Previous इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा क्रांतीकारी इष्टलिंगाचा उगम Next

लिंगाचे स्वरूप

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

लिंगाचे स्वरूप

लिंगपदाचा अर्थ व्यापक आहे, त्याचा सामान्य अर्थ चिन्ह, प्रतीक असे सांगू शकतो. शिवपुराणात, लिंग हे ॐ:कार म्हणून वर्णीत झाले आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारे ॐ:कार प्रणव हेच लिंग म्हणून शिवपुराणात सांगीतले आहे. ॐ:कार हेच ब्रम्ह म्हणून भगवगिता पटवून देते, अव्यक्त गोष्टींचे ज्ञान करुन देणारे हेच लिंग, लिंग म्हणजे, जननिंद्रिय. लिगपूजक म्हणजे जननिद्रियाचे चिन्ह करुन पूजणारे, म्हणून काही पाश्चिमात्याने म्हंटले आहे. शैवविरोधी, वैष्णव संस्कृतीच्या कांहीनी सुद्धा अशी अवहेलनात्मक विधाने केली आहेत.

लिंगम्, परमात्म् चिन्ह म्हणून संहिता प्रतिपादिली आहे. लिंग, म्हणजे परमात्मा, परब्रम्ह हा एक अर्थ आहे. लिंग म्हणजे प्रतिक किंवा चिन्ह हा एक अर्थ आहे.

लिंगायत धर्मात, लिंगपदाचा वापर

वचन वाड.मयात, ‘लिंगदेव' हा शब्द परमात्म्याला संबोधण्याचे संकेत आहे. वचन वाड.मयाच्या दृष्टीने लिंगायत धर्म किंवा तत्वशास्त्रामध्ये लिंगाची अर्थव्याप्ती पाहूया.

लिंग हे संस्कृतपद आहे. याला, 'मग्गे मायीदेव' शरणांनी आपल्या 'शिवानुभव, सुत्रामध्ये, खालीलप्रमाणे व्याख्या केली आहे.

लियते, गम्मते, यत्रयेन, सर्वम्सचराचरम्:
तद् तल्लिंग, मित्यक्तुतंम् लिंग तत्व परायणैः

ही दिसणारी सचराचर सृष्टी, कशातून निर्माण झाली, कुठे विकसीत झाली, कुठे लय होणार हेच लिंग. म्हणून मायीदेवानी व्याख्या केली, उत्पत्ती,स्थीती, व लय याला कारण असलेल्या अव्यक्त चेतनेलाच, 'लिंग' म्हंटले जाते.

लिकारच शून्य, बिंदूच लिला
ग कारच चित्, या त्रीविधात आहे
लिंग रुपी रहस्य, ते जे समजून घेतात
तेच लिंग संगी, कुंडल चन्न संगमदेवा
लिंगानुभावी, यांचे चरणी, नमो, नमो, नमो म्हणतो -- 'श्री चन्नबसवेश्वर' ७८७

लिंगाचे मर्म समजून आचरण करणा-यां लिंगानुभावींना चन्नबसवेश्वरांनी शरणू (नमस्कार) केले आहे.

लिंग हे पराशक्तीयुक्त
लिंग हे परशिवाचे खरे शरीर
लिंग हे, परशिवाचे घन तेज
लिंग हे परशिवाचे निरतिशयानंद सुख
लिंग हे परशिवाचे परमज्ञान
लिंग हे स्वत:च, परशिव
लिंग हे स्वत:च जडध्वमय जगजन्मभूमी
लिंग हे स्वत:च अखंडीत अभेद सौंज्ञा
लिंग हे, हर-ब्रम्हाला जोडलेले,
ज्योतीर्मय लिंग, श्रुती , आलयम्
सर्वभूतानाम् लयानाम् लिंगमुच्यते, म्हंटल्याप्रमाणे,
हे लिंगाचे मर्म उरीलिंग पेद्दिप्रिय
विश्वेश्वर लिंगात, हे जाणणाराच, शहाणा! -- उरीलिंग पेद्दी

'लिंग', या शब्दाचा अर्थ अनेक त-हेने करु शकतो म्हणून, उरीलिंग पेद्दी सांगतात लिंग हे पराशक्ती युक्त, परमात्म्याचे प्रतीक आहे! परमेश्वर हे, 'प्रकाश', आनंद', व ज्ञानाचे माहेर असे हे शब्द सांगतात, लिंग म्हणजे, 'लिंगदेवच'. षट्तत्वयुक्त जगाला लिंग हीच जन्मभूमी, परमात्मा, हरीहरातील 'ज्योती स्वरूप आहे.

असे ‘लिंगपद', 'परमात्मा' सूचकपद, म्हणून स्पधृपणे ध्वनीत होते.

लिंग हे सर्व कारण निर्मळ
लिंग हे सच्चिदानंद नित्य परिपूर्ण
लिंग हे सर्व लोकोत्पतीचे कारण
लिंग हे सर्व तत्वपूर्ण खरे चैतन्य
लिंग हे भवसागर पार करण्याची नाब
लिंग हे शरणाच्या हृदयात प्रकाशणारे ज्योतिर्मय लिंग,
अशा लिंगाचे मर्म जाणणारेच, खरे गुरु,
स्वतंत्र शिध्द लिंगेश्वर,

लिंग अर्थात 'लिंगदेव', सर्वकारण निर्मळ आहे, म्हणजे स्वत: विकार न होता, सर्वनिर्माण करता, सर्वात्म अदिकारण मूळशक्ती आहे. ही सत् चित् आनंद नित्य परिपूर्ण आहे. सर्व तत्वाला आशयभुत, चैतन्यस्वरुप', 'प्रकाशस्वरूप', 'लिंगदेव', सर्वाच्या हृदयात, आत्मस्वरूपात आहे.

‘भवसागर’ पार करण्याची नांव म्हणजे, जन्म व मरण यातून सोडवण्याची शक्ती याच्यात आहे. म्हणून स्वतंत्र शिद्धलिंगेश्वरानी म्हटलेआहे.

असे सर्व वचनकारानी परस्पर वस्तूला, 'लिंग', किंवा 'शुन्य, निशुन्य' नांव दिले आहेत. शुन्य म्हणजे काही नसल्याचे नव्हे, तर सर्व असल्याचे प्रतिक आहे. काही नसल्याचे हे बौध्य तत्वाचे शुन्य तर नसल्याचे असणारे लिंगायत तत्वाचे शुन्य हे परिपूर्ण आहे. त्याला 'अंगिकारणे', म्हणजेच शुन्य संपादन. तेच लिंगायत धर्माच्या योगाचे ध्येय.

अमुल्य,अप्रमाण, अगोचर लिंग
आदि, मध्य, अंत्य नसणारे स्वतंत्र लिंग
नित्य निर्मळ लिंग,
अयोनी संभव आमचा कूडलसंगमदेव
श्री बसवेश्वर १२३७

बसवेश्वरांनी, 'लिंग' या पदाचा तात्वीक अर्थ स्पष्टपणे सांगीतला आहे. परमात्मा अमुल्य व अप्रमाण आहे. लौकिक प्रमाणाद्वारे पटवून देता येणार नाही, पाच इंद्रियाच्या अनुभवाला सापडणार नाही. अंत्य नसलेला, परावलंबी नसणारा स्वतंत्र नाश नसणारा अविनाश कामक्रोधादी नसणारा निर्मळ तो माता पित्यापासून जन्मलेला नव्हे. असंभव अजात आहे. अशाप्रकारे लिंगाचा अर्थ आहे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा क्रांतीकारी इष्टलिंगाचा उगम Next