Previous नाद-बिंदू- कला इष्टलिंगाची अवशक्ता Next

अर्चनेची आवश्यकता

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

अर्चनेची आवश्यकता

देव आहे म्हणून मानल्यास पुरे. पूजेची आवश्यकता काय ? असा वाद घालणारे बरेच जण असतात.पूजा ही एक प्रकारे कृतज्ञता समर्पण करण्याची क्रिया आहे.

जमीन तुमचे दान पीक तुमचे दान
वाहणारे वारे तुमचे दान

म्हणून शरण, जेडर(कोष्ठी)दासीमैच्यांनी म्हंटल्याप्रमाणे समस्त सृष्ठी परमात्म्याचे दान आहे. त्यामुळे अशा दान देणा-या दात्याला विसरणे योग्य आहे का?

महादानी कूडलसंगमदेवाला पूजून
जगा, कायेच्या मोहात गुरफटू नको


म्हणून विश्वगुरु बसवेश्वरांनी सांगीतल्याप्रमाणे सृष्टीकत्र्या महादात्याला नियमीतपणे कृतज्ञता व्यक्त करावी त्या निराकार अनंताची पूजा कशी करावी? नागड्याला कपडे कसे नेसवावेत ? हे समजून घेवून गुरु बसवेश्वरांनी अनाकलनीय लिंगाला आकार विरहित देवाला इष्टलिंगाच्या आकारात पूजायला सांगीतले. ''देवा समस्त सुष्टीचा निर्मात्मा तुला मी अंघोळ घालण्यास समर्थ आहे का ? नाही, तरी धीर न सोडता सांकेतीकपणे तुला अंघोळ घालतो. श्वासासाठी वायु दिलेल्या जगाचा प्राण असलेल्या तुला सुगंध मिश्रित वायु धुपार्पणाद्वारे समर्पण करतो. सूर्य चंद्र रुपी विश्वाती दिलेल्या तुला लहान पणती लावतो. सर्व चराचर सृष्टीला जीवसत्व देणा-या तुला नैवेद्य समर्पण करतो तुझ्या तृप्तीसाठी किंवा तुमचे पोटभरण्याच्या अहंभावाने नव्हे . समर्पण करण्यातच मला आनंद आहे. मी मनतृप्तीसाठी तुम्हाला समपतो, या भावनेने देवाचे उपकार स्मरावे.

पूजेचा आणखी एक उद्देश म्हणजे पूज्य वस्तूच स्वत: व्हावे. सत्-चित्-आनंद नित्यपरिपूर्ण पर वस्तू पूजण्याचा उद्देश आपणच ते स्वरूप व्हावे पूजेचे आणखी एक ध्येय म्हणजे सद्गुण संपदा अंगिकारणे.

१. कित्येक दिवस दगड पाण्यात असला तरी काय ? भिजून मऊ होतो का?

२. पुंगीच्या आवाजाला सर्प डोलला तरी काय ? विषारीपण न सोडल्यास ?

३. कित्येक दिवस पूजून काय उपयोग ? ती पूजा मनपूर्वक नसल्यास ?

असे हजारो दिवसापर्यंत पूजा केले तरी सदाचार सद्भक्ती नसल्यांची पूजा वाया जाते, देवाला प्रसन्न करत नाही. देवाला आम्ही अर्पण करायच्या वस्तू एकेक गुण समजून देत असल्यामुळे आपण आंगिकारले पाहीजेत. ते आक्कामहादेवी असे सांगतात.

देह न झिजवणा-या कडून अंघोळ न घेणारा तू
मन न विरघळणा-याकडून पुष्प न घेणारा तू
मन:शांती नसणा-याकडून गंधाक्षता न घेणारा तू
भावशुद्ध नसणा-यांच्यात धूप न घेणारा तू
विवेक जागृती न झालेल्यांच्यात आरती न घेणारा तू
त्रीकरण शुद्ध नसणा-यांच्यात विडा न घेणारा तू
अनुभाव नसलेल्यांच्यात नैवेद्य न घेणारा तू
हृदय कमल शुद्ध नसणा-यांच्यात न रहाणारा तू
माझ्यात काय आहे म्हणून माझ्या तळ हाती आलास तू
चन्नमलिकार्जुना --अक्कमहादेवी १८७

अशारीतीने सद् गुण आंगीकारण्याचे ध्येयाने दैवीश्रद्धा, शरणागती भाव आणि कृतज्ञतापूर्वक आपण कूडलसंगमदेवाची पूजा केली पाहीजे.

नियमीतपणे लिंगपूजा, करायची म्हणजे ही एक तशी गारूडी विद्याच आहे. जसे साप धरून त्याला खेळवणारा विषविरोधी औषध सदैव बाळगतो. त्याचप्रमाणे संसाररूपी सार्पाशी खेळू इच्छिणारा जीवी सुद्धा सदैव पूजारुपी औषध किंवा अध्यात्म्याची गारुडी विद्या अंगिकरून जगावे.

मनच सर्प तनच टोपली
सापाची संगत केल्यास
कधी प्राण घेईल न कळे
कधी खाऊन टाकेल न कळे
रोज रोज पूजल्यास
तीच गारुडी विद्या कूडलसंगमदेवा --धर्मगरू बसवेश्वर १६०

प्राणलिंग पूजा

तळहाती घेऊन सृष्टीत असलेले पाणी, धूप, दीप इत्यादी घेऊन पूजाकरायची ही इष्टलिंग पूजा. त्यांच्या पुढील टप्पाच प्राणलिंग पूजा. प्राणलिंग म्हणजे आत्मा, प्राणाला वाहन करून आत्मा कार्य करतो. त्यासाठी त्याला प्राणलिंग म्हणून नांव आहे. हृदयाच्या पिठावर
आत्मलिंगाला बसवून, सद्गुणाला पूजासामग्री करून ज्ञानात्मक होवून पूजा करायची हीच प्राणलिंग पूजा. सर्पभूषण शिवयोगीनी याला फार मार्मीकपणे सांगीतले आहे.

लिंगपूजा करावी

लिगपूजा करावी, तुमच्यातल्या प्राण
लिंगपूजा करावी
गंगा यमुना संगम करुन स्नान
अंलकृत मंटपी बसून ॥ प ॥

भक्ती रूपी पाण्याने करवून स्नान
शांती गुणाचे गंध लेपून
इंद्रियरूपी, अक्ष्दा ठेवून
ज्ञान विवेक रुपी पुष्प वाहून ॥१ ॥

हर्ष रूपी धूप समर्पून
वर बिंदूचा, दीप लावून
परिपूर्णता रूपी नैवेद्य करुन
त्रिगुणरूपी विडा हर्षाने देऊन ॥२ ॥

करस्थळी इष्टलिंग हे, शरीरात
परवस्तू स्वता झाले हे.
आत बाहेराचे व्दंब्द मिटविण्यासाठी
गुरुसिध्दामध्ये सामावून तुम्ही ॥३॥ -- सर्पभूषण शिवयोगी

भक्ती, ज्ञान रूपी गंगा, यमुनांच्या संगमात, स्नान करुन सद्गुणाने अलंकृत जीवनाच्या मंडपात बसून ही पूजा करावी, भक्ती रूपी पाण्याने, कूडलसंगमदेवास स्नान करवून शांततारूपी गंध लेवून, इंद्रियानाच, अक्षता बनवून, विवेक ज्ञानरूपी पुष्प बहावे हर्षरूपी धूप घालून भूमध्याचे, बिंदूवर दृष्टी ठेवलेले दीप लावावे. परिपूर्ण रूपी नैवेध करुन, परिशुध्द झालेले काया वाचा मनाचा विडा द्यावा. तळहाती असलेले इष्टलिंगच, परमज्योती, प्राणलिंग झाले आहे. पूज्य व पूजक असे व्दंव्द घालवण्यासाठीच ही पूजा आहे.

भावलिंग पूजा

आत्म्याला प्राणलिंग असे आणखी एक नांव असल्यासारखे, परमात्म्याला भावलिंग म्हणून नांव आहे. विश्वात्मा किंवा ब्रम्हांडांतर्गत महालिंगाला भावनांगद्वारेच, समजणे शक्य आहे. त्यासाठी त्याला भावलिंग म्हणून नांव आहे. ही भावलिंग पूजा सृष्टीत चालत असते. त्याला ज्ञानाचक्षुने पाहून स्फुरणात्मक ज्ञानाने ग्रहण करुन आनंदावे. त्या भूमब्राम्हानंदात मग्न व्हावे. सृष्टीत, कार्याची पूजा अद्भुतपणे चालत असते.

ढगच कुंभ होवून वर्षावणाच्या पावसात परमात्म्याची अंघोळ होते. अनेक वस्तू जळून, देवाला भस्म धारणा होत असते. सृष्टीत उमलेले सर्व फुले त्याला पुष्पार्चना करतात. अनेक सुगंधी वस्तू, गंध लेपून केल्यास, नक्षत्रच अक्षता अर्पण करतात, सुगंधमिश्रीत वायु, धूप झाल्यास सूर्यचंद्रच दीप होतात. नारळ केळे इत्यादी झाडे, चौया ढाळतात समस्त जीवराशीचे कंठ घंटानाद होतो. फिरणारे गृह, प्रदक्षिणा घालत असून, समस्त जीवीयांचा अहारच त्याला नैवेद्य. दृष्टी दैवी मय होवून भावलिंगपूजा करण्याचे सामर्थ्य असलेल्या योगीयांच्या ज्ञान चक्षुद्यला सृष्टीची प्रत्येक हलचाल, दैवी पूजाच दिसते. तेव्हां ते तिच्या गर्भात मी व माझ्या हृदयात ती चेतना आहे असा अनुभव लिंगांग योग व अनुभाव करुन घेतात. ती मी व अर्चना हा त्रिपुटी भाव सोडून देतात. याचे वर्णन केलेले सुंदर वचन आता पाहूया.

जगाला वेढली आहे तुझी माया,
तुला वेढले आहे माझे मन पहा.
जगाला समजणारा तू
तला समजणारा मी
आरशात हत्ती लपल्यासारखा,
तु माझ्यात लपला आहेस कूडलसंगमदेव --धर्मगुरू बसवेश्वर ९०३

असा परमात्मा समस्त विश्वाला व्यापला असून, तो माझ्यात अंशीभूत चैतन्य होवून आत्मस्वरुपात आहे व या दोन्हीचा निकट संबंध आहे. असा अनुभव सांगणारे काही वचने व त्याच्यावर लिहील्या गेलेल्या व्याख्या आता पाहूया

श्री गुरुनी कृपा केलेल्या प्राणलिंगाचे घन कसे म्हणजे,
मल्स्याने गिळलेल्या माणिक सारखे
मट्याने गिळलेल्या पाण्यासारखे
डोळ्याचा बुबुळानी, गिळलेल्या दृश्यासारखे
पोकळी सामावून, बम्हांडांत असलेल्या
स्वानुभांवी यांचे अनुभाव दाखवून
जगवा कूडलसंगमदेवा --धर्मगुरू बसवेश्वर १३५१

अनुभावाच्या आश्रयात बुध्दी तृप्त होते खरे ज्ञान पूर्वकृत पुण्याने, उदय होवून, इष्टलिंगात, दृष्टी, मन, थांबवून तो आकारच म्हणजे इष्टलिंगच प्रान होवून मन जेव्हां. विश्रांती घेते, त्याला प्राणलिंगाचा, साक्षत्कार किंवा स्वरुप साक्षात्कार म्हंटले जाते. असा अनुभव घेतलेल्या शरणांची कशी असते म्हणजे, मत्स्याने मिळलेल्या माणिका सारखे प्रकाशणाच्या, माणिकाला माशाने गिळले असता, त्याच्या पारदर्शक देहामुळे, माणिकाच्या प्रभावाने त्याचे सर्वांग चमकत असते. पाणी गोठल्याने मोती बनते तर मोतीच पाण्याला गिळल्यासारखे नाही का? तसेच दिव्यानुभवच गोठून मोत्यासारखे झालेले शरण, दिव्यानुभवच सावयव होवून, रहातो. बुबुळे अनेक दृष्ये पाहून ते आपल्यात सामावून घेतल्यासारखे मन बरयाच अनुभवाला सामावून घेते. परिपूर्ण पोकळी स्वरूप झालेल्या परमात्म्याला अंगीकरुन अनुभावी या मर्त्यलोकात असतात असे गुरु बसवेश्वरांनी वरील वचनात सांगितले.

या वचनात येणा-या ''माशाने गिळलेल्या माणिकासारखे हे वाक्य किंवा उक्ती अत्यंत शक्तीशाली आहे. दिव्यानुभवाचे माणिक गिळलेले शरण, अशा एका प्रखर तेजाने चमकतो व त्याचे प्राण स्वरुप होवून, तळहातातील चमकत असते. साच्या विश्वात भरलेले परमात्म्याचे चैतन्य आपल्या अंतरंगात आत्म स्वरुपात आहे म्हणून समजतात. बहिर्मुख दृष्टीला अंतर्मुख करुन बाहेर वहात असलेल्या अन्वेषणाला अंतरप्रवाहीत करून आतच देवाला शोधणे हेच अध्यात्म,

तुमच्यात तुम्ही समजून पहा वेगळे कांही नाही
ज्ञान प्रकाश तुमच्यातच आहे.
अन्यभाव न आठवता आपल्यातच जागृत असल्याने
आपल्यातच तन्मय गुहेश्वरा --अल्लम प्रभुदेव वचन ३७६

तुमच्या मनात समजून पहा, परमात्मा बाहेर कुठे नाही. परमात्मा सत् चित् आनंद स्वरुपी आहे, ज्ञानाचे मुख्य स्वरूप आत्म तत्व होवून देहात आहे. तन्, मन्, भाव, हे बहुदेवतांचा विश्वास सोडून, आपल्यात आपणच जागृत होवून राहील्यास, आपल्यातच देव तन्मय झाल्याने दिसतो. काखेत मुल असताना, त्यालाच शोधत गावभर फिरणा-या अज्ञानी स्त्री सारखे आपल्यात असलेल्या ख-या तत्वाला न समजता बाहेर शोधणा-यांना शरणांनी ज्ञान सांगितले आहे.

आपल्यातील ज्ञान आपल्यात न दिसता
इतरात दिसेल का ?
आपल्यात आपल्या सारखेच असणार
आपोआपच पिकून, आपल्यातच जागलेली आठवण
याविचित्राला काय म्हणावे रामनाथ.

आपल्यात एक महत्वाचे ज्ञान आहे. सामान्य जनात ते परिपक्व न होता सुप्तपणे असते गुरुकृपा व सत्संक्ल्प साधनेने ते परिपक्व होते. तेव्हा साधकात आपल्या स्वरूपाची आठवण होते यांची लिलाच विचित्र आहे म्हणून शरण जेडर दासीमैय्यांनी सांगितले आहे.

१) आपल्याला विसरून देवाला पाहीलो म्हंटल्या कारणे,
हरी, सुर, बम्हादी, डोके खाली घालून गेले.
त्या देवाला विसरून, स्वत:ला समजून घेतल्यास
स्वत:च सत्य म्हणाले आंबीगर चौडैय्या

२) आपल्यातले खोटे समजून दुस-याचे खरे म्हंनणा-या
भावाला विश्वास कुठे?
आपल्यात चेतनेला न समजता
पर ब्रम्हाला पहीलो म्हणणायाला मुर्ख म्हंटले
आंबीगर चौडैय्याने

या वचनात सुध्दा आपल्यात असलेल्या चैतन्याला पहावे असे सांगितले आहे. परवस्तूला बाहेर शोधणारे म्हणजे आंधळ्या मुर्खासारखे. असे आंबी चौडैयाने म्हंटले.,


स्वतात स्वता प्रत्यक्ष अनुभवाने जाणून समजून
समजलेल्या ज्ञानात देवाचे स्वरूप पाहून
दिसणारे ज्ञान, मीच समजून बघणारा दिसणारा
दोन्ही एक झाल्याची स्थिती, म्हणजेच तुमची स्मिती
निज गुरु स्वतंत्र सिध्दलिंगेश्वरा.

शरण आपल्यात ज्ञानाने आत्मस्वरूप समजून,त्या समजात देवाचे स्वरूप पहातात देवाचे अस्तित्व पहाणारा, आत्माच हे समजून पहाणारा (आत्मा)दिसणारा (परमात्मा)हे दोन्ही, रश्मी, रवी, सारखेएकात एक मिसळून गेलेल्या स्थितीला, शरणाने मार्मीपपणे सांगितले आहे.आपल्यातच देवाला पहावे तसे पहाण्यासाठी आणखी एका साधनेची गरज आहे तेच इष्टलिंग,

तुझ्याकडून समजले का ? नव्हे.
माझा मी समजलो का ? नाही,
याचे कारण म्हणजे डोळ्याची ज्योत व सूर्यप्रकाश
मिळून वस्तू दिसण्यासारखे माझ्या तुझ्या ज्ञान संबंधाच्या
प्रकाशात लिंगाला जाणलो पहा स्वतंत्र सिध्दलिंगेश्वरा

केवळ गुरुंच्या शक्तीने किंवा केवळ शिष्यांच्या भक्तीने देव दिसत नाही. दोन्हींची भक्ती शक्ती मिळाल्याने मुक्ती दाता देवाला आपण पाहू शकतो, म्हणून या वचनात सांगितले आहे. एकादी वस्तू दिसावी तर डोळ्याचा प्रकाश हवा, व्यक्ती आंधळी असेल तरी त्याला वस्तू दिसत नाही डोळे असले तरी सूर्य प्रकाश नसल्यास वस्तू दिसत नाही. तसेच माझ्या तुझ्या ज्ञान प्रकाशात लिंगाला पाहीले ही गोष्ट फार अर्थपूर्ण आहे. तुमचे ज्ञान म्हणजे सदगुरुनी कृपा करून दिलेले तळहातीची ज्योत इष्टलिंग. माझे ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान ज्योतीचे अंशीक झालेली चित्ज्योत या दोन्हीचा प्रकाशात शरण परमात्म्याला पहातो. कसे म्हणजे वस्तू बघायला सूर्य प्रकाश डोळ्याचा प्रकाश हवा असतो सूर्याला पहाण्याससुध्दा सूर्यप्रकाश व डोळ्याची ज्योत पहीजे इथे करस्थळातील ज्योत डोळ्याच्या प्रकाशा सारखी तिज्ज्योती सूर्यप्रकाशा सारखी परमात्म्याला पहाण्यासाठी चिज्योती व करस्थळाची ज्योत दोन्ही पाहीजे.

तू मी असा भावकुणापासून झाला सांगा.
तू म्हणणे म्हणजे अज्ञान
मी म्हणणेच मायाधीन
तू न म्हणता मी न म्हणता भेद न करता
परम सुख मिळविल्यास
ते सुख तुम्हा अपत गुहेश्वरा --अल्लम प्रभूदेव ५६२

या वचनात मी तु भाव समजून स्वरूप साक्षसत्कार करून घेण्याचे ध्येय आहे. मी विश्वात जीव झालो अंग झालो तू विश्वातीत होवून लिंग झालास ही विश्वाची लीला थांबल्यास मी तू एकच नव्हे ? तिथे जीव-शिव अंग-लिंग असे भेद नाही मी तू याचा भेद नाही हे सर्व भेद देवाला अर्पण करून अल्लमप्रभूदेव दिव्यानुभावी झाले आहेत. शब्द मुक्त झालेल्या शरणाची स्थिती शब्दातच सांगुन गोष्टच ज्योतीलिंग म्हणून खालील वचनात सिध्द करून दिले आहेत.

तू मी असा भाव नाही
स्वत:ला समजल्यास आणखी काही नाही.
नसलेले नाही ते येणार कुठून
देवाला समजुन कसा गुणविसरलो
भावरहित गुहेश्वरा, --श्री अलम प्रभू वचन ३०५

दिव्य असा अनुभव घेतल्यावर मी म्हणजे जीवात्मा तू म्हणजे परमात्मा असा भावच असत नाही. आपले खरे स्वरूप समजल्यावर परत समजण्याला काही उरत नाही. त्या अनुभवाच्या स्थितीत आनंद घेत असताना अत्यंतीक सत्य नसलेला जगताची पर्वाच नसते परमात्म्यारूपी सत्याला समजल्यावर शरण देहभाव घालवून मी देव वेग वेगळे असा सोडून एको भावात थांबतो.

आडोशामागे चिन्ह म्हणजे काय
आत लिंगाचे सत्य धरल्यावर पूजणारा कोण?
पूजून घेणारा देव कोण ? मागे पुढे
पुढे मागे झाला गुहेश्वरा मी तू
॥ तू मी झाल्यावर आणखी काय उरले सांगा ? --श्री अल्लम प्रभु वचन ११६२

आडोशामागे चिन्ह म्हणजे देह इंद्रिय प्राणाच्या मागे असलेला आत्मा विश्वाची लीलारूपी आडोशाच्या मागे असलेले चिन्ह म्हणजे मरमात्मा तत्व आपल्यातील आत्म स्वरूप जाणून आनंदल्या वर पूज्यपूजक-पूजा हा त्रीपुटी भाव मिटतो. भक्ताला दिव्यानंद दिलेला देव श्रेष्ठ का देवाला जाणून अंगिकारलेला भक्त? अशी संदिग्दता होते. अभिन्न असलेला भाव सामावलेल्या स्थितीत आनंद सागरात विहार करुन शब्द मुक्त होतो.

स्वत:ला स्वत:च समजून घेतल्यावर स्वत:च देव,
तू मी असा भाव मिटून स्वत:च स्वत: व्हावे
तुला तूच समजल्यास तुझा विवेकच गुरु
ध्यानी ध्यानात लपून ध्यान ध्येयात लपून
ध्येय स्वत:च स्वत: विश्रामिले.

या सर्व वचन उक्तीत अभिन्न भाव अंगिकारलेल्या मानसिक स्थितीचे वर्णन आहे ध्यानी-ध्यान-ध्येय ज्ञावू-ज्ञान-ज्ञेय उपासकउपासना-उपास्य पूजक-पूजा-पूज्य हा त्रिपुटी भाव मिटून एक भाव झाला आहे. अशी एकोभाव दिव्यानुभुती मिळण्यासाठी इष्टलिंग एक सुलभ साधन आहे.

ज्योतीच्या प्रकाशात पाहून ज्योतीचे स्वरूप पहाण्यासारखे
डोळ्याने आरसा बघून डोळ्यातील कांती पहाण्यासारखे
आपल्यातून आपल्याला पाहून स्वत:ला समजून घ्यावे
स्वत:ला जाणण्यासाठी आरसा हातात दिल्यास
न दिल्यामुळे चित्त स्मरणार्थ ठेवले.
चित्त लिंगावर स्थिरावल्यास आरसा पाहू कशाला?
ज्याळेतले कापूर वा-यातला सुगंध,
शिळेवरच्या तेलाला मोजमाप लावता येते का ?
लिंगधारक देहाला नाही पर्वा जगाची
अनंत अतित निष्कलंक मल्लिकार्जुना

शरण मोळगी मारय्या (मोळीविक्या)नी या वचनात मार्मीकपणे त्यांचे अनुभव सांगितले आहे. हे लिंगदर्पणात स्वरूप साक्षात्कार करून लिंगांग समरसी झालेची स्थिती दर्शविते दिव्याच्या प्रकाशातच त्याचे लो पदोष पहाण्यासारखे डोळ्यातून आरसा पाहून डोळ्याची कांती पहाण्यासारखे स्वत:तून स्वत:ला पाहून स्वत:ला समजून घ्यावे स्वत:चे डोळे बघण्यासाठी आरसा पाहीजे स्वत:ला स्वत:(आत्मस्वरूपाना)जाणण्यासाठी गुरुनी लिंगदर्पणा हाती दिले आहे. इष्टलिंग दर्पणात प्रणलिंगाच्या प्रसन्न स्वरूपाचे प्रतिबिंब पाहून शरण आत्म स्वरूप समजून घेतो इष्टलिंगात चित्त एकाग्र झाल्यावर ख-या अनंदात मग्न होवून इष्टलिंगाची पर्वा नसल्याप्रमाणे लिंगांग समरसी होतो. तेंव्हा ज्वाळेतल्या कापराप्रमाणे वायु गिळलेल्या सुगंधा प्रमाणे ज्ञानगिळलेल्या अज्ञाना सारखे शरण लिंगांग समरसी झाल्यावर त्याच्या देहाला जगाची पर्वा नाही म्हणून इथे वर्णन केले गेले आहे पूजा ध्यानादीचा उद्देश काय ? स्वत:ला स्वत:च समजून घेणे आणि हेच नेमके कठीण आहे असे वाटते साक्रेटीसांना काहीजण विचारतात या जगतात अत्यंत कठीण म्हणजे काय ? तेव्हा त्यांनी उत्तर दिले.

"To know thyself "स्वत:ला स्वतः समजणे फार कठीण आहे असे त्यांनी सांगितले त्याबाबत भारतीय तत्वज्ञानीयांनी सुध्दा तुला तू समज असे सांगितले आहे. या जगातील सर्व चराचर वस्तूला समज शकतो परंतू हे सर्व जाणणारा मी कोण ? हे समजणे फार कठीण आहे. डोळे संपूर्ण जग पाहू शकतात, पण स्वत:ला पाहू शकत नाहीत स्वत:ला पाहण्यासाठी काय पाहीजे? तर आरसा पाहीजे तसेच स्वत:ला समजून घेण्यासाठी लिंगरूपी आरसा पाहीजे अहा ! पाहीले शरणांची उद्दात कल्पना शरणानी लिंगदर्पणात कसा साक्षात्कार करून घेतला याबाबत त्यांच्या आणखी काही अमृत वचनातून पाहू या.

प्राणलिंगाचे प्रसन्न मुख पहाण्यासाठी
इष्टलिंग रूपी दर्पण धरलो पहा
गुहेश्वर लिंगात ,खरे समजून घ्यायचे तर
चिन्ह धरुन चिन्ह विसरले पाहीजे सिध्दरामैय्या --श्री अहम प्रभूदेव वचन

शून्य पिठाधीश अल्लमप्रभूदेवांनी सिद्धरामेश्वरांना, इष्टलिंग दर्पणाची महती या प्रकारे पटवून दिली आहे. प्राणलिंगाचे प्रसन्नमुख पहाण्यासाठी म्हणजे स्वरुप साक्षात्कार करुन घेण्यासाठी इष्टलिंग घेतले पाहीजे. चिन्हातून देवाला पहावे आपल्या स्वरूप आनंदात मग्न झाल्यसस चिन्हाची पर्वा नसते. स्वत:च स्वत: बनतो. लिंगपूजकाला हा अनुभव येतो. इष्टलिंगाला अनिमिष दृष्टीने अनुसंधान करत गेल्याने, 'मी पूजत आहे असा भाव मिटतो असे स्वत:चे ज्ञान करून घेणे हेच चिन्ह पुजण्याचे ध्येय आहे.'

शरण मग्गेमायीदेवांनी त्यांच्या एका वचनात फार मार्मीकपणे उदाहरणासह सांगितले आहे की, आरशात बघणा-या युवतीचा उद्देश फक्त आरसा बघायचा असतो का ? नाही आपले सौंदर्य व लावण्ययुक्त देहाला बघण्याचा असतो. तसेच शरण लिंगदर्पण का बघतो ? केवळ इष्टलिंगाला बघण्यासाठी नव्हे तर आपले स्वरुपसाक्षात्कार करुन घेण्याच्या उद्देशाने इष्टलिंग बघतो. त्या युवतीला आरसा समोर ठेवून घेण्याच्या आधी आरशाचा भाव असतो आरशात बघत आपले स्वरुप सौंदर्य देहभाव विसरल्यावर आरशाचा भाव नसतो. त्याचप्रमाणे इष्टलिंग धरून पूजताना सुरुवातीला तो भाव असतो. त्यानंतर चिन्ह धरुन त्या चिन्हात स्वत:चे स्वरूप पहातो. कांहीजण प्रवचन व्याख्यान करताना एक गोष्ट सांगतात. ती म्हणजे, ''बसवादी प्रमयांचे शिवाद्वैत शंकराचार्याचे ब्रम्हाद्वैत या दोन्हीत कांही फरक नाही, सुरुवातीला शरण मार्गी द्वैत भावाने साधना सुरु करतो तरी शेवटी अद्वैतावर थांबतो, त्यामुळे दोन्ही एकच. ''

शरण मार्ग व्दैत (non dual) म्हणजे परमात्म्याशी भिन्न नसलेली सामरस्याची स्थिती मानतो अव्दैत सिध्दांताला नव्हे. अव्दैत अनुभव वेगळे अव्दैत सिध्दांत वेगळे अव्दैत सिध्दांतानुसार पूजा प्रार्थना इत्यादी बहीरंग क्रियेला वावच नाही. स्वताच ब्रम्ह असल्यावर पूजायचे कुणाला? परंतू शरणांचे षस्थल दर्शन शास्त्र पूजा प्रार्थना व ध्यान इत्यादीला वाव देऊन अतिंद्रेय दिव्य अनुभवाचे भांडार उघडलेले आहे. लिंगांग योगाचा जिव्हाला असलेले इष्टलिंग केवळ सामाजिक चिन्ह न होता विविध अनुभव घेण्याचे योगसाधन झाले. अक्कमहादेवीनी आपल्या योगांग, त्रिविधी पुस्तकात मार्मीकपणे वर्णिले आहे.

अष्टावरणाचे फळ खुल्या मैदानात आसून
अष्टांग योग करून थकून जातात
दृष्टी ठेवायचे विसरलेत

अष्टावरण रुपी तत्व सर्वाना साध्य होण्यासारखे असले तरी, त्याला सोडून अष्टांगयोग करुन थकून जातात. अत्यंत सुलभपणे दृष्टीयोगाद्वारे विशेषसिद्धी असल्याचे विसरलेत.

नऊ छिद्राच्या भरलेल्या घागरीत
दिव्य मोती असतो त्याचे ठिकाण
समजून पहाणाराच खरा ज्ञानी

नऊ द्वाराची नऊ छिद्रे असलेल्या देहरूपी घागरीत, आत्मरूपी दिव्य मोती आहे. त्याच्या अस्तित्वाचे मर्म समजणाराच खरा ज्ञानी. हे दाखवून देणेच लिंगांगयोगाचे ध्येय. हे समजायला सहाय्यक व्हावे म्हणून, इष्टलिंग तळहाती ठेवून त्राटक योग करताना असे काही विशेष अनुभव येतात.

कोटी सूर्य चंद्रा पेक्षा तेजस्वी प्रकाश येऊन
उतले माझ्या तळ हाती त्यातून
पार केले मी भवसागर

कोटी सूर्य चंद्रापेक्षा मोठा प्रकाश येऊन तळहातीच्या इष्टलिंगात, समाविष्ट झाला त्याच्या सहाय्याने भवबंधन मिटवणे शक्य झाले.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous नाद-बिंदू- कला इष्टलिंगाची अवशक्ता Next