समायुक्तम् वर्णानाम किम् प्रयोजनम् ।।
लोहार झाले लोखंड तापवून, धोबी झाले कपडे धुवून,

प्रत्येक माणूस एका त-हेनेच जन्म घेतो. त्याच्या शारीरिक क्रिया एकाच प्रकारच्या असतात. सुखदुःखासारख्या मानसिक क्रिया पण एकाच तहेच्या असतात. सर्वांची शरीरे सप्तधातू पासून बनून, आत्मा व शरीर एक झाल्यानंतरच मानव जन्म घेतो. लोखंड तापविणारा लोहार, कपडे धुणारा धोबी, कापड विणणारा कोष्टी, ज्ञानी झालेला ब्राह्मण. कोणीही ब्रह्मज्ञान मिळवून ब्राह्मण होवू शकतो. जन्मलेली जात किंवा उद्योग ज्ञानी होण्यास आडवे येत नाहीत. देवास जाणेलेला व त्याच्या कृपेस पात्र झालेलाच कुलश्रेष्ठ म्हणून लिंगायत धर्माची ठाम भूमिका. हे हिंदू धर्माच्या मूळ सिध्दांताहून स्पष्टपणे वेगळे आहे नव्हे का ?

लिंगायत धर्म हा एक स्वतंत्र धर्म

दोन व्यक्ती असतात त्यांना आपलीच अशी कांही वैशिष्टे असतात. त्याचप्रमाणे धर्माना पण आपलीच अशी लक्षणे असतात. त्याप्रमाणे लिंगायत धर्मास असणारी लक्षणे खालील प्रमाणे आहेत.

१. धर्मगुरु - धर्मस्थापक झालेले विश्वगुरु बसवण्णा
२. धर्म संहिता - वचन साहित्य
३. धर्म भाषा - कन्नड
४. धर्म चिन्ह - सृष्टिकर्ता लिंगदेवाचे चिन्ह असलेले इष्टलिंग
५. धर्माचे नाव - लिंगायत
६. धर्मक्षेत्र - बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कूडलसंगम शरण भूमी बसव कल्याण
७. धार्मिक वार्षिक समावेश - शरण मेळावा
८. धार्मिक व्रत - शरण व्रत
९. धार्मिक केंद्र - बसव (अनुभव) मंटप
१०. धर्म संस्कार - इष्टलिंग दीक्षा
११. धार्मिक विधी - विधान गुरू - लिंग-जंगम यांची पूजा
१२. साप्ताहिक समावेश - शरण संगम, सामुहिक प्रार्थना
१३. पवित्र मास - श्रावण
१४. धर्माचे ध्वज - षटकोनमधे इष्टलिंग असणारे बसव ध्वज
१५. परंपरा - गुरूबसवण्णांना प्रथम मानून त्यांच्यापासून चालून आलेली शरण परंपरा
१६. धार्मिक बंधुत्व - जात, वर्ण, वर्ग रहित शरणसमाज निर्माण,
१७. धर्माचे ध्येय - जात, वर्ण, वर्ग रहित धर्म सहित कल्याण राज्य निर्माण

असे सिध्दांत, साधना, दर्शन शास्त्र समाज शास्त्र वगैरे सर्व दृष्टिने स्वावलंबी असणारा व केवळ कांही अंश सोडले तर अधिकाधिक विषयात संपूर्णपणे भिन्न मत असणारा लिंगायत धर्म हिंदू धर्माचा अंग म्हणा, जात म्हणा, मत (सैधांतिक अभिप्राय) अथवा पंथ म्हणवून घेणे शक्य नाही. एका राष्ट्रात आणखीन एक राष्ट्र, एका राज्यात आणखीन एक राज्य कसे असू शकत नाही, तसे एका धर्मात आणखीन धर्म असणे शक्य नाही.

सांस्कृतिक साम्य

लिंगायतांचा पोषाक, नावे, राहाणी व कांही शिष्टाचारच्या तुलनेत हिंदूसी साम्यता असू शकेल. ख्रिस्त मतांतराकडे नेहमी डोळे लावून असतात. सामान्यपणे हिंदू जनांगाच्या ज्यास्तकरून दलितांना ख्रिश्चन करण्याच्या कामात गुंतलेले असतात. ख्रिश्चन परदेशाचे, तेथे कुंकू लावणे, बांगड्या घालणे वगैरे प्रकार नाहीत, म्हणून दलित मतांतरास पुढे येत नाहीत असे कळून येताच, त्यांनी फार मोठा बदल करून कॅथोलिक पंथ करून स्त्रियांना कुंकू लावण्यास संधी करून दिली. ह्याप्रमाणेच आता हिंदू संस्कृतीची नावेपण मुलांना ठेवण्यात येत आहेत. संस्कृतीच्या विषयास येताच, भाषेला व संस्कृतीला निकटचा संबंध असल्यामुळे, इथे भाषा व भौगोलिकता काम करते. त्यामुळे हिंदू संस्कृती म्हणण्यापेक्षा भारतीय संस्कृती म्हणणे ज्यास्त सूक्त वाटते. मुसलमान महिला मंगळसूत्र बांधतात. बांगड्या घालतात म्हणून ख्रिश्चन व मुसलमान हिंदू म्हणता येईल कां ? तसेच लिंगायतानी नावे ठेवणे, कुंकू लावणे, जोडवी, मंगळसूत्र घालणे वगैरे हिंदू संस्कृतीचे आचरण केले म्हणून त्यांना तात्विकपणे धार्मिकपणे हिंदू म्हणता येत नाही.

वचन साहित्याचे अध्ययन न केल्यामुळे आपल्या धर्माचे स्वरूप बहुतेक लिंगायताना (व मठाधीशांनापण) माहित नाही. त्यामुळे ते धर्माच्यावरूध्दपणे होनहवन, बहूदेवतोपासना, जातीभेद, अस्पृश्यता, वगैरेचे आचरण करीत असतात. असले हिंदू आचरण ते करीत असतात. म्हणून त्यांच्या धर्माला बाधा येत नाही अशी समज. व्यक्ती भ्रष्टाचारी म्हटल्याने संविधान भ्रष्ट होत नाही. आपल्या धर्म साहित्याचे अध्ययन न करता आसपासच्या मित्र-मैत्रिणीचे पाहून आचरण करण्यामुळे अशा चुका घडतात. कोणीतरी आपल्या वैयक्तीक इच्छेनुसार मांसाहार केला म्हणून लिंगायत धर्म मांसाहारी धर्म होत नाही, त्याचप्रमाणे कांहींनी चुका केल्या म्हणून लिंगायत धर्माचे अविभाज्य अंग म्हणून ती चूक समजली जात नाही.

Reference: LINGAYAT HINDU NAVHET - A prose composition in Kannadda by Her Holiness Maha Jagadguru Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.

*
Previous लिंगायत, महात्मा बसवेश्वर, गुरु बसव लिंगायत कोण ? (Who is Lingayat) Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys