पूर्ण नाव: |
अवसरद रेकण्णा |
वचनांकित : |
सद्योजातलिंग |
कडूलिंबाच्या झाडावर बसून गूळ खाल्ला, तर तो कडू लागेल ?
आंधळ्याने अमृत प्यायले, तर ते आंबट लागेल ?
पांगळ्याने चालण्यारा वाट नाही म्हणता, त्याला मारता येईल ?
सद्योजातलिंगासाठी हीच क्रियाश्रद्धा, शुश्रूषाभाव./1467 [1]
याचा काळ इ. स. ११६०. 'सद्योजातलिंग' या अंकिताने त्याने लिहिलेली १०५ वचने उपलब्ध आहेत. तत्त्व, अनुभाव व गूढता यांचा त्रिवेणी संगम त्यांमध्ये दिसून येतो.
वृक्षावर चढल्याशिवाय फळ काढता येईल का ?
कुसुमाविना सुगंध केसात माळता येईल का ?
साकाराविना निराकार पाहता येईल का ?
क्रियाश्रद्धेविना त्रिविधकर्तृ परवस्तू आपणास साध्य होईल ?
यासाठी गुरूविषयी सद्भाव, लिंगमूर्तीचे ध्यान,
जंगमामध्ये त्रिविधमलापासून दूर असेल तर,
सद्भक्ताचे अंग, चिङ्घनवस्तूचा संग,
सद्योजातलिंगाचा सुसंग मिळेल/1468 [1]
सर्व पृथ्वीवर सुवर्ण पसरलेले आहे, तर
वैरी राजे युद्ध-भांडणे कशासाठी करतात ?
सर्वकाही सत्यमय असेल तर,
तो वाईट, हा वाईट म्हणून भांडण का करतात ?
रत्न, पाचू, मोती, सुवर्ण, फळे, पिके, वृक्ष इत्यादी
आपापल्या अनुकूल भूमीशिवाय जन्मत नाहीत, त्यासम
कुलीनता असेल तेथे आचार, आचार असेल तेथे निष्ठा,
निष्ठा असेल तेथे सत्य लिंगवस्तू,
परलिंगवस्तूचे ज्ञान पक्व झाले तर भक्तीचे पीक,
भक्तीचे पीक कापून, झोडपून,
उफणून, मापून सद्योजातलिंगाच्या पेवात ठेवता येईल. /1465 [1]
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*