Previous उरिलिंगपेद्दी उळियुमेश्वर चिक्कण्णा Next

उरिलिंगपेद्दींची पुण्यस्त्री काळव्वे

पूर्ण नाव: उरिलिंगपेद्दींची पुण्यस्त्री काळव्वे
वचनांकित : उरिलिंगपेद्दिगळरस


नसती कायकरत, ते नव्हेत भक्त,
सत्य-शुद्ध नसता, ते नव्हे कायक,
आसक्ती हेच भवबीज जाणा;
निरासक्ती हीच नित्यमुक्ती.
उरिलिंगपेद्दींच्या रायापुढे
ऐसा आचार सुलभ नसे पहा माये ! / 1298[1]

शूद्र कुळातील उरिलिंगपेद्दीची पत्नी या व्यतिरिक्त तिच्याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. तिचा काळही इ.स. ११६० असून 'उरिलिंगपेद्विगळरस' या अंकिताची बारा वचने उपलब्ध आहेत. भक्ताचे लक्षण, व्रताचरणाचे महत्त्व, प्रसादमहिमा, कायकनिष्ठा, कुलजातींची कठोर निर्भर्त्सना इत्यादी गोष्टी तिच्या वचनांमध्ये आढळतात.

पेटलेल्या कोलीताप्रमाणे
जळणारा तो असे का भक्त ?
लांडीलबाडीने आणून, दासोह
करणारा तो असे का भक्त ?
भक्ताचे कुळ उल्लेखून, निंदा
करणारा तो असे का भक्त ?
निंदया शिवभक्तानां कोऽटिजन्मनि सूकरः ।।
सप्तजन्मनि भवेत् कुष्ठी दासीगर्भेऽषु जायतेऽ ।।
असे म्हटल्याकारणे,
आपल्या प्राणावर बेतले, तरी हे टाळावे.
अन्यथा, उरिलिंगपेद्दींच्या रायास नावडे गे माये. / 1299[1]

व्रत म्हणजे प्रधानरत्न,
व्रत म्हणजे शुभ्र कांतिमान मोती;
व्रत म्हणजे जीवनकळा;
व्रत म्हणजे जागरूकता.
उरिलिंगपेद्दींच्या रायासी व्रतभ्रष्ट ना रुचती गे माये. / 1301[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous उरिलिंगपेद्दी उळियुमेश्वर चिक्कण्णा Next