लिंगा शिवाय चालणारा लिंगाशिवाय बोलणारा
लिंगा शिवाया असणात्याचे अंग सूतक
लिंगांगी, लौकिकास शिवता कामा नये.
लिंगा शिवाय संचार केल्यास, ते चालणे बोलणे पाप.
लिंगा शिवाय बोललेले शब्द ऐकवत नाहीत शिवशिवा!
लिंगाशिवाय यूकी गिळल्यास विषासम
कूडलचन्नसंगमदेवा
एकदा जमीनीत अंकूरलेले बीजारोप
पुन्हा पुन्हा उपटून लावीत गेल्यास,
तो बीजारोप न वाडता ताण
वाढविण्या परी नव्हे का? वेड्या मानवा?
गुरुकडून लाभलेले लिंग पुन्हा पुन्हा अलग करून
पुन्हा पुन्हा धारण केल्यास
ते इष्टलिंग अनिष्ट सर्व घालवून
इष्टार्थ तुम्हि मिळविणे कसे शक्य?
या कारणे कूडलचन्नसंगय्यात मुक्ति शोधणात्यांनी
अंगावर अविरत लिंगधारण करावे.
आकाशात उडणात्या पतंगासपण मूळसूत्र असते
यूक्ती नसलेला शूर काय कामाचा?
जमीन नसल्यास बैलगाडी चालेला का?
अंगावर लिंग नसल्यापरी नि:संगी होवु नये
कूडलचन्नसंगमदेवात संग नसल्यास
नि:संगी असे म्हणता येईल प्रभू?
श्रीगुरूने करस्थलात इष्टलिंग
बीजारोपण करून दिल्यानंतर
आणखीन एक लिंगपेटी शिवदोरा
पाहिजे म्हणण्याचा द्रोह कशाला?
अंगावरील लिंग उपेक्षून अन्यदेवतांना
पूजाणात्या अवमानितांचे दर्शन न घडो
कूडलचन्नसंगय्या
*