Previous लिंगायतमध्ये एकच देव, देव एक, नावे अनेक लिंगायतमध्ये देव स्वरूप Next

इष्टलिंग स्वरूप

सूचीत परत (index)

इष्टलिंग स्वरूप

'इष्टलिंग' हे परमात्म्याचे लहान झालेले रूप
‘जगविस्तार', 'नोविस्तार', या वचनात, बसवेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, 'इष्टलिंग' हे परमात्म्याचे लहान झालेले रूप, अक्का महादेवीनी सुद्धा त्यांच्या वचनात असे सांगितले आहे.

बाप्पा, पाताळाहून खोल तुमचे श्रीचरण
ब्रम्हांडाहून ऊंच तुमचे शीर (डोके)
बाप्पा, दहा दिशाहून दूर तुमचे खादे
चन्न मल्लिकार्जुना, सान झाला तुम्ही
माझ्या करस्थळी येऊनी,
महादेवी आक्काप्रिय लिंगदेवा -- ‘श्री अक्कामहादेवी'

सृष्टीकर्ता परमात्मा ब्रम्हांडाहूनी महान असले तरी इष्टलिंगाच्या रुपात, शरणांच्या करस्थळी सान होवून आला. म्हणजे, लहानशा आरशात प्रचंड हत्ती दिसल्याप्रमाणे, तसेच मोठ्या शहराचा फोटो लहान कॅमे-यात उमटल्याप्रमाणे तसेच परमात्म्याला बसवेश्वरांनी इष्टलिंगरुपात शरणांच्या, तळ हातात आणून दिले.

जगाला सामावून घेतलेले लिंग
माझ्या तळहातात आलेले पाहून
मला हर्ष झाला
गुरु लिंग जंगम स्वरुपात साकार झाला
अहा माझे, पुण्य, अहा ! माझे भाग्य
अहा अखंडेश्वरा
तुमची महानता बघून, माझ्या मनाला मंगल झाले --श्री षण्मुख शिवयोगी ६४

या सर्वजगाला आपल्यात सामावून या सर्वाला झालेले परशिव लिंग माझ्या तळ हातात येऊन, आपले 'घनस्वरुप' दाखवले. हे माझे पुण्य विशेष म्हणून आनंदाने ‘षण्मुख शिवयोगी’ सांगतात.

जिकडे पहावे तिकडे तूचि देवा,
संपूर्ण विस्तृत असे रूप तुझेच देवा.
‘विश्वतश्चक्षु' तूचि देवा,
‘विश्वतोमुख' तूचि देवा,
‘विश्वतोबाहू' तूचि देवा,
‘विश्वत:पाद' तूचि देवा,
कुडलसंगमदेवा. /85 [1]

जगव्यापी, आकाशभर, त्यापलीकडे विस्तार तुमचा हो,
पाताळापलीकडे तुमचे चरणकमल,
ब्रह्मांडापलीकडे तुमचे किरीट.
अगम्य, अगोचर, अप्रतिम लिंगय्या, कुडलसंगमदेवा,
माझ्या करस्थळी येऊन इवलेसे झाला की हो. /201 [1]

*

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
Previous लिंगायतमध्ये एकच देव, देव एक, नावे अनेक लिंगायतमध्ये देव स्वरूप Next