पूर्ण नाव: |
अप्पिदेवय्या |
वचनांकित : |
ईश्वरीय वरद महालिंगा |
सुवर्ण, स्त्री, भूमीचे बंधन
न तोडविणा-या गुरूचा उपदेश नको.
रोष, हर्ष नष्ट न करणारी लिंगार्चना नको.
तामसभ्रम नष्ट न करणाच्या
जंगमाला दासोह करणार नाही.
परमानंद नसलेले पादोदक घेणार नाही.
संतृप्त न करणारा प्रसाद घेणार नाही.
'मी' पणाचा अहंकार नष्ट न करविणा-या
ईश्वरीय वरद महालिंगाला काय म्हणावे ?/1421 [1]
याचा काळ इ. स. १६५० असून 'ईश्वरीय वरद महालिंग' या अंकिताचे एक वचन सापडले आहे. 'मी' पणा नाहीसा झाल्याशिवाय गुरू, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद आपल्याला नको असे त्याने धैर्याने सांगितले आहे.
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*