Previous इष्टलिंग पूजा जड पूजा काय ? लिंगाचे स्वरूप Next

इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा

जनसामान्यांची कल्पना अशी की, इष्टलिंग पूजा ही एक मूर्तीपूजा आहे. अशी कल्पना अनेक सुशिक्षीतांच्या मनातसुद्धा आहे. लिंगपूजा एक मूर्तीपूजा नव्हे इष्टलिंग व मूर्तीपूजेत असलेला फरक आता आपण पाहुया

इष्टलिंग पूजा मूर्तीपूजा
१) निर्गुण साकाराची पूजा सगुण साकाराची पूजा
२) अहंगहोपासना प्रतिकोपासना
३) देवाच्या चिन्हाची पूजा महात्म्यांच्या मूर्तीची पूजा
४) मुक्तीदात्याची पूजा मुक्तात्म्यांची पूजा
५) सदैव मंगलदात्याची पूजा काहीवेळ दांभीकाची पूजा
६) निरवयव साकाराची पूजा सावयव साकाराची पूजा
७) निराकाराच्या साकाराची पूजा साकाराच्या साकाराची पूजा
८) देवाद्वैत भावनेने करायची पूजा द्वैत भावनेची पूजा
९) अर्चना, अर्पण व अनुसंधान योगाला वाव आहे. केवळ अर्चना व अर्पणेला वाव आहे.
१०) सामरस्याची संतृप्ती आहे सामरश्य नाही,
११) विश्वाच्या आकारात पूजा मानव किंवा प्राण्याच्या आकारात पूजा
१२) स्त्री, पुरुष भेद नाही भेद आहे
१३) निर्गुण साक्षात्कार शक्य केवळ सगुण साक्षात्कार शक्य
१४) सुज्ञानसह सद्भक्ती आहे काहीवेळ अंधश्रद्धेला प्रेरणा देते
१५) समुद्रासारखे महाउगम, संगम, संगमनिधीची पूजा फक्त नदीसारखी एकाची पूजा
१६) एकदेवोपासना बहुदैवतांची उपासना
१७) अंगावर धारण करुण तळहाती ठेवून करायची पूजा देहावर धारण न करता मंदिरात घरात समोर ठेऊन करायची पूजा
१८) सुसंस्कारीत त्रैमलदुर दिक्षाबद्ध हरजन्माने पूजा संस्कारविणा, दिक्षाविणा मनुष्य जन्माने पूजा
१९) देवालय बांधण्यास प्रोत्साहन देत नाही दरिद्रयांच्या भक्तीला अडथळा न येणारी पूजा, जनमानसात धर्म वाढवते. देवालय बांधण्यास पैसे खर्च होणार त्यामुळे धनीकशाही वाढते
२०) पूजारी वर्ग वाढायला वाव नाही मंदिर स्थापनेमुळे पूजारीवर्गाला वाव मिळतो त्यामुळे शोषण सुरु होते
२१) कोणताही गोंधळ अवंडबरामुळे रोगराईला वाव नाही आता याचे विवरण सूक्ष्मपणे आपण पाहूया यात्रा, गर्दी इ. पासून होणा-या गलिच्छतेमुळे रोगराईचा संभव

आता याचे विवरण सूक्ष्मपणे आपण पाहूया.

१) इष्टलिंग पूजा व मूर्तीपूजा, दोन्ही साकार पूजाच साकार पूजा मानवाला अत्यावश्यक आहे. भक्तांना सुरवातीला निराकार कल्पना कितीही सांगीतले तरी समजत नाही. इतकेच नव्हे निराकारावर मन केंद्रीत करुन ध्यान करणे कठीण होते एक साकार हवेच हवे परंतु निवडलेल्या साकाराला तात्वीक पाया वैज्ञानीक विचार सर्वसमत होण्यासारखे अर्थपुर्ण विवरण असावे उदा. गणपती, हनुमान इ. विचित्र स्वरुपाबाबत विज्ञानीयानी प्रश्न विचारल्यास त्यांना काय सांगणार? गणपतीच्या जन्माची विचित्र कथा पुराणात असल्याप्रमाणे सांगीतल्यास सर्वजण हसतात व्यंकटेश तिरुपतीला आल्याची कथा कोण मानतात उपाश्य वस्तूला तात्वीक पाया असल्यासच विचार वंत मानतात या दृष्टीने इष्टलिंगाला सर्वसमंत वैज्ञानीक तात्वीक आधार आहे. अर्थपुर्ण विवरण आहे. इष्टलिंग हे निर्गण पूजेला साधन निर्गुणाचे साकार परमात्म्याचे चिन्ह आहे. परंतु मुर्ती सगुणाच साकार आहे. उदा. लक्ष्मीसह, विष्णु, राधासह कृष्ण, सीतासह राम या मुर्तीना निराकार कल्पना कशी देता येईल?तत्वज्ञानी व विज्ञानिंच्या दृष्टीत यांचे मुल्य होत नाही.

२) इष्टलिंग पुजा अहंग्रहोपसाना किंवा स्वरुप पूजा आहे. याला बसवलिंग शरणांच्या खालील काव्यच पुरावा आहे.

पूर्वअनादी परात्पर निरंजन शरण
आपल्या हदय कमलाच्या परंज्योती लिंगाला
विनाभेद डाव्या तळहाती ठेवून
स्वताच स्वताला पूजत आहे.

इष्टलिंग पूजा ही स्वरुप पूजा आहे. परंतू मूर्ती पूजा प्रतिकोपासना कोणत्याही एका व्यक्तीचे प्रतिक मुर्ती करुन तिथे पुजले जाते. मारुतीची मूर्ती कृष्णाची प्रतिमा हे मूर्ती पूजेचे उदाहरण इष्टलिंग पूजेप्रमाण तिथे अंतरात्म्यांची पूजा नसून, दुस-या व्यक्तीची मूर्तीपूजा असते.

३) इष्टलिंगपूजा परमात्म्याच्या चिन्हाची पूजा पिंडांड आत्माचे चिन्ह 'ब्रम्हांड परमात्म्याचे चिन्ह' इष्टलिंग हे ‘पिंडब्रम्हांडयोरैक्यं तत्वाचे प्रतिक आहे. मार्ग चुकलेल्याना मार्ग दाखवण्याचे साधन म्हणजे इष्टलिंग परम निरंजन परमात्म्याकडे नेण्याचे करस्थळाची ज्योत म्हणजे इष्टलिंग परंतू मूर्तीपूजा परवस्तूच्या साकाराची पूजा नसून महात्म्यांच्या प्रतिमेची पूजा आहे. उदा, येशु ख्रिस्त, बुद्ध, राम, कृष्णा, गांधीजी. इष्टलिंग पूजा ही मुक्ती दात्याची पूजा आहे. सृष्टी स्थिती लयाला व सर्व मानवकोटीला कारण कर्ता होऊन योग्य मुमुक्षांना जी परात्पर वस्तू मुक्ती देत आहे. तशा परमात्म्याचे चिन्ह इष्टलिंग झाल्यामुळे ही मुक्ती दात्याची पुजा आहे. सर्व जीवकोटी सृष्टी नदी हे सर्व शेवटी कुठे सामावुन जातात. त्या पराशिवाची पूजाच इष्टलिंग पूजा. त्यासाठी आपण महादेवाची पूजा करुन मुक्ती मागीतली पाहीजे. लिंगायत धर्मानुसार परमात्मा मुक्तीदाता आहे. गुरु बसवेश्वरासारखे प्रवादी मुक्ती प्राप्तीला सहायक होणारे मुक्तीदायक आहेत. उरलेले जीवनमुक्त हे मुक्तात्मा आहेत. त्यासाठी मुक्तीदाता लिंगदेवाकडेच मुक्ती मागीतली पाहिजे. मुक्तीदायक धर्मगुरुद्वारे सुद्धा मागण्यास वाव आहे.

५) परमात्मा सत्य सुंदर शिव आहे. अर्थात मंगलस्वरुप अनादी अनंत आहे. अशा परमात्म्याचे चिन्ह इष्टलिंग असल्यामुळे याची पूजा मंगलमय महादात्याची पूजा होय. ही पूजा सदैव मंगल स्वरुपच आणुन देते.

