अक्कम्मा (काळ इ. स. सुमारे ११६०)
|
|
पूर्ण नाव: |
अक्कम्मा |
वचनांकित : |
आचार ही प्राण बने रामेश्वर लिंग |
नि:कामीखेरीज कामीस व्रत असते का ?
समाधानीखेरीज क्रोधीस व्रत असते का ?
उदाराखेरीज लोभीस व्रत असते का?
ऐसे क्षमा, निग्रह, शांती, समाधानादी ।
संपदेने युक्त होऊन, गुरुलिंगजंगमासी
तनुमनधन अर्पिण्यात तत्पर होऊन,
कुडीत प्राण असेतो चित्त शुद्धात्म होऊन
राहणारा महाभक्तच कृत्यविरहित शरण.
तयाची चरणमुद्रा मम हृदयी सदा राहे ठसून.
आचारचि प्राण असलेले रामेश्वरलिंग
तयांच्या बैलांचा गोठा होऊन राहतसे. /1246 [1]
दुष्टांना घाबरून, मारून-मुटकून अवलंबिता येई का व्रत ?
अशा व्रताचे स्वरूप कसे म्हणजे -
धारदार पात्यास लावलेल्या तुपाच्या रुचीस भाळून
पाते चाटता जीभ कापल्याने विव्हळणाच्या जिवापरी.
श्रद्धा-प्रीतीविना भक्ती, दृढनिश्चयाविना निष्ठा,
जणू सावरीचे झाड राखणा-या पक्ष्यापरी.
असे हे समग्र मर्म न जाणलेल्याचा व्रताचार
प्राणिवध, शील आणि सूतकास बळी पडे.
आचारचि प्राण असलेल्या रामेश्वरलिंगापासून
बहिष्कृत असलेला हा नेम. /1254 [1]
हिचा काळ इ. स. सुमारे ११६० असून जन्मस्थळ एलेश्वर (एलेरी) व ऐक्यस्थळ कल्याण. आराध्य दैवत रामेश्वर. 'आचारवे प्राणवाद रामेश्वरलिंग' या वचनांकिताने तिने लिहिलेली १५४ वचने उपलब्ध आहेत. वचन संख्येच्या दृष्टीने अक्कमहादेवी आणि नीलम्मानंतर हिचा क्रमांक लागतो. व्रत, नेम, आचार, शील ही तिच्या वचनांची मूळ सामग्री होय. त्यांना पूरक म्हणून धान्य, पशू, पक्षी, ग्रामीण श्रद्धा, परंपरा तिच्या उद्योगाच्या परिभाषेत व्यक्त झालेली दिसतात. त्यावरून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा बोध होतो.
व्रत म्हणजे काय ? परवस्तू दर्शनार्थ सोपान.
व्रत म्हणजे काय ? इंद्रियांची मोळी भंगविणारी कुलकुठार,
व्रत म्हणजे काय ? सकल संसारासाठी दावानल.
व्रत म्हणजे काय ? सर्व दोषांचा नाश.
व्रत म्हणजे काय ? जागृत चित्ताने परवस्तू
पाहण्यासाठी अवलंबिण्याचे साधन.
व्रत म्हणजे काय ? आचारचि प्राण असलेले रामेश्वरलिंग
तयांसाठी कोवळे बालक होऊन राहे./1259 [1]
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*