Previous लिंगायतमध्ये पंच सूतक पाळू नयेत लिंगायतमध्ये तिर्थ क्षेत्रां Next

लिंगायतमध्ये वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत

आज, उद्या नका म्हणू.
आजचा दिवसच 'शिव शरण' म्हणणा-यास,
आजचा दिवसच 'हर शरण' म्हणणा-यास,
आजचा दिवसच शुभ,
कुडलसंगास न चुकता स्मरणाच्यास. / 8 [1]

आपुले जन जरी विचारिती,
तरी असे शुभलग्न म्हणा हो,
जुळल्या राशी, असे ऋणानुबंध म्हणा हो,
चंद्रबल, ताराबल असे म्हणून सांगा हो,
उद्याच्या दिवसाहून आजचा दिवसच योग्य म्हणा हो,
कूडलसंगमदेवास पुजिल्याचे फळ तुमचेच हो. / 101 [1]

पोपटाचे पठण, काय त्याचा उपयोग ?
मांजराचे आगमन त्यास न कळे. डोळे
सारे जग पाहती,
परि धस घुसता न पाहू शकती.
समोरच्या व्यक्तीचे दुर्गुण जाणती,
परि आपुले न जाणती,
कुडलसंगमदेवा. /185 [1]

उदय मध्यान्ह संध्याकाळ पाहून
पूजा करणा-या कमी, तू ऐक.
शरणाला उदय म्हणजे काय ?
शरणाला अस्तमान म्हणजे काय ?
महामेरूच्या आड राहून,
आपली छाया शोधणा-या भावभ्रमितांना प्रसन्न न होई,
आमुचा कूडल चेन्नसंगमदेव. /712 [1]

सोमवार, मंगळवार, शिवरात्री म्हणून व्रते करणा-या भक्तांना
मी कसे लिंगभक्तांच्या समान लेखू हो ?
दिन श्रेष्ठ, की लिंग श्रेष्ठ ?
दिन श्रेष्ठ, म्हणून व्रते करणात्या
पंचमहापातक्यांचे तोंड पाहू नये.
सोमे भौमे व्यतीपाते संक्रांतिशिवरात्रयोः।
एकभुक्तोपवासेन नरके कालमक्षयम् ।।
या कारणे, कूडल चेन्नसंगय्या,
अशांचे तोंड पाहू नये. /928 [1]

तिथी, वार म्हणजे काय ते माहीत नाही.
लग्न घटिका म्हणजे काय ते माहीत नाही.
आठवड्याचे सात दिवस, अठरा जाती असे म्हणतात,
हे आम्हाला माहीत नाही. रात्र एक वार,
दिवस एक वार. भवींची एक जात, भक्तांची एक जात.
आम्हांला हेच माहीत, बसवप्रिय कूडलचेन्नसंगमदेवा. /2047 [1]

लिंगभक्ताच्या विवहात शिवगणांना
विभूती तांबूल देवून भोजन करवून
शिवगणांच्या साक्षिने प्रसाद दान करणेच
सदाचार विना वार, तिथि, सुमुहूर्त असे लौकिक
अर्म केल्यास तुमच्या सद्‍भक्तापासून लांब हो
कूडलचन्नसंगमदेवा

सोमवार, मंगळवार, शिवरात्र असा दिवस
पाहून करणारा भक्त केल्हाही लिंगभक्तासम नव्हे
दिवस श्रेष्ठ का लिंग श्रेष्ठ?
लिंगश्रेष्ठ म्हणणे विसरून, दिवस श्रेष्ठ म्हणणात्या
पंचमहापातकाचे दर्शन न घडो.
या कारणे कूडलचन्नसंगमदेवा अशांचे तोंड पाहावत नाही.

वार नच जाणिले, दिन नच जाणिले,
काय कोणते ते नच जाणिले;
रात्र नच जाणिलि, दिवस नच जाणिला,
काय कोणते ते नच जाणिले
तुमची पूजा करून मला विसरून गेलो,
कूडलसंगमदेव

दोन्हीकडची मने जूळल्यास तोच शुभ मुगूर्त म्हाणावा;
रासयोग, गणसंबंध आहेत म्हणावे;
चंद्रबल, ताराबल आहेत म्हणावे;
उद्या हून आजच चिवस उत्तम म्हणावा
कूडलसंगाच्या पूजेचे फळ तुमचेच हो!

अष्टमि नवमि आशा कल्पना कशाला शरणास?
चुकलि गणपदवी! लिंगास दूर, जंगमास दूर!
एकास चाकर होवून, दुसत्यास झुलविण्यापरी
निर्बुद्धि मानवाना काय म्हणावे, कूडलसंगमदेवा

लिंगायतांनी पंचांग पाहू नये

श्री मत्सजन शुद्ध शिवाचारी होवून
अष्टावरण अंग होवून पंचाचार प्राण होवून
वसवेश्वर देवांच्या परंपरेचे म्हणवून
बोलून चालून भक्त म्हणवून, पुरातन म्हणवून,
अशा भक्तास हे तिन्ही लोक समान नव्हेत म्हणावे,
त्या भक्तास शिवाचे आसनच केलास होण्यापरी पहा
हा शिवाचाराचा मार्ग न अनुसरता
रात्र, दिवस अनंत सूतक, पातकांच्यामद्ध्ये
बुडून जावून मतिभ्रष्ट होवून पंचांग म्हणून भूंकणात्या
भ्रष्ट मानंगांचे बोलणे तेथेच असु दे.
पंचांग विचारलेल्या दक्षब्रह्माचे शिर का गेले?
पंचांग विचारलेले पांडव देशभ्रष्ट का झाले?
पंचांग विचारलेल्या श्रीरामाची बायको
रावणाच्या बंदिवासात का गेली?
पंचांग विचारलेल्या इंद्राचे शरीर
योनि मंडल का झाले?
पंचांग विचारलेल्या द्वारकापति शगराच्या नारायणाच्या
बायका महारामंगासि वश होवून का गेल्या?
पंचांग विचारलेला काम जळून भस्म का झाला?
पंचांग विचारलेला ब्रह्मा, विष्णु, इंद्र प्रथम करून
तेत्तीस कोटि देवता तारकासुराकडुन पिडाग्रस्थ झाले
असता शिवाकडे जावून दया याचना का केली?
आंधळा, लंगडा, दात पडलेला ओळखता न येणात्याचे
बल विचारता येत नाही.
शुभदिन, शुभमूहूर्त, शुभवेळ, शुभघटिका, व्यातिपात,
आशुभवार, म्हणून संकल्प करून भुंकणात्यांचे
तोलणे ऐकवन नाही.
गुरुची आज्ञा ओलांडुन गेल्यास सूतक, प्रसूत झाल्यास सूतक,
विटाळ जाल्यास सूतक, असे म्हणून संकल्पना करता.
तुमचे घर सूतक झाल्यास
तुमच्या गुरूने दिलेले लिंग काय कामाचे?
विभूति काय कामाचे? रुद्राक्ष काय कामाचे?
मंत्र काय कामाचे? पादोदक काय कामाचे?
तुमचा शिवाचार कोटे गेला? तुम्ही काय झालात
सांगा हो? मागित नसल्यास ऐका .....
तुमचे लिंग पीतलिंग; तुम्ही सर्व भूतप्राणी
तुमच्या घरातील पदार्थ सर्व मधांनी भरभटलेले
अशुद्ध किल्मिष वाटतात
हे पाहून लाच न वाटता, पुन्हा पुन्हा शुभमूहूर्त
विचारून लग्न झालेल्या अनेक लोकांच्या बायका
विधवा होवून गेल्याचे दृष्य पाहून पंचांग
विचारलेल्यांना कुत्र्याची विष्टा डुकराने पळवून
खाल्या परी झाले पहा
निस्संग निराळ निजलिंग प्रभू.

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायतमध्ये पंच सूतक पाळू नयेत लिंगायतमध्ये तिर्थ क्षेत्रां Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys