Previous इष्टलिंगाची अवशक्ता लिंगांग योग व अनुभव Next

लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण

लिंगदिक्षेद्वारे इष्टलिंग घेतल्यानंतर आता लिंग योगाभ्यासात शरण मग्न होतो. असे लिंगांगयोगाचे(शिवयोग) प्रमुख लक्षण काय ? साधनेचे स्तर कोणकोणते ? याबाबत आता पाहूया.

युज्य धातुने योग शब्दाची उत्पती झाली आहे. युज्य धातुचे मुलार्थ मिलन होणे संयोग होणे, संगम होणे. मिसळणे हेच आहे. परमात्म्याला मानणारे धर्म मते सिद्धांतानुसार मानव व देवाचे मिलनच योग, जीव परमात्म्यात सामावणे हाच योग, मानव, लिंगदेव, अंग, लिंग यांना एकत्र करण्याचे साधन म्हणजेच योग. सर्व धर्माचे सिद्धांत एका ध्येयाला समजाऊन देतात. त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

उदाहरणार्थ सांख्य दर्शनानूसार देव ही व्याख्याच नाही. तिथे असते प्रकृती व आत्मा त्यासाठी तिथे प्रकृती पासून आत्म्याला सोडवणे हेच योगाचे ध्येय आहे. व्दैत सिद्धांतानुसार परमात्मा परमधामध्ये आहे. जीवी सालोक्य समिप्य स्तराद्वारे मोक्ष पावतात. लिंगायत धर्माच्या लिंगांगयोगानुसार कोणत्यामुळातुन जीवाने आपले प्रयाण सुरु केले आहे. शेवटी त्यात सामावणे हेच ध्येय आहे. नदी समुद्रात सामावल्या सारखे जीवाने परमात्म्यात सामावुन जावे. आगीत टाकलेल्या कापरासारखे, लिंगदेवात समरस व्हावे.

भारतात सांप्रदायानुसार पाच योग आहेत. सुधारणावादीधर्मानी सांगीतले अनेक योग वाढत आले आहेत. आत्म्यात मुलत: पाच शक्ती आहेत. आत्मा स्थूल शरीरात येताच या शक्तींची हलचाल दिसून येते. पाच शक्ती कोणत्या म्हणजे क्रियाशक्ती, प्राणशक्ती, ज्ञानशक्ती, बुद्धीशक्ती व भावनाशक्ती. क्रियाशक्तीच्या विकासासाठी त्याच्या आधारावर रुपीत झालेले योग, हटयोग(व कुंडलीनी योग) ध्यान शक्तीच्या आधारशक्तीवर रुपीत झालेले योग. भक्तीयोग ध्येयाप्रत चालण्यासाठी हा योग मार्गासारख असून बुद्धीशक्ती, ध्यानशक्ती व भावनाशक्ती ही वाहनासारखी आहेत.

या सर्व शक्तींचे आश्रयस्थान केंद्र आत्माच आहे. या सर्व शक्ती विषया सक्तीमडे मन वळविल्यामुळे, व्यर्थ होत आहेत. हेच दैवी मुख होवून वाहील्यास म्हणजे योगाद्वारे उद्दाती करण झाल्यास सार्थक होते. इतकेच नाही तर मानवाच्या मुक्तीला सहाय्यक होते. कोणताही एक मार्ग वाहनात बसून एकाच ध्येयाकडे निघाल्यास, तिथे पोहोचणे शक्य आहे. उदा.-पाच रस्त्याचे वर्तृळ आहे असे समजू या, एक व्यक्ती मारूती कार मधून एका रस्त्याने येते. दुसरा टांग्यातून येतो, तिसरा स्कुटरवरून येतो आणखी एकजण रिक्षातून येतो व पाचवा पायी चालत येतो ते सर्वजण त्या वर्तुळात येतात.

एक मोठे रेल्वे जंक्शन आहे. वेगवेगळे रुळ तिथे जमतात. कोणत्याही दिशेकडून आल्यास या जंक्शनात आम्हीही येतो, त्याच पद्धतीने आत्मा रुपी केंद्र वर्तुळातून पाच शक्ती निघत असून या कोणत्याही शक्तीचा विकास करून घेतले तरी त्याच्या सहाय्याने आत्मारूपी वृत्ताकडे जाणे शक्य आहे. इथे एक विषय आम्ही पाहू शकतो ते म्हणजे व्यक्ती कोणत्याही योगावर अवलंबीत असो. इतर अंश तिथे पोषक होवून असतातच असतात. उदा.-मिराबाई स्वभावतः ती भक्तीयागीणी होती तर तिच्यात ज्ञान व कर्म पोषक होते. गांधीजी कर्मयोगी होते. पण त्यांच्यात भक्ती व ज्ञान पोषक रुपात आहेत. शंकराचार्य ज्ञानमार्गी होते. पण त्यांच्यात सुद्धा थोडे तरी भक्ती व कर्म पोषक रुपात होते.

या योगात आपण कोणत्याही एका योगाचा अवलंब केल्यास, एका घटकाचा विकास होईल कर्मयोगामुळे, अन्नमय कोष, झालेल्या शरीराला, हटयोगातून, प्राणमय कोषाला, ध्यान योगातून मनोमय कोषाला ज्ञानयोगातून विज्ञानमय कोषाला, भक्तीयोगातून आनंदमय कोष ह्याला असे संस्कार होतात.

१. बसव योग समन्वय योग

इष्टलिंग निर्माते बसवेश्वरांनी एक नविन वैशिष्ठपूर्ण समन्वय दृष्टीचा योग सांगितले, तोच लिंगाग योग. तो गुरु बसवेश्वरांनी दिल्यामुळे त्याला बसवयोग म्हणतात. ज्ञान,भक्ती, कर्म, इत्यादी योगामुळे एकेका अंगाला संस्कार होतात. पण पाची तत्वांचं संयोग करून सर्वागीण संस्कार देण्यासाठी त्यानी नवीन योग दिले.

बसवांच्या योगातून कल्याण झाले लोकांचे
चांगल्याप्रकारे बसवेशाना आम्ही शरण गेल्याने भव
नाश होणार बसवेशा, बसव पिता शरणार्थी म्हणत
बसवा मी जगलो योगीनाथा -- सिद्धरामेश्वर

इष्टलिंग पुजेलाच जिव्हाळा करुन घेतलेला लिंगागयोग किंवा बसव योग भारतीय विविध योगातील श्रेष्ठांश पावून परिपूर्ण योग झाला आहे. ते योग वेगवेगळे घोड्यासारखे असून हे पाच ही जूपलेल्या रथा सारखे आहे. साधना मग्न झालेला जिवात्माच रथीक परमात्म्यावर विश्वास हेच सारथी, परत्माच अंतीम ध्येय. या नवीन योगाला बसवयोग म्हणून शरण, सिद्धरामेश्वरानी संबोधीत केले आहे. नूतन व आधूनिक असलेला हा योग मागच्या प्रचलित योगाचे समन्वय रुपच असले तरी या सर्वांपेक्षा विशेष व भिन्न आहे. शैव परंपरेत येणारे शिवयोगातून याला काढून विचार स्पष्टतेसाठी यालाबसवयोग म्हणूनच संबोधावे. षठस्थलदर्शनाला मूळ पाया कारुन घेतलेल्या इष्टलिंग पूजाच जिव्हाळा झालेल्या या योगात इतर योगांचे प्रमुख अंश कसे समावेश झाले आहेत ते आपण पाहूया. आराध्य वस्तू इस्टलिंग ठेवून घेवून, पूजेला बसणा-या साधकाला पद्मासन सिद्धासन, स्वस्तिकासन, सुखासन, यांच्यात एकाची सिद्धी आवश्यक आहे. हा हट्योगाचा एक अंश आहे. त्यानंतर अष्टविधार्चन करताना, भक्ती योगाचा गाभा पाहू शकतो.

अष्ट विधार्चन करून (भक्तीयोग)
केलेली पूजा बघायची ( त्राटक योग ध्यान योग)
दिव्य तत्वगीत गायचे
देवाच्या समोरच संतोषायचे
भक्ती संभाषण करायचे
आमच्या लिंगदेवात विलीन व्हायचे (लिंगाग योग) --गुरु बसवेश्वर १७५

पुजेच्या दुस-या भागाच्या या लिंगस्तवनामध्ये देवाचे व त्याच्या अनुभवाचे स्वरूप गाताना त्या ज्ञान योगाची जाणीव करून देते. लिंगसंधानामध्ये प्राण चलनाचे नियंत्रण दृष्टीयोग दोन्ही मिळून कुंडलिणी लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण शक्तीला जागृत करतात. लिंगध्यानामध्ये अंतरत्राटक, मंत्रध्यान, मनोर्लय, हे तिन्ही मिळून, संपूर्ण ध्यान योग साधते. लिंगोदक लिंग प्रसाद परमात्म्याच्या कारूण्याचे प्रतिक म्हणून स्विकारले जाते. असे बसवयोगात भक्तीज्ञान व साधनेला पूर्ण अनूकूल आहे.

संपूर्ण जीवनच एक होवून तपश्या होवून दैवीकरण झाले पाहीजे. कायकाविणा (श्रमाविणा)जीवन साधना व्यर्थ म्हणून शरणानी सांगितले आहे. इथे आपण कर्मयोगाची पराकाष्टा पाहू शकतो. कायकयोगी भक्तीयोगी ज्ञानयोगी, ध्यानयोगी, हटयोगी, कुंडलिणी योगी, या सर्व नावानी संबोधले तरी लिंगांगयोगी या सर्वापेक्षा अलिप्त आहे.

२. भक्ती, ज्ञान, क्रिया समन्वय

'बसवयोग' हे भक्ती ज्ञान व क्रियांचे समन्वय सांगितले आहे. भक्ती नसलेले ज्ञान हे शुष्क ज्ञान आहे. भक्तीयुक्त ज्ञान हेच 'सुज्ञान भक्तीवीना आचार सुष्काचार भक्तीसहीत आचरच सदाचार, तसेच ज्ञान नसलेली भक्ती मुड भक्ती ज्ञान सहीत भक्ती, ही सद्भक्ती. ज्ञान नसलेला आचार, कंदाचार, ज्ञानसहित आचारच, सदाचार, आचार असलेले ज्ञान वाकजाल, आचार सहीत असलेलेच सुज्ञान, भक्तीक्रीया, ज्ञानाचा समतोल, असलेनेच जीवन सर्वांग परिपूर्ण होते.

कोणताही एक पक्षी गगणात उडण्यासाठी त्यानी बाजूला 'पंख' व मागे शेपटी पाहीजे. याच प्रमाणे जिवात्मारूपी पक्षाला, आद्यात्मरूपी गगणात उडण्यासाठी त्याला ज्ञान प्रियारूपी दोन पंख भक्तीरूपी शेपटी हवीच. असे साधकाला सुरवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे, सिद्धी मिळाल्यानंतर ही ह्या तिन्हींचा समतोल पाहीजेच पाहीजे.

३. मर्त्य लोकची महती

लिंगांग योगी आद्यात्मसिद्धी घेतल्यानंतरही जीवन व जगताला विन्मुख होण्याची गरज नाही. होवू नये कारण,

मर्त्य लोकही कत्र्याची टांकसाळ आहे.
इथे प्रिय असणारे तिथेही प्रिय असतात,
इथे प्रिय नसणारे तिथेही प्रिय नसतात
कूडलसंगमदेव --गुरु बसवेश्वर १५५

श्री बसवेश्वरांच्या तत्वज्ञानांच्या दृष्टीत हे मिथ्या नव्हे, माया नव्हे, हा उद्देश मानायला आणखी एक कारण हे असावे.

लिंगायत धर्माचे केंद्र असलेल्या इष्टलिंग विश्वाच्या आकारात विश्वात्म्याचे प्रतिक आहे. तरी विश्वात्म रूपी साद्य पावण्यासाठी हे विश्व एक साधन आहे. साधनातून साद्य मिळविताना साधनेचा तिरस्कार करणे योग्य नाही. पुस्तक रूपी साधनातून अपारज्ञान साधल्यावर त्याच पुस्तकाचा तिरस्कार अविवेकी वृत्ती आहे. त्याच प्रमाणे शरणांनी विश्वाच्या आकारात लिंगदेवाची पूजा केल्याने त्यांना विश्वात्म्यासारखे विश्वसुद्धा गौरवात्मा झाले. जगतमिथ्या न होता सत्य झाले. कत्र्याचे टांकसाळ झाले. सर्व आत्म्यांना परिपूर्ण करणारे कार्यागार झाले. विश्वच पूज्य झाल्यामुळे विश्वाचे सर्व सचराचर वस्तू शरणांच्या दृष्टीत मंगलमय झाले. त्यासाठी शरणांनी सकल जीवात्म्यांना कल्याण इच्छुन विश्व कुटुंबी बनले. विश्वच त्याचे घर बनले. मानव कुल सर्व त्यांचे परिवार झाले दया हेच धर्माचे मुळ म्हणून विश्वाच्या जीवराशीना प्रेम दाखवून अहिंसा सांगीतली त्यासाठीच लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण हा, लिंगायत धर्म, विश्व धर्माचे लक्षण आहे.सर्व धर्म समन्वयतेचे सुदर तत्व असलेले वचन साहित्याचे,अध्ययन व्यवस्थितपणे करून प्रचार केल्यास,हा लिंगायत धर्म राष्ट्रधर्म होवून देशाच्या सर्व समस्याना परिहार देवू शकतो,इतकेच नवे तर विश्वधर्म होवून समस्त मानव जातीला मार्गदर्शक बनू शकतो.

४. शरीराची महती

शरणांना ब्रम्हांडासारखे पिडांडसुद्धा आदरणीय आहे. लिंगदेवाची करूणा मिळवण्यासाठी आलेल्या प्रसाद कायेला विटाळु नये,म्हणुन आत्मा वास केलेल्या या देहाबाबत गूरू बसवेश्वराना, आदरभाव आहे. काही वेदांतीजन देहाला मिथ्या व हीन समजूनदुर्लक्ष्य करतात. पण शरणजण देवाची करूणा मिळवण्यास आलेल्या कायेला न विटाळता लिंग मुखातूनसर्व 'शुद्ध प्रसाद' घ्यावे, असे सांगतात. मग्गेमाइदेव एका वचनात सांगतात की देहाला अनावशकपणे विटाळल्यास कोणताही पुरूषार्थ साधणे शक्य नाही. "Strong mind in a Strong body ''म्हणून स्वामी विवेकानंदानी सांगितले आहे. सदृढ शरिरातच पुष्ट मन असते तशा मनातुनच अध्यात्म साधनेशक्य आहे. दुर्बल शरीर व अशक्त मनाच्याकडून काहीच अध्यम्मीक प्रगती शक्य नाही. असा इथे व्यक्त झाला आहे. त्यासाठीच विपरीत उपवास इत्यादी व्रत करणे शरीराला झिजवून हदयोग साधणेलासुद्धा बसवयोग प्रोत्साहन देत नाही.

रानात शोधायला तो काही झाड-झुडूप नव्हे
ओढ्यात शोधायला तो काही मासा, बेडुक नव्हे
देव्हदंड द्यायला तो काही कर्जदार नव्हे
अष्टघटकी शरीरात वास करणा-या देवाला
सरळ समजुन घे म्हणले अंबीगेर चौडैय्या (नावाडी चौडैया)

जंगलात राहून तप केल्यास किंवा ओढ्यात प्राणायाम इत्यादी अभ्यास केल्यास देवाचे अनुग्रह होईल, असे बसवयोग, सांगत नाही. शरीराच्या अष्ठघटकात असलेल्या आत्म्याचे स्वरूप समजणारा खरा शरण. म्हणून चौडैय्यानी सांगितले आहे.

५. देवाची कृपा

गुरू बसवेश्वरांच्या विचार वाहीनीत 'देव कृपेला अपार स्थान आहे' पांतजली योगासारखे इथे ‘परमात्मा न बोलवलेल्या अतिथीसारखा नाही. लिंगांगयोग’षस्थलसमग्र जीवनात सामावून देवकृपेविना काहीच साध्य नाही. हा शरणाचा अभिप्राय.

काहीजण 'देवकृपा व दैववाद याच्यातील फरक योग्यरितीने न समजता बसवेश्वरांनी पुरूषप्रयत्नालाच मानत होते " असे म्हणतात. दैववादातूनच आमच्या देशाची अधोगती झाली वास्तववादी बसवेश्वरांनी याला मानने शक्यच नाही, असे सुद्धा म्हंटले जाते, हा विचार योग्य की, अयोग्य आता आपण पाहू या.

सामान्यपणे भारतीय जन 'दैववादी' आहेत. प्रत्येक गोष्टीत दैव दैव म्हणून पुरुषप्रयत्नाना विन्मुख झाले. व प्रयत्नवादापासून दूर गेले. त्यामुळे साहसी न होता. आळशी बनले त्यातून परकीय दाश्यात जखडले गेले. पश्चिमात्यजन प्रयत्नवादी आहेत प्रत्येक कार्य पुरुषप्रयत्नाने होवू शकते असा त्याना अहंकार आहे. यातून ते आळशी न होता साहसी बनले नवनवीन भूप्रदेश शोधून ते ताब्यात घेऊन त्यावर सत्ता गाजवली. साम्राज्यशाही होवून इतराना दाश्यात ठेवून मिळविले. या दोन्ही संस्कृतीची विचारधारा अर्धसत्य आहे. त्यामध्ये एक फायदा असला तरी एक नुकसान आहे. दैववादाने मानव आस्तीक व नितीवान साधुप्राणी बनू शकतो हे फायद्याचे पण तो भित्रा बनतो हे तोट्याचे त्याच प्रमाणे पौरूषवादापासून मानव साहसी धैयशाली बनतो. हे फायद्याचे पण नास्तीक व आक्रमणशील हे तोट्याचे. दैववादही पाहीजे, तसेच प्रयत्नवादही पाहीजे म्हणून समन्वय दृष्टीने गुरु बसवेश्वरानी सांगीतले आहे. "तू केल्यान झाले असे म्हणत नाही कर्माला कर्मीच जबाबदार' असे सांगून दैववाद व प्रयत्नवाद या दोन्ही समन्वय केले आहेत. या दोन्हीलाच जीवनात सामावून घेतल्यास आपले जीवन स्वत:ला व इतरांना आदर्श होते. यातून समतोलाचा समाज बांधू शकतो.

दैव म्हणजे काय ? विधी, अदृष्ठ, इत्यादी नावाने ओळखले जाणारे हे दैव मार्ग आपण केलेले प्रयत्न व कार्याचे परिणाम आहे. 'Fate is nothing but the collective force of one's own action's performed in the pastlives' दैव म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या कर्माची एक संग्रहीत शक्तीच आहे. आम्ही होडीत बसून नदी पार करायची आहे. होडीत बसून जाताना नावाडी वल्हे मारत असतो, पण आमची होडी सरळ पैलतीरी न पोचता, प्रवाहाच्या रेट्यामुळे होडी खालच्या दिशेने जाऊन किना-याला लागते. त्या प्रवाहाच्या रेट्याप्रमाणेच दैव असते. वल्हे मारणेच पुरुषी प्रयत्न वल्हे मारणे सोडुन दिल्यास प्रवाहाच्या रेट्याने बुडून जावे लागते. प्रवाहाच्या रेट्याप्रमाणे आमच्या जीवनात एक अव्यक्त शक्ती काम करत असते, ती शक्तीच दैव किंवा नशीब.

