Previous उग्घडिसुव गबिदेवय्या उरिलिंगदेव Next

उप्परगुडिय सोमिदेवय्या

पूर्ण नाव: उप्परगुडिय सोमिदेवय्या
वचनांकित : गारुडेश्वरलिंग


आपणच देव झाल्यावर पुन्हा,
पूजा करवून घेणा-याकडे येरझाया का घालाव्यात ?
आपण परमनिर्वाण स्थितीला पोहचल्यावर,
गोष्टी करणा-या, कीर्तन करणा-यांसंगे मिसळून,
चावडी नि घरीदारी ये-जा थांब, असे का म्हणवून घ्यावे ?
जिथे शरणांना पाहिले, तिथेच त्यांची सहज लीला ऐकून,
तिथेही परमानंदात सुखी असलेल्या
महात्म्याला इथे-तिथे असा भावभ्रम नाही.
तोच गारुडेश्वरलिंगाला जाणून घेणारा शरण. / 1530[1]

याचा काळ इ. स. ११६०. 'गारुडेश्वरलिंग' या अंकिताची याची अकरा वचने मिळाली असून शरीर-आत्मा संबंध, प्रसादाचे महत्त्व, क्रिया ज्ञान मिलाप वगैरे विषयांवर याने सुंदर विवेचन केले आहे.

सापात विष असते, म्हणजे त्याच्या सर्वांगात विष असते ?
विषाचे ठिकाण एकच असत नाही का ?
पृथ्वीच्या पोटात संपत्ती दडली आहे, म्हणजे
पृथ्वीच्या सर्व ठिकाणी संपत्ती असेल का ?
शरण कुळात परमवस्तू परिपूर्ण आहे, म्हणजे
पाखंडी संप्रदायात परिपूर्ण परमवस्तू असेल का ?
हे सत्य सन्मुक्त नि परमविरक्ताजवळच असणार नाही का ?
विष असलेले तोंड दाबून धरावे,
जमिनीतील संपत्ती जाणून घेऊन जमीन खणावी,
सत्य परमवस्तूचे स्थळ जाणून घेऊन पूजा करावी.
अशा आशांना, आशासमूहाला त्रिविधमल.
प्रतिष्ठालाभासाठी भूतदया.
ज्ञानीला लगेच मिळे समरसता.
त्यामुळे जगात जाणून घेणान्यांना परमानंदप्राप्ती,
गारुडेश्वरलिंगामध्ये द्वैत नष्ट करणा-यांना समरसानंद. / 1531[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous उग्घडिसुव गबिदेवय्या उरिलिंगदेव Next