Previous *इष्टलिंग* जात्यातीत (जातिविहीन) चिन्ह इष्टलिंग पूजा जड पूजा काय ? Next

॥ इष्टलिंग पूजा, देवाची पूजा ॥

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंग पूजा, देवाची पूजा

आतापर्यंत आपण इष्टलिंगाचे तात्वीक विवेचन भाक्तीक स्वरूप व यौगीक उपयुक्तता असल्याचे पाहीले. इतर कांही उपाश्य वस्तूना पाहील्यास त्याला तात्वीक विवेचन नसते. त्याच्या भोवती काल्पनीक गोष्टी विनलेल्या असतात. विश्वाच्या आकारात विश्वात्म्याची पुजा म्हणून आपण इष्टलिंग पुजा एकच परमात्म्याची पूजा म्हणून हिंमतीने सांगू शकतो.

सुप्रभात समयी भक्तीने लिंगाचे स्मरण केल्यास
चुकणार अपमृत्यू व काळ कर्म
देवपूजा केल्याने पापबंधनाचा नाश --बसव वचन दिप्ती १७९

गुरुबसवेश्वरांनी असे म्हंटले आहे. जगात असणा-या सर्व उपाश्य वस्तूमध्ये सहा प्रकार आहेत.

१. पौराणीक देवतांची पूजा (Worship of Mythological deities)
२. पंचभूत पूजा (Worship of Five Elements)
३. प्राणी पूजा (Worship of animals )
४. पितृ पूजा (Worship of ancestors )
५. महात्म्यांची पूजा (Worship of Saints )
६. देव पूजा (Worship of God )

१. पौराणीक देवतांची पूजा

काळी दुर्गा, तिरूपती, वेंकटेश्वर पुरी जगन्नाथ, शनी इत्यादी नवग्रह काल्पनीक आहेत, त्याला ऐतिहासिक आधार नाही. तत्वसिद्धांत नाही, तसे म्हटल्यास हे कसे प्रसिद्ध क्षेत्र झाले आहेत. म्हणजे केवळ प्रचार वैश्वरीतून, भावूक भक्तांच्या भक्तीमुळे, पौराणीक देवतांची पूजा बालीश तथा अर्थहीन आहे. हे बालवाडीत जाणा-या लहान बालकासारखे.

२. पंचभूत पूजा

नैसर्गीक वस्तू असलेल्या माती, पाणी, अग्नी, रूईचे झाड, बेलपत्रीचे झाड, शमीचे झाड, तुळस, व गंगा, इत्यादींची पूजा ही पंचभूतांची पूजा आहे. अटणारे पाणी, वटणारे झाड, न हलणारा दगड इत्यायदींची पुजा ही पंचभूताची पुजा म्हंटली जाते. हे बालीश असले तरी बालवाडीतल्या बालकासारखे नाही. नदी पाणी देते झाड फळ देते अग्नी जळते, हे सर्व कितीतरी उपयुक्त आहेत. त्यांची पूजा करणा-याना प्राथमिक शाळेतील विद्याथ्र्यांशी तुलना करू शकतो.

३. प्राणी पूजा

तिसरा प्रकार हा माध्यमीक शाळेतील विद्याथ्र्याप्रमाणे आहे, प्राणी पूजेत गो पूजा, नाग पूजा, माकड पूजा इत्यादी गाय इत्यादी प्राणी दूध देतात म्हणून कृतज्ञतेने पुजल्यास, साप, माकड आपणास पिडा देऊनयेत म्हणून पुजण्याची पध्दत आहे. माणसापेक्षा कनिष्ठ बुध्दीमत्ता असलेले प्राणी यांना काय देऊ शकतात ? गाय दूध देते, जरूर कृज्ञता व्यक्त करावी. तिला गवत पेंड भूसा हे तिला खाऊ घालावे ते सोडून चारा न घालता तिला कुंकु लावून उदबती ओवाळणे योग्य आहे का? भारतीयांच्या अशा अंधश्रद्धेमुळे तिच्या पोषणाकडे दुर्लक्ष होवून इथली गाय दूध कमी देते मात्र पाश्चातदेशात गाईची पूजा वगैरे न करता तिला चारा खूराक वगैरे भरपूर घालून वैज्ञानीक पणे केल्यामूळे तिथल्या गाई दिवसाकाठी पंचवीस ते तीस लिटर दुध देतात, हे आश्चर्य नाही का?

