इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा व धार्मिक समानता | इष्टलिंग पूजा, देवाची पूजा |
'इष्टलिंग' जात्यातीत (जातिविहीन) चिन्ह |
✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि
'इष्टलिंग' हे अनेक लिंगायत, लिंगायतेतरांच्या अभिप्रायानुसार, 'जातीय’ चिन्ह नाही ! मानवा, मानवात जातीभेद करणे हा गुन्हा आहे! व्यक्ती, जातीमुळे मोठी होत नाही! आत्मज्योतीने मोठी होते. म्हणून पटवून देणारे चिन्ह! भारताचा राष्ट्रध्वज, जसा कोणत्याही जातीमतांचे चिन्ह नसून, स्वतंत्र प्रजाप्रभुत्ववादी, राष्ट्राचे सार्वभौमत्वाचे प्रतिक आहे, त्याच प्रमाणे ’इष्टलिंग', हे जात्यातीत, धर्मसहीत, समतावादी, राष्ट्र निर्माणाचे प्रतिक आहे!
आरशात बघायला कोणत्याही, जात, मत, पंथ, यांचा अडथळा नाही, बघणा-यांचा हक्क, आहे ते एक बघण्याचे साधन आहे! त्याचप्रमाणे, इष्टलिंग 'दर्पण', हे देवाला पहावे, अध्यात्मीक क्षेत्राची दिव्यानुभुती मिळावी, स्वरुप साक्षात्कार करुन घ्यावे, म्हणणा-यांचा हक्क व साधनसंपत्ती आहे !
रत्न खचित सोन्याची साखळी कापूसकाठी बांधण्यासाठी उपयोग केल्यास, हसावे की रडावे ? अशाच प्रकारे, उद्दांत उद्देश घेऊन जमलेल्या बसवेश्वरांच्या जीवनाच्या साधनेची श्रेष्ठ त्त ’देणगी’ असलेल्या इष्टलिंगाला केवळ एकच जात बांधण्यासाठी, वापरुन सीमीत केल्यास, त्या चिन्हालाच नाही, तर ते चिन्ह दिलेल्या बसवेश्वरांनाच अपमानीत केल्यासारखे आहे !
धर्माचे रक्षण करुन, जातीचे निर्मूलन करणारी, वैचारीकता वाचून, अंधश्रध्दा टाळण्याचे, वर्ण, वर्ग, लिंग, व जातीभेद न करता, सकलानांच उध्दरण्याचे, सर्वोत्कृष्ठ, समानतेचे, चिन्ह, इष्टलिंग आहे !
हिंदू समाजाला, एकूण भारतीय समाजाला, बिघडवलेले, प्रमुख कारण, बहु देवतोपासना, वर्ग (वृत्ती) भेद, आणि वर्ण (जाती) भेद, सृष्टीकर्ता परमात्म्याला, विकृत, रुप देऊन, त्याच्या पावित्र्याचा नाश केली असून, जनमानसात अती अंधश्रध्दा, बहुदेवतोपासना, मुळे, वाढली आहे! जन्मावर आधारीत जात निरर्धारीत केल्यामुळे, व व्यवसाय भेद केल्यामुळे समाजात विभागणी झाली होती. जातीभेद व वर्णभेदाला एकाच अस्त्राद्वारे निर्मूलन करण्यासाठी, ’समाज विज्ञानी', 'बसवेश्वरानी', इष्टलिंगाची निर्मिती केली !
'रेल्वे’, ‘फोन’, ‘दुरदर्शन', ही वैज्ञानीक क्षेत्रात, जशी उत्कृष्ठ 'शोध', किंवा 'देणगी', त्याच्याही पेक्षा इष्टलिंग हे श्रेष्ठ आहे ! तात्वीक, अध्यात्मीक, यौगीक, अर्थ असलेले इष्टलिंग, जात, मत, पंथाचा भेद न करता, सर्वाना सामावून घेणारे प्रतिक ही, बसवेश्वरांचे कडून, अखिल विश्वाला महान देणगी आहे. यात आतिशोक्ती नाही. वास्तवीकता, समजून घेण्याची असेल तर, पुर्वग्रह पीडीत न होय.
Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.
इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा व धार्मिक समानता | इष्टलिंग पूजा, देवाची पूजा |