आमच्या मागच्या जीवनातील कर्माचे संग्रहीत शक्तीच दैव म्हटले तरी घडून गेलेल्या घटनाना संबशीत असल्यामुळे हे दैव फार बलशाली दिसून येते. त्याच्यापूढे मानव हतबल होतो.

मागच्या जन्मीच्या कर्माचा दबाव झालेले दैव व मानवी प्रयत्न या दोन्हीपेक्षा शक्तीशाली आणखी एक तत्व आहे. ते म्हणजे देवकृपा माणसाचे प्रबळ संस्कार मागील जन्माचे कर्म विधी अदृष्ट या सर्वांपेक्षा प्रभावी होवून कार्य करणा-याला दैवी कृपा म्हणतात. परिशुद्ध मनापासून केलेल्याप्रार्थना व पूजेला प्रसन्न होवून अनुग्रह केल्यास प्रवाहाच्या झोतात सापडलेल्या गवताच्या काडीप्रमाणे दैव वाहून जाऊन त्याचे संपूर्ण भविष्यच बदलून जाते. अशी देवकृपा नसल्यास काहीच साध्य होत नाही. त्यासाठी साधक सर्व प्रयत्न करून अनुग्रहाच्या क्षणासाठी सहनशीलतेने वाट पहातो असे अक्कमहादेवीनी आपल्या वचनात सांगितली आहे.

शोधून दमल्यास नाही, इच्छेने शिरल्यास नाही
तप केल्यास नाही
ते येण्याच्या कालविणा येत नाही
देव कृपेविणा काही होत नाही
चन्नमल्लिकार्जुनाची माझ्यावर झाल्यामूळे
मी श्री बसवेश्वरांचे चरण पाहून
नमो, नमो, म्हणत आहे. -- अक्का महादेवी वचन २०

सामान्य लोक सुद्धा कशालाही असो वेळ यायला पाहीजे. ती वेळ आल्याशिवाय आम्ही काही केले तरी शक्य नाही. सामान्यजनांच्या वाणीत सुद्धा एक अर्थ आहे. त्यालाच आक्का महादेवींनी आपल्या वचनात मार्मीकपणे सांगीतले आहे. शोधून दमल्यास इच्छा करून शिरल्यास तप केल्यास आमची संकल्पसिद्धी न होता, ते आपली योग्य वेळ आल्यास किंवा परमात्म्याची कृपा झाल्यावरच शक्य आहे. हे आक्काचे अभिमत आहे. सृष्टीकरता लिंगदेवाची कृपा फार गरजेची आहे. म्हणून आक्काने आपल्या अनुभवातून समजून घेतले आहे. एका निर्दिष्ठ वेळेतच फळपिकत असते त्याला त्या वेळेपूर्वीच दाबून प्रयत्न करणे जसे योग्य नाही तसेच देवानुग्रहाच्या महाकाळात घडणा-या घटनेची सहनशीलतेने वाट पहावी.

देवाच्या कारूण्याच्या कवचात साधकानी आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे त्यात हिंम्मत हरू नये. साधक आतूर होणे स्वाभावीक आहे. परंतू त्यातून फार दमछाक होते. श्री योगी अरविंदानी सुद्धा दैवी कारुण्याबाबत असे म्हटले आहे.

The true movement is a pure aspiration and surrender. After all one has not a right to call on the Divine to manisfest himself; it can come only as a response to a spiritual or psychic state of consciousness or to long course of sadhana rightly done or if it comes before that or without, any apparent reason it is a Grace ; but one cannot demand or compel Grace. Grace is something spontaneous which wells out from the Divine counciousness as a free flow of its being. The Bhakta looks for it but he is ready to wait in perfect reliance, even if need be, all his life knowing that it will come, never varying in his Love and Surrender because it does not come now or soon.

परिशुध्द झालेली आकांक्षा व सर्व समर्पणच दैवी शक्ती पावणे शक्य आहे. देव शक्ती उतरून व्यक्त व्हायलाच हवी म्हणून बोलवण्याचा अधिकार कुणालाही नाही. तिव्र अध्यात्मीक असाही किंवा निरंतर केलेल्या साधने मुळे ते व्यक्त होवू शकते. साधक दैवी कृपेसाठी परमात्म्यावर संपूर्ण विश्वास ठेवून वाट पहात असतो. तरीही नाही आल्यास, त्याच्यावरील श्रध्दा व प्रेम कमी होत नाही.

