Previous गुरू , जंगम विभूती-रूद्राक्ष-मंत्र Next

(लिंग) इष्टलिंग

*

अष्टावरणातील अत्यंत महत्वाचे चिन्ह म्हणजेच इष्टलिंग होय. निराकार असलेल्या परमात्माला मनुष्य वा, पशु आकार न देता विश्वाच्या आकाराचे रूप देऊन महागुरु बसवेश्वरांनी समाजाला इष्टलिंग दिले. जगाच्या कोणत्याही धर्मात न दिसणारे, देवाला विश्वाच्या आकारात तात्विकपणे रूप देऊन त्यामुळे ग्रहण करण्याची पद्दत व प्रकार अध्यात्मिक आणि व्यवहारिक या दोन्ही प्रपंचात आहे. निराकार असलेला समय अगर काल याला जाणण्यास साकार असलेले घड्याळ जसे साधन आहे : तसेल निराकार परमात्म्यास जाणण्यास इष्टलिंग हे साकार चिन्ह होय. हे कोणत्याही एका प्राण्याचि मूर्ती नव्हे. देवळांत असणा-या शिवलिंगप्रमाणे पौराणिक शिवाचे संकेत हि नव्हे. संपूर्ण विश्वात भरून उरलेल्या परमात्माचे शरीर असलेल्या, ब्रम्हांड, गोलाकार असल्यामुळे त्या आकारात रूप लेवलेले चिन्ह ते इष्टलिंग होय. यास सामाजीक, आध्यात्मिक यौगिक अर्थव्याप्ती आहे. हे उच्च निचतचे सूतक काढून टाकणारे साधन आहे. ब्राम्हण लिंगधारक झाल्यास तो श्रेष्ट म्हणणे अगर अंत्यज लिंगधारक झाल्यास तो कनिष्ट,अशी समजूत डोक्यातून काडून टाकणे इष्ट होय कारण लिंगधारण केल्यावर दोघी व्यक्ति समानता स्ठापित होते दोघीही समान होतात.

इष्टलिंगास काळे कांतिमय कवच (कांती) असल्यामूळे लावर दृष्ठीयोग अथवा त्राटकयोग करण्यास सहायक साधन आहे. डोळ्याचे बुब्बुळ काळे आणि लिंगावरील कवचहि काळे असल्यामुळे परस्पर आकर्षित होतात. थोड्याच वेळयात चित्त एकाग्र झाल्याचा अनुभव येतो.

इष्टलिंग हे आध्यात्मिक दृष्ट्या हा भवसागर पार उजच होय. गाईच्या कासेतीत दुधात तूप. आहे. हे खरे आहे. एखाद्य तेली !! पडू गार गा4 ला गरम तूपाने मालिश करण्यास वैद्य मागतात तेलापी च्या कासेत टूथ आहे. दधात तूप आहे असा जप केल्यास दुखणे कमी होप नाही.तर यीच्या स्तनात असलेले दूध काढून, तापवून विझ लावुन ताकातू- लोणीचे तूप कढवून तुपाने चोळून मरिन। केसे दवणे जाईल.त्याचप्रमाः मानवाच्या अंतरात असलेल्या आत्मचैतन्याने भवनाश हो!र नाही हे जालेले श्री गुरू अंतरात ददलेले आमचेत-या या शांत बाहे काढून बाहा! हानैतन्याचे प्रतीक म्हणून गोलकाच कवच (कंथे) करून दोन्ही अभिन्नपणे जुळवून शिष्याप्त इष्टलि दी। देतात.ही कर स्थलातील ज्योती व ज्ञानाचे चिन्ह परत अंतराने इवेश करून देह हेच देवालय बनवून जन्माचे सार्थक करतात.

म्हणून श्री षण्मुखस्वामी म्हणतात “इष्टलिंग हे आपल्यापासून भिन्न असलेली वस्तुची मूर्तीपूजा नव्हे, तर जीवात्मा-परमात्म्यास जोडणारीपूजा होय.यास ‘अहंग्रहोपासना' असे म्हणतात.

"ममकरस्थलाच्या मध्यात परमनिरंजनाचे
चिन्ह दाविले, त्या चिन्हाच्या मध्यात ज्ञानाचे तेज दाविले,
त्या तेजाच्या मध्यात महाज्ञानाचा प्रकाश दाविला
त्या प्रकाशाच्या स्तरावर मज दाविला
माझ्यात आपल्याला दाविला,
आपल्यातच मज सामावून घेतला
अशा माझ्यात महागुरूला नमो नम:म्हणत असे
अखडेश्वरा"

काही लोक इष्टलिंग पूजेसही स्थावर लिंगपूजा समजतात. पण यास शरणांची सम्मती नाही. परब्रम्हाचे चैतन्यच शरणांच्या मस्तकातून कर स्थलात (डाव्या हाताच्या तळव्यात) गुरूकृपेने लिंगमूर्ती होऊन विराजमान (त्तिराजमान) होतो. म्हणून शरण आणि लिंगात भेदाभेद नाही हे जाणता लिंग हे कैलासाच्या शिवाचे चिन्ह समजून ते पूज्य आहे शरण हा मानव आहे म्हणून पूजक आहे असे मानतात. या भेदभावनेच्या कल्पनेमुळे शिवाद्वैत होणे नाही. अर्धवट जाणलेल्या नरजीवांना शरणांचा लिंगांग सामरस्याचा लाभ होणार नाही' असे चन्नबसवेश्वरांनी आपल्या वचनातून म्हटले आहे.

लिंगायत लोकांनी धारण करून पूजा करीत असलेले इष्टलिंग हे पौराणिक शिवाचे प्रतीक नसून मस्तकात असलेल्या परब्रम्हांचे प्रतीक आहे अशी शरण वाणी सांगते.

असे अत्युन्नत तत्वयुक्त असलेले इष्टलिंगास प्रत्येक अनुयायीने आपल्या शरीरावर धारण करावयास हवे. कारण देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय त्याने काहीही खावू नये. हे सर्व जग देवाचाच विस्तार आहे. देवाने आपल्यावर उदार होऊन दान म्हणून दिल्यावेळी आपण त्याला कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय तसेच उपभोग घेणे ही कृतज्ञता होईल. म्हणून प्रस्तेक वस्तुचा आपण वापरण्यापूर्वी सांकेतिकपणे त्यास देवाला अर्पण करूनच मग स्वीकार करावा. असे अर्पण करण्याचे कार्यच पूजा होय.

दररोज लिंग अर्चना करून रोजच प्रथम प्रसाद म्हणून इष्टलिंगतीर्थ, इष्टलिंगप्रसाद स्वीकार करून आपले जीवन दिव्यत्व पवित्र बनवावे. हे सर्व जाणून रोज लिंगार्चना करणाराच लिंगायत होय. लिंगार्चना करणाच्या सर्वच लिंगायतांनी आपापल्या शरीरावर आपापलेले इष्टलिंग धारण केलेच पाहीजे. धर्माचरण शिथिल लोक लिंगधारणेचे महत्व न जाणता लिगंधारण सोडून देतात. काही प्रसगात पती-पत्नी-मुले यांची लिंग घेऊन परस्पर बदलून पूजा करतात. श्री गुरूंच्या कृपेने मिळालेल्या चित्कलायुक्त लिंगास शरीरापासून वेगळे करून एक दुस-यांचे लिंग घेवून पूजाकरू नये. या विषयी चन्नबसवण्णा म्हणतात “पतीचे इष्टलिंग सतीने करू नये. पुत्राकडूनही करवू नये ज्यांचे त्यांनी इष्टलिंग पूजा करणे इष्ट आहे. असे न केल्यास तोच व्रतहीन होय. कुडलचन्नसंगमदेवा' (च.ब.व.१३८)

श्री गुरूंनी दिलेले इष्टलिंग आपल्यापासून वेगळे ठेवल्यास त्यातील चित्तकलाचे पतन होते. गुरूची कृपा इष्टलिंगद्वारे शिष्याचे सदैव रक्षण करते. म्हणून इष्टलिंग प्रत्येकाने धारण करून पूजा करावी. आणखीन एक उदाहरण चन्नबसवेशांनी दिलेले आहे,

‘एकदा जमीनीत रोवलेले गेप वरच्यावर उपटल्यास
ते रोप वाढून वाढून फळ देईल का, परत लावल्यास?
अजाण मानवा! गुरूने दिलेले लिंग बदलून बदलून
परत धारणा केल्यास ते इष्टलिंग अनिष्ट दूर करून
इष्टार्थ कसे पूर्ण करणार? या कारणे कूडलचन्नसंगम
देवाच्यात मोक्ष मागणात्यांनी आपल्या शरीरावर
सदैव लिंगधारणा करावी
(च.ब.व.८५४)

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous गुरू , जंगम विभूती-रूद्राक्ष-मंत्र Next