पूर्ण नाव: |
एलेगार कामण्णा |
वचनांकित : |
आतुरेश्वरलिंग |
चार प्रहरातील एक प्रहर,
भूक, तहान इत्यादी विषयांत खर्च होतो.
दुसरा प्रहर निद्रा, स्वप्न, तळमळ
अशा अनेक अवस्थात निघून जातो.
आणखी एक प्रहर,
स्त्री आलिंगनात, अधरचुंबनात इत्यादी
अनेक अंगविकारात निघून जातो.
आणखी एक प्रहर आहे :
आपापले या जगी येण्याचे प्रयोजन जाणून,
पुढे घडणारे योग्य-अयोग्य जाणून,
नित्य-नियमाचे आचरण करावे.
तुमची शिवार्चना, पूजा, प्रणव पठण,
पक्व दृढभाव, विरक्तीची आस, सद्भक्तीची मुक्ती,
या आचरणांतील नियम चुकवू नको.
अरुणोदय होण्याआधी,
पशु-पक्ष्यांचा कलरव, वन्य प्राण्यांचा चित्कार,
नरमानवांच्या चाहुलीआधीच ध्यानासक्त व्हावे,
शुद्धसिद्ध प्रसिद्ध प्रसन्न
कुरंगेश्वरलिंगात समरस होण्यासाठी. / 1597[1]
हा विड्याची पाने विकण्याचा कायक करत असे. याचा काळ इ. स. १४०० असून 'आतुरेश्वरलिंग' अंकिताचे याचे एकच वचन मिळाले आहे. आपल्या उद्योगाची भाषा वापरून व्रतनिष्ठेचे महत्त्व त्यामध्ये सांगितले आहे.
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*