पण मूर्तीपूजा काहीवेळी अवडंबराची होत असते काही वाममार्गी इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा सिद्धीपुरुष मंत्र तंत्राने लोकांना वेडे करतात. तेव्हा, हे लोक मेंढरांच्या कळपासारखे त्यांच्या पाठी लागुन पूजा करु लागतात. आपल्या देशाचे अवैज्ञानीक लोक (इतकेच नव्हे अनेक विद्यावंतसुद्धा) चमत्कार यंत्रमंत्राच्या प्रभावानेच व्यक्तींना मोजतात.त्या व्यक्तीकडून समाजाला काय देणगी मिळाली याचा विचार न करता मेंढ्याप्रमाणे पाठी लागतात. साहित्यीक कलात्मक अध्यात्मीक देणगी विसरुन मंत्रुन भस्म देणारे, संतती फळ देणारे किंवा ताईत, गंडा, दोरा मंत्रुन देणान्यानाच देव म्हणून पूजतात.

६) इष्टलिंगपूजा निरवयव साकारायची पुजा आहे. अवयवरहीत विशिष्ठ, अंगविरहित विश्वात्म्याचे चिन्ह, इष्टलिंग आहे. त्याला विशिष्ट रुप नाही, रुपाला नाश आहे. निरुपाला नाश नाही.

मूर्तीपूजा सावयव साकाराची पूजा आहे. उदा: रत्नकिरीटधारी बासरीसह कृष्ण इत्यादी. विशिष्ठ आकार व अलंकार असलेल्या मूर्तीची पूजा करतात हे अल्पव्यापक. आणखी काही मूर्तीत मनुष्य व प्राणी यांचे आकारसुद्धा असतात त्याला काही तात्वीक आधार नसतो उदा: मानव व सिहांच्या आकारात असलेले नृसिंह हत्तीची सोंड व मानव देह असलेला गणपती मानव शरीर व माकडाचे तोंड असलेला हनुमान हे सर्व सावयवाचे साकार रुप आहेत. या सर्व पुराणाच्या कल्पनाच नसुन अर्थहीन आहेत. दिसेल त्या देवताला परमात्मा म्हणने आमच्यात सर्वसामान्य झाले आहे. सावयव पुरुष कधीच देव नसतो जन्म मरण असलेले ते देव असु शकत नाही ते महात्मा होऊ शकतात दशरथपुत्र राम असो, देवकीपुत्र कृष्ण असो, मादरस पुत्र बसवेश्वर असो, यांना परमात्मा म्हणता येत नाही. कारण देवाला जन्म मरण अवतारआवांतर शरीर धारणा शक्यच नाही परमात्मा सर्वव्यापक अनंत सुख-दुख गुणरहित असल्यामुळे अखंड स्वरुपी आहे. असा परमात्मा परिमित असलेल्या मातेच्या गर्भात येणे शक्य नाही अदृश्य व सर्व समरस असलेला एका ठीकाणी जन्म घेणे कसे शक्य आहे?

७) लिंगपूजा निराकार, निरंजन परात्पर साकाराची पूजा आहे. परंतू मूर्तीपूजा कोणत्याही एका व्यक्तीचीच पूजा असते. ज्ञानबोध घेण्यासाठी अवश्यक चिन्ह पाहीजे. चिन्ह नसल्यास, ज्ञानप्राप्ती होणार नाही. निराकार वात्सल्या मुलाला दिलेल्या चुंबनानेच दिसून येते, निराकार दयेचे साकार दान, निराकार भक्तीचे साकार अर्चना, भावनिराकार, भाषा साकार, अर्थ निराकार शब्द साकार, ज्ञान निराकार पुस्तक, ग्रंथ साकार, काल निराकार घडयाळ साकार तसेच परमात्मा निराकार, इष्टलिंग साकार. इष्टलिंग साकार धरुन, निराकाराला समजून घेतले पाहीजे.

ज्ञान धरुन पूजण्यासाठी
चिन्ह दिले असता साध्य सोडून
चिन्ह पूजणारे अज्ञानी पहा

विसरल्यामुळे गुरु हातात चिन्ह दिल्यास ते चिन्ह धरुन ज्ञान प्राप्ती करुन घेतली पाहीजे. इष्टलिंगपुजा केवळ पूजेसाठी नव्हे. साक्षात्कार स्वानुभवासाठी आहे. अत्त्योन्नत तत्वाचा आधार असलेल्या लिंगाचा अर्थ फार विशाल आहे. सर्व चराचर जिथून आले जिथे वाढून जिथे लय होतात त्या महा गर्भाला, लिंग म्हणतात. लिंग म्हणजे पराशक्तीयुक्त पराशिवाचे घनतेज, निरतिशयानंद सुखदा, परमज्ञानमूर्ती लिंग म्हणजे 'षडध्वमय जगज्जन्मभूमी, सर्वकारण निर्मल सच्चिदानंद नित्त्य परिपूर्ण सर्व लोकोत्पत्तीला कारण सर्व तत्वपूर्ण खरे चैतन्य शरणा हृदयात प्रकाशणारे ज्योतीर्मय लिंग. भवजन्मसागर पार करणारी दिव्य नौका जगाला गवसणी घालणारे महालिंगाचे चिन्ह इष्टलिंग. याबाबत विवरण चौथ्या अध्यायात आलेच आहे.

इष्टलिंगबाबत असे विवरण देऊ शक तो परंतु 'गणपती,श्रीकृष्ण,लक्ष्मी, सरस्वती, श्री राम' यांच्या मूर्तीला निराकार अर्थ देणे शक्य आहे का? कारण ते साकार व्यक्तिंचे प्रतिसकार आहेत. साकार व्यक्तीत तो मानव असल्या कारणे लोपदोष असणे स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ- श्री राम देव असूनही त्याला पत्नीच्या पतिव्रत्याची शंका यावी? त्या करीता त्याने तिची आग्नी परीक्षा घेतली ना!, श्री कृष्ण सर्वशक्तीमान असूनही जरासंधाकडून पराजीत का? परंतु सृष्टीकर्ता परमात्मा दोषरहीत मंगलमय सर्वज्ञत्व असल्यामुळे पूजनीय आहे.

८) इष्टलिंग पूजेत देवाव्दैत भाव आहे हे स्थावर लिंगाशी तुलान करताना सांगितले आहे. देव आपल्यात भक्ताला सामावून घेतो अशी भावना आहे. 'तु' व 'मी' एकच म्हणून अव्दैत भावना आहे. परंतू मूर्ती पूजेत व्दैत भाव आहे.कारण उपास्य वस्तू , स्वत्ताला सोडून वेगळी आहे. असे शेवटपर्यंत 'तू', 'मी' असा व्दैत भाव मूर्ती पूजेत असतो.

९) लिंग पूजेत अर्चना व अनुसंधान योगाला वाव आहे. लिंगाचे कवच (कांती) त्राटक किंवा दृष्टी योगाचे साधन आहे. ते काळ्या बुबुळाना तत्काळ केद्रीकृत करून एकाग्रता आणते. पण मूर्तीपूजेत फक्त अर्चनेला वाव आहे. याशिवाय अनुसंधान त्राटकयोग यांना वाव नाही.मूर्ती सावयव असल्याने कोणत्या अवयवावर दृष्टी स्थीर करावी समजत नाही. तेव्हा मूर्ती समग्रपणे दिसत नाही. त्यासाठी मूर्तीवर दृष्टी ठेवून एकाग्रता साधने शक्य नाही.

१०) लिंगपूजेत सामरस्याची संतृप्ती आहे. मूर्तीपूजेत सामरस्य नाही, लिंगपूजेत अंगलिंगाचे कणकण सामरस्य आहे. लिंगमिलनाचे सुख चाखलेला भक्त ज्योतीला स्पर्शन ज्योती झाल्याप्रमाणे सागरात सामवलेली नदी सागर झाल्या प्रमाणे लिंग स्पर्शन लिंग बनतो अग्नित घातलेल्या कापरा प्रमाणे दृष्य गिळलेल्या बुबळाप्रमाणे फुलाने गिळलेल्या सुगंधाप्रमाणे, अवकाश गिळलेल्या ब्रम्हांडाप्रमाणे आपले अस्तित्व विसरून समरसानंद घेतलेला शरण परमात्म्यात सामावतो. तन पुजा करीत असताना मन स्मरण करीत असताना, डोळे पहात असताना, चामडे देह विसरले असताना, प्राण रतिसुखात मग्न असताना, शरीर नसलेले निसंकोच व मिलनात समरस होवून सुख पावतो मनाची चंचलता थांबवून शब्दाचा गाभा प्राशन करून परमात्म्यात सामावतो पण हे समरस सूख, मुर्तीपुजेत लाभणार नाही कारण ते योगाला पुरक नाही.

११) इष्टलिंग नामे हे चिन्ह देवाचे साकार रूप असलेल्या विश्वाच्या आकारात निर्मिलेले आहे. विश्वात्म्याला विश्वाच्या आकारात पूजायचे विधान आहे. परंतू मूर्ती पूजा मानवाकार (कृष्ण राम) अथवा प्राण्याच्या आकारात (नंदी, साप, हत्ती इत्यादी)व मानव प्राण्याच्या आकारात ('नृसिंह''गणपती') सुध्दा होते. इष्टलिंग हे गोलाकार असून विश्वात्म्याचे प्रतीक आहे. निराकार चैतन्यात्मक परमात्म्याला मूर्ती करून मंदीरात ठेवून पूजा करणे शक्य नाही. कारण तो सर्वव्यावी आहे. परिपूर्ण चैतन्य परमात्म्याची मुर्ती करून, मंदिरात ठेवून, अंध भक्तीने पूजणाच्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करून गुरू बसवेश्वरांनी इष्टलिंग दिले आहे.

१२) मूर्तीपूजेत स्त्रिपुरूष भेद आहे. लिंगपूजेत तो भेद नाही. राम, कृष्ण, हनुमान, दुर्गा सरस्वती इत्यादी मूर्तीच्या समोर बसून पूजा करताना स्त्रि, पुरूष अशी कल्पना येणे स्वाभाविक आहे. दुर्गाची मूर्ती ठेवून बाप किंवा पती या भावनेने पूजणे शक्य नाही. कृष्णाची प्रतीमा ठेवून 'माता' इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा म्हणून पूजायला मन तयार होणार नाही. परंतू इष्टलिंगाला कोणत्याही भावसंबंधाने पूजा करू शकतो 'शरण सती’ ‘लिंग पती'. हा भाव मुख्य असलातरी माता, पिता, पुत्र, असे कोणत्याही भावनेने पूजता येते. तळ हातात इष्टलिंग घेऊन बसल्यास तिथे स्त्रि, पुरूष ही भावनाच येत नाही.

१३) इष्टलिंग हे सावयव नसून निर्गुण, निरंजन निराकाराचे चिन्ह असल्यामुळे योगसाधन झाल्यामुळे लिंगपूजाकाला थेट निर्गुण साक्षात्कार शक्य होते. परंतू मूर्तीसगुण साकार असल्यामुळे ते सगुण साक्षात्कारा पर्यंत नेऊन सोडते. मिराबाई व अक्का महादेवी यांच्यात हाच फरक आहे. त्या दोघींचे मन भावना, भक्ती एकच होती. कृष्ण मिराबाईचा पती झाला पण सृष्टकर्ता लिंगदेव (परमात्मा) अक्का महादेवीचा पती झाला. या दोघींनीही भक्ती मार्ग धरून सर्वार्पण करून साहित्य रचना करत साधना केली.मिराबाईने व्यक्ति पूजा करून कृष्णाचा सगूण साक्षात्कार करून घेतले. अक्का महादेवीने लिंगांग योग साधनेने निर्गुण उपासना करून ‘निर्गुण सगुण' दोन्ही त-हेचे साक्षात्कार करून घेतले लिंगो पसाने त निर्गुणउपासनेला वाव आहे. पण मूर्ती पूजेत फक्त सगूणोपासना आहे.

१४) लिंग भक्तीत सुज्ञाना सहीत सद्भक्ती आहे. मूर्ती पूजेत कांही अशी अंधभक्ती आहे. शरण अंधभक्तीला मानत नाहीत

धरायच्या हातावर आधार
पहायच्या डोळ्यावर अंधार
आठवणाच्या मनावर अंधार
अंधार इकडे, गुहेश्वर तिकडे --श्री अल्लमप्रभू २१६

अंधभक्तीने किती पूजा करून काय? समजून भक्ती न केल्यास फळ नाही, पूजणाच्या हातावर दुराचार दुर्भुर्गाचा अंधार असल्यास त्राटक करणारे लिंगपहाणा-या डोळयावर सुज्ञानाचा प्रकाश नसल्यास स्मरणाच्या मनात काय स्मरावे कसे स्मरावे यांचे ज्ञान नसल्यास लगेच स्मरण करून उपयोग नाही. अशा त-हेची लोकांची भक्ती, योग, ध्यान, यांच्यात, अंधार भरुन रहातो, गुहेश्वर लिंग किंवा परमात्मा, दूर जातो. बेरड कन्ना, शंकराला डोळा अर्पण करा, मेंडीच्या लेंडीत गोल्लाकाराचे लिंग पाहील्याचे असो, अशांना शरणांनी मूडभक्ती म्हंटले आहे !

कुरणी दगडात (खुरपे व कु-हाड वगैरे धारायावी म्हणून घासण्याचा दगड) शेळ्या मेढाच्या लेंडीत अंध भक्तीने लिंग पहील्याचा त्यांचा मार्ग आदर्श नव्हे. सर्वानुकरणीय नव्हे. लिंगायत धर्मानुसार भ्रम सोडून, इष्ट लिंगातच साक्षात्कार व्हावा.

डोळस भक्ती समरसाचे मूळ
दु:खाचा विसर आनंदाचे मूळ
भ्रम सोडून संशय मिटून
अज्ञान नष्ट होवून मूळ समजून
करायची अनुकरणीय सदभक्ती
सर्वोत्कृष्ट पहा सच्चिदानंदा -- पूज्य माताजी

असे समजून करायची भक्ती. समरसाला आधी. अज्ञान भक्तीने अनहित होऊ शकते. असे समजून भक्ती करायचा मार्ग, एकट्या बसवेश्वरांनीच दाखवला आहे.

१५) सागरासारखी महाउगम संगम भांडाराचे पूजन ही लिंगपूजा एका नदी सारखी पूजा ही मूर्ती पूजा सर्व नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात तेव्हा समुद्राची पूजा केल्यासर्वच नद्यांची पूजा आपोआपच होते. कृष्णा नदीची पूजा केल्यास कावेरीची पूजा होणार नाही तसेच तुंगभद्रेची पूजा केल्यास भिमेची पूजा होणार नाही. परंतू हिंदुमहासागराची पूजा केल्यास अशा सर्वनद्यांची पूजा होते. तसेच येशुला पुजल्यास महंमदाची पूजा होणार नाही. पैगंबराना पूजल्यास कृष्णाची पूजा होणार नाही कृष्णाला पूजल्यास बुध्दाची पूजा होत नाही. बुध्दाला पूजल्यास रामाची पूजा होणार नाही. परंतू या सर्व महात्म्यानी जिथून अवतार घेऊन जिथे शेवटला सामावले त्याला पूजल्यास या सर्वांची पूजा आपोआपच होते. परात्पर वस्तू इष्ट लिंगाची पूजा केल्यास या सर्वांची पूजा होते.

