Previous एलेगार कामण्णा शरण आणी शरणे Next

एकांत रामितंदे

पूर्ण नाव: एकांत रामितंदे
वचनांकित : आतुरेश्वरलिंग


अशन-व्यसन सर्व विषयात खोटे बोलून,
चहाडीखोरपणाने संकटात पडून,
सेवा करविणे सद्गुरूला शोभत नाही. .
तेल-पाण्याच्या भेदासम, मण्यातील सूत्रासम,
कात टाकलेल्या सापाच्या देहासम,
गुरुस्थल संबंध असावा,
माझ्या चेन्नरामेश्वरलिंगास जाणण्यासाठी. / 1599[1]

हरिहराच्या रगळेमध्ये व अब्बलूरच्या शिलालेखात याचा उल्लेख असून हा गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद गावी राहत असे. याचे वडील

देहा-देहात अनेक भेद आहेत, पण
आत्मा एक म्हणतात, हे कसले बोलणे ?
अग्नीशिवाय का केवळ अग्नीच्या प्रकाशाने भाजेल ?
मग त्यांच्या त्यांच्या देहातील अनुभव
त्यांच्या त्यांच्या परीने घेताना
इतरांच्या देहातील अनुभव का समजत नाही ?
हाच अनुभव माझ्या चेन्नरामाला जाणून घेताना जाणवतो. / 1600[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous एलेगार कामण्णा शरण आणी शरणे Next