Previous गणाचार पंचाचार Next

भृत्याचार

*

व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ आहे. समाज व राष्ट्राच्या हितासाठी प्रत्येक व्यक्तीने आपण भृत्य म्हणजे सेवक होऊन, किंकर म्हणजे नम्रभावाने सेवा करावी. (ब.व.३५९) वचन

‘नसे कोणी मजहून सान
थोर न कोणी शिवभक्ताहून
यांसी तव चरण साक्ष मम मन साक्ष
कुडलसंगमदेवा हेचि मम दिव्य'.

माणूस विनयभावनेने जेवढे वाकतो तेवढेच त्याचे व्यक्तित्व उंचावते.जोंधळा-साळीचे कणीस पूर्ण पिकल्यावरच वाकते. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व पक्व झाल्यावर व्यक्ती विनयपूर्ण बनते. सेवा करणाराच खरा स्वामी तर सेवा करून घेणारा खरा स्वामी नव्हे. असे समाजसेवेचे सूत्र जाणलेलाच भृत्याचारी लिंगायत होय. बसवेश' विनित भावनेने सांगतात, 'मी प्रधानमंत्री असलो तरी समाजाचा सेवकच राहू इच्छितो यात फार मोठे तत्त्व सामावलेले आहे. वचन:-

येई बा बसव येई
म्हणूनि मज बोलविशी देवा!
आहे का या मृत्युलोकी भक्तांचा मेळावा?
कोणी नाही देवा कोणी नाही
मी एकटाच भक्त, कुडलसंगमदेवा,
या मृत्युलोकीचे सारे भक्तगण
जंगमलिंगरूपी तूच असशी!”

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous गणाचार पंचाचार Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys