Previous आम्हांस आमचे कुडलसंग असताना लिंगायतमध्ये आपल्या लिंगाचा नित्यनेम आपणचि करावा Next

लिंगायतांनी शरण संगाचे (सत्संगाचे) महत्व

सूचीत परत (index)

लिंगायतांनी शरण संगाचे महत्व


भाताचे एक शीत पाहता कावळा,
हाक न मारी का आपुल्या परिवारास ?
घासभर अन्न दिसता कोंबडी,
न जमवी का आपुल्या कुलबांधवांस ?
शिवभक्त होऊन भक्तिपक्षविहीन असल्यास
तो कावळ्या-कोंबडीहून हीन, कूडलसंगमदेवा./152 [1]

ज्ञानबळे अज्ञान नष्ट पहा हो,
ज्योतिबळे अंधार नष्ट पहा हो,
सत्यबळे असत्य नष्ट पहा हो,
परीसबळे लोखंड नष्ट पहा हो,
कुडलसंगाच्या शरणांच्या अनुभावबळे,
माझा भव नष्ट पहा हो./207 [1]

मोरीचे पाणी नितळ असून काय उपयोग ?
खोटे नाणे कुठेही असले तरी काय उपयोग ?
लगडले आम्र आकाशाला, त्याचा काय उपयोग ?
न तोडता येती, ना खावया मिळती.
अनुभाव नाही ज्याला कूडलसंगय्याच्या शरणांचा,
तो कुठेही असो, कसाही असो, त्याचा काय उपयोग ?/274 [1]

भक्त भक्ताघरी येता, त्याची सेवा करावी.
भक्त असून कर्ता म्हणून पादपूजा करवून घेतली तर,
त्याची तोपर्यंतची भक्ती सारी नष्टच होईल.
लाखो कोस चालुनिया जावे भक्ताघरी, आणि
द्यावी भक्तास भेटी, यास सदाचार म्हणती.
दोघांनीही मिळुनिया तेथे केल्याने दासोह,
होई प्रसन्न कुडलसंगमदेव./294

मडके करण्यासी माती हवी आधी,
अलंकारासाठी सोने हवे आधी,
शिवपथ जाणण्या गुरुपथ हवा आधी,
कुडलसंगय्यास जाणण्या शरणसंग हवा आधी./310 [1]

समीप जा : सज्जनांचा संग करावा,
दूर रहा : दुर्जनांचा संग नको देवा,
साप कोणताही असो, विष एकच असते.
त्यांचा संग करू नको.
अंतरंग शुद्ध नसणा-यांचा संग म्हणजे
धमणीचे विष, काळकूट विष आहे, कुडलसंगय्या. /384 [1]

समीप रहा: सज्जनांचा संग चांगला पहा.
दूर जा: दुर्जनांचा संग वाईट पहा.
संग दोन आहेत : एक धर, एक सोड,
मंगलमूर्ती आमच्या कूडलसंगाच्या शरणांना धर./383 [1]

डोके मलिन झाल्यास महामार्जन करावे,
वस्त्र मलिन झाल्यास पटाकडे द्यावे,
मनाची मलिनता धुवायची असल्यास
कूडल चेन्नसंगय्याच्या शरणांचा अनुभाव करावा./862 [1]

विना संग ना अग्नी उपजे,
विना संग ना बीज अंकुरे,
विना संग ना पुष्प उमले,
विना संग ना सर्वसुख लाभे.
चेन्नमल्लिकार्जुनदेवा,
तव महानुभावींच्या सत्संगाने
मी परमसुखी जाहले ! /1227 [1]

अज्ञानींचा संग केल्यास
दगड पेकून भांडण काढण्यापरी
ज्ञानींचा संग केल्यास
दही घुसळून लोणी काढण्यापरी
चन्नमल्लिकार्जुन तुमच्या शरणांचा संग केल्यास
सुगंधाचा गोड अनुभव घेण्यापरी

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous आम्हांस आमचे कुडलसंग असताना लिंगायतमध्ये आपल्या लिंगाचा नित्यनेम आपणचि करावा Next