लिंगायत धर्मगुरु निष्ठा | इष्टलिंग दिक्षा संस्कार |
गुरुत्व योग्यतेने; जातीने नाही. |
✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि
दिक्षा घेऊन लिंग धारण करणा-यात भेद करु नयेत हाच शरणांचा संदेश एखाद्या व्यक्तीचे मुल्यमापन करायचे झाल्यास जातीने नव्हे तर त्याच्या सद्गुणाने करावे, असे गुरु बसवेश्वरांनी सांगीतले. पण आज लिंगायत समाजात धर्माचे मुळ संविधान नियम सोडून काही जाती उपजातीच्या कल्पनेने भांडत आहेत ही दुदैवाची गोष्ट आहे.
ब्राम्हणापासून दलितापर्यंत कोणत्याही जातीचे असो ते लिंगदिक्षा घेऊ शकतात. स्वामीत्वाची योग्यता असल्यास गुरुसुद्धा बनू शकतो स्वामी किंवा विरक्तही बनू शकतो. असे बसव धर्म सिध्दांत ठासून सांगतो. अंगच लिंग जीवच शिव होतो म्हणून षस्थल दर्शनात म्हटले जाते. जीव स्वामी बनू शकतो म्हणून वेगळे सांगण्याची गरज नाही. स्वामी होण्याचा हक्क प्रत्येकाला आहे.परंतू त्याग वैराग्य सम्यक्ज्ञान दिव्यानुभव दृष्टी समाजा बाबत कळकळ उपदेश करण्याची शक्ती इत्यादी योग्यता असणारे कुणीही असले तरी स्वामी बनू शकतात. अशी घोषणा करुन बसवादी शरणांनी विश्वधर्माला पाया घालून दिला आहे. वर्णाश्रम धर्मात ब्राम्हणच फक्त गुरु होवू शकतो. क्षत्रिय व वैश्य केवळ भक्त बनू शकतो शुद्राला स्वामी व्हायचा हक्क नाही. भक्त सुद्धा व्हायचा हक्क नाही. पण बसवधर्मात तसे नाही. इथे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, पंचम, अस्पृश्य या सर्वानांच स्वामी व्हायचा हक्क आहे. त्यांच्यात योग्यता असेल तर, प्रत्येकजण भक्त होवू शकतात. त्यापेक्षा योग्यता असल्यास गुरु होवू शकतो, त्याही पेक्षा योग्यता असल्यास जंगम होवू शकतो. भक्त, गुरु, जंगम, हे जातीसूचक शब्द नव्हे. तत्ववाचक पद आहे. हे लक्षात ठेवले. पाहीजे अशा विशाल तत्वाच्या पायावर उभ्या असलेल्या विश्वधर्म होण्याची योग्यता असणा-या लिंगायत धर्मात आज जातीभावना घुसून धर्म लोप होत आहे. स्वामी होणारे अशा विशिष्ठ जातीचे असावेत. अशा विशिष्ठ जाती मतात जन्मलेलेच महेश्वर, जंगम. उरलेले सर्व भक्तांचे स्वामी होण्याचे वाव नाही. महेश्वरच स्वामी होणे योग्य आहे. म्हणून काही लोक सांगतात हे लिंगायत धर्माच्या विरूध्द आहे. इतकेच कशाला आता महेश्वर म्हणवणारे विशिष्ठ जातीयांनाच मठाधिकारी बनवण्याचा स्वार्थ सांप्रदाय रुढ होत आहे. ही दुर्देवाची बाब आहे. याच्यामुळे समाजात एकजुट वाढणार नाही. प्रतिभावंत त्या पदाला जाणार नाही. त्यामुळे जाती जातीचे वेगवेगळे गुरु होऊन आतापर्यंत अनहित झाले आहेत. पुढे असे होऊ नये अशी इच्छा असल्यास पोट जाती तोडल्या पाहीजेत. होऊ इच्छिनाच्या प्रत्येकाला स्वामी व्हायचा हक्क असावा.
इष्टलिंग दिक्षा संस्कार गृहस्थींनीसुद्धा पोटजातीचे भेद तोडून परस्परात रक्त संबंध केले पाहीजे. असल्या जातीचे स्वामी व्हावेत म्हणून कोणत्याही शास्त्रात किंवा सांप्रदायात नाही. लिंगायत मठाला सर्व जातीचे स्वामी होत आलेत सातशेहे सत्तर अमर गणात ब्राम्हणापासून भंग्यापर्यंत सर्वजातीचे होते हे जग जाहीर आहे. आजसुद्धा अनेक भक्त मठाधिकारी होऊन स्वामी बनलेले आपण दाखवू शकतो. समाज सर्वांग सुंदरपणे वाढवायचा असेल तर प्रत्येकातली जातीय दृष्ठी मिटून दिव्यानुभव दृष्टी आली पाहीजे. शरणानी म्हंटलेली धार्मीक समता म्हणजे काय ? याबाबत योग्यरीतीने लोकांनी समजून घेतल्यास हा उच्च, निच्च भाव जाऊन समानता येईल असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
इष्टलिंगदिक्षा संस्कार घेऊन लिंगायत झाल्यावर त्या व्यक्तीची पुर्व जात व उद्योग न विचारता त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार निसंकोचपणे केले पाहीजे.
पट्टाभिषेक केल्यावर लक्षण शोधणार का ?
लिंगदेवाला पूजून जात विचारणार का?
लिंगदेवा भक्त काया मम काया झाल्यामुळे --धर्म गुरु बसवेश्वर ८३८
देवा देवा
विप्र आदी होऊन, दलीतापर्यंत
सर्व लिंगभक्तांना समान मानतो
ब्राम्हणापासुन, भंग्यापर्यंत सर्व भवीयांना समान मानतो --गुरु बसवेश्वर ७१०
जेवताना, नेसताना क्रिया मिटले म्हणतात
देण्या घेण्यात जात शोधतात त्यांना कसे भक्त म्हणावे?
त्यांना कसे युक्त म्हणावे ? -- गुरु बसवेश्वर ६२७
गुरु बसवेश्वरांच्या अभिप्रायानुसार दिक्षा घेतल्यानंतर जाती शोधायच्या नाहीत. ब्राम्हण असो दलीत असो सर्वांना समान समजले पाहीजे. जंगमदिक्षा घेतल्यानंतरही, त्यांच्यात पुर्वाश्रय शोधू नये म्हणून ते सांगतात.
आचार समजा विचार समजा
जंगमस्थळ लिंग पहा
जातभेद नाही, सूतक नाही
अजात्याला जात नाही --गुरु बसवेश्वर ४१७
Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.
लिंगायत धर्मगुरु निष्ठा | इष्टलिंग दिक्षा संस्कार |