शरणाने 'शरण' म्हणून नमस्कार करणेच भक्तीचे लक्षण
काय हो आलात, सर्व ठीक आहे ना म्हटल्यास,
तुमचे ऐश्वर्य उडून जाईल का ?
बसून घ्या म्हटल्यास पडेल का खळगा जमिनीस ?
तत्काळ बोलल्यास डोक्याची कवटी फुटून जाईल का ?
नाही दिलेत तरी देण्याची बुद्धीही नसेल, तर
नाक कापल्याशिवाय सोडेल का, कुडलसंगमदेव ?/112 [1]
बोलणं मोत्याच्या हारासारखं असावं.
बोलणं माणकाच्या दीप्तीसारखं असावं.
बोलणं स्फटिकाच्या शलाकेसारखं असावं.
बोलणं लिंगानेही प्रशंसा करण्यासारखं असावं.
बोलल्याप्रमाणे वागले नाही, तर
कुडलसंगमदेव कसा प्रसन्न होईल ?/260 [1]
बोल तेच ज्योतिर्लिंग, स्वरचि परतत्त्व,
ताळु-ओष्ठ संपुटच नादबिंदुकळातीत.
गुहेश्वराचे शरण बोलून सुतकी न होती, ऐक वेडे./592 [1]
शरणाने शरणाला पाहून,
'शरण' म्हणून नमस्कार करणेच भक्तीचे लक्षण,
शरणाने शरणाला पाहून,
पाय धरून वंदन करणेच भक्तीचे लक्षण.
शरणाने चरण न धरता।
बघूनही तसेच निघून गेल्यास,
कूडल चेन्नसंगय्याचे शरण क्षमा करणार नाहीत./905 [1]
*
Reference:
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.