बसवादी शरणांनी सांगितलेला. लिंगयोग, सेश्वरवादी योग असून देवकारूण्याला, प्रमुख स्थान दिले आहे, याबाबत मग्गेमायी देवानी, असे सांगितले आहे की, मोक्षप्राप्ती करुन घ्यायची असेल तर, नुसत्या ज्ञानाने, नुसत्या आचरणाने नुसत्या विश्वासाने साध्य होणार नसून किंवा त्या विषयावर नुसत्या बोलण्याने शक्य नाही. फक्त परमात्म्याच्या कृपेमुळे मुक्ती मिळेल. असे बरयाच शरणसंतानी परमात्म्याची कृपा मिळवून त्याच्यात सामावलेले आपण पहातो. महायोगी श्री अरविंदानी आपल्या पूर्णयोगात देवकृपेला अग्रस्थान दिले आहे.

६. शरणागती

देवकृपेशी दृढ संबंध जोडलेले तत्वच शरणागती. परमात्म्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यात अन्य शरणागती असली पाहीजे. असहनशीलता अविश्वास, दौर्बल्य असल्यास लिंगदेवाची कृपा होणे शक्य नाही. शरणागतीला एकप्रकारचा विधिवाद किंवा निष्क्रीयता म्हणून अर्थ करणारे सुद्धा आहेत. असा अर्थ काढणे चुकीचे आहे. विधीवादात अज्ञान भरून उरत असते. शरणागतीत प्रज्ञा विवेक भरलेला असतो. विधीवादात मी असहायक असा भाव असून प्रयत्नाची उर्मी मेलेली, असते. शरणगतीमध्ये परमात्म्याची कृपा मिळणारच असा आत्मविश्वास असतो. लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण प्रामाणीक प्रयत्न असतो. देवावर पूर्ण विश्वास असून, तुला जेव्हा वाटेल तेंव्हा कृपा कर ती मी स्विकारे असा निलिप्त भाव असतो. वैराग्यनिधी आक्का महादेवीनी असे म्हंटले आहे की,

अष्ठ विधार्चना करुन विनवावे
तर तु बहीरंग व्यवहाराला दूर आहेस
अंतरंगात ध्यान करुन विनवावे तर
तु वाक् मनाला दूर आहेस
जपस्तोत्रातुन विनवावे तर
तु नादातीत आहेस
भावज्ञानातुन विनवावे तर
तु सर्वांग परिपूर्ण आहेस
हे पिता तुला विनवणे शक्य नाही
तु जेव्हा प्रसन्न होशील तेच सुख आहे
चन्नमल्लिकार्जुना --आक्का महादेवी

किटक स्वत:च्या प्रयत्नाने भुंगा होऊ शकत नाही. मुंग्याला करुण येऊन किटकाला उचलुन नेऊन कोषात ठेवुन दंशाने आपल्यासम करुन घेतो. त्याचप्रमाणे आक्का महादेवीनी संपुर्ण शरणागत होऊन असे म्हटले आहे.

अष्टविध्यार्चन करुन परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी केलेला प्रयत्न निष्फळ झाला असेल. कारण ही सर्व बाह्य पुजा आहे. परमात्मा बहिरंग व्यवहाराला दुर असल्यामुळे यातुन शक्य झाले नाही. अंतरंगात ध्यान करुन विनवण्याला इच्छुन आक्का निराश झाली आहे. कारण लिंगदेव हा वाक्मनातुन दूर आहे. वामनाने न सापडणा-याला मनात ध्यान करुन कसे विनवणे शक्य होईल जपस्त्रोत करुन गाऊन प्रशंसा करुन आक्का थकली आहे. कारण देव नादातील आहे. बुद्धीने, तर्काने समजणे शक्य नाही. कारण बुद्धीला अतित आहे. हदयकमलात झाकुन ठेवणे शक्य नाही. कारण परमात्मा सर्वांग परिपुर्ण आहे.जे खंडीत आहे त्याला एक स्थानी व कालात ठेवता येते. पण विश्वंभर आतोप्रोत होऊन उरलेला विश्वातीत धनवस्तूला सीमीत करता येत नाही. हे सर्व प्रयत्न करुन त्याला विणवने शक्य नाही म्हणून आक्का महादेवी पूर्ण शरणाग झाली आहे. असा भाव त्यंच्यावरील वचनात प्रकट झाला आहे.

श्री योगी अरविंदानी सुद्धा आपल्या पूर्ण योगामध्ये शरणागतीला महत्वाचे स्थान दिले आहे.

"It is necessary it you want to progress in your Sadhana that you should make the submission and surrender of which you speak sincere real and possible"

"तुझ्या साधनेत तुला पुढे जायचे असेल तर ज्यासाठी तु निष्ठेने श्रमुन प्राप्ती करु इच्छीत आहेस त्या सत्याला संपुर्णपणे शरणागत व्हायला पाहीजे"

"It is ego and desire that prevent surrender. If there is no surrendr, there can be no transformation of the whole being. Absolute sincerity can make the determination of surrender rapidly effective"

आशा आणि अहंकार शरणागताला अडथळा आणणाच्या दोन प्रबळ शक्ती आहेत. शरणागतीशिवाय साधकाच्या पूर्ण व्यक्तीत्वात लिंगांग योगाचे प्रमुख लक्षण परिवर्तन शक्यच नाही. परिपूर्ण प्रामाणीकतेने असलेली अचलनिष्ठा ही शरणागतीला प्रभावयुक्त व त्वरीतगतीने साध्य होण्यासारखे असते.

"A complete surrender is not possible is so short a time for a complete surrender means to cut the knot of the ego in each part of the being and offer it free and whole to the divine"

'संपूर्ण शरणागती केवळ काही अल्प काळात येणे शक्य होणार नाही, कारण आमच्या कणाकणात असलेले अहंकाराचे गाठोडे कातरुन ते निरहेतुकपणे दैवी शक्तीला सोपवावे लागते. अरविंदाश्रमाच्या पुज्य माताजींनीसुद्धा शरणागतीची अशी सांगीतली आहे.

"True surrender enlarges you it increases your capacity it gives you greater in quality and quantity which you could not have had by yourself”

खरी शरणागती तुझा विकास करते, तुझ्या स्मरणशक्तीला वाढवते तुझे तू मिळविणे शक्य नसल्याची शक्ती, प्रमाणात व गुणातही आधीक वाढवते.

" The true lasting queintness in the vital and the physical as well as in the mind comes from a complete consecration to the Divine : for when you can no more call anything not even yourself yours when every thing including your body sensations feelings and thoughts belong to the divine the divine takes the entire responsibility of all and you have nothing more to worry about"

देहीक व मानसिक अत्यंतीक शांती अभावी म्हणजे दैवीशक्तीत सर्वार्पण भाव व भक्ती अत्यंत आवश्यक आहे. कारणतुझेपण सर्व घालवल्यानंतर तुझे सर्वस्व म्हणजे देह भावना इंद्रिय विचार सर्वच दैवि शक्तीला अर्पण करुन दुर राहील्यास त्या दैवी शक्तीलाच सर्व जबाबदारी पेलावी लागते तुला या सर्व त्रासापासून मुक्ती लाभते.

असाच भाव व्यक्त करणारे श्री रामकृष्ण परमहंस यांची एक गोष्ट अशी आहे की,'' हे माते मी यंत्र, तू यंत्र चालीका मी रथ तु रथ चालीका तू फिरवशिल तसे मी फिरणार, तु करवशील तसे मी करणार.''

परमात्म्याची करुणाा न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे अंहपणाचा अंश साधकात शिल्लक असणे. देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. तू काहीही कर ‘मार किंवा तार'' हा तुमचा धर्म म्हणून स्वताच स्वताला समर्पन केल्यासा देवकृपा पाहुण येते. तो एक नदीप्रमाणे वाहत येऊन जीवनात अनुभवाची हिरवळ भरते.

७. मुक्तीची हाव

शरणागतीबरोबरच साधकात असावा लागणारा महत्वाचा अश देवकृपेसाठी उत्कट हाव म्हणजे केवळ बुद्धीने बोलवायचे नव्हे तर हदयाच्या अंतरातल्या हाकेतुन बसवेश्वरांनी दिलेल्या वचनसाहित्यात देवासाठी भक्तानी अनुभवलेली व्याकुळता अत्यंत हदयस्पर्शी आहे.

बाप्पा कोवळे वासरु आईला शोधून थकल्या सारखे
मी तुम्हाला शोधून थकलो आहे
बाप्पा तुम्ही माझ्या मनाला प्रसन्न करुन
अनुग्रह करा तुम्ही मनाला
आश्रय होऊन अनुग्रह करा
असे तुम्ही कल्याण करा
हंब्बा ... हंब्बा.... कूडलसंगमदेव --धर्मगुरू बसवेश्वर १०१५

कोवळ्या वासराला भुक लागली आहे. चरायला गेलेली गाय अजुन घरी आली नाही. पोटाची भुक एकीकडे दुसरीकडे आईची आठवण तेव्हा ते कोवळे वासरु, हंबा.. हंबा.. आईला बोलावण्याची रीत हदयभेदक असते, या जीवात्म्याची सुद्धा हीच अवस्था झाली आहे. आत्म्याची भुक एकीकडे तर परमात्म्याची आठवण दुसरीकडे.

सागरातल्या शिंपल्याप्रमाणे
मी तोंड वासून वाट पहात आहे
तुमच्या विणा कोणी नाहीत माझे
कूडलसंगमदेवा तुमच्यावीणा नाहीत कुणी
आश्रय देणारे --धर्मगुरू बसवेश्वर ५५

समुद्रातील शिंपला जसे स्वाती पावसाच्या थेंबाच्या वाट पहात असतो. तसेच या संसार सागरात पोहणारा जीवरुपी शिंपला, देवाच्या करुणारुपी थेंबाची वाट पहात असतो. कारण, मोती होण्यासाठी स्वातीच्या थेंबाशिवाय इतर पाण्यात असत नाही. तसेच जीवाला मुक्ती देण्याचे सामर्थ्य लिंगदेवाशिवाय इतर कुणालाही नाही. त्यासाठी गुरु बसवेश्वरांनी सागरातील शिंपल्याप्रमाणे देवाच्या करुणेसाठी विनंती केली आहे.

बाप्पा सांग तू का आला नाहीस ?
तु आला न आल्यामुळे मी दगड झाड झालो
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना तु ये
तुमचा धर्म सांगा --सिध्दरामेश्वर वचन ६४६

सोलापुरच्या सिद्धरामेश्वरांनी, आपल्या या वरील वचनात, परमात्म्याला विनंती केली आहे की, हे देवा तु न आल्यास मी जडवस्तू होईन तुम्ही येऊन माझ्यात चैतन्य भरावे.

अबब ! देवा तुला करुणा नाही.
अबब ! देवा तुला थोडीसुद्धा कृपा नाही.
का घातलेस जन्माला इह लोकीच्या दुखीला ?
का घातलेस जन्माला परलोकाहुन दूर ?
का घातलेस जन्माला लिंगदेवा
माझ्याशिवाय कुठे झाडेझुडपे नव्हती का? --धर्मगुरू बसवेश्वर ६४

मुल मातेवर रुसुन ज्याप्रमाणे खाऊ मागते, तसेच गुरु बसवेश्वरांनी देवावर थोडे रुसुन, त्याची कृपा मागीतली आहे.

बाप्पा तु माझा गुरू झाल्यास
! मी तुझा शिष्य झाल्यास
माझ्या कायेचे कर्म घालवून
माझ्या इंद्रियांचे गुण मिटवून,
माझ्या प्राणाचा स्वभाव थांबवुन
तु माझ्या शरीरात लपून तु माझ्या प्राणात लपून
तु माझ्या तळहाती येऊन अनुग्रह कर गुहेश्वरा --अल्लमप्रभु

जगद्गुरु अल्लमप्रभुदेवांनी परमनिरंजन गुरुला शरण जाऊन त्यांच्या करुणेसाठी वरीलप्रमाणे मागणी केली आहे. शरीर, इंद्रिय, प्राण यांचा त्रास थांबवुन तु माझ्या शरीर प्राणात इष्ट, प्राण भावलिंग होवून माझ्या करस्थळी येऊन अनुग्रह करा म्हणून विनंती केली आहे.

जीव सरिता

परमात्म्यासाठी हा जीव अशा रीतीने का तळमळतो ? शक्ती विशिष्टाद्वैत सिध्दांतानुसार सर्व जीवात्मे परमात्म्यापासुनच आले. त्यासाठी त्याच्यात सामावण्यापर्यंत समाधान नाही. याला समुद्रात विलीन होण्यासाठी वहात जाणा-या नदीचीच उपमा योग्य आहे. पाण्याची जननी सागरच आहे, म्हणून वेगळे सांगण्याची गरज नाही. कोणत्याही कारणाने पाण्याचा एक थेंब समुद्राला सोडून बाहेर आल्यावर ते पुन्हा आपल्या जननीत सामावण्यापर्यंत समाधान किंवा विश्रांती नाही सुर्यकिरणाने समुद्राचे पाणी तापुण वाफ होऊन आकाशात तरंगले तरीसुद्धा आपले माहेर समुद्रासाठीच तळमळत असते.

थंड वारा सुटताक्षणी फार दिवसापासुन न भेटलेल्या दोन बहिणी एकमेकांना मिठी मारल्याप्रमाणे ढग एकमेकांना भीडुन मी पुढे तु पुढे म्हणुन जमिनिवर कोसळतात. समुद्राला सोडलेले पाण्याचे थेंब घन, द्रव, वाफ, बर्फ व दहीवर कोणत्याही रुपात असो कोणत्याही ठीकाणी असो, तरी आपल्या माहेरी (समुद्रात)जाण्यासाठी सतत तळमळत असते. नदी वहात असताना मध्ये टेकडी, डोंगर आडवे आल्यास त्यांना छेदुन किंवा बाजु देऊन जाते. जीवनातील आशा, आकांक्षा सोडून उंच पर्वतावरुन धबधबा खाली कोसळतो त्याच्या मार्गात कोणी आडवे येत नाही. कोणतीही शक्ती त्याला आडवु शकत नाही सर्व कष्ट, अडथळे, ओलांडून स्वताचा एक राजमार्ग शोधुन ओडा, नदी होऊन एखाद्या गंभीर राजकुमारी प्रमाणे वहात सागरात सामावते.

समुद्रापासुन वाफ होऊन निघालेले पाणी, आकाशात गेले तरी समुद्रात सामावण्यापर्यंत अविश्रांतपणे जसे वहात असते. तसेच चित्शक्तीतून बाहेर पडलेला, चिंदशिक जीवात्मा काहीवेळ या मर्त्यलोकात रहात असुन सुद्धा त्या देवांच्या आश्रयासाठी तळमळत असतो देवाची तळमळ असणारच खरा शरण. असे अनेक शरण देवासाठी तळमळणारे आपण पहात असतो.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंगाची अवशक्ता लिंगांग योग व अनुभव Next