Previous वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता अंगावरील लिंग अलग होवू नये Next

बसवेश्वरच इष्टलिंगाचे जनक

सूचीत परत (index)
आदी बसवण्णा अनादि लिंग म्हणतात
खोटे हो, हे खोटे, हे बोलणे ऐकणे नाही
आदी लिंग, अनादी बसवण्णा!
लिंग बसवणणांच्या उदरात जन्मला
जंगम बसवण्णांच्या उदरात जन्मला
प्रसाद बसवण्णांचे अनुकरणासाटि झाले
असे त्रिविधास बसवण्णाच कारण म्हणून जाणिले हो.
कूडलचन्नसंगमदेवा

कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, याच्याही
पूर्वी नसलेले पाहा
धरती, ब्रह्मांड मूर्तस्वरूप घेण्यापूर्वी नव्हते पाहा
श्रेष्ठ असा प्रसाद साधुन आणून
दिलास माझ्या हाती निक्षेप म्हणून
कूडलचन्नसंगा, तुमचा शरण

सर्वप्रथम तूच गुरु झाल्याकारणे
तुझ्यापासून जन्मले लिंग
सर्वप्रथम तूच लिंग झाल्याप्रमाणे
तुझ्यापासून जन्मले जंगम
सर्वप्रथम तूच जंगम झाल्याकारणे
तुझ्यापासून जन्मले प्रसाद
सर्वप्रथम तूच प्रसादि झाल्याकारणे
तुझ्यापासून जन्मले पादोदक.
असे गुरु लिंग, जंगम, प्रसाद, पादोदक स्वरूप
तूच झाल्याकारणे जंगमप्राणी होवून
पूर्वाचारी तूच झालास
या कारणे तूच सर्वाचार संपन्न होवून
पूर्वाचारी तूच झालास
या कारणे गुहेश्वर लिंगात चंदय्याला,
लिंगाचे सत्य दाविणारे संगन बसवण्णा होत.

एकदाच श्रीगुरुचे चरण स्मरिल्यास
भवबंधन नाहीसे होते
आशा गुरुला नमो, गुरु लिंगास नमो
हरिब्रह्मादींना अगोचर असे
कूडलचन्नसंगय्या लिंग दिलेल्या
गुरुंना नमो नमो.

हरच गुरु होवुन तो मृत्यूलोकात येवून
परशिव लिंग तळहातात दिलेला
गुरुच बसवण्णा हो ! सर्वज्ञ

आदी गुरुरायाने भेदुन दिले लिंग
तिन्ही देवांचा मालक, तिन्ही जगाचा कर्ताच
आदी गुरु बसवण्णाच जाणा ! सर्वज्ञ

भक्तिस तुमची घनकृपा मूख्या देवा
तूम्हाहून महान कोणि ना पहा देवा
कूडलसंगमदेवा तूम्हीच ज्ञानगुरु झाल्याकारणे

माझी गति मति तूच पाहा देवा
माझा गुरु परमगुरु तूच पाहा देवा
माझा अंतरंगाची ज्योत तूच पाहा देवा
कूडलसंगमदेवा तूच मला गुरु, मीच तुमचा शिष्य
हे तुमचा शरण सिद्धरामय्या देवही जाणतात

गुरुची (देवाची) कृपा असल्या विना
वीर शरणासम वाद करणे शक्य?
गुरुकृपा बसवनाम गजात शिवल्यामूळे
कूडलसंगमदेव रूपि सिंहाबरोबर वाद करणे शक्य

माझ्या अंतरंगात जाणीव हेवून
माझ्या बहिरंगात आचार हेवून, तू स्थान करून,
माझ्या मनात धनसृती हेवून मूर्ती हेवून,
गुरुस्थल, लिंगस्थल, जंगमस्थल, प्रसादिस्थल असे
चतुर्विध माझ्यात स्वायत करून, दाखवुन
प्राणलिंग नाम वाटेचा आधार दाखवून
सर्व असंख्याताना पावन केल्यामूळे
कूडलसंगमदेवा, तुमच्या मूळे सकल योग्यता मी मिळविली
विना, माझ्यामुळे तू झालास हे म्हणणे
तुमचे प्रमथ सर्व मानीत नाहीत पाहा.

पेरलेल्या बिजाचे फळ अतिरिक्त चारित्र्याचे पहा
अपल्यातून अपणच विसकीत हेवून वर आलेले,
स्वयंकृत सहज कूडलचन्नसंगय्याचा बसवण्णा.

तूला तूच कर्ता बसवा; मालाही तूच कर्ता बसवा
मी करणात्या भक्तिला तूच कर्ता बसवा
करुणा कर कपिलसिद्धमल्लिनाथ बसवा
*
Previous वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता अंगावरील लिंग अलग होवू नये Next