Previous लिंगायतमध्ये आदर्श दांपत्य लिंगायतमध्ये नेम, व्रत आणि शील Next

लिंगायत विश्व संदेश

सूचीत परत (index)

Lingayat's message to world

नको करू चोरी, नको करू हत्या, नको बोलू मिथ्या
नको करू राग, नको करू द्वेश,
नको मारू फुशारकी, नको करू निंदा,
हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी,
हे कूडलसंगमदेवास प्रसन्न करण्यापरी

मृत्युलोक म्हणजे सृष्टिकत्र्याची टंकसाल हो,
हथे योग्य तो तेथेही योग्य हो
हथे अयोग्य ते तेथेही अयोग्य कूडलसंगमदेवा

देवलोक मृत्युलोक हे नव्हेत वेगळे हो!
सत्य बोलले जाते तेच देवलोक
मिथ्या बेलले जाते तेच मृत्युलोक
सदाचार हेची स्वर्ग, अनाचार हेची नरक
कूडलसंगमदेवा, तुम्हीच याला साक्ष

भेटलेल्या भक्तास हात जोडणाराच खरा भक्त
मृदु संभाषणच सर्व जप हो,
मृदु संभाषणच सर्व तप हो,
सद्‍वर्तनच सदाशिवाला प्रसन्न करण्यापरी,
कूडलसंगमदेवास तसे नसलेले नको हो.

हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा असे नच म्हणवी;
हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा, असेची म्हणवी
कूडलसंगमदेवा, तुमच्या घरचा पुत्र म्हणवी.

दयोवीना धर्म तो कोणता?
दया असावी सर्व प्राणीमात्रा टायी
दया हेच धर्माचे मूळ असे हो.
कूडलसंगमदेवास तसे नसलेले नको हो

पुण्य पाप हा आपल्या इच्छा पहा;
अहो म्हणता स्वर्ग; ’अरे" म्हणता नरक!
’देवा, भक्ता स्वामी’ म्हणण्यातच! कैलास आहो
कूडलसंगमदेवा

मंदिर बांधीति धनिक
मी, काय करणार गरीब हो?
माझे पायच खंबा, देहच देवालय,
शिर हेची सोन्याचे कळस हो
कूडलसंगमदेव ऐका हो, स्थावर नाशवंत,
जंगम शाश्वत.
*
Previous लिंगायतमध्ये आदर्श दांपत्य लिंगायतमध्ये नेम, व्रत आणि शील Next