Previous अमुगे रायम्मा अल्लमप्रभुदेव Next

अरिविन मारितंदे

पूर्ण नाव: अरिविन मारितंदे
वचनांकित : अमुगेश्वरा

जल-मातीच्या मिश्रणाने बनलेल्या घटासम,
चित्तशक्ती एक होऊन, मज इष्टलिंग होऊन आला देवा !
चित्तस्थिरतेला ध्येय होऊन, ध्येयाला आधार होऊन,
सकल इंद्रियनिग्रहासाठी जहाज होऊन,
मज भवसागरातून पार केले देवा.
भक्तिप्रिय सत्यकरंडमूर्ती सदाशिवमूर्तिलिंगा,
माझ्या अंगात विलीन व्हावे. /1432 [1]

याचा काळ इ. स. ११६० असून 'सदाशिवमूर्तिलिंग' अंकिताची त्याची ३०९ वचने मिळाली आहेत. नावातील अरिविन (ज्ञानी) शब्दाप्रमाणे त्याने ज्ञानाला जास्त महत्त्व दिले आहे. याच्या तात्त्विक वचनांमध्ये गुरू, लिंग, जंगम, प्रसाद, शैव, वीरशैव वगैरे विषयांवर चर्चा केली आहे. अनेक वचने गूढ भाषेत आहेत.

दुभत्या जनावराला चारा-पेंड घातले तर,
जास्त दूध मिळते, त्याप्रमाणे -
क्रियाशुद्धीसाठी काया, वाचा, मन हे त्रिकरण शुद्ध केले तर,
परमवस्तूची प्राप्ती होईल,
अनित्य नष्ट होऊन प्रकाश मिळेल,
हेच सदाशिवमूर्तिलिंगातील सामरस्याच्या संतोषाचे स्वरूप /1439 [1]

दगड, वृक्ष, मातीमध्ये पूजा करवून घेणारी
वस्तू दडली आहे का, आपल्या मनाच्या जाणिवेविना ?
तेथे जाणावयाचे ज्ञानच
परमवस्तू होऊन प्रकाशित होत आहे,
सदाशिवमूर्तिलिंग होऊनी./1441 [1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous अमुगे रायम्मा अल्लमप्रभुदेव Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys