अग्घवणि हंपय्या (काळ इ. स. सुमारे १३००)
|
|
पूर्ण नाव: |
अग्घवणि हंपय्या |
वचनांकित : |
भोगबंकेश्वरलिंग |
कायक (काम): |
अर्घ्य (गोड पाणी) आणून ते भक्तांच्या घरात ओतणे |
भक्त खोटे बोलत नाही, भक्त सप्तव्यसनांत अडकत नाही.
विषय-विकार तृणसमान असे त्याला.
आशा करीत नाही भक्त; दया असे त्याच्या हाती.
स्मरण हाच दास असे त्याचा.
कोप माहीत नसल्याने तापत्रयाचा स्पर्श त्याला होत नाही.
कष्ट नष्ट झाल्याने लिंगात सामावलेला तृप्त असे तो.
तयाचा मार्ग जगाला नवीन, जगाचा मार्ग त्याला नवीन,
त्याला सदा लिंगध्यान, लिंगाला सदा त्याचे ध्यान,
महान परशिवाची स्तुती करणे माझ्या आवाक्यात नाही.
पालनकत्र्या ऐका, चेन्न हंपेय विरूपय्या,
तुमच्यावर विश्वास ठेवणारा सत्यशरण संतृप्त./1417 [1]
हा कुंतलदेशातील मुकुंदपुरचा रहिवासी असून काळ इ. स. १३००. याचा उद्योग अग्घवणी (शुद्ध, पवित्र जल) आणून भक्तांना, शरणांना पुरविणे. 'चेन्न हंपेय विरुपय्या' अंकिताने लिहिलेली चार वचने उपलब्ध आहेत. त्यामध्ये पंचाक्षरी मंत्राचा महिमा व सद्भक्ताची स्थिती यांचे वर्णन आढळते.
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*