Previous इष्टलिंग दिक्षा संस्कार सर्वांग लिंगत्व Next

इष्टलिंग-चरलिंग -स्थावरलिंग

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंग-चरलिंग -स्थावरलिंग

हातात दुध असुन लोणी का शोधावे ?
हातात लिंगधरून तीर्थ क्षेत्राला का जावे ?
लिंगाचा तीर्थप्रसाद घेऊन
अन्य बोध अन्य शास्त्रे कशाला हवे ?
इष्टलिंग असुन स्थावर लिंगाला नमल्यास
कुत्र्याचा जन्म मिळेल
गुरूने दिलेल्या लिंगातच सर्व तीर्थ सर्व क्षेत्र
आहेत म्हणून समजुन मुक्त व्हावे
तसे न झाल्यास गुरूने दिलेल्या लिंगाला न मानता
तीर्थ लिंग श्रेष्ठ म्हणून गेलेल्याला घोर नर्क
चुकत नाही चन्नमल्लिकार्जुना -- अक्क महादेवी वचन १५७

शरण स्थावर लिंगपुजा मानत नाहीत. अंगावर लिंगदेव असल्यावर इतर स्थावर लिंग, क्षेत्रलिंगाला नमणे, मानत नाहीत. आपल्या लिंगाला सोडून अन्य लिंगाला नमणा-याला आक्का महादेवीनी डोळे न उघडलले कुत्र्याचे पिल्लू म्हटले आहे.

मातीचा ढिग व रोवलेल्या दगडा समोर
गळ्यातील इष्टलिंगाला झुकवुन नमणाच्या
मुर्त्यांना काय म्हणवे कलिदावाच्या देवा ?

स्थावर लिंगाला वाकून नमस्कार करताना गुळ्यातील इष्टलिंग खाली झुकते. तेंव्हा त्या मूर्ख भक्ताच्या भावनेत इष्टलिंगापेक्षा स्थावर लिंगच श्रेष्ठ दिसते. इष्टलिंग हे आमचे महापती आहेत म्हणून गुरूने दिले आहे. पतिव्रत्ता आपल्या पतीला सोडून मनात परपुरूषाचा विचार आणल्यास पातिवृत्त्याला धक्का पोचतो. तसेच शरण सतीनी सुध्दा लिंगपतीवर अढळानिष्ठा ठेवली पाहीजे. गुरूदेवानी अंगावर लिंग असावे म्हणून, धारण केल्यावरसुध्दा त्याचे पावित्र्य न जानता स्थावर लिंगाला नमण्याची गरज काय?

लिंगभक्त झाल्यावर, आपल्या अंगावर धारण केलेल्या
लिंगपूजेशिवाय दुसरेकाही समजण्याची गरज नाही
त्या लिंगात निष्ठाभावाचा संगम असावा
तो लिंगच पती आपणच सती अशी द्रढू बुध्दी निश्चित व्हावी
ते सोडून आपल्या अंगावर असलेल्या लिंगाला
कनिष्ठ समजून दिसेल मंदिरातील दगडाला.
देव म्हणून पूजणाच्या मूर्खाचे मुख बघवत नाही अखंडेश्वरा - षण्मुख शिवयोगी २९४

अंगावरले लिंग सोडून
स्थावर लिंगाला नमनायांचे मुख बघू वाटत नाही
ते कसे म्हटल्यास, आपल्या पतं
स्मरण केल्यास.. --अल्लमप्रभुदेव ९९२

तुडवल्यागेलेल्या दगडावर टोपलीभर बेलघालुन
बांधलेल्या लिंगाला झुकवून नमणारा
तो भ्रष्ट पहा सर्वज्ञ -- सर्वज्ञ

अशा अनेक वचनात बांधलेल्या लिंगाला दुर्लक्षुन, स्थावर लिंगाला मान देणे लिंगायत धर्माचा द्रोह असा भाव व्यक्त झाला आहे. त्यामुळे शरण मंटप पूजा, गणपती, लक्ष्मी इत्यादी दैवतांच्या पूजेला तत्व द्रोह म्हटले आहे. दैवांचा शिव, गंगा गौरी, वल्लभ, स्मशान विशाल, शरण पूजत नाहीत. लिंगायत धर्म पौराणिक शिवाला मानत नाही. किंवा पूजायला सांगत नाही. इष्टलिंग हे सृष्टीकर्ता परमात्म्याचे चिन्ह आहे.

रूद्र नावे एक गणेश्वर भद्र नावे एक गणेश्वर,
शंकर नावे एक गणेश्वर, शशीधर नावे एक गणेश्वर,
पृथ्वीच पीठ, गगनच लिंग असा एक गणेश्वर,
बल्लाळाची वधु मागणारा एक गणेश्वर,
काम दहन करणारा एक गणेश्वर,
ब्रम्ह कपाळ विष्णु केकाळ ठेवून खेळणारा
नीळकंठ नावे एक गणेश्वर हे सर्व
आमच्या गुहेश्वर लिंगात लपले आहेत. --श्री अल्लमप्रभुदेव: ५१२

शरणांचे काही वचन बघताना शैवांच्या शिवाचे चिन्ह स्थावर लिंगालाच यांनी सुध्दा पूजले आहेत म्हणून ही कल्पना येते. पण इष्टलिंग हे त्या शिवाचे चिन्ह नव्हे. तेव्हा शैव धर्माचा प्रभाव फारच होता. इतकेच नव्हेतर श्री बसवेश्वर, अक्क महादेवी असे अनेकशरण शिवोपासकांच्या घरी जन्मले, पुढे बसवेश्वरांची स्वतंत्र देणगी, त्यांच्या स्वानुभाव चिंतनेचे ‘फळ' होवून इष्टलिंगाची निर्मिती झाली. त्यालाच केंद्रस्थानी ठेवून समाजाचे संघटन केले गेले. अनुभव मंटपात रचलेले वचन साहीत्यच या र्धमाचे संविधान झाले.

सुरूवातीला शरणांच्या लिखाणावर शैव धर्माचा प्रभाव होता. परंतू शिवालाच परमात्मा मानत नव्हते. शिवा आणि इतर अवतारीक पुरूष परमात्म्याचे एक अंश मात्र आहेत. त्याला खालील वचन पुरावा आहे.

शैवानी बांधलेल्या मंदिरात जावेच का?
शैवानी स्थापलेल्या लिंगाला स्पर्शन पूजावेच का?
आपल्या गुरूनी दिलेल्या इष्टलिंगात शक्ती नाही
असे गैर समजून रोवलेले लिंग देईल म्हणून
जाणा-या मूर्खाला पाहून मी हसतो पोट दुखेपर्यंत.
हातात पिकलेले फळ असूनही झड चढून फांदी वाकवून
कच्चे फळ तोडणारे अर्ध वेड्यासारखे, अनादीमुळ धनी
आपल्या तळहातात, मनस्थलात असलेला स्वताला न समजता
वेगळे क्षेत्र वेगळे लिंग आहे म्हणून इतर क्षेत्राकडे जाऊन
हावतरणाच्या मुर्खाना गुरू नाही, लिंग नाही, जंगम नाही प्रसाद नाही
मुक्ती तर कधीच नाही पहा महालिंग गुरू शिव सिध्देश्वर प्रभु --तोंटद शिध्दलिंगेश्वर, २६७

हातात अमृतासमान फळ असताना खायचे सोडुन झाड चढुन कच्च्या फळासाठी व्यर्थ श्रम घेतल्यप्रमाणे आपल्यात चित्चैतन्य लिंगफळ महाक्षेत्र असताना बाहेर शोधतात. दुध असूनही लोण्यासाठी वणवण फिरायचे. इष्टलिंग असूनही तीर्थक्षेत्राला जायचा मुर्खपणा.
काही सांप्रदायवादी लिंगायत ‘मठाधीश' व विव्दान वाद घालतात की इष्टलिंग व स्थावर लिंग, यांच्यात काही फरक नाही. अंगणात ठेऊन पूजा करायची ते स्थावर लिंग. अंगावर घातल्यास तेच इष्टलिंग, त्या दोन्हीच्या अर्थ व्याप्तीत परस्पर, विरोध नसल्यास शरण, स्थावर पूजेची उग्र खंडण का केले? त्यासाठी, स्थावर लिंग, इष्टलिंग यातील फरक समजून घेणे फार आवश्यक आहे.

याच संदर्भात चरलिंगाचा विषय सांगत आहे. बसव प्रतीपादीत हा धर्म स्थावरलिंग व चरलिंग पूजायला मान्यता देत नाही. केवळ इष्टलिंग

शिवमंदिरात स्थापन केलेले स्थावर लिंग, त्याच आकाराचे लहान लिंग चरलिंग, चरलिंग हे स्थावर लिंगाचेच लहान रूप आहे.गोलाकार काळ्या रंगाचे कवच असलेले इष्टलिंग आहे. त्याच्यातला परस्पर फरक आता आपण पाहूया.

स्थावर लिंग चरलिंग इष्टलिंग
१. शैवांची उपाश्य वस्तू १. काही शैव पंथियाची उपाश्य वस्तू. १. लिंगायत धर्मियांची उपाश्य | वस्तू
२. शिवालय मंदिरात स्थापीत केलेले २. एकाच जागी प्रतिष्ठापीत नसलेले प्रवासात नेण्यासारखे. २. देहावरच धारण करायची वस्तू दिक्षेनंतर, इष्टलिंग व भक्तचे अतूट संबध असलेले.
३. ऐतिहासीक महायोगी शिवाचे साकार मानव देहाचे साकार. ३. शिवाचे साकार मानव देहाचे साकार ३. निराकार, निरावयव परमात्म्याचे साकार, गोलाकारात विशवाच्या आकारात.
४. प्रतिकोपासना ४. प्रतिकोपासना ४. अहंग्रहोपासना.
५. भिन्न भावनेने पूजा. ५. भिन्न भावनेने पूजा. ५. अभिन्न भावनेने पूजा.
६. योगाला सहकारी नव्हे केवळ भक्तीतृप्तीचे साधन. ६. योगाला सहकारी नव्हे केवळ भक्तीतृप्तीचे साधन. ६. लिंगयोग त्राटक योगाचे प्रमुख साधन
७. सार्वत्रिक उपासना वस्तू ७. कौटुंबीक उपासना वस्तू. ७. वैयक्तीक उपासना वस्तू
८. दिक्षा घेऊन पूजायचे नाही. ८. काहींवेळ मंत्रोपदेश घेतलेला असेल ८. गुरुने दिक्षानंतर इष्टलिंगाला चित्तकला भरून देतात.
९. पूजा-याच्या मध्यस्थिला वाव आहे. तो पुजतो भक्त दर्शन घेतो. ९. पूजा-याच्या मध्यस्थिला वाव आहे. ९. पुजा-याच्या मध्यस्थिला वाव नाही.
१०. अवाहन व विसर्जनाला वाव आहे. १०. अवाहन व विसर्जनाला वाव आहे. १०. अवाहन व विसर्जनाला वाव नाही
११. एकांतात बसून मनाला येईल तितका वेळ पूजा करायला वाव नाही. मंदिराला जाऊनच पूजा करावी. ११. घरात बसून मनाला येईल तितका वेळ करता येते पण योगसाधनेला उपयुक्त नाही. ११. घरात बसून एकांतात कितीही वेळ पूजा करू शकतो योगाभ्यासालाही उपयुक्त आहे.
१२.सामाजीक समानता स्थापायला सहकारी नव्हे. १२.सामाजीक समानता स्थापायला सहकारी नाही. १२.सामाजीक समानता स्थापण्याचे प्रमुख चिन्ह..

आता याचे विवरण

१) प्रथम म्हणजे स्थावर लिंग. हे शैवांची उपाश्य वस्तू. अंगावर लिंगनसणा-यांची आराध्य मूर्ती त्याच प्रमाणे चरलिंग सुद्धा कांही शैव पंथियांची उपाश्य वस्तू. इष्टलिंग हे लिंगायतांची आरध्यवस्तू. सृष्टीकर्ता परमात्म्याचे चिन्ह आहे.

२) लिंगायतांच्या अंगावर सदैवकाळी जागृत स्वप्नी सुषुवती (गाढ निद्र स्थिती) जनन, मरण, काळीसुध्दा कूडलसंगमदेवाला स्थान आहे. मातेच्या गर्भात मूल आठ महिन्याचे असताना गर्भाला 'लिंग संस्कार दिले जाते. त्यामुळे मूल लिंग संस्कारासह जन्म घेते. मृत्यूनंतरही लिंगसहच माती देण्याची.प्रथा आहे. असे लिंगासह जन्मून लिंगासह जगून शरण लिंगातच सामावतात असा भाव आहे. परंतू शैवांचे स्थावर लिंग देहातून भिन्न असून मठ व मंदिरात स्थापलेले असते. 'चरलिंग' पूजागृहात ठेवलेले असते.

अशा प्रकारे इष्टलिंगाला चैतन्यात्मक शरीरच देवालय झाले असून स्थावरलिंग व चर लिंगाला अचेतनात्मक मंदिर व पूजागृहच निवास.

३) निराकार परमात्याचे साकार रूप हे विश्व, त्या विश्वाचे प्रतिकच गोलाकार इष्टलिंग चरलिंग स्थावर लिंग हे शिवाचे चिन्ह परंतू इष्टलिंग विश्वात्माचे चिन्ह इष्टलिंग हे विश्वाच्या गोलाकारात साकार झाले असून स्थावरलिंग मानवदेहाच्या आकारात साकार झाले आहे.

४) इष्टलिंग पूजा अहंमग्रहोपासना म्हणजे स्वआत्म्याची पूजा इष्टलिंगाच्या आतील जन्मलिंग हे आत्म्याचे चिन्ह हे शांभवी मुद्रेच्या आकारात साकार झाले आहे.मुद्रा म्हणजे लिंगपूजेला बसले असताना शरण डाव्या हातात लिंग घेऊन पूजन्याचा भाव शरणाचे पद्मानच पीठ हावून. शीरच गोलक होवून लिंग धरून पुढे पसरलेला हातच पन्हाळी सारखे दिसत असल्याने या पिडांडाच्या आकारात जन्मलिंग किवा पंचसुत्रलिंग रचले गेले आहे. वरचे कवच ब्रम्हांडाचे प्रतिक असून त्यात पिडांडाच्या प्रतिकाला ठेवून एकच इष्टलिंग म्हणून कल्पून घेतले आहे. याचे विवरण पाचव्या अध्यायात आलेच आहे.

५) इष्टलिंगाच्या अनुसंधानाने सामस्य सामरस्याने तृप्ती लाभते. स्थावरलिंग व चरलिंग पूजेत लिंग व अंग समरसाला वाव नाही. इष्टलिंग हे तळहाती घेऊन पूजा करत असताना माझ्यात तू कूडलसंगमदेवा तुझ्यात मी म्हणून शरण गातो. स्थावराला समोर ठेवून बसल्यास माझ्यातून ते भिन्न हा भाव मिटत नाही.

६) लिंगांग योगाचा जिव्हाळा त्राटक योग या दृष्टी योगाचा अभ्यास करत इष्टलिंग पूजक विविध अनुभुती पावतो. याप्रकारे इष्टलिंग हे केवळ भक्तीची तृप्ती यासाठीच नसून योगाला सुध्दा सहायक आहे. स्थावरलिंग व चरलिंग केवळ भक्तीभावाला तृप्ती देतात.

७) इष्टलिंग हे वैयक्तीकडे उपासना वस्तू एकांतात पूजण्याचे साकार परंतू स्थावरलिंग मंदिरात स्थापील्याकारण ते सार्वत्रीक उपासना वस्तू असून बहिरंग पूजेलाच साधन आहे. इथे एकांतात पूजेलावाव नाही.

८) शिष्याला गुरूनी चित्कळा भरून इष्टलिंग देतात. परंतू स्थावरलिंग सार्वत्रीकरित्या मंदिरात स्थापील्या गेल्यामुळे पूजणान्याला दिक्षा घ्यायची अट नाही. चरलिंगाला कुठेही तीर्थक्षेत्राहुन किंवा दुकानातून आणुन ठेवतात. ते दिक्षेव्दारेच घ्यावे असा नियम नाही.

९) इष्टलिंग पूजण्याची आसक्ती असणारा भक्त प्रत्यक्ष पूजतो. पूजारीची मध्यस्ती नमते.

देह शुध्द झाला देवभक्ताच्या प्रसादाने
हा भावच मला जीवन ऐका लिंग पिता
प्रत्यक्ष तुम्हा पूजून भवनाश करून घेतले चन्नमलिकार्जुन - अक्कमहादेवींचे वचन

या आक्कामहादेवींच्या वचनाप्रमाणे परमात्म्याला प्रत्यक्ष पूजून भवनाश करून घेतले पाहीजे. स्थावर लिंगाला देवालयात पूजा-याव्दारेच पूजावे लागते शरणानी या पूजारी शाहीचे खंडण केले आहे.

सतीचा संग स्वताचे
इतराकडून करवणारे ?
आपल्या देवाची पूजा
आपण न करता इतर कडुन करणार?
अशी औपचारी पूजा करणारे
तुम्हाला जाणती कूडलसंगमदेवा ? - श्री बसवेश्वर वचन

पत्नीसुख व स्वताचे जेवन जसे इतराडून करू शकत नाही. तसेच परमात्याची पूजासुध्दा इतराकडून करवल्यास स्वताला आनंद मिळत नाही. पूजाच्याकडून पूजा करणारे नुसत्या अवडंबरासाठी करतात. परंतू त्यांना परमात्मा भेटत नाही. देवकृपा पावण्यासाठी आनंदाने पूजावे लागते. तिथे यांत्रीकपणे पूजणा-या पूजा-यांची गरज काय ? सामान्य पणे पूजारी मनपुर्वकपणे व देवकृपेसाठी पूजत नसून मजुरी व नैवेद्यासाठी पूजतात.

निष्ठा नसलेली पूजा भाव क्रिया
ती पूजा, ती क्रिया
चित्रातील आकृती ऊसाचे चित्र पहा
मिठी मारुन सुख नाही चघळल्याने चव नाही
पाखंडयांची भक्ती असी असते कूडलसंगमदेवा --श्री बशवेश्वर वचन १२३

अशी दांभीक भक्ती परमात्म्याच्या प्राप्तीला योग्य नाही.

नोकराने कितीही अतिथ्य केल्यास काय ?
मालक अतिथ्य न केल्यास अतिथीला राग आल्यासम
देवाला भक्तीचे प्रेम आवडते
पूजा-याची औपचारीक पूजा नव्हे
पूजा-याची निष्ठा रहीत पूजा
वावटळीत सापडलेल्या कोळयाच्या जाळ्याप्रमाणे. --पूज्य माताजी वचन

इतकेच नव्हे तर पूजारी परंपरा परावलंबण शिकवून कायक (श्रम) तत्वाचा नाश करुन जातीयतेला प्रोत्साहन देते. पूजारी स्थानासाठी बरेचडाण न्यायालयात झगडत असल्याचे आम्ही पहातो. परंतू बसवधर्मात तसे नाही. प्रत्यक्ष देवाला पूजून भवनाश करुन घेणे, या धर्माचे वैशिष्ठय आहे. पूजा-यांची ‘कुनिती'दुराशय, दुर्गुणाने, वैतागलेले जन, नास्तिक होतात. इष्टलिंग पूजेत पूजून आनंदणारा तो भक्त. परंतू स्थावर पूजेत पूजारी पूजतो भक्त केवळ दर्शन घेतो.

१०) इष्टलिंगात अव्हान विसर्जन नाही तो परमात्मा सर्वांतर्गत आहे त्याला बोल्वायचे कुठुन ? पाठवायचे कुठे ?

अव्हाणून बोलवायला कुठे आहे,
चवदा भूवने सामावून घेतलेली दिव्य चेतना ?
आणखी विसर्जून सोडताना कुठे लपते. काट्याच्या टोकावर
सुध्दा असलेली अखंड चेतना ?
नुसत्या बोलण्याचे अवडंबर ज्ञान सोडून प्रत्यक्ष आपल्या
तळहाती असलेल्या इष्टलिंगाला निरखून पाहिल्यास
तिथे आपल्या मनाला मनसंधान झालेला दिव्य निश्चय मिळून
या दिव्य निश्चयाने भेद मिटून भावैक्य होतो
यामुळे आमच्या कूडलसंगमदेवाचे शरण आव्हान
विसर्जन या दोह्नीचा जंजाळ सोडून आपापल्या
करस्थळात निश्चिल्याने स्वयंमलिंग झाले. --श्री बशवेश्वर वचन १२१५

ब्रम्हांडव्यापी असलेला इथे तिथे सगळीकडे असलेले काट्याचे टोकसुद्धा न सोडता अखंड असलेला आपल्या तळहातात मनस्थळात सदैव ठासून भरलेल्या परमात्म्याला शरण पहातो.

जगताच्या आत बाहेर खच्चून भरलेल्या
परमात्म्याला आव्हानुन बोलवुन विसर्जुन सोडायला
जागा कुठे आहे वेड्या ? असा अखंड परिपुर्ण झालेला
परब्रम्हाचे स्थान न जाणता अल्पबुध्दीने
कल्पून पूजून, कर्माच्या जाळ्यात सापडून यमाला
बळी झालेल्याना पाहून चकीत झालो अखंडेश्वरा --षण्मुख शिवयोगींचे वचन नं. २६४

अखंड झालेल्या परिपुर्ण चैतन्याला खंडीत, अपरिपुर्ण कलात्मक मूर्तीत धरुन सीमीत मंदिरात ठेवणे मुर्खपणाच आणखी एक बाब म्हणजे शरणांचा देहच लिंगाच्या लिंगचित्कळेने भरलेला असतो जिथपर्यंत त्याच्यात प्राणलिंग चैतन्य असेल तिथपर्यंत सदैव अस्तीत्व
असतेच असते.

प्राणच लिंग झाल्यामुळे आव्हानच नाही
विसर्जन नाही अंगावर विराजल्यामुळे
या कारणे आव्हान विसर्जन नाही,
शरणांची रीत वेगळी....
अंग संगच लिंग, लिंगच मन
कूडलसंगमदेवाचा शरण मुक्ताला

प्राणाचा जडागाला स्पर्श झाल्यास चैतन्य संचार होतो. तेच लिंग धतन्य सर्वांगलिंगी झालेल्या शरणाचे मनही लिंग असे तन, मन सर्वच लिंग असे असताना आव्हान विसर्जनाचा प्रश्न कुठे ? जन्मतांना आव्हान मृत्यूगर्भाला गेल्यास विसर्जन

११) इष्टलिंगच केंद्र झालेला लिंगागं योग राजयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, क्रियायोग, कुंडलिनी योग हे सर्व सामावलेले समन्वय सार झाल आहे. परंतू स्थावर लिंग पूजेत केवळ भक्तीयोग असून अंतरंग अनुसंधानाला ते साधन नाही.

इष्टलिंग अंगावर असल्यामुळे आम्ही जाऊ तिथे येते. आमच्या सोबतच असते कुठेही कोणत्याही वेळी पूजायला वाव आहे. इष्टलिंग हे मनगटी घड्याळासारखे पाहीजे तेव्हा वेळ सुचवते. असल्याजागी बघणे शक्य होते. परंतु स्थावर लिंग हे सार्वजनीक घड्याळासारखे आहे. त्याला तिथे जाऊनच पहावे लागते पाहीजे तेव्हां वेळ समजणे शक्य नाही. स्थावर लिंग एका जागेवर स्थापल्याने जाऊ तिथे घेऊन जाता येत नाही. ते जिथे असेल तिथे आम्हालाच शोधुन जावे लागते. पाहीजे तेव्हां पूजा करता येत नाही. नूसती बाह्य पूजा आचरण स्थूल क्रीया याला ओलांडून विचारपुर्वक साधनेने परात्पर पूजा केली पाहीजे ही सूक्ष्म व उच्च दर्जाची पूजा शरणांनी अशा स्थूल, सूक्ष्म, बाह्य, अंतर, पूजा लिंगामध्ये साधली
आहे. मनाला आनंद व्हावा इतकी पूजा इष्टलिंगाची करु शकतो.

परंतू स्थावर लिंगपूजेला वेळेचे बंधन व अडंकाठी आहे. स्थावरलिंगाची पूजा जड मंदिरात विशिष्ठ कालात होते. परंतू इष्टलिंगागी सद्भक्तांच्या चिन्ममंदिरात सतत क्रिया पूजा होत असते.

चरलिंग हे भिंतीवरील घड्याळासारखे, सहकुटुंब पूजायची वस्तू ती सुद्धा सदैव सोबत असत नाही काहीवेळ पूजासामुग्रीसह तेही नेल्यास पूजेव्यतीरीक्त योगाभ्यास साधनेला उपयुक्त नाही.

१२) इष्टलिंग धारणा व त्याच्या पूजेमागे आणखी एक महत्वपूर्ण ध्येय आहे. ते ध्येय म्हणजे सामाजीक समानता स्थापने स्थावर पूजक शिवभक्त. ब्राम्हण क्षेत्रीय, वैश्य, क्षुद्र इतर कोणत्याही समाजात असो त्यांच्यात परस्पर रोटीबेटी व्यवहार होत नाही. म्हणजे स्थावर लिंगापासून सामाजीक समानता शक्य नाही. गुरुबसवेश्वरांच्या पूर्वी चरलिंग धारक होते. सर्वजाती वर्णाचे लोक चरलिंग घेत होते तरी त्यांच्यात परस्पर रोटी-बेटी व्यवहार होत नव्हते इतके नव्हे दिक्षा दिलेल्या गुरुसुद्धा त्यांचेबरोबर व्यवहार करत नव्हते.

इष्टलिंगाचे प्रमुखध्येयच सामाजीक समानता. विश्वगुरु बसवेश्वरांनी इष्टलिंगाद्वारे जातीभेद, वर्गभेद, वर्णभेद व लिंगभेद (स्त्रीपुरुष भेद) नष्ट करुन कल्याण राज्याची निर्मिती केली. याप्रकारे इष्टलिंग हे सामाजीक समानतेचे प्रमुख प्रतिक झाले. स्थावर लिंग क्षेत्राबाबत सांगताना आणखी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे काही क्षेत्रात समाधिलिंगी असतात. लिंगायत धर्मात शरण लिंगैक्य झाल्यावर समाधीवर थडगे बांधतात. लिंगायतात मेल्यानंतर दहन करण्याची प्रथा नाही. समाधीस्त करतात. योग्यांच्या समाधीवर थडगे बांधुन ते लिंगैक्य झाले म्हणून थडग्यावर विभुतीचा गोळा ठेवून त्यावर कवच करतात म्हणजे हा लिंगात्मा परमात्म्यात सामावला असा त्याच्यात अर्थ आहे. लिंगायत धर्माच्या अनेक शरणांचा अनेक समाध्या या प्रकारच्या आहेत. गुलबग्र्याचे शरण बसवेश्वर, सोलापुरचे सिद्धरामेश्वर, सिद्ध गंगाक्षेत्राचे गुरु गोसला सिद्धेश्वर, सत्तुरचे शिवरात्रीश्वर इ. समाधीवरील लिंग ते समाधी लिंग आहेत. भारतात सुप्रसिद्ध असलेल बाराजोतिर्लिंग सुद्धा समाधीलिंगच आहेत. काहीजण सांगतात पण त्याबाबत निश्चितपणे समजत नाही.

बसवादी प्रथम स्थावर पूजक होते. विरोधक नव्हते म्हणूनच आपल्या वचनांकि ताला कूडलसंगमदेवा चन्नमल्लिकार्जुना इ. स्थावरलिंगाची नांवे ठेवले आणि अक्कमहादेवी, अल्लमप्रभुदेव ,श्री शैलकडे व बसवेश्वरांनी कुडलसंगमकडे, लिंगैक्य होण्यासाठी गेले असे काहीजण वाद घालतात.

गुरुबसवेश्वर, अक्क महादेवी इत्यादी शरणांनी बालपणापासून शिवोपासक होते. पुढे गुरुबसवेश्वर स्वतंत्र्य विचारसंहिता म्हटल्यावर इष्टलिंग देऊन एकदेवोपास नेला उचलुन धरले कुडलसंगमदेवा मुद्रिका प्रथमपासून वापरत होते. एकदेवता उपासना करताना म्हणजे ऐतिहासिक योगी शिवार्च वर्णन करताना कुडलसंगमदेवा लिहीले आहे. पण विचार परिवर्तन झाल्यावर किंवा सृष्टीकर्ता परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी आपली वचनमुद्रा बदलली व कूडलसंगमदेवा लिहीली.

अमुल्य तू अप्रमाण तू अगोचर लिंग तू
आदी मध्य अंच्य नसलेला स्वतंत्र लिंग तू
अयोनी संभव कूडलसंगमदेवा

या वचनात त्यानीसृष्टीकर्ता निराकार निर्गुण निरंजन परमात्म्याचे वर्णन केले आहे. साक्षात्कारापुर्वी गुरू बसवेश्वरांनी 'योगी महात्मा शिवलिंगाच आराध्य दैवत मानत होते. पण दैवी साक्षात्कारानंतर निराकार देवाचे प्रतीक म्हणून इष्टलिंग निर्मुन दिले.त्याला लिंगदेव म्हणून संबोधले याप्रकाराचे विचार परिवर्तन सर्व शरणांच्या वचनात सुद्धा पाहू शकतो.

प्रभुदेव, आक्कामहादेवी यांनी,श्री शैलकडे स्थावर लिंग मल्लिकार्जुनाची पूजा करण्यासाठी गेले नव्हते.तर तेव्हा त्यानी पारमार्थीक सिद्धीच्या अत्यंतीक स्तरापर्यंत पोहोचले होते.आपला अंतिम काळ प्रशांत असलेल्या निर्जन प्रदेशात,उत्कट ध्यानानंदात घालवावा म्हणून श्री शैलगिरीच्या प्रातांत असलेल्या 'कदळीवनात गेले. श्री गुरू बसवेश्वर सुद्धा कूडल संगमला जाण्याची चार कारणे आहेत.पहीले कारण,दोन नद्याचा प्रशांत परिसर दुसरे कारण, त्याची विद्या भूमी तपोस्थान व परिचीत स्थळ तिसरे कारण, बिज्जळानी हद्दीपार केल्याने हे स्थान त्याच्या हद्दीबाहेर होते.चौथे कारण, 'जातवेद मुनीचे उतराधिकारी देवराज मुनीप यांनी बसव निर्मित लिंगायत धर्माचा स्विकार करून अनुयायी बनले होते. त्यासाठी कुडलसंगमला आपल्या विचारधारेचा प्रसार करण्याचे केंद्र स्थापावे म्हणून गेले.

इथेपर्यंत दोन आध्यायात इष्टलिंग पूजा, मूर्ती पूजा, इष्टलिंग, चरलिंग, स्थावरलिंग याबाबत सांगितले आहे. लिंगायत धर्माचे ‘संविधान वचन साहित्य एक देवोपासना ठासून सांगतो. 'काय पूजू नये, काय पूजावे, कसे पूजावे' हे सुध्दा सांगते. ते आपण पुढील अध्यायात पाहूया.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग दिक्षा संस्कार सर्वांग लिंगत्व Next