पूर्ण नाव: |
अग्घवणि होन्नय्या |
वचनांकित : |
हुलिगेरेचा वरद सोमनाथ |
होईल तसे होऊ दे, म्हणेल तसे म्हणू दे,
असे म्हणता येणार नाही.
नियम-व्रत करणा-याला हट्ट पाहिजे, जिद्द पाहिजे.
धरलेले सोडता येत नाही देवा.
हुलिगेरेचा वरद सोमनाथ
मनस्पर्शी वीराविना कोणासही हार जाणार नाही./1418 [1]
हा पुलिगेरे (आजचे लक्ष्मेश्वर) चा रहिवासी असून सोमेश्वर त्याचे आराध्य दैवत होते. रोज तुंगभद्रा नदीचे पाणी आणून पूजा करणे हे त्याचे व्रत होते. अब्बलूर येथे घडलेल्या शिरच्छेदाच्या प्रसंगी एकांत रामय्याचे मुंडके थाळीमध्ये ठेवून होन्नय्याने मिरवणूक काढली होती. त्याने आपल्या जीवनाचा उत्तरार्ध कल्याणमध्ये घालविला.
कल्लेदेवरपुर (११७९), मरडीपूर (११८०) येथील शिलालेखांमध्ये याचा उल्लेख येतो. याचा काळ इ. स. ११६० असून 'हुलिगेरेय वरद सोमनाथ' या अंकिताने लिहिलेली चार वचने उपलब्ध आहेत. शिवमहिमा, एकदेवनिष्ठा, लिंगांगसामरस्य यांची माहिती नसलेल्यांवर त्याने आपल्या वचनांत टीका केली आहे.
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*