अमरगुंडचा मल्लिकार्जुनतंदे
|
|
पूर्ण नाव: |
अमरगुंडचा मल्लिकार्जुनतंदे |
वचनांकित : |
मागुडच्या मल्लिकार्जुन देवा |
कायारूपी नगराला सत्यरूपी तटबंदी बांधून,
धर्म, अर्थ, काम, मोक्षरूपी पहारेक-यांनो, सावधान रहा !
जागे रहा, भय आहे, खूप भयानक भय आहे !
अज्ञानरूपी भयाण अंधकार अति दाट, अति दाट !
नवद्वाराचे रक्षण करा, रक्षण करा !
ज्ञानज्योत प्रज्वलित करा, प्रज्वलित करा !
पाच चोर खिंडार पाडीत आहेत, जागे रहा, जागे रहा !
जीवधनाचे जतन करा, जतन करा ! चांगभले !
चांगभले ! त्या नगराच्या मूल शिखराचे द्वार उघडून,
सुमार्गावर स्वयंभूनाथाकडे जायचे आहे.
हे जाणून घे, महामहिम मागुडच्या मल्लिकार्जुन देवाबद्दल
अजागृतपणा नको ! अजागृतपणा नको ! /1422 [1]
याच्या नावात सुचविल्याप्रमाणे अमरगुंड म्हणजे तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी हे त्याचे गाव असावे. याचा काळ इ. स. ११६०. याचे वचनांकित 'मागुडद मल्लिकार्जुन' असून याची दोन वचने उपलब्ध आहेत. एका वचनात शरीररूपी शहराचे रक्षण करण्याची रीत व दुसऱ्या वचनात लिंगाचा महिमा वर्णिला आहे. दोन्हीमध्ये अध्यात्म व अनुभाव ओतप्रोत भरलेला आहे.
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*