लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण | *इष्टलिंग* का हवे आहे ? |
लिंगांग योग व अनुभव |
✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि
गुरु बसवेश्वर शुष्क, तार्कीक नव्हते केवळ भाषाकार नव्हेत मूळत: अनुभवी होते. त्यांच्या हृदयातून आलेल्या अनुभवाच्या शब्दात गहन तत्वज्ञान व उन्नत दिव्यानुभाव फळात लपलेल्या चवीसारखा सामावला आहे. शब्द व मनातून दूर असलेली परंज्योत अप्रमाण अंगोचर लिंग तर्कज्ञानापेक्षा दूर असणा-यापरशिवाला व वेद शास्त्र श्रुतस्मृती यांना सुद्धा न समजलेल्या परवस्तुला अंगावर धारण करण्यास अनुभवातूनच शक्य आहे. असा दृढ विश्वास, गुरु बसवेश्वरांना होता. बर्गसन्, डॉ. वैटेसारख्या प्रतिभावंतानी सुद्धा आपल्या तत्वज्ञानाला, अनुभवच आधार मानतात. महायोगी श्री अरविंदांनी सुद्धा परमात्म्याला जाणण्यासाठी अनुभवच हवे म्हणून अभिप्राय दिला आहे. जगताचे अनेक संत वं शरणानी अनुभवाच्या महतीला उचलून धरले आहे. त्यासाठी शरणांनी देवाला पहाण्यास अनुभावी बनले. लिंगांगी झाले. लिंगांगी होवून स्वत:चे स्वरुप साक्षात्कार करुन घेतले लिंगदर्पणात स्वत:चे स्वरूप पाहून दैवी अनुग्रहाची प्राप्ती करून घेतली तो विषय इथेसांगणे जरूरीचे आहे. प्रथम, 'अनुभाव त्याचे महत्व काय?' या बाबत आपण चिंतन करुया ज्ञानतृप्तीला अनुभवच आश्रय लिंगानुभवातून तुम्हा पाहून मला मी विसरलो कूडलसंगमदेवा.
अनुभव सामान्यपणे इंद्रियाव्दारे आपण घेण्याची संवेदना पण इंद्रियातीत होवून हृदय इंद्रियाच्या साधना द्वारे घेण्याचे अतिंद्रिय अनुभवच अनुभाव.
मनुष्यबुद्धीचा स्वभाव म्हणजे अन्वेषण किंवा शोधणे आणखी शोधायचे. या अन्वेषण बुद्धीचे प्रतिफळ होऊन, मानव जनांग विविध क्षेत्रात प्रगती साधणे शक्य झाले आहे. अशा बुद्धीला खरा आनंद संतृप्ती, अनुभवाचा आश्रय मिळालातरी होते. आईसाठी तळमळून रडणारे मुल आईची ऊब मिळताक्षणी आनंदाने निद्रिस्थ होते. किंवा आईच्या ओटीत भू॒
अनुभाव रुपी ओटीत आनंदाने खेळू लागते.
लिंगानुभावातून देवाला पाहील्यानंतर मी स्वत:लाच विसरलो. म्हणून बसवेश्वरांनी सांगीतले. त्याचा अर्थ असा आहे की दिव्यानुभव पावताना शरण स्वत:लाच विसरतो.
अभाव म्हणजे आत्मविद्या
अनुभाव म्हणजे स्वत: स्वत:ला ओळखणे
अनुभाव म्हणजे, खच्या निवासाची वस्ती
अनुभाव म्हणजे पारलौकिक क्षेत्राला संबंधित अध्यात्मिक विद्या. हा अनुभाव स्वरुपाचे ज्ञान करुन देतो, स्वरुप दर्शन सुद्धा करवतो. कोणत्या मुकीतून हा जिवत्मा आला आहे, त्या मुळाकडे नेणारे साधन, आहे.
अनुभाव हे पद शरणांनी अध्यात्मिक चिंतन गोष्टीला ही म्हणतात.
डोके मळल्यास अभ्यंग स्नान करणे
कपडे मळल्यास धोब्याकडे देणे
लिंगांग योग व अनुभाव
मनाला धुवायचे झाल्यास
कूडल चन्नसंगाच्या शरणाशी अनुभाव करणे.
च.ब.व. ९९
थोडक्यात सांगायचे म्हणजे परमात्म्याशी सामरस्याचा लुटण्यास अनुभाव हवेच हवे. दिव्य अनुभुती मिळवण्यासाठी गुरु बसवेश्वरांनी दिलेले अमूल्य साधन इष्टलिंग आहे. हे केवळ जाती चिन्ह किंवा एका समाजाच्या अनुयांयाना ओळखण्यासाठीचे चिन्ह नव्हे. केवळ तृप्तीसाठीच नव्हे. हे योगाभ्यासाला सहाय्यक होणारे चिन्ह आहे. देवालयात अनेक उपास्य वस्तू व घरी ठेवून, पूजले जाणारे ब-याच देवांची गर्दी होती पण ते सर्व योगाभ्यासाला योग्य नव्हते. त्याला काही तात्विक आधार नव्हता. त्यासाठी गुरु बसवेश्वरांनी पूजायला नविन उपास्य वस्तू इष्टलिंग शोधून दिले.
उपासना तीन प्रकारात पूर्ण होते- १. अर्चना २. प्रार्थना ३. ध्यान, हाताने करायची ती पूजा किंवा आर्चना, जिव्हेने करायची ती स्तुतीच प्रार्थना, मनाने करायचे ते ध्यान. इष्टलिंगाला डाव्या हातात ठेवून मज्जन, गंध, धूप, दीप, आरती इत्यादी समर्पण करायची ही अर्चना, देवाचे स्वरूप व त्यांच्या अगाध करूणेचे वर्णन करुन त्यांचा अनुग्रह मागणे हीच प्रार्थना, देवाचे स्वरूप आठवत मनन करत अंगिकारणेच ध्यान या तिन्हीना गुरु बसवेश्वरांनी लिंगांग योग साधणेत अंगिकारले.
Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.
लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण | *इष्टलिंग* का हवे आहे ? |