Previous भक्तांनी भवींचा संग करून नये लिंगायतमध्ये वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत Next

लिंगायतमध्ये पंच सूतक पाळू नयेत

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये पंच सूतक पाळू नयेत

लिंग असेल तेथे अस्पृश्यता असेल ?
जंगम असेल तेथे कुळ असेल ?
प्रसाद असेल तेथे उष्टे असेल ?
अपवित्र बोलणा-याचे शब्द हे सुतक, हेच पातक.
निष्कलंक, निजैक्य असलेले त्रिविध निर्णय,
हे कूडलसंगमदेवा, तुमच्या शरणांशिवाय अन्यांना नाही. /431 [1]

जेवणे-जेवू घालणे हा शिवाचार,
सोयरीक जुळविणे हा कुलाचार,
असे अनाचारीचे बोल ऐकू नयेत.
ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत शिवभक्त सारे समान मानून
सोयरीक जुळविणे हा सदाचार, बाकी सर्व अनाचार,
ते कसे म्हटल्यास -
स्फटिकाच्या घटात काळेपण शोधल्यापरी,
मधुरतेत कटुता शोधल्यापरी,
रज:सुतक, कुलसुतक, जननसुतक,
प्रेतसुतक, उच्छिष्टसुतक म्हटल्यास,
त्याला गुरू नाही, लिंग नाही,
जंगम नाही, तीर्थप्रसाद नाही.
असे पंचसुतक हटविल्याविना होणार नाही भक्त.
अशा भक्तांमध्ये सोयरीक जुळविणे हा सदाचार,
कूडल चेन्नसंगमदेवा./ 707 [1]

जातिसुतक सुटत नाही, जननसुतक सुटत नाही,
प्रेतसुतक सुटत नाही, रजस्वलेचे सुतक सुटत नाही,
उच्छिष्ट सुतक सुटत नाही, भ्रांती सुतक सुटत नाही,
वर्णसुतक सुटत नाही, मग हे कसले भक्त ?
लेपून विरूप केल्यास, गोड गोड बोलल्यास,
सद्गुरुलिंग नाक कापल्याविना राहील का ?
वणव्याच्या हातून कुसळाचे गवत कापल्याप्रमाणे
असली पाहिजे भक्ती.
मागे ढीग नाही, पुढे गवत नाही.
या कारणे, कूडल चेन्नसंगय्याचे भक्तिस्थल
तुमच्या शरणांविना अन्यास साध्य होत नाही /777 [1]

श्रीगुरुकृपा कटाक्षाणे (दीक्षा) पूनीत झालेल्या भक्तास
जातसूतक, जननसूतक मरणसूतक, रजसूतक
उच्छीष्टसूतक म्हणून त्याना गुरु नाही
लिंग नाही, पादोदक प्रसाद नाही
कूडलचन्नसंगमदेवा

शैवसिद्धांताचे पालन करणारे कर्मकांडी
स्तावर लिंगाच्या स्थानी हवनहोमादी
पवित्र कार्य हाती घेतल्या वेळी
उच्छिष्टादि पंचसूतकांची बाधा झाल्यास
त्यांनि ती सूतके न मानता
परिशुद्ध बावनेने असत नाहीत
देव देवांचा पिता महादेव
लिंगरूपात अंगावर धारण करून
परिशुद्ध झाले असे न समजता
सूतकाचे आचरण करणात्या व्रतभ्रष्टांचे
मला दर्शन न घडो कूडलचन्नसंगमदेवा

सूतक असणारी लिंगार्चना नाही
पातक असणारी लिंगार्चना नाही
सूतक विरहित लिंगार्चना
पातक विरहित लिंगार्चना
असे सूतक पातक दोन्ही नाही,
कूडलचन्नसंगाच्या शरणांना

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

*
सूचीत परत (index)
Previous भक्तांनी भवींचा संग करून नये लिंगायतमध्ये वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत Next