१६) इष्टलिंगपूजा एकदेवोपासनेला पूरक आहे. मूर्ती पूजा बहुदेवोपासनेला प्रोत्साहन देते. लिंग हे परशिवाचे सान रूप किंवा चिन्ह असल्यामुळे ती एकदेवोपासना आहे. कारण देवाचे स्वरूप अपरिवर्तनीय एकरूपीय एकच रीत व स्थीर असते. सदैव एकच असते महात्मे अनेक जन्मतात व लोप पावतात वेळोवेळी जन्मणाच्या त्या सर्वाच्या मूर्ती पूजन केल्यास त्या वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या मूत्यही वेगवेगळ्या प्रकारच्या होतात मुळे मूर्तीपूजेत एक देवोपासना आचरणात येणे शक्य नाही बहुदेवतोपासनामुळे वेगवेगळ्या समाजगट वेगवेगळे पंथ निर्माण होतात. याला भारतच अतिउत्तम उदाहरण आहे. मूर्तीपूजेमुळे तत्व रहीत अर्थहीन काल्पनीक पौराणिक प्रभावी मूर्ती पूजेने भारतात पसरलेली जातीयता अनैक्यतेच्या रोगाचा नाश व्हयचा असेल तर तात्वीक अर्थपूर्ण परिकल्पनेची इष्टलिंग पूजा एकच दिव्य औषध,

१७) लिंगपूजा करणा-यांच्या अंगी सदैव लिंग असल्यामुळे देवच माझ्या संगती आहे. असा भाव व पापाची भिती जागृत असते. इष्टलिंगाला अंगावर धारण करून वाटेल तेंव्हा तळहातावर ठेवून पूजा करता येते. पण मूर्तीला अंगावर धारण करता येत नाही. वाटेल तेव्हा पूजा करणे ही शक्य नाही. मूर्तीला मंदिर किंवा पाटावर ठेवून पूजा करावी लागते. लिंगपूजक सर्दव लिंगधारणा केल्यामुळे वाटेल तेव्हा स्मरण करू शकतो.

१८) लिंगपूजकाला धर्मसंस्कार असतो म्हणजे लिंगसंस्कार घेतलेलाच लिंगायत जन्मत: लिंगायत म्हणून लिंग सोडणारे ते लिंगायत नव्हेत. कारण लिंगायत तत्व जन्माने येत नाही संस्कारानेच घेता येते. लिंगायत हा गुरूंच्याकडूनच लिंगात चित्कळा भरून घेतलेला असतो. गुरूनी तीन प्रकारचे कर्म घालवून तीन प्रकाराच्या शरीरालर शुध्द करून तीन प्रकारची लिंगस्थापना करतात. भवबंध मिटवून परमानंद देतात. लिंगपुजकाला संस्कार असतो. पण इतर काही मूर्तीपूजकाला गुरूकडून संस्कार घेण्याची अंट नसते.

१९) लिंगपुजकाना आपले शरीरच देवालय असल्याकारणाने खर्चासाठी धनाची गरज नाही. कद्राभिषेक सहस्त्र बिल्वर्चन सत्यनारायण पूजा या रूढी सुध्दा अंधश्रध्देला प्रोत्साहन देतात अवडंबरांचे धर्म व्यक्तीला मानसिक दृष्ट्यया निस्तेज करतात.

काल्पनीक दैवतांची पूजा करणे योग्य नाही. परंतु भारतीयांचा परंपराच असा आहे. की यांना पूजा करण्यासाठी एखादे प्रतिक लागते महापुरूषांची, योगी योगीनींची पूजा केल्यास हरकत नाही परंतू त्यानाच परमात्मा समजणे ही अत्मवचना आहे. लिंगायत धर्मानुसार गुरू लिंग जंगमाची पूजा मान्य आहे. त्यासाठी गुरू बसवेश्वरांची पुजा इष्टलिंगाची पूजा व ज्ञानी गुरूंची पूजा सुध्दा आपण करतो मात्र इथे कोणताही अवडंबर जातीभेद वर्ण, वर्गभेद, स्त्रि पुरूषभेद व शोषणाला वाव नाही. सर्व मानवाना समान हक्क आहे.

इष्टलिंग व शाळिग्राम (सालिग्राम)

अनेक वैष्णवात शालिग्राम नावे वस्तू पूजेसाठी ठेवलेली असते. त्याबाबत काहीजण वाद घालतात की, “ते सुध्दा इष्टलिंगासमानच दिसते परंतु इष्टलिंगाला तळहातावर ठेवण्यासाठी खालील भाग सपाट असतो. परंतु शाळी ग्राम तसे नसते. या दोन्हीतला फरक पाहूया

१. शाळीग्राम काळे, तांबडे, निळे या रंगाचे असते. त्यात विष्णू शाळीग्राम नृसिंगशाळीग्राम असे असते. पण इष्टलिंगात, विष्णु, शिव, शक्ती याचा भेद नाही. हे शिळा नव्हे अनेक रासायनीक घटकाने बनवलेले कवच असते.

२. शाळीग्राम हे पौराणिक विष्णूचे चिन्ह आहे. त्यावर चक्रकाराचे चित्र असल्यामुळे त्याच्याशी विष्णूचा संबध जोडला जातो परंतू इष्टलिंग पौराणीक शिव किंवा विष्णूचे चिन्ह नव्हे. हे सृष्टीकत्र्या परमात्म्याचे चिन्ह आहे.

३. शाळीग्राम हे सगळीकडे मिळत नसून उत्तर भारतातल्या ‘गंडकी नदीतच सापडते. ते घ्यायला सर्वांना शक्य नाही. इष्टलिंग घेणे सर्वांना सहज शक्य आहे. सगळीकडे ते सापडते. (सगळीकडे ते तयार केले जातात.)

४. गंडकी नदीत असणारा एक किटक त्या काळ्याशिळेला पोकरत जाऊन चक्राकार करतो. त्याला तात्वीक आधार नाही. परंतू हे इष्टलिंग तात्वीक अधारावर तयार केले आहे. वरचे कवच विश्वाचे साकार असून पंचसूत्र लिंग पिंडांचे चिन्ह आहे. हे दोन्ही जोडप्यामागे 'जीव' व 'देव' या दोन्हीच्याघनिष्ठतेचे प्रतीक आहे.

५. सगळ्यांच्याकडेच असत नाही. लिंग हे इच्छिणाच्या सर्वांना मिळणे शक्य आहे.

६. गुरू संस्कार देऊन सर्वांना इष्टलिंग देतात. परंतू शाळीग्राम तसे दिले जात नाही.

७. इष्टलिंगाला सर्वांनी अंगावर धारण करून जाऊ तेथे नेता येते ही वैयक्तीक पूजा वस्तू आहे. पण शाळीग्राम कौटुंबीक पुजेची वस्तू असून ती अंगावर धारण करता येत नाही. घराच्या भिंतीतल्या देवळीत एका ताटात ठेऊन पूजले जाते.

८. शाळीग्राम स्त्रीया, पूजू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर त्याच्यावर स्त्रीयांची सावली सुध्दा पडायची नाही. असा दंडक आहे. दररोज त्याला पूजा नैवेद्य व्हायला पाहीजे. तो नैवेद्यसुध्दा स्त्रीयानी करायचा नाही. पुरूषांनी शुध्दतेने तो नैवेद्य करायचा असतो.

इष्टलिंगाचे असे नाही. स्त्री पुरूष असा भेद नसून सर्वांना धारण करता येते. इष्टलिंगाला विशेष नैवेद्याची गरज नसून साधारणपणे खडी साखर, साखर वगैरे पूजेच्यावेळी लिंगार्पण करून त्यानंतर जेवताना ताटात वाढलेल्या पदार्थचा नैवेद्यात अर्पण झाले.

९. इष्टलिंग हे त्राटक ध्यानयोगाला पूरक आहे. पण शाळीग्रामाचे तसे नाही. केवळ भक्तीभावाच्या तृप्ती साठी त्याची पूजा आहे. परंतू इष्टलिंग हे दृष्टीयोग साधनेला साधन आहे.

१०. शाळीग्राम हे बहुतेक ब्राम्हणांच्या घरी असते. इष्टलिंगाला कोणत्याही जातीचे लोक दिक्षाव्दारा घेऊन पुजा करू शकतात.

११. इष्टलिंग धारण करून लिंगायत बनल्यावर परस्पर वैवाहीक संबधाला वाव आहे. इष्टलिंग हे समाजात समानता आणणारे एक साधन आहे. परंतु शाळीग्राम तसे नव्हे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग पूजा जड पूजा काय ? लिंगाचे स्वरूप Next