Previous अर्चनेची आवश्यकता लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण Next

इष्टलिंगाची अवशक्ता

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंगाची अवशक्ता

लिंगायत धर्म हा लिंगपदाला परमात्मा परब्रम्ह या दृष्टीने पहातो. तशा परमात्म्याला इष्टलिंग स्वरुपात साकार करुन पुजण्याचे कारण इष्टलिंग हे एक सुंदर आकार व तात्वीक अर्थ असलेले एक चिन्ह आहे. म्हणून आतापर्यंत मी प्रतिपादन केले असे एक चिन्ह धारण करुन पुजण्याचीर आवशकता आहे का ? देव हा सर्वव्यापी असून, सर्वांच्या हृदयात व विश्वात सर्वकडे आहे म्हंटल्यावर तळहाती ठेवून पूजण्याची आवश्यकता आहे का ? असा प्रश्न येणे स्वाभावीक आहे. कांहीजण साकार पुजाच नको म्हणणारे आहेत. साकार उपासनेची आवश्यकता, याबाबत मी प्रथम विषयाची मांडणी करुन, त्यानंतर पूजा करण्यासाठी इष्टलिंगच का पाहीजे? पाहूया.

चिन्हापासून ज्ञान

निराकार कळण्यासाठी, साकार पाहीजे. ज्ञानाच्या आराधनेसाठी चिन्ह हवेच. चिन्हा पासूनच ज्ञान शक्य आहे. ही गोष्ट लौकिक आणि पारमार्थीक दोन्हीना संबधीत आहे. लौकीक व पारलौकिक जीवनात चिन्हापासूनच आम्ही समजून घेतो. अशी काही उदाहरणे -

‘भगवी वस्त्रे, त्यागाचे, सन्यासींचे चिन्ह
‘खादी वस्त्र, स्वदेशाभिमानाचे चिन्ह
'खाकी वस्त्र रक्षणाचे चिन्ह' (पोलिस)
‘राष्ट्रध्वज, स्वातंत्र्याचे चिन्ह '
'मंगळसुत्र, सौभाग्याचे चिन्ह' (पतीचे)
'सही करणे, संमतीचे चिन्ह '
‘हसू, आनंदाचे चिन्ह'
'रडू, दु:खाचे चिन्ह
‘चित्र, वस्तूचे चिन्ह
‘किरीट, राजाचे चिन्ह -
'शंभर रुपयाच्या नोटवरील सरकारी मुद्रा, शंभर रुपये किंमतीचे चिन्ह'
'वाहनाचे हॉर्न वाजवणे, रस्त्यावरील लोकांना बाजूला सारण्याचे चिन्ह
‘स्टेशनवरील लाल निशाण दाखविणे, गाडी रोखण्याचे चिन्ह
'पुतळे, ज्ञानी व महात्म्यांचे चिन्ह
'लाल दिवा, अपायकारी चिन्ह
‘रुग्णालये, जास्त होणे, आजायांची संख्या वाढल्याचे चिन्ह
'दाढी, मिशा, पुरुषाचे चिन्ह
‘जयघोष करणे, विजयाचे चिन्ह
'नकाशा, प्रदेशाचे चिन्ह'
'हात जोडणे, तू, मी, एक असल्याच्या सद्भावाचे चिन्ह
'अतिथी आल्यास उठून उभे रहाणे, गौरवाचे चिन्ह '

अशी अनेक उदाहरणे जीवनात आम्ही पहातो. त्याचप्रमाणे,

इष्टलिंग हे सृष्टीकर्ता, परमात्म्याचे चिन्ह.

‘पिंडांड' आत्म्याचे चिन्ह, ब्रम्हांड, परमात्म्याचे चिन्ह . इष्टलिंग हे पिंड ब्रम्हांड, 'योरैक्यम्' तत्वाचे चिन्ह त्याचे विवरण पुढे पाहूया.

एक पोलिस येत आहे असे समजुया. तो कधी मी पोलिस आहे तुम्ही भांडण तंटा करु नका, असे सांगत येत नाही. तरी त्याला पहाताक्षणी लक्षात येते की, तो पोलिस आहे. त्यामुळे भांडणारे चपापतात. भगवी वैस्त्रे परिधान केलेले स्वामी येत आहेत. समजूया ते काही मी स्वामी आहे. मी त्यागी आहे. असे सांगत येण्याची गरज नाही. त्यांची वस्त्रे पाहूनच लोक नमस्कार करतात. तशी काही चिन्हे पद शब्द ही सर्व वस्तूंचे स्वरूप दर्शवणारी चिन्हे आहेत. पाणी म्हणून उच्चारताच, आम्हाला पाण्याची कल्पना येते एकजण मुका होता, त्याला पाणी म्हणता येत नाही तो तेव्हा, तोंडाजवळ हात नेऊन सुचक हालचाल करतो, त्या हलचालीवरून आपण समजतो की याला तहान लागली आहे.

आपल्या समोरुन एक स्त्री येत आहे. असे समजूया तिच्या गळ्यात मंगळसुत्र दिसल्यास ती सौभाग्यवती आहे, हे आपणास समजते, तसेच नेहमीच्या जीवनात चिन्हाविणा बोध होणे शक्य नाही. लौकीक जीवनाप्रमाणे, आध्यात्मीक जीवनात सुद्धा चिन्ह पाहीजेच म्हणूनच शरणानी, इष्टलिंगरुपी चिन्हाद्वारे लिंगदेवाला समजून घेतले.

एकेकदा निराकार भावनेला समजून देण्यासाठी साकार शक्तीसाठी माध्यम आहे असे वाटते. ममता निराकार वाटते. तीच मुलाचा मुक्का घेताना साकार होते.

‘दया निराकार, सेवा साकार, भक्ती निराकार, आराधना साकार
‘भावना निराकार, भाषा साकार, अर्थ निराकार, शब्द साकार’ -
‘ज्ञान निराकार, पुस्तक साकार, बिंदू निराकार... साकार
‘रेखा निराकार - साकार, वेळ निराकार, घड्याळ साकार'

लिंगदेव(सृष्टीकर्ता) निराकार, इष्टलिंग साकार

माते मध्ये वात्सल्य भावना भरुन उरलेली असते ती निराकार ती व्यक्त करायची कशी? ती बाळाला उचलून मुका घेते तेंव्हा ती साकार होते. मी आता माझ्याकडून ज्ञान, देणार आहे, ते निराकार आहे, ते मी कसे देऊ शकणार ते मी प्रवचन किंवा पुस्तकाद्वारेच देऊ शकते. म्हणजेच ज्ञान निराकार पुस्तक साकार आहे.

तुमची देवावर आपार भक्ती आहे, भक्तीभाव निराकार तो व्यक्त करण्याचे साधन 'आराधना' ही साकार.

भूमिती(रेखागणीतात) मध्ये बिंदू व रेखांची व्याख्या करताना असे सांगतात की, बिंदूला फक्त स्थान आहे, लांबी, रुंदी, उंची नाही. लांबी असून, रुंदी व जाडी नसते तिला, रेखा म्हणतात. या व्याख्येप्रमाणे बिंदू, रेखेला, लिहिणे किंवा इतरांना दाखवणे शक्य नाही. त्या निराकाराच्या कल्पना तरी शिक्षक हा 'बिंदू' ही रेखा म्हणून सांगतात. हे खरे नसून फक्त त्यांची चिन्हे आहेत. त्यावर विश्वासून तुम्ही अभ्यास करा,' असे म्हणतात. शिक्षकावर विश्वास ठेवून विद्यार्थी भूमितीचे आपार ज्ञान प्राप्त करुन घेतात. त्याचप्रमाणे सदगुरु, शिष्यांच्या तळहाती इष्टलिंग देऊन, हे परशिवाचे चिन्ह आहे. त्यावर विश्वास ठेवून पूजा करण्यास सांगतात. त्यासाठी तो शिष्य इष्टलिंगा पासून दिव्य ज्ञान मिळवतो. या जगात वेळ किंवा समय दाखविणे कुणालाही शक्य नाही. ते निराकार आहेत. घड्याळ रुपी साकारापासून आम्ही बेळ सूमजून घेतो, त्याचप्रमाणे निराकारा परमात्म्याला साकाररुपी इष्टलिंगाद्वारे ओळखले पाहिजे. तसे बोध करण्यासाठी चिन्ह पाहिजे. दिव्यज्ञानाच्या प्राप्तीसाठी चिन्हाची पूजा आवश्यक आहे. निराकार निर्गुण, निरंजन लिंगदेवाला पुजण्यासाठी इष्टलिंगाची अवश्यकता आहे. शरणांच्या अमृतवाणीमध्येच हा सिद्धांत आम्ही पाहू शकतो. अशा कांही वचन मौक्तीक आम्ही खाली देत आहोत.

माझ्या तळ हातात परमनिरंजनाचे
चिन्ह दाखविल, त्या चिन्हामध्ये
ज्ञान कला दाखवल्या,
त्या कलामध्ये महाज्ञानाचा प्रकाश दाखवला
त्या प्रकाशात मलाच दाखवला,
माझ्यात स्वत:ला दाखवला, आपल्यात मला सामावलेल्या
महागुरुला, नमो, नम: म्हणतो बाप्पा अखंडेश्वरा
--षण्मुख शिवयोगी ५६

षण्मुख स्वामीच्या या वरील वचनात सांगितले आहे. इथे शरण तळहाती असलेले परमनिरंजनाचे चिन्ह इष्टलिंगाला अनिमिष, दृष्टिने बघून आपल्यात उतरुन घेतो. त्या इष्टलिंग, अनुसंघानात, त्या चिन्हामध्ये, प्राण लिंगाचि ज्योती झालेल्या ज्ञानकला पहातो. त्या काळात भावलिंगाचे, परमज्योती झालेले महाज्ञानाचा प्रकाश बघतो त्या महाप्रकाशात शरण स्वत:ला पहातो. आपल्यात ते लिंगदेव असल्याचा अनुभव घेतो इतकेच नव्हे तर तो शरण त्या परशिवाच्या चित्गर्भात अर्भकाप्रमाणे सामावून घेतल्याचे पाहून विस्मीत होतो.

तळहातातील ज्योत

एक माणूस काळोखात आपल्या ध्ययाकडे जात असतो असे समजू या. त्याला दिवसा सुर्यप्रकाशाची व रात्री चंद्रप्रकाशाची गरज असते, शेवटी एक दिवटी तरपाहिजे, बॅट्री तर आता मिळते. तसे अज्ञानी भवजीवी मानव परमात्म्याकडे जात असताना जीवनाच्या काळोखात चालणे, इष्टलिंगरुपी तळहातातील ज्योतीची फार गरज आहे.

करस्थळाची ज्योत ही चिन्ह
हिचे मर्म कळल्यास,
खरा आनंद,


जेडर दाशीमैय्या या शरणानी वरील वचनात,सागितले आहे. की इष्टलिंग हे तळहातील ज्योत ज्ञानाचे चिन्ह आहे निराकाराचे साकार आहे त्याचे ठिकाण समजून, अंगात सामावून घेतल्यास, निस्सीम देवाचे स्वरूप पाहून आम्ही स्वत:च देव स्वरुप बनु शकतो. म्हणून त्यानी म्हंटले आहे.

आकार नसलेली, निराकार मुर्ती तुम्ही
कृपा करूण साकार बनलात तुम्ही
भवसागरात ढकलणारे ‘दुर्गुण' सोडवण्यासी ,
आलेले महाशोक हर आहोत तुम्ही.


वरील काव्यामध्ये मुळगुंदाच्या 'महांत' शिवयोगी नी म्हंटले आहे. भक्ताना भवसागरात लोटून यातना देणा-या दुर्गुणाना दुर करून आमचा उध्दार करण्यासाठी,दयामयी लिंगदेव साकार रूप घेउन आमच्या तळहाती
आला आहे. असा भाव प्रगट झाला आहे

चिन्ह हे एक साधन आहे, ज्ञान हे साध्य आहे. इष्टलिंग साकार आहे पण ते साध्य करून देणारा देव निराकार आहे.

साधना करण्यासाठी,चिन्ह दिले गुरू
चिन्ह हातात ठेवून साध्याला विसरून
चिन्हाची पूजा करणारे अज्ञानींना पहा


इथे अल्लमप्रभुदेवानी, म्हंटले आहे की, चिन्हरूपी साधनेव्दारे ज्ञानरूपी साध्य प्राप्त करून घेण्यासाठी चिन्ह दिले असता ध्येय विसरून त्या चिन्हामध्येच शेवटपँत वेळ घालवू नये म्हणून साधकांना जागे केले आहे. 'परमात्म्याचा विसर पडला म्हणून गुरुनी हातात चिन्ह दिले. असे शरणानी म्हंटले आहे ''देवाची किंवा स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी प्रत्येकाला इष्टलिंगाची अवशक्ता आहे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous अर्चनेची आवश्यकता लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण Next