साक्षात्कार | लिंगाचार |
लिंगाग योगियांचे बहीरंग जीवन |
✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि
केवळ यांत्रीकपणे पवन भेदून व कुंडलिनी जागृती होऊन बहीरंग जीवनात क्रियात्मक परिवर्तन न झाल्यास ते फक्त शारीरिक कसरत (व्यायाम) होईल अध्यात्मीक साधना नव्हे. शरण सांगतात., 'बघणे शक्य नसणारा अप्रमाण, अगोचर लिंगदेव तळहाती आल्यावर तो लिंगभक्त सदाचार संपन्न होवून, शरीरातील मोह मनातील अहंकार मिटले पाहीजेत, प्राणात निर्भय मनात निरपेक्षता व विषयात उदासीनता आंगीकारली पाहीजे.
अंगावर लिंगधारण केल्यास, सर्वांगाचे विकार सोडावेत
लिंगाला करंडक व शिवदोरा त्रिकरण शुद्धी हीच शीख
देहच करंडक, आचारच शिवदोरा, कोणता म्हणजे
हे त्रिगुण समजून त्रिगुण संपन्न व्हावे
या त्रिगुणापर्यंत पोहोचून लिंगार्चना करावी
अंग लिंगसंबधाला हाच क्रम कूडल चन्न संगमदेवा : --श्री चन्न बसवेश्वर ९०६
लिंगधारण केलेल्या भक्ताचा देहच देवाला करंडक व्हावे तो सदाचारच शिवदोरा व्हावे.
अंगत्रयात लिंगत्रय सामावल्यावर सर्वांगही देवाला मंदिर व्हावे त्यासाठी लिंगस्पर्श केलेले शरणांचे हात लिंगासाठीच राखीव असावेत. ते परधन, परसती, परदैवताकडे वळू नये, परिहंसा करु नये. सदाचार, सद्गुण संपन्न व्हावे. हेच इष्टलिंगाचे ध्येय आहे. हाच शरणांचा नीती धर्म असा सदाचार आपल्या जिवनात न अंगीकारल्यास लिंगपूजकाची पूजा व्यर्थ म्हणून शरणानी म्हंटले कोपीशनी लिंगाला अंघोळ घातल्यास ती रक्ताची धार, पापी फूल चढवल्यास तिक्ष्ण शस्त्राचा धाव. बोलण्यात जागृती असली तरी, वागण्यात विसंगती झाल्यास हातातील लिंगाचे सर्प होईल म्हणून शरणानी सांगीतले आहे. भयभक्ती जागवून चालण्याप्रमाणे बोलण्यास शिकवले आहे. आशा न सोडल्यास रोष न मिटल्यास लिंगाला अंघोळ घालून उपयोग नाही. शंभर ग्रंथ वाचून शंभर गोष्टी ऐकल्या तरी, बोलल्याप्रमाणे मन नसल्यास अशा अवडंबर भक्ताला देव कधीच मानत नाही म्हणून शरणानी स्पष्टपणे सांगीतले आहे. सज्जन होवून अंतकरणाच्या दयारसाने लिंगाला अंघोळ घालणे व शांततेने देवाला जाऊन स्तूती करून पुजा करावी म्हणून म्हंटले गेले आहे. दुष्ट इंद्रिय रुपी लाकुड जाळून त्याचे भस्म लावावे सम्यक दृष्टी यावी म्हणून कूडलसंगमदेवाला रुद्राक्षी धारण करावे परमशांती गुण द्यावे म्हणून गंध लावावे कर्म मिटावे म्हणून अक्षता अर्पण करावे.
तीन प्रकाराचे मळाचा नाश व्हावा महणून त्रिदल बेल अर्पण करावे देहाचे सर्व दुर्गुण जहन भस्म व्हावे म्हणून धुप समर्पण करावे भक्तीच्या प्रकाशात देहाचा अंधार मिटावा म्हणून आरती ओवाळावी. प्रतिदिनी अन्न पुरवणा-या देवाला कृतज्ञतेणे नैवेद्य करावे शरीर मन धन गुरु लिंग जंगमासाठी. राखिव ठेवण्याच्या भावनेने अर्घ्य द्यावे. शरणांचे तत्व प्रसार करण्याचे ध्यैर्य द्यावे घंटानाद करावे त्यानंतर कृतज्ञता भावनेने शरणार्थी समप्रण करावे असे शरणानी लिंगपूजचा सांगीतला आहे.
वारुळात मारल्यास साप मरेल का ?
अघोर तप केले तरी काय
अंतरंगी आत्मशुद्धी नसल्यास --धर्म गुरु बसवेश्वर ११७
गुरु बसवेश्वरानी या वरील वचनात सांगीतले आहे की अंतरंगशुद्धीच पूजेचा परिणाम आहे. हे न साधता कितीही वर्षे तप केले तरी सार्थक नव्हे. कोणकोणते सद्गुण असल्यास, लिंगदेव आपल्याकडून कोणती वस्तू स्विकार करतो.
याबाबत अक्कामहादेवीनी’‘तन न विरघळणा-यांच्यात 'अंघोळ न घेणारा तू' या वचनात(वचन नं. १८७) फार मार्मीकपणे सांगीतले आहे. काअही सद्गुण अंगिकारल्यावरच परमात्मा पूजा स्विकारतो कारण, शरणांचे बोलणे-वागणे, आचार-विचार सर्वातच सत्य सदाचार दैवी भाव अंगीकारले पाहीजे. अशी सर्वांग शुद्धी अत्यावश्यक आहे.
Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.
साक्षात्कार | लिंगाचार |