Previous उरिलिंगपेद्दींची पुण्यस्त्री काळव्वे एचरिके कायकद मुक्तनाथय्या Next

उळियुमेश्वर चिक्कण्णा

पूर्ण नाव: उळियुमेश्वर चिक्कण्णा
वचनांकित : हुळियुमेश्वर


मी भक्त, मी शरण, मी लिंगैक्य असे म्हणालो तर,
लिंग हसणार नाही का ?
पंचेंद्रिये हसणार नाहीत का ?
षड्रिपू हसणार नाहीत का ?
माझ्या देहातील सत्त्व, रज, तम गुण हसणार नाहीत का ?
सांगावे उळियुमेश्वरा. / 1592[1]

हा रायचूर जिल्हा, सिंधनूर तालुक्यातील एक छोटे गाव देवरगुडी येथील रहिवासी. तेथील त्याचे अधिदैवत म्हणजे 'हुळियुमेश्वर', आज जे 'मल्लिकार्जुन' नावाने प्रसिद्ध आहे. कल्लेदेवरपुर शिलालेखात (१२७९) येणारा 'चिक्क' हा उल्लेख बहुतेक या चिक्कण्णाचा असावा. देवरगुडी येथील शिलालेखावरून हा मूळ काळामुखी शैव आचार्य होता असे समजते. 'उळियुमेश्वर' अंकिताची बारा वचने याच्या नावावर उपलब्ध आहेत. संसारहेय, शरणांची स्तुती, निर्वाणाची तळमळ, भृत्यभाव, उदार दृष्टी हे विषय त्याच्या वचनांत प्रामुख्याने आले आहेत.

माझ्या मनाचा मंच करून
देह अंथरेन, यावे देवा !
माझ्या अंतरंगात सामावून घेतो, यावे देवा !
माझ्या बहिरंगात सामावून घेतो, यावे देवा !
माझ्या शिवलिंगदेवा, यावे देवा !
माझ्या भक्तवत्सला, लवकर यावे देवा !
ॐ नमः शिवाय म्हणुनी हाक मारितो,
उळियुमेश्वरलिंगदेवा, यावे आता ! / 1593[1]

वाराणसी अविमुक्त तीर्थक्षेत्र इथेच आहे.
हिमालयातील केदार, विरूपाक्ष इथेच आहे.
गोकर्ण, सेतुरामेश्वर इथेच आहे.
श्रीशैल मल्लिनाथ इथेच आहे.
सकल पुण्यक्षेत्रे इथेच आहेत.
सकल लिंग उळियुमेश्वर आपल्यातच आहे. / 1595[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous उरिलिंगपेद्दींची पुण्यस्त्री काळव्वे एचरिके कायकद मुक्तनाथय्या Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys