Previous एचरिके कायकद मुक्तनाथय्या एलेगार कामण्णा Next

एडेमठच्या नागिदेवय्यांची पुण्यस्त्री मसणम्मा

पूर्ण नाव: एडेमठच्या नागिदेवय्यांची पुण्यस्त्री मसणम्मा
वचनांकित : हुळियुमेश्वर


कावळा, कुत्रे खाणारे नव्हेत,
व्रतभ्रष्टांची संगत करणारे नव्हेत.
कुत्र्याला नारिंग कधी लभ्य होईल का ?
शिवसंतानाखेरीज -
लौकिक नरास व्रत साध्य होईल का ?
तुम्हीच साक्षी निजगुणेश्वरलिंगाठायी. / 1302[1]

चोळ राज्यातील कांची नगरातील एडेमठचा नागिदेवय्या हा हिचा पती असून दोघे कल्याणला जाऊन वास्तव्य करतात. तिचा काळ इ. स. ११६० असून 'निजगुणेश्वरलिंग' अंकिताचे तिचे एकच वचन मिळाले आहे. त्या वचनात तिने व्रताचे महत्त्व सांगून व्रतभ्रष्टांची निंदा केली आहे.

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous एचरिके कायकद मुक्तनाथय्या एलेगार कामण्णा Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys