Previous शिवाचार भृत्याचार Next

गणाचार

*

आपल्या अंतरंग बहिरंगात असलेल्या वैयक्तिक, सामाजीक, अनिष्ट व दुष्टांच्या विरूध्द आत्मविश्वासाने झगडणे, त्यांचे निमुर्लन करून सत्याचे साम्राज्य कल्याण राज्य (Kingadom of God) बांधणारी निष्ठा हाच गणाचार.

दौर्जन्याला सौजन्याने, हिंसेला अहिंसतेने, द्वेषाला प्रेमाने आत्मस्थैर्याचे शस्त्र धरून विजय मिळवणे हाच गणाचार.

हे कौर्य नव्हे तर शौर्य, दौर्जन्य नव्हे धैर्य. यात समाज सुधारणेची कळकळ आहे. विनय-विरत्वाची एकता आहे. वीरात नसलेला विनय, विनय नसलेले वीरत्व म्हणजे क्रूरपणा. या दोन्हीचा समन्वय व्हावा.

समाजात अनेक अन्याय, अत्याचार घडत असतात. जातीयता, आर्थिक समानता, सामाजिक शोषण इत्यादी भ्याडपणाने सहन करीत गेल्यास समाज नरक सदृष्य होतो तेव्हा काही जणांना गणाचार तत्वाप्रमाणे झगडावे लागते.

“तत्वासाठी झगडते वेळी मरण आले तरी महानवमी समजेन'' असे बसवेशानी म्हटले आहे. (ब.व.६९८)

मरणाला, समाजाच्या निंदा, नालस्तीला न भिता झगडणेच गणाचार. असा तत्वनिष्ठ, सत्यशोधक गणाचारी हाच खरा लिंगायत होय.

आजही काही ठिकाणी समाजात दिसून येत असलेले ’मुळ्ळाविगेय कायक' ’तेक्केय कायक’ ही तेव्हांच्या गणाचार तत्वाची प्रतीके होत.

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous शिवाचार भृत्याचार Next