क्रांतीकारी इष्टलिंगाचा उगम | इष्टलिंग-चरलिंग -स्थावरलिंग |
इष्टलिंग दिक्षा संस्कार |
✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि
प्रत्येक मानवी जीव सुखाच्या शोधात आहे. सुखाचे मुळ काय ? अशी माणसे निरंतन सुख शोधत जातो, विविध स्तरात मिळणारे सुख संतोष व आनंद यांच्यात आनंदच परमसुख असे माणूस समजतो. खरे सुख पारमार्थीक मौल्यात आहे. म्हणून समजून घेतल्यास तो त्याच्या साधनात आसक्ती ठेवतो. साधनेची पहिली पायरीच धर्म संस्कार आहे.
धर्माची तुलना एका मोठ्या भवनाशी केल्यास धर्म संस्कार हे त्या भवनाचे प्रवेश द्वार आहे. प्रत्येक धर्म आपल्या संस्कारद्वारे व्यक्तीला आपल्यात सामावून घेतो. इष्टलिंग दिक्षा हाच लिंगायत धर्माचा प्रमुख संस्कार आहे. इष्टलिंगच ओळख पत्र आहे. त्यासाठीच लिंगायत धर्मात चौदा पंधरा वर्षाच्या वयात प्रत्येकांनी दिक्षा घ्यायची अटच आहे. लिंग धारणा वेगळी व लिंगदिक्षा वेगळी. जन्मताच इष्टलिंग बांधण्याच्या विधिला लिंगधारणा म्हणतात. मुल किशोर अवस्थेत पाऊल ठेवताना सदगुरु कडून लिंग दिक्षा करावावी. लिंग धारणा म्हणजे वाड:निश्चय, लिंगदिक्षा म्हणजे विवाहासारखे, त्यासाठी प्रत्येकजण दिक्षारूपी अध्यात्मीक विवाह करून घेऊन लिंगपतीशी, शरणसती होवून लिंगभोगोपभोगरूपी संसार करून परमात्म्यात विलीन व्हावे.
माणसाला जन्मापासून मरेपर्यंत देण्याच्या अनेक संस्कारपैकी दिक्षा संस्कार अति प्रमुख विधी आहे. केवळ मानवालाच नसून वस्तूनाही आपण संस्कार देऊनच वापरतो. ते कसे ? आता पाहू,
मातीला संस्कार दिल्यास मडके होते.
गाईच्या शेणाला संस्कार दिल्यास विभूती होते.
ऊसाच्या चोथ्याला संस्कार दिल्यास कागद होते.
दुधाला संस्कार दिल्यास तूप होते..
गव्हाला संस्कार दिल्यास खीर होते.
तांदळाला संस्कार दिल्यास भात होतो.
खायच्या पदार्थाला संस्कार दिल्यास प्रसाद होतो
शब्दाला संस्कार दिल्यास मंत्र होतो
दगडाला संस्कार दिल्यास मुर्ती होते.
त्याच प्रमाणे भविला लिंग दिक्षा दिल्यास तो भक्त बनतो. जीवाला लिंग दिक्षा दिल्यास शिवरूप बनतो. लिंगदिक्षेमुळे मानव महादेव रुप बनतो. लिंगदिक्षा संस्काराच्या महतीबाबत 'अक्कमहादेवीनी आपल्या एका वचनात असे सांगीतले आहे ते आपण पाहू या.
नरजन्म घालवून हरजन्म केलेले गुरू
भवबंधन सोडवून भक्त बनलेले गूरू
भवित्व घालवून भक्त बनवलेले गूरू
चन्नमल्लिकार्जुनाला माझ्या तळहाती
आणून दिलेले गुरू, तुम्हाला शरणू शरणार्थी.
नरजन्मातून हरजन्म करून भवबंधनाचे हे क्षणीक सुख सोडवून पार लौकीक आनंद देऊन. भवी जन्मातुन भक्त जन्म देऊन, परात्पर वस्तु लिंगदेवाला सान करून तळहाती दिलेल्यासदगुरुंची शिष्या होवून, अक्कामहादेवी कृतज्ञतेने नमन करत लिंग दिक्षेचे प्रतिफ ळ व महत्व सांगितले आहे.
संसार सागरात होते बघा मी
संसार निरसार म्हणून दाखवले गुरूनी मला
अंगविकार संग थांबवुन
लिंगाला अंगावर स्थापन केले ग्रू
मागचा जन्मघालवून पुढचा मार्ग दाखवला माझ्या पित्याने
चन्नमलिकार्जुनाला दाखवून दिले माझ्या गुरूनी --महदेवी आक्काचे वचन नं. ४०
जन्म मरणाचे भवचक्र हा संसार,संसार सागरात पाप पुण्य रूपी तरंग असल्यामुळे बुडत तरंगत रडत असताना गूरू नावड्याप्रमाणे येऊन अनूग्रहाचा हात देवून इष्टलिंगारुपी होडीत बसवुन मुक्तीच्या किना-यापर्यत पोहचतात. असे अक्का महादेवीनी दिव्यजीवनाचे ध्येय दाखवलेल्याची प्रशंसा केली आहे.
श्री तोंटद सिध्दलिंगेश्वरानी लिंगदिक्षासंस्कारात चालणा-या त्रिविध लिंग संबधाबाबत असे म्हंटले आहे,
ब्रम्हरंधात असणारया चैतन्ययुक्त
परम चित्काळत्तला भाव मन हातात आणुन
श्री गुरूनी दिल्यामुळे
भावात,सतस्वरूपाचे भावलिंग म्हणून
प्राणात चित्रस्वरुपाचे प्राणलिंग
तळहातात आनंद रुपाचे इष्टलिंग म्हणून
एकच वस्तू तन्मन् भावात
इष्ट, प्राण, भाव, झालेला भेद समजून इष्टलिंगाला
दृष्टीने ग्रहण करून प्राणलिंगाला मन ज्ञानातून
ग्रहण करून तृप्ती लिंगाला भावज्ञानातून ग्रहण करून
हे तिन्ही लिंग धरून आचरून लिंगाबरोबर मिळून
ते लिंग स्वत:च प्रकाशीत आहे.
महालिंग गुरू शिव सिद्धेश्वर प्रभू . --तोंटद सिध्दलिंगेश्वर ३४६
सदगुरु वेदादिक्षेने आपले हात शिष्याच्या मस्तकावर ठेवून शिष्याच्या कारणशरीरातून पूर्वाश्रय घालवून भावलिंग संबंध करतात. मंत्र दिक्षेने सद्गुरु आपल्या शिष्याच्या उजव्या कानात प्रणवपंचाक्षरी मंत्र उपदेशून त्याच्या सुक्ष्म शरीरातून, पुर्वाश्रय घालवून प्राणलिंग संबंध करतात. व क्रियादिक्षाद्वारे सदगूरु शिष्याच्या तळहाती त्या मंत्रस्वरूपालाच इष्टलिंगस्वरूप बनवून त्याच्या स्थूल शरीरातून पुर्वाश्रय घालवून इष्टलिंग देतात. असे शिष्याचे तनुत्रयातील मलत्रय घालवून; लिंगत्रय धरून लिंगदेवात सामावणे हाच लिंगयोग किंवा बसवयोग. त्यासाठी प्रत्येकानी लिंगदिक्षा घेतली पाहीजे. तीन प्रकारच्या दिक्षेतून शिष्याच्या तनुत्रयात असलेले मलत्रय घालवून, लिंगत्रय संबंध सांधून लिंगांग समरस मार्गाकडे जाण्यासाठी सद्गुरुनी करायच्या एका धार्मिक संस्काराला दिक्षा म्हणतात.
अलिकडे लिंगदिक्षा घेण्याची पध्दत लोप पावत चाललेली दिसते. गुरु व भक्तामध्ये योग्य सामंजश्याचा अभाव आहे. गुरु भक्तांना अनावश्यक भीती घालत असल्याने जनमानसात काही कल्पना रुढ होत आहेत. लिंगदिक्षा घेतल्यानंतर तीन वेळा तरी पूजा करावी लागते. आम्ही गावोगाव फिरणार प्रवासात लिंगपूजेला अवसर मिळत नाही. पूजा चुकल्यास परमात्मा रागावून शाप देईल. त्यासाठी लिंगदिक्षा न घेणेच बरे. असा गैरसमज आहे.
दिक्षेविणा मोक्ष नाही अशी जनमानसात एक म्हण आहे. अक्कामहादेवीनी आपले दिक्षागुरु गुरुलिंगदेव यांच्याकडून लिंगदिक्षा घेतली त्याचा अनुभव त्यांनी असा सांगितला आहे.
श्रीगुरु लिंगदेव आपले हस्त माझ्या
मस्तकावर ठेवताक्षणी माझा भवनाश झाला
मला आपलाशी केला
आपल्या करस्थळी असलेले महालिंग
माझ्या मनस्थळी स्थापीले
माझ्या मनस्थळातील महालिग
भाव स्थळात स्थापून केले.
माझ्या भावस्थळातील महालिग
माझ्या ज्ञानस्थळात स्थापिले
माझ्या ज्ञानस्थळातील महालिंग
सर्वांगाच्या आत बाहेर जागा न सोडता
व्यापिले माझे श्री गुरू लिंगदेवरू चन्नमलिकार्जून -- अक्कामहादेवी वचन ४७
‘आक्काहादेवीचे दिक्षागूरू लिंगदेवरू', त्यानी आपल्या करस्थळी ठेवून पूजा करुन चित्कला भरलेले 'इष्टलिंग, महादेविंच्या तळहाती देऊन तिथून एकेक पायरी चडवून दिव्यानुभवाच्या अरोहण क्रमात आणून थांबवले. करस्थळे मनस्थळ, मनस्थळ भावस्थळ, ज्ञानस्थळ, ज्ञानस्थळातून, सर्वांगलिंग समरसी होण्याचे रहश्य महादेवीनी गुरु कडून लिंग दिक्षा द्वारे समजून घेतले. आपले स्वानुभव' या वरील वचनात सांगीतले आहे.
बसवेश्वरांनी सांगितलेल्या लिंगांग योग साधनेत शक्तीपात क्रिया फार प्रमुख तत्व आहे. गुरु मध्यस्थ होऊन शिष्याला देवकृपा मिळवून देतात शिष्याला अनुग्रहीत करण्याचा स्पर्श, दृष्टि, संकल्प या तिन्ही क्रिया लिंगदिक्षा संस्कारात आहेत.
शिष्याच्या मस्तकावर हस्त ठेवून स्पर्शाने म्हणजे कोंबडीच्या ऊबीप्रमाणे अनुग्रह देतात. आपली दृष्टी शिष्यावर वर्षावून दृष्टीद्वारे ज्ञान अनुग्रह देतात याला मत्स्य नाम म्हणतात, इष्टलिंगात चित्कला भरताना व मस्तकावर हात ठेवून मंत्रोपदेश करताना मनात संकल्प करून शुभ इच्छितात. याला कुर्मन्याय म्हणतात. ही शक्तीपात क्रियाशिष्याच्या, साधनेत वेगवर्धक होवून काम करते. व लिंगाग योगसाधनेत हे महत्व पूर्ण स्थान घेतले आहे.
Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.
क्रांतीकारी इष्टलिंगाचा उगम | इष्टलिंग-चरलिंग -स्थावरलिंग |