४) पितृ पूजा

देहात झालेले वाडवडील किंवा जिवंत असलेल्याही आई,वडील,आजी, आजोबा,पणजोबा वैगरेच्या प्रतिमेची पुजा ही पितृपुजा सदरात मोडते. त्यांनी जन्म दिल्यामुळे त्यांच्या प्रतिमा आठवणीसाठी घरी ठेवून श्रध्देने हार घातल्यास हरकत नाही परंतू ‘हिरीयर हब्बा' (वडीलांचे पुण्यतिथी) म्हणून कळस ठेवून, पोशाख चढवून, समोर नैवेद्य ठेवून साजरा करणे अज्ञानपणाचे नाही का? ते वडील जीवंत असतानाच अशाप्रकारे आपण असा आदर दाखवून, त्यांचे जीवन सुसह्य केले का? याचा विचार मनातच करून पाहील्यास काय दिसते? इथे मराठीतील एक म्हण आठवतो 'जिवंत असता लाथा देती मेल्यानंतर दर्शन घेती असे होते नाही का?तर असे पिर्त पूजा करणारे, हे हायस्कूलचे ‘विद्यार्थी'.'

५) महात्म्यांची पूजा :

पाचवी ही महात्म्यांची पूजा हिला विभूती पूजा ही म्हणतात, हे कॉलेज दर्जाचे विद्यार्थी,'योगी शिव', 'भगवान बुध्द', 'भगवान महावीर', 'येशु ख्रिस्त ','महंमद पैगंबर', 'विश्वगुरू बसवेश्वर', 'गुरू नानक', 'स्वामी विवेकानंद', 'योगी अरविंद' इत्यादी. आदर्श जीवी जगले मानवतेसाठी झटले ते परमात्म्याचे अनुग्रही होते. म्हणून ते इतरांना अनुग्रह देऊ शकतात याशिवाय मानवी समाजासाठी झटलेले कांही ‘महात्मे 'शरण' 'संत' अशांची पुजा सुध्दा या सदरात येते.

६) देव पूजा:

इष्टलिंग पूजा ही मात्र देव पूजा आहे. ही कोणत्याही पौराणीक देवतांचे प्रतीक नाही, पंचमहाभुतापैकी कोणाची नाही, प्राणी प्रतिनिधीत्वाची नाही. पिर्तत्वाचे स्वरूप नाही. महात्म्यांचे प्रतिक नाही. तरे ते सृष्टीकर्ता परमात्म्याचे प्रतीक आहे. देवाची खरोखर प्रर्थना करणारे म्हणेजे कांही 'उपनिषदकार' 'मुसलमान 'व'शरण गण’ बाकी सर्व मी म्हटल्याप्रमाणे वरील पाचपैकी एकाची किंवा सर्वांची पुजा प्रर्थना करणारे आहेत 'इसलाम धर्मात पूजा नाही. नुसती प्रार्थना व ध्यान (नमाज) परंतू पूजा, प्रार्थना व ध्यान या तीन्ही मार्गाने सृष्टीकर्ता परमात्म्याला पूजायला सांगणारा धर्म म्हणजे 'लिंगायत धर्म' एकच असे तत्व दिलेले गुरू महात्मा बसवेश्वर एकटेच. ही मतांधतेची गोष्टी नाही. चिंतनशील दृष्टीने ‘श्री बसवेश्वरांनी शोधून दिलेले इष्टलिंगाचे महत्व समजून घेतल्यास यातील सत्यता दिरणे शक्य आहे. या सहा पध्दतींच्या शिवाय आणखी एक उपाश्य वस्तू म्हणजे ‘प्रेत सगळीकडे नसून कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यात दिसून येते प्रेताकडून आपणास पिडा होवू नये म्हणून प्रेताची पूजा करतात. त्या लोकांना बालवाडीतल्या मुलांच्या पेक्षाही अज्ञानी मानले पाहीजे

काही लोक इष्टलिंगाबाबत संशय व्यक्त करतात.
१. “इष्टलिंग ही जडवस्तू आहे. तर मग त्याची पुजा भूतपूजा होत नाही का?''
२. विश्वाची गोलाकारात पूजा म्हणजे ही जडवस्तू आहे. लिंगायत धर्म याला पूजायला सांगतो. तर मग ही जडवस्तूची पूजा होत नाही का?

१. 'इष्टलिंग' हे दगड नाही त्याच्याचप्रमाणे कवच कठीण असते त्याला ‘कांती' म्हणतात. त्राटकयोगसाधनेला सहायक व्हावे म्हणून चमकदार कवच केले गेले आहे.

२. लिंगायत धर्म संस्थापक ‘गुरू बसवेश्वरानी' विश्वाच्या आकारात गोलाकार इष्टलिंगाची निर्मिती केली. याचा अर्थ गुरू बसवेश्वरांनी विश्वाची पुजा करायला सांगितली असा नव्हे. त्याचे सांगणे असे की,' विश्वात सगळीकडे भरून उरलेल्याविश्वात्म्याची पूजा करा.'आम्ही फूल घेऊन ते हुंगतो याचा अर्थ त्या फुलाला हुंगतो. असा नसून, त्यातील सुगंध हुंगतो.

'स्त्रीया गंगापूजा करावी म्हणून एका घागरीत पाणी घेतात.त्या घागरीला लुगडे नेसवुन, दागिने घालून पूजतातत्यांना विचारल्यास त्यांनी सांगतात की गंगापूजा' करत आहोत.घागरीची पूजा करत आहोत असे सांगतात का? नाही, कारण ‘पाणी',द्रव, वस्तु असल्यामुळे घागरीत घेउन, जशी पूजा करतात. तसेच, निराकार , जंगविस्तार,नभो विस्तार असलेल्या परमात्म्याला विश्वाच्या आकारात ,पूजायला लिंगायत धर्म, सांगतो.

काहीजन सागतात,''मग आपण, राम, कृष्ण, हनुमान, 'दुर्गा' यांच्या प्रतिमासमोर ठेवून परत्म्यालांच उद्देशून करतो. समोर साकार देह व अवयव असलेल्या मूर्ती ठेवून घेतल्यास त्या ध्येयव्यक्तीलाच ते सूचीत करतात. 'श्रीराम', 'श्रीकृष्ण','बुद्ध', 'महावीर', 'बसवेश्वर', ‘अक्कमहादेवी' या सर्वांनी एकेकाळी होवून गेलेले आहेत. कारण त्या सर्व मुर्ती, विभूती पुरुषाना सुचीत करतात. परंतू निराकार, निरवयव देवाला नाही.

३. दगडाचादेव देव नाही, मातीचा देव नाही. तांब्या पितळेचे बनवलेले देव,नाहीत म्हणून सांगितले. बसवेश्वरच, दगडाच्या देवाला, देव म्हणून पुजायला सांगितले आहेत ना ? असा काहीजण प्रश्न करतात.

कत्र्याचे स्थान खाली उतरण्यासारखे बसवेश्वरांनी कधीही केले नाही. त्यानी इष्टलिंगालाच देव न म्हणता, त्याचे ज्ञान करून देणारे चिन्ह म्हणतात. देवरूपी, ध्येयापर्यंत पोचण्यासाठी, सहायक होणारे तळहाताची ज्योत म्हणतात. विश्वसंस्थामध्ये चर्चा करत असताना, ''भारताने असे म्हटले' असे म्हटले जाते, तिथे का भारत जात असतो ?' भूप्रदेश जात असतो, नाही. भारताचे एक प्रतिनिधी जात असतात. तसेच इष्टलिंग, हे जगविस्तार, नभोविस्तार असलेल्या देवाला समजावून देणारे प्रतिनिधी आहे.

इष्टलिंग हे योग साधनेला सहायक आहे

आता बसणाच्या उपाय वस्तुत, बहतेक वस्तू केवळ माणसाच्या भक्तीच्या तृप्तीला सहाय्यक आहेत, परंतू योगसाधनेला नाही. देवळातील स्थावर लिंग असो किंवा तिरूपती व्यंकटेश्वर असो, हे केवळ मुग्धभक्तीला समाधान देवू शकतात. पण इष्टलिंग हे भक्तीची ध्येयवस्तू इतकेच नसून योगाभ्यास करायला सहकारी आहे. निष्ठावंत वैदिक धर्मानुयायी चिन्ह म्हणून यज्ञोपवीत (जानवे) धारण करतो. 'कौटुंबिक, किंवा सामाजीक विधीविधान करताना ते अवश्यक चिन्ह असल्यामुळे तो ते घालतो. पण पूजा करताना वैशण्व ब्राम्हणांनी विष्णूला, शैव ब्रम्हणानी शिवाला, शाक्तानी शक्तीची पूजा करतात योग साधनेला हे कोणतेच उपयुक्त नसल्याकारणाने अष्टांगयोगे कुंडलिनी योगाचा आश्रय घेतात. असे सामाजीक चिन्ह वेगळे आध्यात्मीक साधन वेगळे भक्तीची ध्येयवस्तू वेगळी झालेली आहेत.

इष्टलिंगाचे वैशिष्ठ्य काय म्हणजे, ते सगळ्या अवशकता पुरवते. सामाजीक बनून सर्वांना एकत्रीत करु शकते उपाश्य वस्तू होवून पुजा करुन घेऊ शकते. त्राटक सहीत लिंगयोगाभ्यासाला सहकारी किंवा साधन होवून, सर्व अतिंद्रियानुभव मिळवून देऊ शकते. त्याकरीता, इष्टलिंग हे (All in one)चिन्ह होवून बुद्धीजीवी भावजीवी योगाभ्याशी समतावादी असे सर्वाना तृप्ती देणारे साधन म्हणणे गैर नाही. याचा अर्थ मर्म व उपयुक्तता समजून घेतल्यास हे अखिल जगतातच अव्दितीय धर्मचिन्ह व श्रेष्ठ योगासाधन होवू शकते, इथे एक दृष्टांत आम्हाला आठवतो.

तो असा एका गावी लिंगयोग साधनेत अनुभव मिळवलेले एक गुरु होते , त्यांच्याकडे 'भक्तजन',मार्गदर्शनासाठी येत असत,तसेच एक साधक त्याच्याकडे आला तो थोडा ‘मंदमती' होता. इतरापेक्षा, विशेष योग शिकून विशेष साधना करण्याची त्याची इच्छा होती. त्याची मागणी ऐकूण गूरूनी त्याला मंत्रोपदेश करून, इष्टलिंगात चित्कळा भरून दिली. ती देताना उपदेश केला की, हेच तुझे सर्वस्व आहे म्हणून साधना करण्यास सांगितले तो 'शिष्य आनंदाने ऐकांतात झाडाखाली बसून योगाभ्यास करावा म्हणून मळ्याकडे निघाला. तिथे झाडाला पाणी घालणारा माळी होता. तो वचन गुणगुणत पाणी घालत होता. त्याच्यागळ्यातही इष्टलिंग होते.तेव्हा आश्रमाचे कपडे धुण्यासाठी कपड्यांचे गाठोडे घेऊन
आश्रमसेविका आली. तिच्या गळ्यातही इष्टलिंग होते. तेव्हा तो म्हणतो, 'अरेरे' गुरूनी,सर्वांना हेच दिले आहेत याच्यात काय विशेष आहे ?''असे निकत्साहीत होवून,अश्रमात येऊन त्याने गुरूना विचारले कि,

‘गुरूदेव मी विशेष साधना करून अत्यंत नवनवीन अनुभव मिळण्यासाठी आलो. पण आपण माळी पटीन याना दिलेलेच मलाही दिला आहात. याच्यात काय विशेष आहे ?"

ते ऐकून ओठात हसत गुरुंनी म्हंटले, ''ही वस्तू घे, गावातील बाजारात वेगवेगळ्या दुकानात जाऊन याची किंमत करून घेऊन ये, कुणाला विकू नको'' एक लहानसा हि-याचा खडा दिला तो ते घेऊन निघाला रस्त्याच्या कडेला फुगे, आरसे, कंगवे वगैरे विकणाच्याकडे जाऊन खड्याची किंमत विचारल्यावर तो म्हणाला’ ‘हा खडा माझ्या मुलाना खेळण्यासाठी घेईन त्याच्या बदल्यात एक आरसा देईन माझ्या मुलाला खेळायला होईल.''

मग तो शिष्य तिथून पानपट्टी दुकानात जाऊन विचारला असता. त्या दुकानदाराने शंभर रुपयास तो खडा घेण्यास तयार झाला. तिथून पुढे निघून तो एका कापड दुकानदाराला तो खडा दाखविला त्याने एक हजार रुपयास तो मागीतला. तिथूनही पुढे जाऊन त्या शिष्याने गावातील एका प्रसिद्ध हिन्याच्या व्यापा-याला तो खडा दाखवला असता तो व्यापारी चकीत होवून म्हणाला' हा खडा एक अतिमुल्य रत्न आहे. याच्या बदल्यात माझ्या दुकानातील हिरे सोने चांदी सर्व विकले तरी याची किंमत होणार नाही. तेव्हा चकीत होवून त्या शिष्याने आश्रमात येऊन, गुरुना ही हकीगत सांगितली, तेव्हा गुरु म्हणतात, "बाळा तू वेग वेगळ्या लोकाना याची किंमत विचारलास ना ? त्या सर्वांनी त्या एकाच खड्याची किंमत केली का वेगवेगळ्याची?'' तेंव्हा शिष्य म्हणतो, ''एकाच खड्याची ''त्यावर गुरुनी म्हंटले ''हे बघ त्या प्रत्येकाची आपल्या बुद्धी व कुव्वतीनुसार त्या खड्याची वेगवेगळी किंमत केली. तसेच गुरुनी सर्वाना दिक्षा देताना एकाच प्रकारचे इष्टलिंग देतात. पण आपल्या योगते व साधनेनूसार लोकत्याचा वेगवेगळा परिणाम घेतात. सर्वसामान्य माणूस केवळ इष्ठार्थ सिद्धी करुन घेतात पण ज्ञानी लोक दिव्यानुभव प्राप्ती करून घेतात.

"इष्टलिंगाची महती समजून घेतलेले साधक त्यातच अत्यंतिक व विशेष अनुभव घेतात."

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous *इष्टलिंग* जात्यातीत (जातिविहीन) चिन्ह इष्टलिंग पूजा जड पूजा काय ? Next